Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

ओबीसी नेताओं के बीच टकराव: वाघमारे ने भुजबळ-वडेट्टीवार पर सवाल उठाया

NMNITESH MAHAJAN
Oct 18, 2025 13:04:08
Jalna, Maharashtra
जालना : नवनाथ वाघमारे बाईट भुजबळ-वडेट्टीवार यांच्यातच वाद होत असतील तर ओबीसींनी कुणाकडे पाहायचं ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा सवाल वडेट्टीवार यांचा व्हिडीओ सभेत दाखवायला नको हवा होता मागच्या कुरघोड्या काढण्यात वेळ घालू नका भुजबळांच्या मनात काय आहे आम्हाला काही कळेना सर्व ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन लढा द्यावा मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला वडेट्टीवार यांच्यावर टिका करायला लावली का,वाघमारे यांचा भुजबळांना सवाल भुजबळांनी सर्वांना सोबत घ्यावं ज्याला सभेला येता येतं ते येतात,ज्यांना शक्य नाही ते येत नाही,गम भुजबळ नागपूर मधील सभेला का गेले नाही,वाघमारे यांचा सवाल तुम्हीच तुमच्यात भांडण करणं योग्य नाही,वाघमारे यांची भुजबळ -वडेट्टीवार वादावर प्रतिक्रिया अँकर | भुजबळ-वडेट्टीवार यांच्यातच वाद होत असतील तर ओबीसींनी कुणाकडे पाहायचं असा सवाल ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी उपस्थित केला आहे.वडेट्टीवार यांचा व्हिडीओ बीडच्या सभेत भुजबळांनी दाखवायला नको हवा होता.मागच्या कुरघोड्या काढण्यात वेळ घालू नका असा सल्ला नवनाथ वाघमारे यांनी भुजबळांसह वडेट्टीवार यांना दिला आहे.भुजबळांच्या मनात काय आहे आम्हाला काही कळेना असं म्हणत सर्व ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन लढा द्यावा अस वाघमारे म्हणालेत. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला वडेट्टीवार यांच्यावर टिका करायला लावली का असा सवाल वाघमारे यांनी भुजबळांना केला आहे.भुजबळांनी सर्वांना सोबत घ्यावं अस आमचं मत असून ज्याला सभेला येता येतं ते येतात,ज्यांना शक्य नाही ते येत नाही,मग भुजबळ नागपूर मधील सभेला का गेले नाही असा सवाल देखील वाघमारे यांनी भुजबळ यांना केला आहे.तुम्हीच तुमच्यात भांडण करणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया वाघमारे यांनी भुजबळ -वडेट्टीवार वादावर दिली आहे. बाईट नवनाथ वाघमारे नेते ओबीसी
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Nov 19, 2025 02:31:15
Jalna, Maharashtra:जालना :नगराध्यक्षपदाचे तीन, तर नगरसेवकपदाचे 67 अर्ज बाद अँकर : जालना जिल्ह्यातील भोकरदन, परतूर आणि अंबड नगरपालिका निवडणुकीसाठी दाखल अर्जाची छाननी झाली. त्यात तिन्ही ठिकाणचे अध्यक्षपदाचे तीन तर नगरसेवक पदाचे एकूण 67 अर्ज बाद झाले आहेत. भोकरदन शहरात सर्वाधिक 56 जणांचे अर्ज बाद झाले आहेत.परतूर पालिकेच्या अध्यक्षपदासाठी 16, नगरसेवकपदासाठी 133 अर्ज दाखल झाले होते. छाननीदरम्यान नगराध्यक्षपदाचा एक अर्ज बाद झाला आहे तसेच विविध प्रभागांतून दाखल झालेले नगरसेवकपदाचे आठ अर्ज बाद झाले आहेत. छाननीनंतर नगराध्यक्ष पदासाठी 15 तर सदस्यपदासाठी 125 अर्ज राहिले आहेत. अंबड नगरपरिषदेच्या निवडणुकीतील नगराध्यक्ष पदासाठी एकूण 14 नामनिर्णय पत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एकूण 12 उमेदवार वैध ठरले आहेत. तर नगरसेवक पदासाठीचे एकूण 116 उमेदवार वैध ठरले आहेत.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 19, 2025 02:17:54
Shirur, Maharashtra:चाकण / पुणे गुलाल नगर परिषदांचा अँकर - चाकण नगर परिषद मध्ये महायुतीतील तिन्ही पक्ष आमने-सामने निवडणूक लढवत असताना महाविकास आघाडीने एकत्र अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार दिलेला नाही. भाजपा, शिंदे शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस आय अध्यक्षपदासाठी आमने-सामने आले आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेने नगरसेवक पदासाठी काही जागांवर आपले उमेदवार दिले आहेत, मात्र नगराध्यक्ष पदासाठी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. चाकण नगर परिषद 33 हजार 125 मतदार महिला मतदार - पुरुष मतदार - 12 प्रभागातील 25 नगरसेवकांच्या जागेसाठी मतदान, नगराध्यक्ष जनतेतून *महिलांसाठी 13 जागा आरक्षित* नगराध्यक्ष पदासाठी (सर्वसाधारण महिला राखीव) *भाजप, शिवसेना (शिंदे), अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस आय आमने-सामने* शिवसेना (शिंदे) - मनीषा सुरेश गोरे भाजप - हर्षला घनश्याम चौधरी राष्ट्रवादी (AP) - भाग्यश्री विवेक वाडेकर काँग्रेस आय - संगीता आनंद गायकवाड *प्रतिष्ठा पणाला...* खेड आळंदी विधानसभेचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, भोसरी विधानसभेचे भाजपचे आमदार आणि उत्तर पुणे जिल्ह्याचे प्रभारी महेश लांडगे आणि खेड आळंदीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार बाबाजी काळे यांची प्रतिष्ठा पणाला.. उत्तर पुणे जिल्ह्यात एकूण 05 नगर परिषद व 1 नगरपंचायत निवडणुक. - नगरपरिषद - चाकण, आळंदी, राजगुरुनगर, जुन्नर आणि शिरूर - नगरपंचायत - मंचर *निवडणुकीतील पाच मुद्दे* वाहतूक कोंडी, आरोग्य, पिण्याचे पाणी, कचरा आणि स्थानिक नगर परिषदेसाठी मूलभूत सुविधांचा अभाव.. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया चाकण पुणे..
117
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 19, 2025 02:17:36
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणी शहरातील डॉक्टर लेन भागातील विशाल गारमेंट्स होजिअरी या कपड्याच्या दुकानास मंगळवारी रात्री अचानक भिषण आग लागली. या आगीचे लोट पसरून वरच्या मजल्यावरील अन्य एक दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या आगीने या दुकानासह गोदामातील संपूर्ण कपड्याच्या माल खाक झालाय, सकाळी 4 वाजेपर्यंत ही आग धुमसत असल्याची माहिती नागरिकांनी दिलीय. दुकანाचे दैनंदिन व्यवहार आटोपून दुकान मालक घरी गेले होते, तेव्हा विशाल गारमेट्स होजिअरी या दुकानातून शटर खालून धूर दिसून आल्यानंतर प्रत्यक्षदर्शनींनी तात्काळ दुकान मालकास कळविले असता अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले, अग्निशामक दलाचा बंब येईपर्यंत या दुकानातील कपड्याच्या मालाने मोठा पेट घेतला. बंब आल्यानंतरसुध्दा योग्य दाबाने पाण्याचा मारा होऊ शकला नाही. आगीने वरच्या मजल्यावरील दोन घरांना धोका निर्माण झाला. तेव्हा तेथील रहिवाशांनी भितीपोटी घर रिकामे केले.
181
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 19, 2025 02:16:57
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर | पैठणला एकाच वॉर्डमधील भाजपच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज त्रुटीमुळे बाद छत्रपती संभाजीनगरमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर पैठणच्या राजकारणात मंगळवार उलथापालथीचे दृश्य पाहायला मिळाले. अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने निवडणुकीचे गणितच बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेष म्हणजे काही नामांकित दिग्गजांच्या अर्जाना याचा फटका बसला आहे. यात भाजपमधील बी फॉर्म जोडलेल्या वॉर्ड क्रमांक ६ मधील सिद्धार्थ परदेशी यांच्यासह एक महिला आणि अश्विनी लखमले या उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये अवैध ठरले. एकंदरीत अर्जाच्या छाननीमध्ये भाजपला फटका बसल्याचे दिसून आले. असे असले तरी नगराध्यक्ष पदासाठी मात्र भाजपच्या मोहिनी लोळगे यांनी प्रत्येक प्रभागातील भाजपच्या कार्यकत्यांचे नियोजन केले असल्याचे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी सांगितले.
37
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 19, 2025 02:16:00
Nagpur, Maharashtra:नागपूर राज्यात गेल्या अकरा वर्षात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात 564 मानवी मृत्यू माहिती अधिकारात पुढे आलीय. 2014 सालापासून ऑक्टोबर 25 पर्यंतची ही आकडेवारी आहे.... गेल्या 11 वर्षात 2023-24 मध्ये सर्वाधिक 102 मानवी मृत्यू आणि 1310 जण जखमी झालेय.. दरम्यान गेल्या काही वर्षात मानव वन्यजीव संघर्ष अतिशय टोकाला पोहोचताना दिसत आहे..यांमध्ये -- वन्यप्राण्याच्या बिहेवियर मध्ये झालेले बदल चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया वन्यजीव अभ्यासकांनी दिलीय. यावर स्थलांतर किंवा नसबंदी कायमस्वरूपी तोडगा राहू शकत नसल्याच धन्य जीव अभ्यासात सांगतात . -- मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यात वनविभागाच्या यंत्रणेच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.दरम्यान याबाबतीत आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर आणि वन्यजीव अभ्यासक कुंदन हाते यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
111
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 19, 2025 02:15:32
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मानवी हस्तक्षेपाचा फटका शेतशिवारात सापडलेल्या २२ दिवसांच्या बिबट्यांच्या दोन पिलांना बसला. जगण्यासाठी आधार असलेली त्यांची आईच त्यांच्यापासून दुरावली. वन विभागाने प्रयत्न करूनही बिबट्याच्या मादीने त्या पिल्लांचा स्वीकार न केल्यामुळे त्यांची रवानगी नागपूरला करण्यात आली. वैजापूर शिवारात काही जणांनी व्हिडीओ करण्याच्या नादात बिबट्याच्या पिल्लांना हाताळले. त्यांच्या शरीरावर मानवी गंध चिकटला आणि त्यामुळे मादी बिबट्यानेच आपल्या पिल्लांना सोबत नेणे नाकारले. १० दिवस चाललेली प्रतीक्षा, प्रयत्न आणि आशेचे क्षण अखेर निष्फळ ठरले. मादी बिब्ट्या दररोज पिल्ले ठेवलेल्या परिसरात येत होती, त्यांच्याकडे पाहत थांबत होती, परंतु त्यांना उचलून मात्र नेत नव्हती. पिल्लांच्या अंगावर मानवी वास टिकून राहिल्याने आईने त्यांना ओळखण्यास नकार दिल्याचे वनकर्मचाऱ्यांने सांगितले.
47
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 19, 2025 02:06:31
162
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 19, 2025 02:06:21
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने हरविलेले, चोरी गेलेले तसेच रिक्षा-बसमध्ये विसरून गेलेले अशा 16 लाख 25 हजार रुपये किमतीचे एकूण 101 मोबाईल फोन तांत्रिक तपासाच्या आधारे हस्तगत करून त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत. विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण, लोकेशन ट्रॅकिंग आणि सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने मोबाईलचे वापरकर्ते आणि त्यांचे ठिकाण शोधून काढले. यानंतर पथकाने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, जळगाव, अहिल्यानगर तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, बिहार या राज्यांमधून स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने मोबाईल हस्तगत केले.
146
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 19, 2025 02:06:11
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर |ब्रेकिंग | मराठवाडयात दररोज 3 शेतकरी आत्महत्या; दहा महिन्यांमध्ये 899 मृत्यू शेती करणे महागल्याने बळीराजा उचलतोय टोकाचे पाऊल अँकर | मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यांत 899 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे एका अहवालावरून समोर आले आहे. दिवसाला सरासरी तीन शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. सर्वाधिक 200 आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर आहे. नापिकीमुळे उत्पन्न घटले आहे. दुसरीकडे हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने बऱ्याचदा पिकावरील खर्चही निघत नाही. यातच यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला. काही भागांत जमीन खरडून गेली. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र ती अपुरी ठरली आहे. जानेवारीत 88, फेब्रुवारीत 75, मार्चमध्ये 110, एप्रिलमध्ये 88, मेमध्ये 78, जूनमध्ये 85, जुलैमध्ये 109, ऑगस्टमध्ये 76, सप्टेंबरमध्ये 83 आणि ऑक्टोबरमध्ये 109 शेतकऱ्यांनी आत्मhemmत्या केल्या. जिल्हानिहाय आकडे पाहता, छत्रपती संभाजीनगरमध्ये 171, जालना 58, परभणी 90, हिंगोली 53, नांदेड 145, बीड 200, लातूर 67 आणि धाराशिवमध्ये 115 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासनाकडून 1 लाख रुपयांची मदत दिली जाते. आतापर्यंत 560 प्रकरणे पात्र ठरली. 237 प्रकरणांची चौकशी सुरू आहे. 102 प्रकरणे अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या अहवालातून प्राप्त झाली आहे. 2023 मध्ये 948 आत्महत्या दोन वर्षांपूर्वी म्हणजे 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या काळात 948 शेतकऱ्यांनी आत्महत्याक केली.
140
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 19, 2025 02:05:47
Lasalgaon, Maharashtra:नाशिक के मालगाव तालुक्याके डोंगराळे में चार वर्षीय चिमुकली पर बलात्कार और हत्या की भयानक घटना ने हर जगह गुस्सा बढ़ा दिया है। इस अमानुषिक कृत्य के विरोध में लासलगाव के सुवर्णकार समाज ने मौन मोर्चा निकाल कर अपना आक्रोश व्यक्त किया। लासलगाव के शिवाजी चौक से पुलिस थाने तक मौन मोर्चा निकालते हुए सहाय्यक पुलिस निरीक्षक भास्कर शिंदे को निवेदन दिया गया। इस अवसर पर आरोपी के विरुद्ध तात्कालिक फास्ट-ट्रैक कोर्ट में ट्रायल चलाकर कठोरतम से कठोर सजा, फांसी की, दी जाए यह स्पष्ट मांग महिलाओं ने की। इसके बाद ऑल इंडिया पैंथर सेना की ओर से लासलगाव पुलिस को निवेदन देकर आरोपी को फांसी की सजा देने की मांग की गई。
135
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 19, 2025 02:05:31
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्यात हुडहुडी... पारा घसरला ९.५ अंश सेल्सिअस! येत्या दिवसात जिल्ह्यात थंडीची लाट पुना वाढणार Anchor : भंडारा जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. गेल्या चार दिवसांपासून १२ अंश सेल्सिअसच्या आसपास असलेले किमान तापમાન ९.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा १५.५ अंशांनी कमी आहे. तापमानात झालेल्या घसरणीमुळे जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढली आहे आणि थंडीची लाट येण्याची भीती आहे. भंडारा जिल्ह्यातील किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आल्याने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यात थंडीची लाट येण्याच्या शक्यता वर्तविली आहे. नागरिकांना सावधगिरीचा सल्ला देऊन लोकांना थंडीपासून स्वतःचे संरक्षण करा, उबदार कपडे वापरा, थंडीच्या संपर्कात येण्यास टाळा, वृद्धांची आणि मुलांची काळजी घ्या, असे आवाहन केले आहे.
79
comment0
Report
Advertisement
Back to top