Back
कांग्रेस-ठाकरे युति के बीच महाराष्ट्र की राजनीति में महाविकास आघाडी मजबूत?
AKAMAR KANE
Dec 24, 2025 09:31:09
kolhapur, Maharashtra
नागपूर
बाईट - विजय वडेट्टीवार,काँग्रेस नेते -
On ठाकरे बंधू युती -
- आता नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून सगळ्यात मोठा भाऊ काँग्रेस ठरलेला आहे, हे आता सगळ्यांच्या पुढे आलेला आहे आणि त्यामध्ये काँग्रेस आघाडी न करता लढली होती आणि *त्यात मिळालेली एकूण मत आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील किंवा नगरसेवक असतील या दोन्ही पक्षापेक्षा अधिकच यश आम्हाला मिळालं*
- *यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आणि भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडी न करता लढण्याची आहे*
- मुंबईत दोन भाऊ एकत्र येत असतील तर नक्की आम्हाला आनंद आहे, एक कुटुंब एकत्र येऊन निवडणुकीत एकत्र लढत असतील त्यामध्ये आम्हाला दुःख होण्याचं काही कारण नाही
- आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना या निवडणुकीत यश मिळो अशी भावना सुद्धा आम्ही व्यक्त करतो
- पण *एक लक्षात घ्या काँग्रेसची पूर्वीपासूनची भावना आहे मनसे बरोबर जाण्याची नव्हती, शिवसेनेसोबत जाण्याची आणि शरद पवारांसोबत जाण्याची कालही भावना होती आणि आजही आहे*
(On मराठी माणूस चुकला-- उद्धव ठाकरे )
---- महाराष्ट्रावर मराठी माणूस काय विचार करून तो निर्णय घेईल पण मराठी माणूस महाराष्ट्रात भाषेवर आणि प्रांतावर अतिक्रमण चाललेल आहे
- *मी काँग्रेसचा असलो तरी ती वस्तूस्थिती आहे*, *मुंबई बळकावण्याचा मुंबईवर वर्चस्व निर्माण करून मुंबई गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे*
- मुंबईची वाट लावण्याचा काम, मुंबईच्या जमिनी गिळंकृत करण्याचं काम आणि मुंबईवर पूर्ण कंट्रोल करण्याचा जे दिसते ते गुजरातच दिसतोय
- म्हणून *मराठी अस्मिता, मराठी माणसाच्या हक्काचा संरक्षण करायचा असेल तर मराठी माणसाच्या पाठीमागे उभा राहिल पाहिजे ही त्यांची आणि आमची ही भावना आहे*
(On उद्धव ठाकरें लोकसभा)
- महाविकास आघाडी, इंडिया आघाडी म्हणून जे भाजपच्या विरोधातील पक्ष होते त्यांची मोट बांधण्याचा काम झाला होता
- इंडिया आघाडीचे ते आजही सदस्य आहेत, लोकसभा विधानसभा निवडणुकीचा संबंध स्थानिक स्वराज्य संस्था सोबत जोडणे याचे उत्तर आमच्याकडे नाही
- या स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, तो निर्णय स्थानिक पातळीवर घ्यायचा असतो त्यामुळे आघाडी किंवा इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीला कुठेतरी धक्का लागतोय असं काही मांडण्याचं कारण नाही
(On उद्धव ठाकरे -महाविकास आघाडी अबाधित) -
--- उद्धवजी जे बोलले ते बरोबर बोलले.. महाविकास आघाडी म्हणून मी त्याचा उत्तर दिले आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रच आहोत
(On ओपन स्पेस - )
--- आमच्याकडून तो विषय संपलेला आहे,मुबंईत काँग्रेस आणि वंचितला घेऊन आम्ही लढण्याचा विचार झाला आहे त्यामुळे तिथे पुन्हा फार काही स्कोप आहे असं वाटत नाही
(On वंचित - जागा)
- जागा मागण्याचा अजून काही ठरलेलं नाही जो काही प्रस्ताव दिला तो काही अर्ध्या-अर्ध्याचा प्रस्ताव नाही, अनेक ठिकाणी आघाडी करण्यासाठी किंवा युती करण्यासाठी बोलणे सुरू आहे आणि अंतिम टप्प्यात आहे. पण 50-50 फॉर्मुला कुठेही वंचित ने दिलेला नाही
(On अकोला वंचित - )
- जे काही आमचे परमनंट युती किंवा लोकसभा किंवा विधानसभेपासून आलेली नाही. राजकारणात आघाड्या बनवूनच निवडणुका लढल्या जातात त्यामुळे वंचित ने अकोल्यात काय भूमिका घेतली तर, महाराष्ट्राची युती आहे म्हणून तिथे झाली नाही.
अशातला भाग नाही काही ठिकाणी झाली काही ठिकाणी झाले नाही
(On बावनकुळे - )
- बावनकुळे यांचा पक्ष देश पातळीवर मोठा पक्ष आहे, त्यांना निवडणुका मतं चोरी करून... हारत असताना घोषित करून घ्यायचे सवय लागले तर त्यांना काही फरक पडणार नाही, पण आता पैसा आहे प्रचंड यंत्रणांचा वापर आहे त्यामुळे त्यांना काही फरक पडणार नाही कोणी कितीही सोबत आले तरी कारण निवडणुका जिंकाव्या कशा आणि कशाचा आधार घ्यावा कोण सोबतीला असावे
- निवडणूक आयोगापासून सर्व यंत्रणा सोबतीला असल्याने काय फरक पडणार आहे
(On चंद्रपूर ऑपरेशन लोटस - )
- आमचे गट तयार झाले आम्हाला प्रचंड बहुमत आहे पुढे पुढे चा काय विषय आणि फोडले तर बघू
(On नवनीत राणा - चार मुलं)
- 3-4 अपत्ये करायला पाहिजे आणि नवनीत राणा यांच्या घरी नेऊन सोडले पाहिजे आणि त्यांचा पालन पोषण करण्याचे जबाबदारी त्यांना दिली पाहिजे
(On मुंबई वगळता आघाडी - )
- अनेक ठिकाणी चर्चा आहे त्यामुळे अनेक महानगरपालिका मध्ये अशी आघाडी होईल अशी शक्यता आम्हाला आहे... चंद्रपूर, अकोला अमरावती येथे चर्चा सुरु आहे
(On उद्धव महापौर)
- महापौर ते म्हणतात... आम्ही भाजपबरोबर जाऊ शकत नाही असेल त्या परिस्थितीत आमचा महापौर करून आणि आम्ही एकत्र राहण्याचा प्रयत्न करू
(On उद्धव मराठी - )
- काँग्रेसचे मागे सर्व जाती धर्माचे लोक आहेत, आम्ही कधीही प्रांतीयवाद जातीयवाद भाषावाद मानत नाही, प्रत्येक माणूस या देशाचा मालक आहे या भावनेतून आम्ही काम करणारे आहोत, आमचे विचार सर्वांना घेऊन चालणारे विचार आहेत त्यामुळे आमची भावना हीच असणार मराठी किंवा गैर मराठी असू दे देशाच्या अस्मितेसाठी आणि आमच्यातील समन्वयासाठी आमच्या पाठीमागे उभे राहावे अशीच आमची साद असणार आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKShubham Koli
FollowDec 24, 2025 10:27:060
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 24, 2025 10:26:000
Report
MAMILIND ANDE
FollowDec 24, 2025 10:09:350
Report
PNPratap Naik1
FollowDec 24, 2025 09:51:130
Report
AKAMAR KANE
FollowDec 24, 2025 09:34:000
Report
SNSWATI NAIK
FollowDec 24, 2025 09:31:340
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 24, 2025 09:05:460
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 24, 2025 09:05:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 24, 2025 09:03:00Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत अंबादास दानवे यांनी आनंद व्यक्त केलाय आज खूप मोठा दिवस आहे, खऱ्या अर्थाने ही नवी सुरवात आहे त्यामुळे आनंद होत असल्याचे अंबादास दानवे म्हणाले निश्चितपणे महाराष्ट्राचा राजकारण या एकी मुळे बदलेल असे अंबादास म्हणाले त्यांच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी...
0
Report
MKManoj Kulkarni
FollowDec 24, 2025 09:02:470
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 24, 2025 08:45:500
Report
SNSWATI NAIK
FollowDec 24, 2025 08:36:360
Report
PNPratap Naik1
FollowDec 24, 2025 08:35:590
Report
ABATISH BHOIR
FollowDec 24, 2025 08:24:150
Report
