Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
कोल्हापुर जिल्हा परिषद के आरक्षण की ड्रॉ आज, उम्मीदवारों में उत्साह और नाराजगी
PNPratap Naik1
Oct 13, 2025 09:46:59
Kolhapur, Maharashtra
जिल्हा परिषद आरक्षण सोडत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठी आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोडत प्रक्रिया पार पडली. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पार पडली. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद निवडणुका झाल्या नव्हत्या त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच इच्छुकांचे लक्ष या सोडतीकडे लागले होते. यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग १८, खुला २०, खुला महिला १९, अनुसूचित जाती ४, अनुसूचित जाती महिला ६, अनुसूचित जमाती १ अशी सोडत पार पडली. तर पंचायत समितीच्या सभापती पदाची आरक्षण सोडत देखील आज निघाली यामध्ये सांगरूळ- पुरूष अनूसुचीत जाती हातकंणगले-अनुसुचित जाती महिला ओबीसी कागल-महिला चंदगड-पुरूष आजरा- महिलाओपण गागा बावडा- महिला शाहूवाडी-महिला शिरोळ-पुरूष *पन्हाळा :पुरूष* भुदरगड-महिला राधानगरी-पुरूष गडहिंग्गलज-पुरूष अशा पद्धतीने सोडत झाल्याने इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मनाप्रमाणे आरक्षण न पडल्यामुळे अनेक जण नाराज झाल्याचे देखील पाहायला मिळाले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Oct 13, 2025 13:15:21
Nagpur, Maharashtra:नागपूर सुधीर मुनगंटीवार, भाजपा नेते. - निवडणुकी अगोदर बैठक है त्यामुळे नाविन्य तुम्हाला वाटत आहे...., पण त्यात काही नाही... रोज वेगवेगळ्या ऑनलाइन बैठका होत असतात... आमच्या बैठका मन जिंकण्याचा दृष्टीने होत आहे... जनतेसाठी काय करू शकतो.... यासाठी काम करत असतो, जनता प्रसाद देईल तो गोड असों की कडू स्वीकारावा लागतो, आणि जनतेच्या हितासाठी पुढे जात काम करत राहावे लागते... - आज बैठकीत निवडणुकीवर चर्चा होईलच... पण आता शेतकरी संकटात आहे, यावर माहिती घेतली जाणार आहे.... 31 हजार 628 कोटींच पॅकेज कस शेतकरी वर्गापर्यंत पोहचवता येईन या दृष्टीने काम करायचे आहे... On दिल्ली अमित शाह बैठक - आम्ही मंत्रिपदासाठी काम करत नाही.. यापुर्वी केले नाही,15 वर्ष सत्ते बाहेर होतो.... सत्ताधारी लोकांनी आम्हाला आमिष दिले पण आम्ही मंत्री होण्यासाठी गेलो नाही...आम्ही विचारासाठी सेवेसाठी काम करतो, मंत्रीपदाची काम करत नाही.. आज उत्तर घेणारा है, जेव्हा उत्तर देणार होईल तेव्हा चांगल उत्तर होईल.... - दिल्लीत झालेली बैठक चांगली आणि ऊर्जा देणारी बैठक होती... गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक अशी सार्वजनिक करत नसते. On कांग्रेस आरोप (हिंदी) - "छोटी सोच आणि पाव की मोच" कधी कॉँग्रेसला पुढे जाऊ देत नाही... संघाचा विचारधारा आक्रमण करण्याचा प्रयत्न कॉंग्रेकडून झाला आहे., संघ परवानगी कार्यक्रम घेतो, संघ देशभक्तीच्या विचाराने काम करतो. समर्पण सेवाभाव घेऊन काम करतो.... On धंगेकर आरोप - त्यांचा आरोप काय मला माहित नाही... एका गुंडाच्या बाबतीत मत व्यक्त केलं.... एखादा गुंड असेल त्याची बाजू कुणाला घेता येणार नाही... तुम्ही सत्ताधारी असो ka विरोधक असो....तो गुंड माझ्या पक्षाशी संबंधित असला तरी त्याचा विरोध केला पाहिजे... धंगेकर यांनी गुंडाला विरोध केला भाजपला विरोध केला नाही. On संजय राऊत - विचाराची लढाई असू शकते.. उत्तम आरोग्य असावा उदंड आयुष्य लाभो हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना असते,उत्तम आरोग्य लाभावे अशी प्रार्थना आहे... On दिल्ली वारीची दिल्लीतील राजकीय वर्तुळात कुजबुज ? - आता देवेंद्र फडणवीस येणार आहे... कुठली जबाबदारी देणार आहे तुम्ही देवेंद्रजींना विचारून घ्या तुमच समाधान होईल, माझाही समाधान होईल असं मिश्किल उत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी दिले..
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 13, 2025 12:52:41
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 13, 2025 12:31:09
Satara, Maharashtra:सातारा तालुक्यातील सासपडे येथील १३ वर्षीय अल्पवयीन युवतीच्या हत्या केल्याप्रकरणी राहुल यादव या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी. या मागणीसाठी सातारा शहरात मोर्चा काढत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आर्या चव्हाण हिच्या मारेकऱ्याला फашीसारखी कठोर शिक्षा व्हावी, तसेच हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात yarnेव, अशी मागणी यावेळी पीडितेच्या नातेवाईकांनी केली. तर मागील वर्षभरापूर्वी झालेल्या आणखी एका युवतीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. याप्रकरणात देखील आरोपी राहुल यादव याचाच हात असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला असून त्याची देखील सखोल चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 13, 2025 12:30:52
Nashik, Maharashtra:Anch -घरामध्ये ब्रॉडबँड लावलेला असेल आणि सातत्याने त्याचा उपयोग घरातील सर्वजण मोबाईल साठी करत असतील तर सावधान... या ब्रॉडबँडच्या माध्यमातून तुमचं बँक अकाउंट पूर्णपणे साफ होऊ शकतो.. जळगाव मधील एका घटनेने व्हाट्सअप चा वापर करणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा समोर आलाय Vo 1 हे आहे जळगावातील एक तक्रारदार नीलेश सराफ.... यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप ॲपवर कस्टमर सपोर्टच्या नावाने एक एपीके फाईल आली. ऑटो डाउनलोड सेटिंग चालू असल्यामुळे ही फाईल आपोआप डाउनलोड झाली. या फाईलमुळे सायबर गुन्हेगारांना सराफ यांच्या मोबाईलचा 'ॲक्सेस' मिळाला. एकदा ॲक्सेस मिळताच, त्यांनी सराफ यांच्या खात्यातून एकामागून एक, तब्बल पावणेपाच लाख रुपये काढून घेतले. त्यामुळे खात्यात केवळ किरकोळ रक्कम शिल्लक राहिली. या प्रकरणी जळगावच्या या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Byte 1 अशोक नखाते अप्पर पोलिस अधीक्षक जळगाव GFX मोबाईल वापरतानातुम्हीही तुमच्या व्हॉट्सॲपची 'ऑटो डाउनलोड' सेटिंग बंद करा. अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या कोणत्याही फाईलवर क्लिक करू नका किंवा ती डाउनलोड करू नका. कायदेशीर कारवाईच्या उदा महापालिका ,RTO चलान,NHI toll कडून वा तत्सम विभागाकडून कुठल्याही नोटीस असलेल्या फाईल उघडू नये उत्सुकता ताणून धरणाऱ्या वा प्रलोभने देणारी आमिषे वा टास्क देणारी पोस्ट टाळाव्यात त्याच्या आहारी जाऊ नये Vo 2 प्रत्येक जण सध्या संवादासाठी व्हाट्सअप चा वापर करतो.. संवाद घरचा असो मित्रांचा असो की ऑफिसचा.. यासाठी सातत्याने व्हाट्सअप चा वापर केला जातो.. यामध्ये बऱ्याच वेळेस ग्रुप मध्ये बिनकामाचा संवाद व्हिडिओ फोटो मोठ्या प्रमाणात येतात.. अनेक ग्रुप्स आपल्याला ऍड करत असतात मात्र हे सर्व टाळण्यासाठी आपण कुठलीही गोष्ट डाऊनलोड करताना whatsapp च्या चॅट सेटिंग मध्ये केवळ वाय-फाय वर डाऊनलोड असे सेट करतो... उद्देश असतो मोबाईलचा डेटा वाचावा...त्यासाठी ऑफिसचा किंवा घरी ब्रॉडबँड असेल तर वायफाय ॲक्सेस घेऊन वापर होतो... इथेच मोठी चूक होतेय सायबर तज्ज्ञांनी याबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे Byte 2 तन्मय दीक्षित सायबर तज्ज्ञ Vo 3 महाराष्ट्रभर आणि देशात आजकाल सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. याचे एक मोठे कारण ठरते आहे आपले दुर्लक्ष ..आता गरज आहे प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 13, 2025 12:20:42
Washim, Maharashtra:वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागां साठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोडत काढण्यात आली यावेळी अनेक ठिकाणी कही खुशी कही गम असे चित्र बघायला मिळालं. यात अनुसूचित जातीच्या 11जागांसाठी, अनुसूचित जमाती करिता 4 जागांसाठी तर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गसाठी 14 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 23 जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.या आरक्षणात अनेकांच्या मनसूब्यावर पाणी फेरल तर तर दिग्गजांना नवीन पर्याय शोधावे लागणार असल्याचं या आरक्षणातून समोर आलं आहे. त्यामुळे आता जिल्हापरिषद निवडणुकीची खऱ्या अर्थाने रणधुमाळी पहावयास मिळणार आहे.आणि त्याच अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष आता उमेदवार निश्चित करण्यासाठी सज्ज होणार आहेत. वाशिम जिल्हा परिषदेचे 52 जागांसाठी आरक्षण.. अनुसूचित जाती महिला (६ ) पारवा गोवर्धन ब्राम्हणवाडा रिठद डोंगरकिन्ही भामदेवी अनुसूचित जाती सर्वसाधारण (५) अडोळी तोंडगाव उकळीपेन कवठा बु. कंझरा ........ अनुसूचित जमाती महिला..(२) मेडशी किन्हीराजा अनुसूचित जमाती सर्वसाधारण..(२). राजुरा शेंदुरजना ............ ना. मा. प्र. (OBC) महिला..(७) धनज बु. कुपटा कवठळ काजळेश्वर आसेगाव तिवळी कासोळा ना. मा. प्र. (OBC) सर्वसाधारण..(७) काटा पोहा मनभा जऊळका तऱ्हाळा गिरोली गोभणी ...... सर्व साधारण (महिला)...(११) इंझोरी आसोला खुर्द पोहरादेवी शेलू खुर्द पांगरी नवघरे हराळ चिचंबा भर पार्डी टकमोर तामसी अनसिंग वारला ........ सर्वसाधारण ...(१२) उंबर्डा बाजार कामरंगाव धामणी तळप बुद्रुक फुलउंबरी दाभा शिरपूर केनवड वाकद भर जहांगीर वारा जहांगीर कळंबा महाली .
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 13, 2025 11:23:07
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Oct 13, 2025 11:19:20
Yeola, Maharashtra:अँकर:- येवला तालुक्यातील सोमठाण देश येथील संशयित आरोपी प्रमोद कचरू सोनवणे याने आपल्या सावत्र भावाचा खून करण्यासाठी अहिल्यानगर येथील सराईत गुन्हेगारांची टोळी बोलावली होती यावेळी गौरव दत्तू सोनवणे यांना मारहाण होत असताना पोलिसांना खबर मिळाली होती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आठ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातील गावठी कट्टा कोयता ताब्यात घेतला आहे यावेळी नाशिक जिल्ह्यात सुरू झालेली नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम येवल्यात देखील यशस्वी ठरली असून पोलिसांनी आरोपींच्या तोंडातून हा मंत्र वदवून घेतला आहे बाईट :- बाळासाहेब पाटील - पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Oct 13, 2025 11:18:52
0
comment0
Report
Advertisement
Back to top