Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001
मराठवाड़े में अतिवृष्टि से किसान संकट, एसटी भाड़ा बढ़ाने पर विवाद
VKVISHAL KAROLE
Oct 01, 2025 08:32:13
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
अतीवृष्टि महाराष्ट्र के मराठवाडा में संकट बनकर घूम रही है. खेती चौपट है और बळीराजा कठिनाई में है. लाल परी के नाम से जानी जाने वाली एसटी बस की भाड़े में दिवाळी के अवसर पर वृद्धि की घोषणा से ग्रामीण इलाकों में आक्रोश है. अतिवृष्टि के कारण हुए नुकसान और एसटी भाड़े की बढ़ोतरी किसान-मज़दूर वर्ग के लिए बड़ा मुद्दा बन गया है. मराठवाड़ा में भाड़े की बढ़ोतरी पर राजनीतिक प्रतिक्रियाएं आ रही हैं—राष्ट्रवादी नेता रोहित पवार ने भाड़ा रद्द करने की मांग की है, जबकि भाजपा ने सावधानीपूर्वक निर्णय लेने की बात कही है. अब सरकार से सुधार की मांग तेज हो गई है.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Oct 01, 2025 11:49:09
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटा तर्फे चारा वाटप, उपक्रमावेळी उडाली झुंबड - राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे चारा वाटप उपक्रमावेळी शेतकऱ्यांची अक्षरशः झुंबड उडाली - उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव मध्ये अजित पवार गटाच्या वतीने चारा वाटप सुरु होते - मात्र नागरिकांनी चारा वाटपावेळी एकच झुंबड करत चाऱ्याने भरलेला संपूर्ण ट्रॅक्टर पाच मिनिटात रिकामा केल्याचे पाहायला मिळाले - मिळेल त्या पद्धतीने नागरिकांनी चाऱ्याची पेंडी ओरबाडत घेऊन जाणे पसंत केले - आम्हाला जेवणाचं किट नाही दिले तरी चालेल मात्र जनावरांना चाऱ्याची नितांत गरज आहे - अनेकजण जीवनावश्यक वस्तूचे किट देत आहेत मात्र जनावरांना चाराच मिळत नाही. - शेतकऱ्यांची गरज ओळखून आम्ही हा चारा शेतकऱ्यांसाठी आणला आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 01, 2025 11:48:31
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आज वाशिमला आले. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन राज्य सरकारवर तीव्र टीका केली. ठाकरे म्हणाले की, सरकारने मदतीचा जीआर बदलून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १३,६०० रुपयांऐवजी फक्त ८,५०० रुपये व २ हेक्टरपर्यंतच दिलासा ठेवला आहे, जी शेतकऱ्यांची पिळवणूक आहे. शेतकऱ्यांना तातडीची व योग्य मदत न दिल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करेल,असा इशाराही त्यांनी दिला. तसेच शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये, तर पूर्णपणे नुकसान झालेल्यांना १ ते ५ लाख रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली. इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा अति पाऊस होऊनही शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळत नाही.उलट पहिल्यांदाच बघितले दिल्लीला जाऊन मुख्यमंत्री–उपमुख्यमंत्र्यांना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन घेऊन जाण्याचं नाटक करावं लागले ही राज्याच्या राजकारणातील पहिलीच वेळ असल्याची टीका त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.नुकसानीबाबत काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बाईट:माणिकराव ठाकरे,माजी प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 01, 2025 11:31:57
Satara, Maharashtra:सातारा - महाराष्ट्र सहकारी साखर कारखाना संघाची पहिल्यापासूनच पद्धत आहे ही गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी बैठक होत असते.या बैठकीत नैसर्गिक आपत्ती,पूर , दुष्काळ आला की प्रतिटना मागे साखर कारखाने पैसे देत असतात शेतकऱ्याचे पैसे घेतले असा त्याचा अर्थ होत नाही कारखान्याने स्वतःच्या उत्पन्नातील पैसे द्यायचे आहेत असा त्याचा अर्थ आहे असं मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे.हे संकट मोठं आहे की 60 लाख हेक्टर क्षेत्रातील नुकसान आहे. त्यामुळे मदत करावीच लागणार आहे त्यामुळे साखर उद्योगाची थोडी मदत व्हावी हा त्या मागचा उद्देश असल्याचे देखील देसाई यांनी सांगितले आहे.विरोधकांकडून हा जिजिया कर असल्याच्या टिकेला उत्तर देताना हा कर शेतकऱ्यांकडून घेतला जाणार नाही तर कारखाने देणार असल्याचं सांगत शरद पवार मुख्यमंत्री असताना किल्लारी भूकंपावेळी कारखान्यांनी 2 रुपये कर दिलाच होता मग तो जिजिया कर होता का असा सवाल देसाई यांनी केला आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 01, 2025 11:31:20
Chandrapur, Maharashtra:अतिवृष्टीत उध्वस्त झालेले सोयाबीन स्पीड पोस्टने पालकमंत्र्यांना पाठवले, चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा अनोखा विरोध चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील आसाळा गावातील शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबला आहे. अतिवृष्टीमुळे संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेले सोयाबीन पीक त्यांनी थेट स्पीड पोस्टने पालकमंत्र्यांकडे पाठवले आहे. गावातील बहुतांश शेतकरी सोयाबीन उत्पादक असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचाच निषेध म्हणून शेतकऱ्यांनी खराब झालेले सोयाबीन स्पीड पोस्टमधून पाठवून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. स्पीड पोस्टसोबत पाठवलेल्या चिठ्ठीत, पालकमंत्र्यांनी गावाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या पिकांची दयनीय अवस्था पाहावी आणि नुकसान भरपाईसंदर्भात तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी स्पष्ट विनंती करण्यात आली आहे.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 01, 2025 11:01:00
Pune, Maharashtra:उद्या शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाकडून जलद गतीने तयारी केली जात आहे. उत्साह, शक्ती प्रदर्शन आणि राजकीय संदेश देण्याच्या उद्देशाने पुणे–मुंबई एक्सप्रेस हायवेवर ठिकठिकाणी बॅनरबाजी सुरू आहे. कार्यकर्त्यांचा जोम आणि मेळाव्याकडे जाणाऱ्या जनतेला आवाहन करण्याची ही धडपड सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर सध्या एक वेगळंच चित्र दिसत आहे. उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर बॅनर, पोस्टर्स आणि फ्लेक्सद्वारे दसरा मेळाव्याचे आमंत्रण देण्याचा धडाका लावला आहे. प्रवाशांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मेसेज, घोषवाक्यं आणि ठाकरेंचे फोटो यांना मोठ्या प्रमाणात वापरलं गेलं आहे. कार्यकर्त्यांना शक्ती प्रदर्शन करण्याची ही मोठी संधी मानली जाते. त्यामुळे एक्सप्रेसवेवरील बॅनरबाजी केवळ सजावट नाही तर राजकीय संदेश देखील पोहचवत आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी नेमकी निवडणुकीच्या रणशिंगाची चाहूल तर नाही? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. उद्याच्या मेळाव्यातून ठाकरेंचा सूर किती तीव्र असेल? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. याच पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी...
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 01, 2025 10:54:33
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात सराईत गुंडाने दहशत माजवण्याचा प्रयत्न गरब्याच्या कार्यक्रमात शिवसेना शाखा प्रमुखावर बंदूक रोखत गोळीबार उल्हासनगर कॅम्प 2 मधील 24 नंबर शाळा परिसरात बंजारा विकास परिषद येथे बालाजी मित्र मंडळाचा गरबा आहे. ह्या गरब्याचे आयोजक शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे हे आहेत. त्यांना स्थानिक सराईत गुन्हेगार सोहम पवार याने गरब्याच्या ठिकाणी रात्री पावणे बारा वाजता अडवले. गरब्याला माझ्याकडून परवानगी घेतली का, मी इकडचा भाई आहे असे म्हणत सोहमने बंदूक काढून बाळा भगुरे यांच्यावर रोखले. त्यामुळे गरब्यात एकच खळबळ उडाली. बाळाच्या भावाने मध्यस्थी करीत त्याना वाचवले. मात्र चिडलेल्या सोहमने दहशत माजवण्यासाठी त्याच्या कडच्या बंदुकीतून हवेत दोन गोळ्या झाडल्या. या घटनेची माहिती उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष आव्हाड यांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलिस पथकासह घटनास्थळ गाठत तपास सुरू केला आहे. या प्रकरणी बाळा भगुरे यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे. चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
2
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 01, 2025 10:51:30
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Oct 01, 2025 10:45:28
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 01, 2025 10:40:45
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 01, 2025 10:37:59
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 01, 2025 10:03:08
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 01, 2025 10:02:49
Akola, Maharashtra:वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर गंभीर आरोप करत रोष व्यक्त केला.राज्य सरकारने अद्यापही ओला दुष्काळ जाहीर केलेला नसून हे सरकार चोर सरकार असल्याची टीका आंबेडकरांनी केलीय. जर ओला दुष्काळ जाहीर केला तर सर्वप्रथम खावटी जाहीर करावी लागते, पण टेंडरच्या माध्यमातून पैसेांचा गैरव्यवहार थांबेल म्हणूनच सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नाही असाेही तेांनी यावेळी केला.दिवाळी अगोदर नुकसान भरपाई देऊ असे सरकार सांगत आहे मात्र नुकसान भरपाई फक्त ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतरच देता येते असे ही ते म्हणाले.कर्जमाफीबाबतही त्यांनी राज्यकर्त्यांना टोला लगावला , जर कर्जमाफी केली तर बँकेचे कर्ज सरकारला फेडावे लागते, त्यामुळे मलिदा कमी होतो आणि म्हणूनच शेतकऱ्यांचा ७/१२ अद्याप कोरे केलेले नसल्याचं आंबेडकर म्हणाले. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना टोला लगावला आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 01, 2025 09:49:05
1
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top