Back
मतदार सूची में दुबार नाम और बोगस प्रविष्टियों पर सत्ता-वर विपक्ष का टकराव तेज
VKVISHAL KAROLE
Oct 18, 2025 10:03:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Anchor : महाराष्ट्रात मतदार यादीत बोगस नाव असल्याचा, दुबार नाव असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेत निवडणुकांची पुढे ढकलण्याची मागणी केली ,विरोधकांच्याकडून आरोप होत असताना आता सत्ताधारी सुद्धा या मतदार यादीतील दुबार नावा विरोधात आवाज उठवत असल्याचे चित्र आहे, बुलढाणा छत्रपती संभाजीनगर ,मुंबई सगळीकडेच निवडणूक आयोगाने याबाबत कारवाई करण्याची मागणी होतेय... मतदार यादीतील घोळ बाबत विरोधकांसह सत्ताधाऱ्य आक्रमक मतदार यादीतील घोळ असल्याचा आरोप करत आहे , बुलढाण्यात शिंदें गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मतदार यादीत एक लाख दुबार नाव असल्याचा आरोप केला आहे यातील काही नाव बोगस आहे मृत लोकांचीही आहे ही नाव हटवण्याची मागणी केली आहे तर बुलढाणा भाजप जिल्हाध्यक्षांनी या आरोपाची री ओढत जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली असल्याची माहिती दिली आहे आणि लवकरच ही नाव काढावी अशी त्यांची मागणी आहे.. छत्रपती संभाजीनगर मध्ये अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनीही पत्रकार परिषद घेत छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात 36000 बोगस नाव असल्याचा आरोप केलेला आहे ही नाव तातडीने काढण्याची मागणी त्यांनी केली आहे तर छत्रपती संभाजीनगर मधीलच अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघ म्हणजे सिल्लोड तालुक्यातही बोगस मतदार असल्याची तक्रार भाजपचा तालुकाध्यक्ष कमलेश कटारिया यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे आणि ही नावे वगळण्याची त्यांची मागणी आहे.. बेलापूर भाजपाचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सुद्धा मतदार यादीच्या घोळावरण टीका केली आहे अनेक वर्षांपासून तक्रार करूनही ही नाव वगळण्यात येत नसल्याचा आरोप त्यांचा आहे आणि आता मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे.. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारला यावरून टोला लावलाय, हा प्रकार सगळीकडेच आहे सत्ताधाऱ्यांच्याही लक्षात येत आहे मात्र निवडणूक आयोग या टाळाटाळ करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री मतदार याद्यांमध्ये घोळ नसल्याचा दावा करत आहेत मात्र आता सत्ताधारी आमदार कडूनच मतदार यादीत घोळ असल्याचे पुरावे पुढे येत आहे त्यामुळे राज्य सरकार आता विरोधकांमुळे तर कोंडीत अडकली आहे सोबतच सत्तेतील सहका-या मुळे ही त्यांच्या अडचणी वाढल्या आहे असं चित्र दिसतंय
7
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowOct 18, 2025 17:15:360
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 18, 2025 17:01:311
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 18, 2025 16:30:124
Report
ABATISH BHOIR
FollowOct 18, 2025 16:00:340
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 18, 2025 15:16:571
Report
MKMohammad Khan
FollowOct 18, 2025 14:49:429
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 18, 2025 14:00:590
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 18, 2025 13:54:154
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 18, 2025 13:31:240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 18, 2025 13:04:084
Report
AKAMAR KANE
FollowOct 18, 2025 13:00:450
Report
2
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 18, 2025 12:26:584
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 18, 2025 12:04:491
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 18, 2025 12:04:411
Report