Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
Kolhapur जिल्हा अधिकारी कार्यालय को धमकी: आरडीएक्स बॉक्स फूटने की चेतावनी
PNPratap Naik1
Dec 12, 2025 09:00:48
Kolhapur, Maharashtra
Kolhapur जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेल द्वारा धमकी दी गई है. धमकी वाले मेल में कोल्हापुर जिल्हाधिकारी कार्यालय में लावलेले पांच आरडीएक्स बॉक्स लवकरच फुटणार असल्याचं म्हटले आहे. इतकेच नाही तर दो еще two बजे तक जिल्हाधिकारी, कर्मचारी और नागरिक सुरक्षित स्थळी आने की बात भी है. संबंधित मेल में धमकी देने वाले का पता 'आर्यना अश्विन शंकर', उम्र 13 वर्ष, चेन्नई लिखा है. या मेलमध्ये विषय मराठीत आणि मजकूर इंग्रजीत दिला गेला होता. त्यामुळे खोडसाळी नेemailer केला आहे का? याची शहानिशा सुरू आहे, तर दुसरीकडे कोल्हापुर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्च ऑपरेशन चालू आहे. प्रताप नाईक यांनी हा आढावा घेतला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 12, 2025 10:09:54
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग बातम्या राजकारणातील एक सुसंस्कृत पर्व संपले.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील राजयोगी म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज निधन झाले. लातूरच्या नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री असा त्यांचा प्रवास अत्यंत उल्लेखनीय राहिला आहे. अशा भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केल्या. ते लातूरमध्ये बोलत होते.. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर येथील देवघर निवासस्थानी अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत लातूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते. स्वच्छ चारित्र्य, अजातशत्रू वृत्ती, विविध पक्षांतील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि विचारांचा सन्मान ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये होती. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांवरील प्रभुत्वामुळे ते उत्तम वक्ते म्हणूनही ओळखले जात. लोकसभा अध्यक्षस्थानावर असताना त्यांनी दाखवलेले कामकाज हे एक आदर्श मापदंड मानले जाते.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 12, 2025 10:08:44
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात युरिया खताच्या तुटवड्यानंतर गेल्या दोन दिवसांत सुमारे ३ हजार ९०० मेट्रिक टन युरिया खताचा साठा उपलब्ध झाला आहे. मात्र, आज सकाळपासून खत वितरण सुरू होताच शेतकऱ्यांनी खताच्या दुकानांबाहेर मोठी गर्दी केली. युरिया खत मिळत असले तरी खत विक्रेत्यांकडून युरिया नॅनो बॉटल किंवा पावडर खरेदी करण्याची सक्ती केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अतिरिक्त खरेदी करण्याची जबरदस्ती होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून यामुळे वातावरणात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. युरिया खरेदीवर कोणतीही सक्ती लादू नये आणि उपलब्ध झालेला साठा कोणत्याही अडथळ्याविना सर्वांना न्याय्य पद्धतीने वितरित करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली जात आहे.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 12, 2025 09:38:23
Malegaon, Maharashtra:कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या नाकोडे येथील शासकीय विद्यार्थी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी आज प्रकल्प कार्यालयावर मोठ्या संख्येने मोर्चा काढत असंतोषाची जाहीर भावना व्यक्त केली. वस्तीगृहात गेल्या अनेक महिन्यांपासून निकृष्ट दर्जाचे, अयोग्य पद्धतीने बनवलेले आणि दुर्गंधीयुक्त जेवण देण्यात येत आहे. शासनाच्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना दररोज अंडी, केळी, दूध यासारखा पोषक अन्न पुरवठा करणे बंधनकारक असतानाही हा अन्न पुरवठा नियमितपणे मिळत नसल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. मोर्चाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना लिखित निवेदन देत "आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष बदल हवा" नाहीतर आम्ही आमरण उपोषण करणार असा इशारा यावेळी विद्यार्थ्यांनी दिला आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 12, 2025 08:45:35
Nala Sopara, Maharashtra:नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्रावर कारवाई महिला डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल महानगरपालिकेची धडक कारवाई अँकर - नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपाताच्या प्रकरणाचा मोठा पर्दाफाश झाला आहे. मान्यता नसलेल्या शाहीन क्लिनिकवर पालिकेच्या आरोग्य विभागाने धडक कारवाई करत डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धानिव बाग येथील या क्लिनिकमध्ये डॉ. जबीउल्ला खान हे स्त्रीरोगतज्ञ नसतानाही फक्त पंधराशे रुपयांमध्ये गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, आठ डिसेंबर रोजी गुप्त तपासात डमी रुग्ण पाठवण्यात आला आणि संपूर्ण प्रकरण उघड झाले. ठिकाणी गर्भपाताच्या गोळ्यांचा साठाही आढळून आला. या प्रकरणी पेल्हार पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318 तसेच MTP Act च्या कलम 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, पीसीपीएनडीटी कायदा भंग केल्याप्रकरणी वसईतील ईश्वर्या हेल्थकेअरच्या सोनोग्राफी मशीनलाही सील करण्यात आले आहे. पालिकेने बेकायदेशीर आरोग्य केंद्रांविरुद्ध मोठी मोहीम सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Dec 12, 2025 08:31:48
Mumbai, Maharashtra:दादरमें पार्किंग की बड़ी समस्या है. सड़क पर द्विपक्षीय पार्किंग होने से यातायात जाम होता है. कोहिनूर पार्किंग महापालिका की है लेकिन अधिक दर के कारण स्थानीय निवासी उससे दूर हैं. अब दादर के ५०० मीटर परिसर में रहने वालों को ५० प्रतिशत छूट दी गई है. इससे बैनरबाजी शुरू हो गई है. कोहिनूर पार्किंग के शुल्क में ५० प्रतिशत छूट देने के निर्णय पर भाजप और शिवसेना (उद्धव बाला साहेब ठाकरे गट) के कार्यकर्ताओं के बीच “बैनर–बाजी युद्ध” उफान पर है. भाजप ने इस निर्णय को ‘हमारे संघर्ष की सफलता’ कह कर बड़े-बड़े बैनर लगाए, वहीं ठाकरे गुट ने इसे श्रेय लेने का प्रयास माना है और स्थानिक नेताओं के समर्थनों के बावजूद सत्ता के दुरुपयोग का आरोप लगाया है, जिसकी समीक्षा हमारे प्रतिनिधि मनोज कूल Karnī ने की.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 12, 2025 08:20:25
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील माढयात टेंभुर्णी मध्ये अवैध वाळू उपसा झाल्याची तक्रार केल्याने वकिलाला बेदम मारहाण, पोलिस निरीक्षक आणि तहसीलदारांच्या निलंबन साठी नागरिकांचा पोलिस स्टेशनवर मोर्चा माडयातील टेंभुर्णी परिसरातून भीमा नदीच्या पात्रातून रात्रीच्या वेळी बेसुमार वाळू उपसा होतो यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या पाईपचे फुटून नुकसान होते. यामुळे वकील पांडुरंग तोडकर यांनी पोलिसात तक्राऱ्या केल्या होत्या. याचा राग मनात धरून वाळू माफियानी करमाळा चौकात पांडुरंग तोडकर यांना बोलवून बेदम मारहाण केली. मारहाणीत त्यांचे पाय आणि हातावर गंभीर दुखापत झाली. पोलिस आणि महसूल प्रशासनाने वाळू माफियावर कारवाई करण्याअघि त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार घडत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक आणि तहसीलदार यांना निलंबित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वकील तोडकर यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे.अवैध वाळू उपसा बंद व्हावा यासाठी मोर्चा काढण्यात आला आमदार विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा नागपूर अधिवेशन मध्ये याबत मुद्दा उपस्थित केला आहे
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 12, 2025 08:17:32
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 12, 2025 07:45:44
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर २ सप्टेंबर रोजी निघालेल्या हैदराबाद गॅजेटियर जीआरनुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात तीन महिन्यांमध्ये मराठा समाजाला केवळ ९८ कुणबी ओबीसी प्रमाणपत्रे मिळाली आहेत. त्यामुळं अवघी मुंबई जॅम करीत जरांगे ने हैद्राबाद गॅजेट साठी केली धडपड व्यर्थ गेली का असा प्रश्न उपस्थित होय. ३ महिन्यात अवघे ९८ कुणबी प्रमाणपत्र. हैद्राबाद गॅजेट चा फायदा ९८ प्रमाणपत्र पुरता !! गॅजेट च्या आधारे अवघे ५९४ अर्ज दाखल. मुंबईत जरांगे यांनी मराठा आरक्षण साठी केलेले आंदोलन कुणीही विसरले नाहीय, आझाद मैदान आणि परिसरात तब्बल ७ दिवस हा आंदोलनाचा झंझावात सुरू होता त्यानंतर हैद्राबाद गॅजेट ची मागणी पूर्ण करण्यात आली आणि आंदोलन थांबले, यावेळी मराठा समाजाने मोठा आनंदोत्सव सुद्धा साजरा केला, मात्र याच्या ३ महिन्यानंतर आता आढावा घेतला तर आतापर्यंत अवघ्या ९८ लोकांना या गॅजेट चा फायदा घेत कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याची आकडेवारी पुढं आली आहे... त्यासाठी केवळ ५९४ जणांनी अर्ज केले होते. प्रतीक जितेंद्र पापळकर, विभागीय आयुक्त. हैद्राबाद गॅजेट चा फायदा आता कसा आणि कुणाला झाला याचा उत्तर जरांगे नी दयावे, आंदोलन संपवण्यासाठी ही बोळवण होती का असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय..तर हैद्राबाद गॅजेट्सच्या आधारे सरकारला जातीय लढाई लावायची होती आणि त्यात सरकारला यश आले, असा टोला नाना पाटोळे यांनी लावलाय तर अवघे ९८ लोकांना हैदराबाद गॅजेट जीआर प्रमाणे कुणबी ओबीसी प्रमाणपत्र मिळाले आहे याची चौकशी झाली पाहिजे, एवढे कमी प्रमाणपत्र कसे काय मिळाले अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केलीय. बारामाही चालणारी प्रक्रिया आहे मात्र निर्णय सरकार ने घेतल्यावर लोकांच्याही लक्षात आले असेल म्हणूनच रांगा लागल्या नाहीत असे ओबीसी नेते बबनराव तायवाडे म्हणाले, तर सरकार ने सावध पवित्रा घेत कुणबी प्रमाणपत्र बाबत आमचा निर्णय स्पष्ट असल्याचे सांगत कोणावरही अन्याय होणार नाही याची आम्हाला खात्री असल्याचे सांगितले. याबाबत जरांगे यांनी भूमीला स्पष्ट केली नाही मात्र पुढं आलेली आकडेवारी नंतर याबाबत जरांगे पाटिल ही समाधानिं असतील असे वाटत नाही त्यामुळं आता जरांगे पाटील याबाबत काय भूमीला घेतात यावर बरेच काहो अवलंबून आहे.... छत्रपती संभाजी नगर हुन विशाल करोळे सह ब्युरो रिपोर्ट नागपूर.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 12, 2025 07:35:59
Latur, Maharashtra:काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन चाकूर ते दिल्ली नगरपालिका ते संसद वयाच्या 90 वर्ष शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन. लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसापासून ते आजारी होते. आयुष्यभर काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय राहिलेले चाकूरकर. मागील अनेक वर्षांपासून राजकीय जीवनातून निवृत्त होते. राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे शिवराज पाटील (जन्म : १२ ऑक्टोबर १९३५) हे लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे जन्मले. उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९६७-६९ या काळात लातूर नगरपालिकेमध्ये काम करत राजकारणात पाऊल ठेवले. १९८० मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले आणि त्यानंतर १९९९ पर्यंत सलग सात निवडणुका जिंकत लोकसभेतील एक प्रभावी नेता म्हणून उदयास आले. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. १९९१ ते १९९६ या काळात ते देशाचे १० वे लोकसभा अध्यक्ष होते. लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, नवे ग्रंथालय इमारत यांसारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली. देश-विदेशातील अनेक संसदीय परिषदांमध्ये त्यांनी भारताचे नेतृत्व केले. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षातही त्यांनी जाहीरनामा समितीचे अध्यक्षपदासह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. २००४ मध्ये निवडणूक हरूनही त्यांच्यावर विश्वास ठेवत केंद्रातील गृहमंत्रीपद देण्यात आले. मात्र २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी ३० नोव्हेंबर २००८ रोजी राजीनामा दिला. २०१० ते २०१५ या काळात ते पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून कार्यरत होते. देशातील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू करण्याचे श्रेयही त्यांनी दिले जाते. वैयक्तिक आयुष्यात ते लिंगायत समाजातील असून, १९६३ मध्ये विजया पाटील यांच्याशी विवाह केला. त्यांनी एक मुलगा व एक मुलगी आहेत. सून डॉ अर्चना पाटील चाकूरकर राजकारणात सक्रीय आहे. दोन नाती आहेत. शिवराज पाटील हे सत्य साई बाबांचे निष्ठावंत अनुयायी म्हणूनही परिचित आहेत. सुमारे पाच दशका संसदीय आणि प्रशासकीय अनुभव, विविध मंत्रालयातील कामकाज आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून केलेले योगदान यामुळे शिवराज पाटील हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व मानले जातात. वैभव बालकुंदे ZEE 24 TAAS Latur
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 12, 2025 07:34:03
Shirdi, Maharashtra:साईनगरीत गर्दी घटली , उत्पन्न मात्र वाढले.. शिर्डी साई संस्थानचे उत्पन्न ८५० कोटींवर... मागील वर्षीच्या तुलनेत ३१.६२ कोटींची वाढ... साई संस्थानच्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जवळपास ३२०० शे कोटींच्या ठेवी... शिर्डीचं साई संस्थानचे देवस्थान पुन्हा श्रीमंत देवस्थानांच्या यादीत... शिर्डात साई दरबारी भाविकांचा ओघ तुलनेने कमी मात्र दानात लक्षणीय वाढ... उत्पन्नाचे प्रमुख स्रोत खालीलप्रमाणे - गुंतवणुकीवरील व्याज - २४२.८८ कोटी, दक्षिणापेटी - १५३.८२ कोटी, सर्वसाधारण देणगी - १११.४२ कोटी, रुग्णालये - ६८.४१ कोटी, अन्नदान निधी - ६७.८८ कोटी, प्रसादालय - ५५.२६ कोटी, वैद्यकीय निधी - ५२.७४ कोटी, वस्तुरूप देणगी - २०.९८ कोटी, दागिने व रत्ने - १४.७९ कोटी. या पद्धतीने घटली १० रुपयांच्या लाडू पाकिटची मागणी. १० रुपये किंमतीचे हे लाडू पाकीट सन २०२२ - २३ मध्ये उपलब्ध नव्हते मात्र २०२३ - २४ मध्ये भाविकांसाठी १० रुपयांत सुरू झाल्यावर याची विक्री प्रचंड वाढली आणि १ कोटी ४५ लाख ६० हजार ५३६ रुपयांमध्ये विकली गेली.परंतु २०२४ - २५ मध्ये १० रुपयांत मिळणाऱ्या लाडू पाकिटची विक्री घटून ३९ लाख ६८ हजार ३४९ रुपये इतकी झालिये
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Dec 12, 2025 07:16:49
Pune, Maharashtra:Headline : तळेगाव–उरळी कांचन या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे पुनःसर्वेक्षण करून आवश्यक ते बदल करण्याची खासदार बारणे यांची मागणी लोकसभेत शिवसेनेचे मावळ खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रकल्पातील गंभीर मुद्द्यांकडे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे लक्ष वेधले. तळेगाव–उरळी कांचन या प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे अनेक गावांमध्ये घरे आणि शेतीजमीन बाधित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही या परिसरातील जमीन विविध शासकीय कामांसाठी अधिग्रहित झाल्याने स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे. मात्र, रेल्वेमार्गाला विरोध नसून मार्गाचे पुनःसर्वेक्षण करून आवश्यक ते बदलाव करावेत आणि स्थानिकांची घरे सुरक्षित ठेवावीत अशी ठाम मागणी बारणे यांनी सभागृहात केली.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 12, 2025 07:09:49
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील अकोट आणि तेल्हारा तालुक्यात रेल्वे विभागाकडून मोठ्या प्रमाणात गौण खनिजांचा उपसा होत असल्याचा गंभीर आरोप करत शेतकरी संघटनेने आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हा उपसा तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. शेतकरी संघटनेच्या निवेदनात म्हटलं आहे की, रेल्वे कामासाठी मोठ्या प्रमाणात वाळू आणि गौण खनिजांचा उपसा केल्यामुळे स्थानिक पातळीवर या खनिजांचा तुटवडा निर्माण होत आहे. पंतप्रधान घरकुल आवास योजना तसेच अनुसूचित जातीसाठी असलेल्या रमाई आवास योजनेसाठी लागणारी वाळू नदी-नाल्यातून स्वस्त दरात उपलब्ध होते. मात्र रेल्वेच्या मोठ्या प्रमाणातील उत्खननामुळे वाळूचे दर वाढून या योजनांचा खर्च अवाजवी वाढणार असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.अकोट आणि तेल्हारा तालुक्यातील ५२ ठिकाणी तसेच इतर नदी-नाल्यांमधील खनिज उपशावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top