Back
Kolhapur महापालिका वचननामे पर टीका-प्रश्न, ठाकरे गट दावा बनाम विपक्ष
PNPratap Naik1
Jan 08, 2026 11:41:04
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपला वचननामा जाहीर केला आहे. मात्र ८१ पैकी अवघ्या 7 जागा लढवणाऱ्या ठाकरे गटाच्या वचननाम्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. महायुतीमधील सर्वच पक्षांनी हा वचननामा म्हणजे फक्त हवेतले इमले असल्याचा आरोप केला आहे. कोल्हापूर शहराच्या विकासासाठी पारदर्शक, लोकाभिमुख आणि सक्षम प्रशासन देण्याचा संकल्प करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज आपला वचननामा जाहीर केला आहे. भ्रष्टाचारमुक्त महापालिका, नागरिककेंद्री प्रशासन आणि नियोजनबद्ध शहर विकास हे या वचननामाचे मुख्य सूत्र असल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांसह काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि पदाधिकारीही उपस्थित होते. सुनील मोदी, शहराध्यक्ष – ठाकरे शिवसेना • वचननाम्यातील प्रमुख मुद्दे • शहर विकास व पायाभूत सुविधा • नियमित व शुद्ध पाणीपुरवठा • स्वच्छता व आरोग्य सुविधा बळकट करणे • शिक्षण व युवकांसाठी विशेष धोरण • महिला, ज्येष्ठ व दुर्बल घटकांसाठी योजना • अंबाबाई अन्नछत्र अधिक सक्षम करणे • झोपडपट्टी पुनर्विकास व गृहनिर्माण • हरित कोलापूरचा संकल्प • पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा आराखडा मात्र या वचननाम्यावर महायुतीमधील पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. भाजप नेत्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करून अवघ्या सात जागा लढवणाऱ्या ठाकरे सेनेचा या निवडणुकीत सुपडा साफ होईल, असा दावा केला आहे. महेश जाधव, नेते – भाजप दरम्यान शिवसेनेनं ठाकरे गटाच्या वचननाम्यावर टीकेची झोड उठवली आहे. अवघ्या सात जागा लढवणाऱ्या पक्षाचा वचननामा म्हणजे हास्यास्पद प्रकार असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. इतकंच नव्हे, तर हा वचननामा म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने असल्याची टीकाही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे. हर्षल सुर्वे, युवा नेते – शिवसेना एकीकडे ठाकरे गट आणि काँग्रेस पारदर्शक व लोकाभिमुख कारभाराचा दावा करत कोल्हापूरकरांसमोर आपला वचननामा सादर करत आहेत. तर दुसरीकडे जास्त जागा लढवणाऱ्या भाजप आणि शिवसेनेनं अद्याप जाहीरनामा जाहीर न केल्यावरून ठाकरे गट आणि काँग्रेसकडूनही प्रति टीका केली जात आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत जाहीरनामा आणि वचननाम्यांबरोबरच आरोप-प्रत्यारोपांचं राजकारणही चांगलंच तापताना दिसत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 07:52:140
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 07:49:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 07:33:140
Report
AKAMAR KANE
FollowJan 09, 2026 06:50:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 06:49:160
Report
AKAMAR KANE
FollowJan 09, 2026 05:45:13kolhapur, Maharashtra:नागपूरकरांच्या मनात काय हे जाणून घेतलेय...झी २४ तास च्या बोल बिंधास्त या विशेष रिपोर्ट मध्ये
0
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJan 09, 2026 05:02:060
Report
SGSagar Gaikwad
FollowJan 09, 2026 04:45:320
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJan 09, 2026 04:45:140
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 03:46:590
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 03:45:420
Report
YKYOGESH KHARE
FollowJan 09, 2026 03:08:360
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 09, 2026 03:07:220
Report
AKAMAR KANE
FollowJan 08, 2026 15:47:050
Report
PNPratap Naik1
FollowJan 08, 2026 15:15:510
Report