Back
सुप्रीम कोर्ट निर्देश: भटकते कुत्तों को सार्वजनिक स्थान पर खाना रोक, कोल्हापुर में कार्रवाई
PNPratap Naik1
Nov 28, 2025 14:04:35
Kolhapur, Maharashtra
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.. या सूचनेनुसार भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कुठेही खायला घालता येणार नाही.. याची अंमलबजावणी कोल्हापूर महानगरपालिकेने सुरू केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालता येणार नाही. खाऊ घालायचे असेल तर रीतसर अर्ज करून आहार क्षेत्राची निर्मिती करावी लागेल. कोल्हापूर महानगरपालिकेने सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करायला केली सुरुवात. जाहिरात प्रसिद्ध करत आहार क्षेत्राची निर्मिती करू इच्छिणाऱ्याच्याकडून मागून घेतली माहिती. देशभरात भटक्या कुत्र्यांच्या चाव्या मध्ये मोठी वाढ होत आहे.. भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामध्ये अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांसंदर्भात नुकताच नव्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे ज्यांना ज्यांना भटक्या कुत्र्यांना खाऊ घालायचा असेल त्यांना या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल.. जर कोणाला कुत्र्यांना खाऊ घालायचंच असेल तर महानगरपालिकेची नियमानुसार परवानगी घ्यावी लागणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका त्यासाठी नागरिकांच्या अर्जानुसार विशिष्ट भागात कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी ठिकाण निश्चित करणार आहे. दररोज अनेक श्वानप्रेमी भटक्या कुत्र्यांना जिथे शक्य आहे तिथे खाऊ घालतात.. पण या भटक्या कुत्र्यांच्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फिरणे देखील मुश्किल झाले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक सूचना देत भटक्या कुत्र्यांना आवरण्यासाठी मार्गदर्शक सूचना पारित केल्या आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 28, 2025 14:04:1363
Report
JMJAVED MULANI
FollowNov 28, 2025 14:03:32109
Report
UPUmesh Parab
FollowNov 28, 2025 14:02:49108
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 28, 2025 14:02:3181
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 28, 2025 13:35:1876
Report
KJKunal Jamdade
FollowNov 28, 2025 13:17:31128
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 28, 2025 13:17:0398
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 28, 2025 13:15:35137
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 28, 2025 13:09:59139
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 28, 2025 12:51:2992
Report
KJKunal Jamdade
FollowNov 28, 2025 12:50:58114
Report
MAMILIND ANDE
FollowNov 28, 2025 12:40:2998
Report
JMJAVED MULANI
FollowNov 28, 2025 12:40:10138
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 28, 2025 12:20:36115
Report