Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाल में सर्दी-खांसी की दवा से बच्चों की मौत, FDA ने दवा बिक्री रोक दी

SRSHRIKANT RAUT
Oct 13, 2025 09:47:23
Yavatmal, Maharashtra
मध्य प्रदेश मध्ये कफ सिरप मुळे लहान मुलांच्या मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ मध्येही एका लहान मुलाचा मृत्यू सर्दी-खोकल्याच्या औषध सुरु असताना झाल्याने खळबळ उडाली आहे. एफडीए ने रुग्णालयाच्या मेडिकल मधून औषधीचे नमुने तपासणीसाठी पाठविले असून खबरदारीचा उपाय म्हणून या औषधांची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. या औषधी मुळे शिवम ला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. बाळाचा व्हिसेरा रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला, तर इतर अवयव हिट्रॉपॅथालॉजीकडे तपासणीला दिले आहे. आरोग्य विभागाचे पथकही शिवमच्या घरी पोहोचले. सर्दी-खॅंख्याची औषधी घेत असतानाच अचानक शिवम चा मृत्यू झाल्याने धक्का बसला असून तपासणीत काय खरे आहे ते समोर यावे अशी अपेक्षा कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Oct 13, 2025 11:23:07
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Oct 13, 2025 11:19:20
Yeola, Maharashtra:अँकर:- येवला तालुक्यातील सोमठाण देश येथील संशयित आरोपी प्रमोद कचरू सोनवणे याने आपल्या सावत्र भावाचा खून करण्यासाठी अहिल्यानगर येथील सराईत गुन्हेगारांची टोळी बोलावली होती यावेळी गौरव दत्तू सोनवणे यांना मारहाण होत असताना पोलिसांना खबर मिळाली होती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आठ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातील गावठी कट्टा कोयता ताब्यात घेतला आहे यावेळी नाशिक जिल्ह्यात सुरू झालेली नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम येवल्यात देखील यशस्वी ठरली असून पोलिसांनी आरोपींच्या तोंडातून हा मंत्र वदवून घेतला आहे बाईट :- बाळासाहेब पाटील - पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Oct 13, 2025 11:18:52
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 13, 2025 10:52:09
Nashik, Maharashtra:जयंत पाटील यांच्याबाबत नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया जे काल परवा काही बोलले असतील जमीन जुमला च्या बाबतीत किंवा स्टडी च्या बाबतीत आरोप करत असताना काही आधार असेल आरोप केला असेल माहित नाही पण ज्या पद्धतीने ते भाषा वापरतात मागच्या वेळेला जसं बापूंच्या याच्यावर बोलले होते ते बोलणं बरोबर नाही त्यामुळे भाषा वापरताना इतरांना कोणाला त्यांना तर दुखावलं जाईलच पण इतर समाजही दुखावला जातो मागच्या प्रतिक्रिय आता तशा खराब होत्या माझ्यासहित बोलताना थोडसं तारतम्य ठेवलं पाहिजे आंबेडकर मुस्लिम वक्तव्य ते काय अभ्यास करतात कशाच्या आधारावर बोलतात मला ते सांगता येणार नाही मलाच नाही तर समाजात सहसच चर्चा होते तुमचं राजकारणी लोकांचं म्हणजे सरळ एकत्र केलं जात आहे की तुमच्या भाषेवर प्रभुत्व राहिलेलं नाही भाषेला कुठला तार मिळेल राहिलेला नाही फार खालच्या पातळीला बोलणं बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण पातळी सोडून जाऊ नये अशा पद्धतीची चर्चा होते
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 13, 2025 10:47:09
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 13, 2025 10:45:35
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्व दुर्लक्ष करण्यासाठी राज्यात वेगवेगळे वाद निर्माण केले जात आहेत - राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यासाठी सरकारकडुन वाद उकरून काढतात, कधी आय लव मोहम्मद, कधी आय लव महादेव आणि आणखी काही, यासाठी सरकारक मार्फत काही लोकांना नेमण्यात आले आहे,असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर केलाय.सरकारकडून नेमण्यात आलेल्यांमध्ये राम कदम,गोपीचंद पडळकर,सदाभाऊ खोत अशा पाच-सात लोकांचा समावेश असून त्यांच्याकडून वाद निर्माण केले जातात,असे देखील राजू शेट्टींकडून स्पष्ट करण्यात आला आहे,ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 13, 2025 10:34:00
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठा आरक्षण विषययावरून आज संभाजी नगरात मराठा क्रांती ठोक मोर्चा ने आपली भूमिका जाहीर केली, आरक्षण विषय संपला नाही जरांगे च्या आंदोलनातून अवघे 10 टक्के लोकांचा प्रश्न सुटलाय मात्र 90 टक्के लोकांसाठी लढा सुरू राहील असे सांगत नव्या आंदोलनाची घोषणा केली, मात्र या सगळ्यातून आता जरांगे अडचणीत येतयात हे मात्र स्पष्ट होताय.. पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट.. जारांगेच्या आंदोलनाचा अवघ्या 10 टक्के लोकांना फायदा ! मराठा क्रांती ठोक मोर्चाची जरांगे विरोधी भूमिका ? आरक्षण साठी आता दिल्ली दरबारी उपोषणाची घोषणा मराठा आरक्षणाहुन अजूनही घमासान सुरुय, हैद्राबाद गॅजेट हुन समाजाला भरपूर मिळाल्याचा दावा जरांगे पाटील करताय, मात्र यातून फारसे काहीही साध्य झाले नाही असे सूर आता उमटायला लागले आहेत, संभाजी नगरात आज मराठा क्रांती ठोक मोर्चाने पत्रकार परिषद घेत आरक्षण प्रश्न सुटला नसल्याचे सांगत दिल्ली दरबारी दिवाळी नंतर उपोषण आणि या आंदोलन करण्यात येईल असे भूमिका जाहीर केली.. जरांगे च्या आंदोलनातून फक्त नोंदी असलेल्याना कुणबी प्रमाण पत्र मिळतील मात्र बहुसंख्य मराठा समाज यापासून दूर आहे अवघ्या 10 टक्के लोकांना फायदा झाल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले , आणि सरकारला आंदोलनाचा इशारा देण्यात आला..
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 13, 2025 10:21:38
Akola, Maharashtra:अकोल्यात प्रधानमंत्री ई-वस सेवा योजनेंतर्गत ई-सिटी बस डेपोचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत अकोल्यात ४२ ई-बस सेवा नववर्षात कार्यान्वित होणार आहे. १० कोटी ९७ लाख रुपयांच्या या प्रकल्पास शासनाने मान्यता दिली असून, त्यात केंद्र शासनाचा ६ कोटी ५० लाख, तर राज्य शासनाचा ४ कोटी ४७ लाख इतका आर्थिक वाटा आहे. तसेच महानगरपालिका निधीतून २ कोटी ४४ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. एकूण ४२ ई-बसेस मंजूर असून, त्यापैकी २८ बस ९ मीटर लांबीच्या आणि १४ बस १२ मीटर लांबीच्या आहेत. सध्या इमारतीची पायाभरणी पूर्ण झाली असून, रस्ते व पार्किंग शेडचे काम अंतिम टप्यात, तर इलेक्ट्रिक सब-स्टेशनच्या उपकरण जोडणीचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे अकोल्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक होणार आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 13, 2025 09:50:21
Shirdi, Maharashtra:अत्याचाराच्या शंभर केसेसमध्ये शंभर महिला हिंदू सापडतात आणि सर्व आरोपी जिहादी असतात.. आपल्यातीलच काही मानसिक खतना झालेले लोक आरोपींना पाठीशी घालतात असे वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी केलंय.. संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.. यावेळी बोलताना संग्राम जगताप यांनी पुन्हा आपल्या शैलीत जोरदार टीका केली आहे.. जे हिरवे साप फणा काढतील त्यांना ठेचण्याची वेळ आली आहे.. या लोकांना वेळोवेळी माफ करण्याचे पाप आमच्यासकट अनेकांनी केले मात्र आता प्रायश्चित करण्याची वेळ आली आहे.. असे देखील आमदार जगताप यांनी म्हटलंय.. आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी अजित पवार
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 13, 2025 09:47:40
Yavatmal, Maharashtra:मध्य प्रदेश मध्ये कफ सिरप मुळे लहान मुलांचे मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ मध्येही एका लहान मुलाचा मृत्यू सर्दी खोकल्याचे औषध सुरु असताना झाल्याने खळबळ उडाली आहे. एफ डी ए ने रुग्णालयाच्या मेडिकल मधून औषधीचे नमुने तपासणीसाठी पाठविले असून खबरदारीचा उपाय म्हणून या औषधांची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. या जिल्ह्यातील पिंपळखुटी येथील शिवम गुरुनुले या सहा वर्षीय बालकाचा सर्दी खोकल्याची औषधी घेतल्यानंतर मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेश मध्ये कफ सिरप घेतल्याने बालकांचे मृत्यू झाल्यानंतर आता यवतमाळ मध्ये देखील असाच प्रकार घडल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. मृत शिवम ने यवतमाळ शहरातील बालरोगतज्ज्ञाकडून ४ व ६ ऑक्टोबर रोजी दोन दिवस औषध उपचार घेतले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बाळाची प्रकृती बिघडली. पालकांनी त्याला बालरोगतज्ज्ञाकडे नेले, त्यांनी शिवम ला शासकीय रुग्णालयात रेफर केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शिवम चा मृत्यू झाल्याने शवचिकित्सा केली. त्यानंतर एफडीएने संबंधित रुग्णालयातील मेडिकलमधून सहा औषधांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले आहे. तसेच राज्यात या औषधांच्या विक्री व वापरावर अहवाल येई पर्यंत बंदी घातली आहे. या औषधी मुळे शिवम ला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. बाळाचा व्हिसेरा रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला, तर इतर अवयव हिट्रोपॅथालॉजीकडे तपासणीला दिले आहे. आरोग्य विभागाचे पथकही शिवमच्या घरी पोहोचले. सर्दी खोकल्याची औषधी घेत असतानाच अचानक शिवम चा मृत्यू झाल्याने धक्का बसला असून तपासणीत काय खरे आहे ते समोर यावे अशी अपेक्षा कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top