Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001
सुप्रीम कोर्ट ने अजिंठा अर्बन को-ऑप के पूर्व विधायक सुभाष झांबड को शर्तिया जमानत दी
VKVISHAL KAROLE
Feb 02, 2026 02:30:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
माजी आमदार सुभाष झांबड यांना सर्वोच्च न्यायालयात सशर्त जामीन मंजूर छत्रपती संभाजीनगर मधील अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष, काँग्रेस चे माजी आमदार सुभाष झांबड यांना सर्वोच्च न्यायालयाने  जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या अटी आणि शर्तीच्या अधीन राहून, तसेच सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकून झांबड यांना जामिनावर सोडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दोन गुन्ह्यांपैकी पहिल्या प्रकरणात सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. याचिकाकर्ता ७ फेब्रुवारी २०२५ पासून कोठडीत आहे. २६ सप्टेंबर २०२४ रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि १ एप्रिल २०२५ रोजी पूरक आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले. या गुन्ह्यातील सह-आरोपींना आधीच जामिनावर सोडण्यात आले आहे. खटल्यातील तथ्ये आणि परिस्थिती लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने जामिनाचा आदेश दिला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
Feb 02, 2026 04:20:18
Vasai-Virar, Maharashtra:वसईत सापडले मानवी अवशेष, अंधश्रद्धा भानमतीचा प्रकार की खून... माणिकपूर पोलिसांचा तपास सुरू... माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून फॉरेन्सिक टीमला पाचारण केलं आहे. माणिकपूर परिसरातील नवपाडा मध्ये बारकुल्या नावाची चाळ आहे आणि या चाळीच्या वर ही पाण्याची टाकी आहे गेल्या 30 वर्षापासून ही टाकी वापरात नव्हती परंतु सध्या या टाकीचा दुरुस्तीसाठी बिल्डिंग वर पत्र टाकण्याचा काम सुरू होतं. पाण्याची टाकी वापरत नसल्याने ती तोडण्याचा काम सुरू होतं. त्याच वेळेला मजुरांना मानवी शरीराची कवटी आणि काही हाड सापडली त्यामुळे भीतीच वातावरण पसरलं. त्या संपूर्ण प्रकरणाची माहिती देऊन पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी दिवसा तपास पूर्ण करण्याचा विचार केला. दोन वर्षांपूर्वी या इमारतीमध्ये गॅस लिक होऊन गुदमरून दोन ते तीन मजुरांचा मृत्यू झाला होता. जवळपास आठ ते दहा लोकं चाळीमध्ये राहतात. महानगरपालिकेचे पाणी वर चढवलं जातं त्यामुळे टाकीचा वापर केला नव्हता. ही हाडे नेमकी कोणाची आहेत हे फॉरेन्सिक तपासानंतरच स्पष्ट होईल. काहींचा असा अंदाज आहे की भानामती अंधश्रद्धेच्या दृष्टीकोनातून ही हाडे कोणीतरी आणली असावी का, तपास केला जाणार आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 02, 2026 03:33:52
Nashik, Maharashtra:नाशिकरोडमध्ये अल्पवयीन मुलगी बेपत्ता.... अज्ञात व्यक्तीवर फूस लावून पळवून नेल्याचा संशय... नाशिक मध्ये अल्पवयीन मुलं-मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले... दररोज दोन ते तीन मुलं मुली बेपत्ता होण्याच्या घटना समोर येत आहेत... नाशिक मध्ये अल्पवयीन मुलं व मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून रोज नाशिक मधून दोन ते तीन अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता होता आहे नाशिक रोड परिसरातून एक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास संबंधित मुलगी राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडली. मात्र त्यानंतर ती परतलीच नाही.कुटुंबीयांनी परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र मुलगी आढळून न आल्याने अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 02, 2026 03:33:35
Nashik, Maharashtra:अँकर नाशिक महापालिकेच्या १२२ जागांपैकी तब्बल ७२ जागा जिंकत भाजपने पुन्हा एकहाती सत्ता मिळवली. विरोधात लढलेल्या शिवसेना शिंदे गटाचे २६ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ४ नगरसेवक निवडून आले.केंद्र आणि राज्यात तिन्ही पक्ष एकत्र सत्तेत असल्याने नाशिक महापालिकेतही एकत्र काम करण्याची भूमिका भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी मांडली होती. शिंदे गटाकडूनही प्रस्ताव आल्यास विचार करू, असा सूर होता. त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षांमध्ये पडद्याआड चर्चा सुरू असल्याची माहिती राजकीय वर्तुळात होती. एखादं महत्त्वाचं पद शिंदे गटाला मिळू शकतं, अशीही चर्चा रंगली होती.मात्र, या सर्व घडामोडींना छेद देत मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. "नाशिक महापालिकेत आम्हाला कुठल्याही कुबड्यांची गरज नाही. ज्या ठिकाणी आम्ही मित्रपक्षांसोबत लढलो, तिथे त्यांना सत्तेत घेतलं जातं. पण नाशिकमध्ये आम्ही परस्परांविरोधात लढलो आणि भाजपला स्पष्ट बहुमत आहे."* बाईट - गिरीश महाजन (मंत्री)
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 02, 2026 03:31:20
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर महापालिकेच्या महापौर निवडीसाठी भाजपकडून आपल्या नगरसेवकांना व्हीप जारी सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार सकाळी 10 ते 11.30 या दीड तासाच्या वेळेत दाखल करावा लागणार उमेदवारी अर्ज महापौर निवडीसाठी भाजपकडून आपल्या नगरसेवकांना व्हीप जारी ‘महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी पक्षाच्या अधिकृत आदेशाशिवाय कोणीही उमेदवारी अर्ज दाखल करू नये‘ ’तसेच कोणत्याही उमेदवाराचे सूचक किंवा अनुमोदक होऊ नये‘ अशा सूचना या व्हीपच्या माध्यमातून बजावण्यात आल्या आल्या आहेत सोलापूर महापालिकेचे भाजपचे गटनेते नरेंद्र काळे यांनी हा व्हीप जारी केलाय सोलापूर महापालीकेत भाजपचे 102 पैकी 87 नगरसेवक आहेत महापालिकेचा महापौर 6 फेब्रुवारी रोजी निवडला जाणार आहे, त्यापूर्वी आज अर्ज दाखल करावा लागणार आहे
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 02, 2026 03:31:03
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ करण्याचे वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादीच्या खासदाराची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार धुलाई केली आहे. सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार निमित्ताने भाजपची मुलुखमौदानी तोफ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची पळता भुई थोडी केली आहे. सोलापूर महापालिकेत एम आय एम पेक्षा यांची लायकी खाली आहे. आमचा सुपडा साफ करणाऱ्या मोहिते पाटील यांना छत भाजपाने दिलें आहे. ते काढल्या नंतर काय अवस्था होईल. संपलेले घराणे ज्या पक्षाने उभे केले. तुमचं जीवन ज्यानी उभे केल त्यांच्यावर टीका करता. अनेक लोकांचे संसार देशोधडीला लावले बँका कारखाने बुडवले जेवढे करता तेवढे पाप केले तरीही छाती वर करून कसे बोलता. असा प्रश्न त्यांनी मोहिते पाटील यांना विचारला आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 02, 2026 03:15:14
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 02, 2026 03:10:04
Nashik, Maharashtra:पाच मिनिटांत दोन दुचाकींची चोरी सीसीीटीत कैद झाली. शहरात दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडला असून दररोज पाच ते सहा दुचाकी चोरीस जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकताच जुने नाशिक येथील गर्दीच्या चौक मंडई परिसरातून नागरिकांच्या समोरूनच दोन चोरट्यांनी तीन महिन्यांपूर्वीच खरेदी केलेली दुचाकी चोरी करून नेली. यानंतर त्याच दुचाकीचा वापर करून राजीव गांधी भवन समोरील सुयोजित बिल्डिंगच्या पार्किंगमधून एक दुचाकी चोरीस गेली. ही दुचाकी नंतर कॉलेज रोड मार्गे डॉन बॉस्कोच्या पुढे नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. चोरी केलेल्या दुचाकी काही दिवस वापरात ठेवून नंतर त्या दुसऱ्या ठिकाणी टाकून देणे किंवा नवीन नंबरप्लेट लावून वापरण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे मूळ मालकांना वाहने परत मिळण्याची शक्यता कमी होत आहे
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 02, 2026 03:00:43
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत माजी आमदार पुत्राच्या प्रचारासाठी मैदानात - उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी जिल्हा परिषद गटातून माजी आ.दिलीप माने यांचे सुपुत्र पृथ्वीराज माने यांनी भाजपकडून निवडणूक लढवत आहेत - उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी गावातून माजी आ.दिलीप माने यांनी मुलासाठी प्रचार यात्रा काढत मतदान मागितले. - माजी आ. दिलीप माने यांनी काही दिवसापूर्वीच भाजपमध्ये केला होता प्रवेश. - विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून काम केल आहे राजकारणातली आमची ही तिसरी पिढी असणार - कोंडी जिल्हा परिषद निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढणार。 पृथ्वीराज माने, कोंडी जिल्हा परिषद भाजप उमेदवार दिलीप माने, माजी आमदार
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 02, 2026 02:45:58
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 02, 2026 02:31:44
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 02, 2026 02:31:28
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 02, 2026 02:16:59
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Gondia सडक अर्जुनी तालुक्यातील नरभक्षी वाघ जेरबंद.... दोन दिवसांपूर्वी महिलेचा घेतला होता बळी Anchor :- सडक अर्जुनी तालुक्यातील सहवनक्षेत्र कार्यालय सौंदडअंतर्गत येणाऱ्या माउली येथील वृद्ध महिलेचा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंदण्यात वन व वन्यजीव विभागाच्या चमूला यश आले आहे. गेल्या महिनाभरापासून वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला होता, तर दोन दिवसांपूर्वी माहुली येथील शेतात तुरीच्या शेंगा तोडत असलेल्या लक्ष्मी सयाम या वृद्ध महिलेवर हल्ला करून ठार केले होते, तर त्यापूर्वीच या वाघाने दीपानंद चौधरी या युवकावर हल्ला करून जखमी केले होते. यामुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण होते. वाघाला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी गावकरी आक्रमक झाले होते. यानंतर वन व वन्यजीव विभागाने वाघाला जेरबंद केले आहे..
0
comment0
Report
Advertisement
Back to top