Back
भारत में पहला ट्रेडिंग धोखाधड़ी मामला: डिपफेक वीडियो से करोड़ों की ठगी
MKManoj Kulkarni
Oct 18, 2025 14:00:59
Mumbai, Maharashtra
अँकर -- भारतातील पहिलाच ट्रेडिंग फसवणूक गुन्हा समोर आला आहे. या गुन्हयातील फिर्यादी हे सेबी रजिस्टर रिसर्च अनॉलिस्ट असून स्टॉक मार्केट एक्सपर्ट म्हणून काम करीत आहेत. ते वेगवेगळया बिजनेस न्युज चॅनेलवर कंपन्याच्या शेअरच्या किमतीच्या अनुषंगाने अभिप्राय देत असतात. दिनांक २९/०९/२०२५ रोजी सोशल मिडीयावर उपलब्ध असलेल्या शेअर मार्केट खरेदी विक्रीच्या गुंतवणूक संबधीत व्हिडीओचा वापर करून डिफ फेकच्या माध्यमातून बनावट व्हिडीओ तयार करून अनेक लोकांची अर्थिक फसवणुक करण्याच्या उद्देशाने ते जाहिरीतीच्या स्वरूपात फेसबुक व इन्स्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर प्रसारीत केले असल्याचे आढळून आले म्हणून त्यांनी नोंदवलेल्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाणे, पश्चिम विभाग इथे कलम ३१८(४), ३१९(२), ३३६ (२), ३५६ (२) बीएनएस सह कलम ६६ (क),६६ (ड) आय.टी अॅक्ट गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाच्या प्राथमिक तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की, नमूद आरोपीनी कंपनीच्या ग्राहकांची कोणतीही पडताळणी न करता फेसबुक अॅड आय.डी. चा बेकायदेशीरपणे अॅक्सेस आंतरराष्ट्रीय कस्टमर्सला देवून त्यांच्याव्दारे डिप फेक व्हिडीओज प्रदर्शित करण्यात मदत केली आहे. त्यांना डिप फेक व्हिडीओच्या माध्यमातून ऑनलाईन शेअर्स ट्रेडिंग इन्व्हेस्टमेन्टव्दारे नागरिकांची फसवणूक होणार आहे हे माहित असुनसुध्दा तसेच मेटा कंपनीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यानंतर मेटा कंपनीकडून येलो फ्लॅग दाखविण्यात आल्यानंतरही पुन्हा पुन्हा बेकायदेशीरपणे फेसबुक अॅड आय.डी. चा आर्थिक लाभासाठी अॅक्सेस आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना दिला आहे. सदर आरोपी हे व्हल्युलीप इंडिया सव्हिसेस प्रा.ली. या डिजिटल मार्केटींग कंपनीचे उच्चपदस्थ कर्मचारी आहेत. त्यांनी चायनीज नागरिकांना फेसबुक अॅड आय.डी. चा एक्सेस देवुन त्याबदल्यात साधारण ३ कोटी भारतीय व दुबई चलनाच्या माध्यमातुन घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये सायबर क्रेडिट पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. सायबर सेलचे उपायुक्त पुरषोत्तम कराड यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे की अशा प्रकारे व्हिडिओ पाहताना सत्यता पडताळण्याशिवाय विश्वास ठेवू नये. कष्टानी कमवलेला पैसा अशा लोकांच्या हाती लागून देऊ नका. काही वेळेला अशा ट्रेंडिंच्या ग्रुप मध्ये ऍड केलं जात अशा ग्रुपपासून लांब व्हा. असा सल्ला देखील देण्यात आला आहे.
अटक आरोपींची नावे
१) जिजिल सॅबेस्टियन, वय ४४ वर्ष, धंदा नोकरी, रा.ठी. २६, क्लालिस प्रेसिडंसी ले Out, एस.बींगीपुरा, हुल्लाहाल्ली, बेंगलोर, कर्नाटक.
२) दिपायन तपन बानर्जी, वय ३०, रा.ठी. २६६३/२५, सी मेन रोड, एचएसआर फस्ट लेआउट, बेंगलोर, कर्नाटक.
३)डॅनियल अरुमुघम, वय २५ वर्षे, रा.ठी. ४३९, ५ वा मजला, ७ वा क्रोस, जगदीशनगर, बेंंगलोर, कर्नाटक यांना दिनांक ०९/१०/२५ रोजी २२:३५ वा. बेंगलोर, कर्नाटक येथे अटक
४) चंद्रशेखर भिमसेन नाईक, वय ४२ वर्षे, रा.ठी. पी/३०३, गजराज सोसायटी, कोपरी पोलीस स्टेशन समोर, कोपरी, ठाणे (पूर्व)
Byte -- पुरषोत्तम कराड(पोलीस उपायुक्त सायबर)
मनोज कुळकर्णी
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 09:51:460
Report
ABATISH BHOIR
FollowNov 09, 2025 09:47:040
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 09, 2025 09:40:100
Report
KJKunal Jamdade
FollowNov 09, 2025 09:39:392
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 09:38:492
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 09, 2025 09:35:174
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 09, 2025 09:26:241
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 09, 2025 09:16:502
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 09, 2025 09:16:282
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 09, 2025 09:16:091
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 09, 2025 09:15:542
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 09, 2025 08:51:201
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 09, 2025 08:51:104
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 09, 2025 08:49:146
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 09, 2025 08:31:216
Report