Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
तामगाव के लोगों ने विमानतळ का मुख्य रस्ता 30 मिनट से अधिक रोककर हंगामा मचाया
PNPratap Naik1
Nov 27, 2025 03:18:33
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर विमानतळा समोर तामगाव गावासाठी पर्यायी रस्त्याची मागणी करत आंदोलन केलेल्या तब्बल 300 हून अधिक आंदोलकांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. गोकुळ शिरगाव पोलिसात हा गुन्हा नोंद केला असून वाहतूक आणि सुरक्षतेच्या दृष्टीने अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तामगाव ग्रामस्थांनी उजळवाडी – तामगाव रस्ता बंद केल्याने विमानतळ प्रशासनाकडे आणि जिल्हा प्रशासनाकडे पर्याय रस्त्याची मागणी केली होती. पण वारंवार मागणी करून देखील रस्ता मिळाला नाही, त्यामुळे या ग्रामस्थांना विमानतळ प्रवेशद्वारावरच जोरदार आंदोलन करत विमानतळाकडे जाणारा मुख्य रस्ता पाऊण तासाहून अधिक काळ अडवला होता.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Nov 27, 2025 03:45:17
Nagpur, Maharashtra:नागपूर महापालिकेने शाळा, रुग्णालये, बसस्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणांमधून भटक्या श्वानांना हटवण्याचे अभियान सुरू केलेय - आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली तात्कडीची बैठक घेऊन सर्व विभागांना सज्ज राहण्याच्या सूचना, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या कडे जवाबदारी देण्यात आली आहे - सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निरीक्षण समिती स्थापन, दहा झोनमध्ये विशेष तपास पथके संवेदनशील ठिकाणी श्वानांची नोंद घेत कारवाई करतील. - अँटी रेबीज लस, वैद्यकीय साहित्य आणि एकसमान प्रोफॉर्मा तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - भटक्या श्वानाची संख्या पाहता क्षमत्यापेक्षा अधिक असल्याने जागा कमी पडत आहे. तात्पुरते शेल्टररची गरज पडणार आहे.
59
comment0
Report
KPKAILAS PURI
Nov 27, 2025 03:32:54
126
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 27, 2025 03:15:21
Nashik, Maharashtra:पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी; सावकाराला अटक तीन लाखांचे कर्ज घेतलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाला धमकावून त्याचे वडिलोपार्जित घर बळजबरीने बळकावून घेत आठ लाख रुपये उकळून पंधरा लाखांच्या खंडणीसाठी अवैध सावकाराने पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याचा धक्कादायक प्रकार नाशिककात उघडकीस आलाय... पोलिसांनी संशयित चंद्रशेखर ऊर्फ पिंटू शिंदे यास अटक केलीये...कळवण तालुक्यातील नांदुरी येथे फिर्यादी किरण भास्कर कानडे यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. त्याने २०१४ साली व्यवसायाकरिता पैशांची गरज असल्याने चंद्रशेखर यांच्याकडून व्याजाने तीन लाख रुपये घेतले होते. यासाठी अजय दुबे याने मध्यस्ती करून कर्ज मिळवून दिले होते....व्याजाच्या पैशाच्या मोबदल्यात कानडे यांच्या भावाच्या नावावर असलेला भूखंड शिंदे याने जबरदस्तीने रजिस्टर साठेखत करून लिहून घेतला. व्याजाची रक्कम वेळेवर देऊ न शकल्याने कानडे यांचे हॉटेल गौतमी व वडिलोपार्जित घर स्वतःच्या नावाने रजिस्टर खरेदीखत करून घेतले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात सावकार संशयित चंद्रशेखर शिंदे व अजय दुबे याच्याविरुद्ध अवैध सावकारी व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शिंदे यास अटक केलीये...
149
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 27, 2025 03:02:15
Nashik, Maharashtra:थंडी झालीकमी , पण हवेची गुणवत्ता घसरली अँकर नाशिक शहरात एकीकडे थंडी कमीहोत असताना देखील हवेची गुणवत्तादेखील घसरत असल्याचे उपलब्ध आकडेवारीतून समोर आले आहे.... दोन आठवड्यांपूर्वी हवेची गुणवत्ता घसरण्यास थंडीचे कारण देण्यात आले होते. मात्र, आता थंडी ओसरूनही शहरातील हवेचा गुणवत्ता दर्जा गत २१ दिवसांत ५६.४ टक्क्यांनी घसरला आहे. ५ नोव्हेंबरला ९३ एक्यूआय असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स) आता २१ दिवसानंतर १६५ एक्यूआयपर्यंत अर्थात धोकादायक पातळीपर्यंत पोहोचला आहे... हिवाळ्यातील थंडीमुळे स्थिर झालेल्या हवेने वातावरणात मिसळणारे धूलिकण वर जात नसल्याने शहरातील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा धोकादायक पातळीपर्यंत पोहोचला असल्याचे सांगण्यात आले होते. हवा गुणवत्ता निर्देशांक हा स्तर ५० च्या खाली असल्यास आरोग्यासाठी सर्वोत्तम असतो. मात्र, हा स्तर १६५ च्या पातळीवर पोहोचल्याने आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. देशातल्या 'बेस्ट एअर सिटीज'मध्ये मोजला जाणाऱ्या नाशिकची हवा गेल्या ५ नोव्हेंबरपासून प्रदूषित झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात नाशिक शहरात हवेची पातळी १३१ एक्यूआय इतकी होती. ती यावर्षी वाढून १६५ पर्यंत गेलीये... या हवेत प्रमुख प्रदूषक पर्टिक्युलेट मॅटर (पीएम) २.५ आहे.....
147
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 27, 2025 02:49:23
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - न्यायालयाने याचीका फेटाळल्यानंतर अनगरच्या प्रथम नगराध्यक्ष प्राजक्ता पाटील यांची पहिली प्रतिक्रिया - उज्वला थिटे यांचा अपील अर्ज फेटाळल्यानंतर अनगर नगरपंचायत प्रथम नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या प्राजक्ता पाटील यांची पहिली प्रतिक्रिया - अनगर नगरपंचायत स्थापन झाल्यापासून बिनविरोधाची परंपरा असणाऱ्या नगराध्यक्ष म्हणून निवड केली त्याबद्दल अनगरवासी यांचे त्यानी मानले आभार - अनगर आणि परिसरातील लोक एका कुटुंबाप्रमाणे राहतात - तालुक्यातील विरोधकांनी आमच्या कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न केला - अनगरचे ग्रामदैवत अनगरसिद्ध महाराज आणि थोर मोठ्यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले नाही - आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास होता आणि आहे त्यामुळेच आम्हाला न्याय मिला - न्यायदेवतेने आमच्या विश्वासावर शिक्कामोर्तब केले
172
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 27, 2025 02:48:18
Nashik, Maharashtra:प्रारूपवर मतदार यादींवर ७ दिवसांत तब्बल २,०३८ हरकती अँकर दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे, चुकीचे पत्ते आणि प्रभागांतील प्रारूप मतदारयादींतील विसंगतींच्या तक्रारींमुळे आठ दिवसांत तब्बल २०३८ हरकतींचा पाऊस पडलाy. सर्वाधिक हरकती सिडको विभागात १३९७ तर सर्वांत कमी हरकती नाशिक पश्चिम विभागात २४ आढळून आल्या आहेत. राजकीय पक्षांच्या मागणीमुळे हरकतींसाठी आता २७ नोव्हेंबरऐवजी ३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मनपा मुख्यालयात काल हरकती मांडण्यासाठी झुंबड उडाली होती. महापालिकेने प्रत्येक विभागात विशेष ३१ तपासणी पथके नेमली असून, घरभेट, स्थळ पडताळणी आणि कागदपत्रांची छाननी या तिन्ही स्तरांवर प्रक्रिया वेगाने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना आपली नावे, पत्ते, दुरुस्त्या तपासण्यास आणि हरकती दाखल करण्यास अतिरिक्त वेळ मिळणार आहे.....
142
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 27, 2025 02:46:21
161
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 27, 2025 02:46:11
Nashik, Maharashtra:सात पाण चिट्ठी लिहत नवविवाहितेचा सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या भाऊ, तुम्ही मला खूप प्रेमाने वाढविले; पण माझे नशीब खराब, रोज थोडं-थोडं मरण्यापेक्षा मी विष खाऊन झोपत आहे...' अशी एका भावनिक आत्महत्यापूर्व सात पानांची चिठ्ठी लिहून नाशिकच्या पंचवटीतील हिरावाडीत नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून जीवनप्रवास संपविल्याची धक्कादायक घटना काल घडलीये. नेहा बापू डावरे ऊर्फ नेहा संतोष पवार , असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पंचवटीमधील संजयनगर परिसरात राहणाऱ्या नेहा हिचा विवाह जून महिन्यात संतोष पतार नामक युवकासोबत झाला होता. विवाहानंतर जेमतेम महिनाभरानंतर पती, सासू, तसेच नणंदेकडून तिचा विविध कारणांनी शारीरिक-मानसिक छळ करण्यास सुरुवात झाली. माहेरी जाते, माहेरच्या लोकांशी फोनवर गप्पा मारते, असे सांगून तिच्या चारित्र्यावर संशय घेत कौमार्य चाचणीसारखा क्रूर प्रकार पती व नणंदेकडून करण्यात आल्याची संतापजनक बाबसुद्धा तिने चिठ्ठीत लिहिली आहे. पतीसह सासरच्या नातेवाइकांकडून सततच्या होणाऱ्या बुधवारी राहत्या घरी विष प्राशन केले. ही घटना भावाला समजतात त्याने तत्काळ तिच्या घरी धाव घेत तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे, तसेच सात पानांची चिठी तपासाकरिता जप्त केली असून, याप्रकरणी रात्री उशिरा पंचवटी पोलिस ठाण्यात तिच्या पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय...
127
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 27, 2025 02:45:16
Kolhapur, Maharashtra:टीईटी पेपर फुटी प्रकरणी बिहारच्या रितेश कुमारचा कोल्हापूर पोलिसांनी शोध सुरू केला आहे. रितेश कुमार हा TET आणि सेट पेपर फुटी प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून तपासात समोर येत आहे. यापूर्वी पोलिसांनी अटक केलेला गायकवाड याला रितेश कुमार TET आणि सेट पेपर पुरवल्याचे तपासात पुढे येत आहे. पोलिसांनी महेश गायकवाड आणि एजंट राहुल पाटील या दोघांकडून तब्बल तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत. कराड मधून अटक केलेला महेश गायकवाड हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचं देखील तपासात पुढे आलाय. एकीकडे रितेश कुमारचा शोध सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी सात संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत. या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालल्याने आरोपींची संख्या देखील आणखी वाढणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पेपर फुटी प्रकरणात राजकीय पक्षाचा संबंध आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सोळाअंकुर इथले प्राचार्य गुरुनाथ चौगुले यांना देखील अटक केल्यामुळे अनेक संस्था मधील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक हे देखील पोलिसांच्या रडावर आले आहेत.
312
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 27, 2025 02:31:02
Jalna, Maharashtra:जालना : भोकरदनच्या नांजामध्ये गर्भलिंगनिदान करणारे दोन बोगस डॉक्टर गजाआड जालना : भोकरदन तालुक्यातील नांजा येथे अवैध गर्भलिंगनिदान करताना दोन डॉक्टरांना पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकानं रंगेहाथ पकडलं आहे. नांजा येथील शेतात छापा टाकून काल रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. पकडण्यात आलेले दोन्हीही डॉक्टर बोगस असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. सतिष सोनवणे, केशव गावंडे अशी या बोगस डॉक्टरांची नावं आहेत. यातील एक जण फरार झाला आहे. या छाप्यादरम्यान पोलिसांनी सोनोग्राफी मशीनसह औषधांचा साठा जप्त केला आहे. पकडण्यात आलेले बोगस डॉक्टर प्रोब आणि मोबाईल अँप्लिकेशनच्या माध्यमातून तपासणी करत असल्याचं समोर आलं या कारवाईत गर्भपाताच्या गोळ्या देखील जप्त केल्या आहेत. दरम्यान आरोपी असलेल्या बोगस डॉक्टरांना भोकरदन पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
113
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 27, 2025 02:15:39
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या वादात खासदार श्रीकांत शिंदे आता तोडगा काढणार आहेत. चिकलठाणा विमानतळावर बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी सुरुवातीला जिल्हाप्रमुख जंजाळ, त्यांच्या पाठोपाठ खासदार संदिपान भुमरे आणि त्यानंतर पालकमंत्री शिरसाट आले होते. या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जंजाल यांच्या सोबत संवाद साधला आणि याबाबत खासदार शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याच्या सूचना जंजाळ यांना दिल्या. त्यानंतर खासदार शिंदे विमानतळावर आल्यानंतर त्यांनी पालकमंत्री शिरसाट यांची भेट घेतली. त्यानंतर जंजाळ आणि श्रीकांत शिंदे हॉटेलकडे रवाना झाले. संजय शिरसाठ यांनी मात्र इथं कोणतीही चर्चा झाली नाही. नेत्यांना निरोप देण्यासाठी आलो आहे, असे सांगितले. महत्वाचे म्हणजे विमानतळावर पालकमंत्री आणि जिल्हाप्रमुखांनी शक्तिप्रदर्शन केले. दोघांचेही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
208
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 27, 2025 02:01:02
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या लाखनी ओवर ब्रिजवरील ड्रेनेज पाईप कोसळले..... थोडक्यात बचावला ईसमाचा जीव..... भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथे स्थानिकांना वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता उड्डाण पुलाची निर्मिती करण्यात आली मात्र तयार झाला तेव्हापासून हा उड्डाणपूल वादग्रस्त ठरताना पाहायला मिळत आहे. उड्डानपुलाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे पहावयास मिळत असून उद्घाटनानंतर तीन महिने दुरुपत्तीनावाखाली पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. बऱ्याच काळानंतर पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र पुलावरील कठळे तुटून ट्रक खाली पडणे, पावसाळ्यात पुलाखाली झऱ्याचे स्वरूप प्राप्त होणे, किरकोळ अपघात घडणे अशा अनेक घटना घडताना दिसतात. अशातच पुलावरील मोठे ड्रेनेज पाईप तुटून खाली कोसळले दरम्यान सुदैवाने जीवितहानी तळली असली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पुलाच्या निकृष्ट बांधकामावर प्रश्नचिन्ह उद्भवू लागलेले आहे. पुन्हा अशा घटना घडतील की काय अशी भीती नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे.
267
comment0
Report
Advertisement
Back to top