Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001
संभाजी नगर में शिवसेना-भाजपा की युति टूटी, चुनावी घमासान तेज
VKVISHAL KAROLE
Jan 09, 2026 07:49:40
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Anchor : मतदानासाठी अवघा आठवडा उरला आहे मात्र संभाजीनगर मधील मोठा भाऊ छोटा भाऊ हा वाद संपता संपत नाहीय, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या विधानातून शिवसेनेला टोला लगावला आहे आणि छत्रपती संभाजी नगरात सगळ्यात मोठा पक्ष आम्ही असू महापौर आमचा असेल आणि आमचा मित्र पक्ष आमच्या मागे असेल असे विधान केल्याने पुन्हा चर्चा ना उधाण आलय संभाजी नगरातील युती शिवसेनेने तोडली - मुख्यमंत्री सेनेत गटतटाचे राजकारण, युतीला फटका संभाजी नगरात महापौर भाजपचाच - सीएम छत्रपती संभाजी नगरात तब्बल दहा बैठकांनंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली, दोन्ही पक्षांनी एकमेकांवर युती तोडल्याचा ठपका ठेवला आणि अखेर स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला.. मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा या वादाला फोडणी घातली आहे , संभाजीनगरची युती ही शिवसेनेने रागारागात तोडली , शिवसेनेत गटातटाच राजकारण आहे आणि त्यामुळे ही युती तुटली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मात्र यासोबतच या शहरात भाजपच नंबर एकचा पक्ष असेल महापौरही आमचाच असेल असे टोलाही त्यांनी लगावला आणि पुन्हा एकदा या वादाला सुरुवात झाली... छत्रपती संभाजी नगर मध्ये शिवसेना-भाजपचा प्रचारात आता दोघांकडूनही टोकाचा विरोध सुरू आहे.. त्यात मोठा भाऊ छोटा भाऊ हा वादही शिगेला पोहोचलाय एकीकडे निवडणुकीनंतर एकत्र येण्याची भाषा दोन्ही पक्षांचे नेते करताय मात्र संघर्ष इतका शिगेला पोहोचला असेल तर निवडणुकीनंतरही मोठा भाऊ छोटा भाऊ हा वाद आणखी पेटेल यात शंका नाही...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Mar 04, 2026 04:02:11
Kolhapur, Maharashtra:Kop Sahayadri Tiger Feed:- 2C Anc:- सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अजून एका नवीन नर वाघाची नोंद झालीय. नवीन वाघाला STR T9 असे सांकेतिक नंबर देण्यात आले आहे. स्थानिक गाईड मंडळीनी या वाघाचे नामकरण शिलेदार असे केले आहे. नवीन वाघ हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात गेले दोन महिने विविध कॅमेरा ट्रॅप मध्ये दिसून आला आहे. सध्या हा STR T9 शिलेदार हा वाघ STR T5 तारा वाघिणीच्या ट्रेटरी मध्ये तिच्या मागे मागे फिरत असताना दिसत आहे. शिलेदार या नर वाघामुळे सह्याद्रीमध्ये एकूण वाघांची संख्या सात झाली आहे. सह्याद्रीच्या जंगलात असणाऱ्या वाघांना सह्याद्रीला साजसे अशी नावे या सात वाघांना देण्यात आले आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात असणाऱ्या वाघांची नावे नेमके काय आहेत त्यावर एक नजर टाकूया. GFX T1 सेनापती T2 सुभेदार T3 बाजी T4 चंदा T5 तारा T6 हिरकणी T9 शिलेदार GFX Out Anc/ Tag :- सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील T5 (तारा) ह्या वाघिणीच्या क्षेत्रात T1 सेनापती , T 2 सुभेदार, व नव्याने आलेला T 9 शिलेदार हे तीन वाघ फिरत आहेत.. आता तारा T5 ही वाघीण कोणत्या जोडीदाराची निवड करते हे पाहणे उत्सुकतेच आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 04, 2026 04:01:59
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 04, 2026 04:01:19
Chendhare, Maharashtra:बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे उपोषण सहाव्या दिवशीही सुरूच. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. होळीच्या सणातही आंदोलक ठाम. अँकर - पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्प ग्रस्तांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेलं उपोषण आज सहाव्या दिवशीही सुरूच आहे. होळी सारख्या सणासुदीच्या दिवसात देखील आंदोलन या ठिकाणी ठाण मांडून असून सरकारच्या नावाने शिमगा करीत आहे. मात्र त्यांच्या या आंदोलनाची प्रशासनाने अपेक्षित दखल घेतलेली दिसत नाही. धरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम पूर्ण होण्यापूर्वी आमच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात असे आंदोलकांची मागणी आहे. प्रकल्पासाठी न वापरलेली जमीन परत करून तो सातबारा कोरा करावा, अशी प्रकल्पग्रस्तांची प्रमुख मागणी आहे. बाईट - आंदोलक
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 04, 2026 04:00:43
Nagpur, Maharashtra:विजय वडेट्टीवार बाईट शरद पवार राज्यसभा उमेदवार आज तीन पक्षाची बैठक आहे, तो रिपोर्ट आम्ही दिल्लीला देऊ.. आज कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार निश्चित होईल.. अजूनही कुठल्याही नावावर अंतिम निश्चिती झालेली नाही.. आमची आग्रही मागणी होती की राज्यसभेची जागा आम्ही राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आम्हाला मिळावी. विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळावी. तीन पक्षाच्या आघाडीमध्ये जे काही ठरेल, ते अंतिम होईल.. हाय कमांड त्याबद्दल अंतिम निर्णय घेईल.. サуп्रिया सुळे काय म्हणत आहेत, ते उद्धव ठाकरे यांना भेटून काय बोलल्या, हे मला माहित नाही.. आम्हाला अजूनही दिल्लीवरून काँग्रेसच्या भूमिकेबद्दल कुठल्याही सूचना आलेल्या नाही.. आ आखाती देशात भारतीय अडकले दुबईमध्ये परिस्थिती फार काही वाईट नाही. मात्र मोठ्या संख्येने लोक तिथे अडकलेले आहे.. त्यांच्यामध्ये भीती आहे.. त्यामुळे केंद्र सरकारची, राज्य सरकारची जबाबदारी आहे ki ते लवकरात लवकर सुरक्षित भारतात परत आणावे.. मुस्लिम उमरा भाविक ते सर्व भारतीय आहेत, त्यात हिंदू मुस्लिम असे फाटे फोडण्याची गरज नाही.. जे लोक अडकले आहेत, ते सर्व भारतीय असून त्यांना सुरक्षित आणणे भारत सरकारचे काम आहे... एसबीएल स्फोट नागपूरचे दहा किलोमीटरच्या अंतरावर 14 स्फोटक कारखाने असून दरवर्षी तिथे दुर्घटना होत असतात.. अनेकांचे मृत्यू होत असतात.. PESO स्फोटक सुरक्षिततेसाठीच्या संस्थेचा मुख्यालय नागपुरात आहे.. मुख्यमंत्री नागपूरचे आहे, मात्र दरवर्षी घटना घडतात.. सरकारचा गांभीर्याने याकडे लक्ष नाही.. एसबीएल स्फोट प्रकरणी मृत्युसंख्या वाढण्याची शक्यता आहे.. आम्ही SBL स्फोट प्रकरणी विधिमंडळात या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव दिले आहे.. आम्ही सरकारला या संदर्भात प्रश्न विचारू.. मोठी मदत जाहीर केली म्हणजे पैशाने जीव खरेदी करता येत नाही.. तिथल्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने सरकार काय प्रयत्न करत आहे असा आमचा प्रश्न आहे... या प्रकरणात सदोष मनुष्य वधाचा नाही तर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे... ओबीसी छात्रावास महापुरुष नाव प्रस्ताव चांगला आहे, मात्र महापुरुष कोण हे आधी ठरवा.. शाहू, फुले L, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांची नावे द्या.. भाजपचे नेत्यांची नावे देऊ नका... महापुरुषांच्या नावाने भलतीच नाव देऊ नये अशी अपेक्षा आहे...
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 04, 2026 04:00:28
Amravati, Maharashtra:अमरावतीचे 25 पेक्षा अधिक पर्यटक अडकले दुबई, पर्यटकांना आखाती देशांच्या युद्धाचा फटका; गोळ्या, औषध आणि पैसे संपल्याने पर्यटकांचे हाल. अमरावतीचे 24 पर्यटक 26 फेब्रुवारीला दुबईत दाखल झाले होते; संपूर्ण दुबईची सैर केल्यानंतर पर्यटक मायदेशी परत येणार असताना त्यांना स्फोटाचे आवाज आल्याने सर्व पर्यटक सध्या दुबईतील नाईट कॅसल हॉटेलमध्ये सुखरूप आहेत. हॉटेल बाहेर पडू नका अशा सूचना स्थानिक प्रशासनाने दिल्या असून पर्यटकांसाठी हेल्पलाइन जारी करण्यात आली आहे. जवळपास अडकलेल्या सर्वच पर्यटकांशी अमरावती जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला असून सर्व पर्यटक हे 25 पेक्षा अधिक असल्याची माहिती उपजिल्हाधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान आता पर्यटकांजवडील गोळ्या, औषध आणि पैसे संपल्याने पर्यटकांचे मोठे हाल होत असून आम्हाला मायदेशी लवकर परतण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 04, 2026 03:46:01
Nagpur, Maharashtra:नागपूर - कामठीतील चौधरी हॉस्पिटल परिसरात धक्कादायक घटना, वाहनाला साईड देण्याच्या कारणावरून किरकोळ कारणावरून झाला वाद - मात्र टोकाला जात वादाचे हाणामारीत रूपांतर झालं यात तरुणाचा मृत्यू - रवी शिवकुमार गुटलेवार असं मृतक तरुणाच नाव आहेय... - अक्षयकुमार धनराज गेडाम असं आरोपीचे नाव आहेय... - धक्काबुक्कीत खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत, लागलीच उपजिल्हा रुग्णालय, कामठी येथे उपचार - त्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलविण्यात आले - उपचारादरम्यान प्रकृती खालावून मृत्यू, एक वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता, पत्नीसमवेत भाड्याच्या घरात वास्तव्यास होता... - होळीच्या दिवशी घडलेली घटन घडल्यान शहरात तणावाचे वातावरण - जुनी कामठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सुरू
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 04, 2026 03:45:42
Satara, Maharashtra:कराड:- पुणे- बेंगळोर महामार्गावर रस्त्यातच कंटेनर आडवा पलटी झाल्याने मध्यरात्री एक वाजेपर्यंत वाहन चालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. पुणे मुंबई सातारा या शहरांकडे जाणाऱ्या मार्गावर रात्री नऊ वाजता पलटी झालेला कंटेनर एक वाजता बाजूला करण्यात आला तर त्यानंतर जवळपास दहा ते बारा किलोमीटर लागलेल्या वाहनांच्या रांगा रिकाम्या करण्यात आल्या. कराड जवळ खोडशी येथे हा अपघात झाल्याने पूर्ण रस्ता बंद झाला होता. कंटेनर मोठा असल्याने अनेक वाहन चालकांनी आणि प्रवासी ने रस्त्यातच जेवण उरकून घेतले. यावेळी ॲम्बुलन्स देखील या ट्रॅफिक मध्ये बराच काळ अडकली होती.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 04, 2026 03:45:27
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ च्या वणी येथे होळी च्या धुळवडीला गुद्दलपेंडीचा थरार रंगला. रंगनाथ स्वामी मंदिरापुढील जत्रा मैदानावर दोन स्पर्धक एकमेकांना ठोसे मारून हा पारंपरिक खेळ खेळतात. एका खांबाला बांधलेला नाडा, एक हाताने पकडून दुसऱ्या हाताने प्रतिस्पर्ध्यावर ठोसे मारले जातात. नाडा सोडला तर तो स्पर्धक बाद ठरतो. विजयी व पराभूत स्पर्धक शेवटी गळाभेट घेऊन खेळ संपवतात. विशेष म्हणजे या खेळाला वयाची मर्यादा नाही. गुद्दलपेंडी हा केवळ मारामारीचा खेळ नसून ‘कायमचे वैर संपवणारा खेळ’ अशी त्याची ओळख आहे. पूर्वी एकमेकांशी वैर असलेले लोक या खेळातून राग व्यक्त करून शेवटी गळाभेट घेत आपले मतभेद मिटवायचे, शंभर वर्षांहून अधिकची परंपरा लाभलेल्या या गुद्दलपेंडी खेळामुळे वणी शहराची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 04, 2026 03:45:13
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 04, 2026 03:32:44
Wardha, Maharashtra:वर्धा के हनुमान टेकड़ी परिसरात अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. टेकड़ीवरील कोरड्या गवताला व झाडाझुडपांना आग लागल्यानंतर काही मिनिटांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचे फवारे व विशेष उपकरणांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य केले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र नैसर्गिक वनस्पतींचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 04, 2026 03:32:21
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 04, 2026 03:32:05
Nashik, Maharashtra:२२८ नागरिक आखाती देशांपैकी सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातमधील काही शहरांमध्ये अडकले आहेत. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू झालेल्या युद्धाचा फटका या भारतीयांना बसला आहे. विमानसेवा बंद असल्यामुळे त्यांचा भारतात परतण्याबाबत अनिश्चितता निर्माण झालीये.... जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून सातत्याने आखाती देशांत असलेल्या नाशिकच्या नागरिकांची माहिती मिळविण्यावर भर दिला जात आहे. काल सायंकाळपर्यंत २२८ पर्यंत आकडा पोहोचला होता.नाशिक शहरासह मालेगावमधून मोठ्या संख्येने रमजान पर्वच्या औचित्यावर मुस्लीम बांधव 'उमराह' या तीर्थयात्रेसाठी सौदी अरेबिया देशात पोहोचलेले आहे. खासगी टूर ऑपरेटर कंपन्यांच्या माध्यमातून हे यात्रेकरू त्या ठिकाणी गेलेले आहेत. प्रत्येकाच्या यात्रेचा कालावधी वेगवेगळा आहे. नाशिक शहरातील ५०, तर मालेगावमधील १७८ असे एकूण २२८ नागरिक असल्याचे निश्चित झाले आहेत. या मध्ये सातजण हे शिक्षणासाठी तेथे गेलेले असून ते विद्यार्थी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीये...
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 04, 2026 03:31:38
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्ह्यातील 13 पर्यटक दुबईत अडकले की माहिती समोर आली आहे. फिरण्यासाठी दुबईला गेलेले हे पर्यटक सध्या वेगवेगळ्या ठिकाणी अडकले असून प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिघेजण मनामा शहरात तर उर्वरित दहा जण दुबईतील कर्मा हॉटेलमध्ये अडकल्याची माहिती आहे. अडकलेल्या पर्यटकांमध्ये उमरगा शहरातील चौघेजण, तुळजापूर तालुक्यातील दोघेजण आणि धाराशिव तालुक्यातील दोघेजणांचा समावेश आहे. इतर काही जणांची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, उमरगा येथील आदर्श विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक शिवानंद दळगडे आणि शिवानंद माशाळकर हे आपल्या पत्नीसह दुबईला पर्यटनासाठी गेले होते. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आम्ही दुबईमध्ये अडकलो असल्याची माहिती दिली आहे. सध्या जिल्हा प्रशासनाने सर्व पर्यटकांचे संपर्क क्रमांक मिळवले असून त्यांच्याशी संपर्कही साधला आहे. या प्रकरणाची माहिती केंद्र आणि राज्य सरकारलाही देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 04, 2026 03:31:23
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ओबीसी कार्यकर्ते दिपक खेडकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी निवडण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप आणि शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले...खेडकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि संघटन कौशल्य पाहून ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे ओबीसी समाजात उत्साहाचे वातावरण असून पक्ष संघटनेला मोठी बळकटी मिळेल असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून शहरात त्यांचे कौतुक होत आहे..
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top