Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109
राज्यसभा में तीसरी बार जीत के बाद शिर्डी सांसद रामदास आठवले बोले: मोदी-शहा लक्ष्य
KJKunal Jamdade
Mar 08, 2026 08:00:26
Shirdi, Maharashtra
Shirdi News Flash रामदास आठवले प्रेस पॉईंटर ऑन राज्यसभा हॅट्ट्रिक राजभसभेवर तिसऱ्यांदा निवड झाल्यानंतर शिर्डीला आलोय... शिर्डीचा खासदार होण्याची माझी खूप इच्छा होती... आता मी राज्याचा खासदार आहे... नरेंद्र मोदी आणि अमित शहांमुळे ही संधी मिळाली... अशी संधी मिळणारा मी एकमेव खासदार आहे... एकेकाळी आमचे 9 खासदार होते... सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाण्याची माझी भूमिका... बाबासाहेबांचा एकतेचा आणि संविधानाचा संदेश घेऊन मी देशभर काम करणार आहे... देशाचा विकास हाच नरेंद्र मोदींचा उद्देश... AI तंत्रज्ञानात पुढे जाण्याचा भारत सरकारचा संकल्प... नरेंद्र मोदींची भूमिका सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाण्याची... मी भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलो असलो, तरी मी RPI चा उमेदवार आहे... माझ्या मंत्रालयाला केंद्रात आणि राज्यात कोट्यवधींचा निधी मिळाला आहे... राज्याचे आणि केंद्राचे बजेट सर्व घटकांना न्याय देणारे आहे... आणखी दोन राज्यात संधी मिळाली तर माझ्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळेल... ऑन स्थानिक निवडणुका पुण्यात आमचे सहा नगरसेवक निवडून आलेत... महाराष्ट्रीयत पक्ष वाढवण्याचे आमचे प्रयत्न... ऑन ज्योती वाघमारे_stateसभा शिंदेंकडे अनेक नावे होती... त्यांची अडचण झाली... त्या मी ज्योती वाघमारेंच्या रूपाने एक महिला चेहरा दिला... त्या देखील दलीत पँथरच्या कार्यकर्त्या होत्या... ऑन काँग्रेस राहुल गांधींनी आजतागायत जातीजातीत भांडणे लावण्याचे काम केले... राहुल गांधी आताही तेच करताय... ऑन रोहित पवार आरोप प्रफुल पटेल अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राचे नुकसान... प्रफुल पटेल नागरी उड्डाण मंत्री होते... त्यामुळे VSR च्या मालकांशी त्यांचे चांगले संबंध असतील... संबंधांमुळे ते लग्नाला गेले असतील... मात्र अजित पवारांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे... अजित पवारांचा घातपात झाला असे मला वाटत नाही... ऑन इराण अमेरिका युद्ध अमेरिके आणि रशिया सोबत आपले संबंध चांगले... नवीन करारामुळे छोट्या व्यापाऱ्यांना मोठी संधी मिळेल
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Mar 08, 2026 09:33:53
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या सामाजिक जाणीव असलेल्या ज्योती पगारेांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक प्रेरणादायी उपक्रम राबवला. डोंगरदऱ्यामध्ये राहणाऱ्या कष्टकरी आदिवासी तसेच गरजू आणि महिला दिनापासून वंचित राहणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांनी सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले.ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक महिलांना महिला दिनासारख्या उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन ज्योती पगारे यांनी स्वतः पुढाकार घेत डोंगराळ भागात जाऊन तेथील आदिवासी महिलांना साडी सोळी व मिठाई देत सत्कार केला. या उपक्रमामुळे सन्मानित झालेल्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसून येत होते. “आमच्यासारख्या साध्या महिलांचा कोणी सन्मान करेल असे कधी वाटले नव्हते,” अशी भावना काही महिलांनी व्यक्त केली. याच डोंगरदऱ्यामध्ये जाऊन महिला दिनाचा आढावा घेतला आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 08, 2026 09:15:22
Amravati, Maharashtra:मेळघाट संघर्ष यात्रेत बच्चू कडूंच्या पायाला दुखापत; आज बच्चू कडू च्या पदयात्रेचा आठवा दिवस, 200 किलोमीटचा बच्चू कडूंचा प्रवास पूर्ण कर्जमाफीची आठवण करून देण्यासाठी आणि मेळघाटातील आदिवासींचा संघर्ष पुढे आणण्यासाठी बच्चू कडू यांनी एक मार्चपासून सेमाडोह ते चिखलदरा अशा 250 किलोमीटरच्या मेळघाट संघर्ष यात्रेला सुरुवात केली आहे. बच्चू कडूंच्या मेळघाट संघर्ष यात्रेचा आजचा आठवा दिवस असून बच्चू कडूंनी 200 किलोमीटरचा पायदळ प्रवास आतापर्यंत केला आहे. संपूर्ण यात्रा पायदळ असल्याने त्यांच्या पायाला मोठ्या दुखापत झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे बच्चू कडू यांनी काटकुंभ येथे पायावर प्राथमिक उपचार करून पुढील प्रवास सुरू केला आहे. बच्चू कडू यांच्या पायाला आणि बोटांना मोठ्या प्रमाणात फोड आले असून काही काळ विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र तरीही बच्चू कडू यांनी मेळघाट संघर्ष यात्रा सुरू ठेवली आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 08, 2026 08:18:46
Junnar, Pune, Maharashtra:इराण इजराइल अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा भारतातील शेतीमालाला मोठा फटका बसला असून या युद्धामुळे भारतात शेतीमालाचे बाजारभाव गडगडलेत तर दुसरीकडे भारतातून आखाती देशांमध्ये पाठवलेला शेतीमाल हा समुद्र लाईनमध्येच अडकल्याने शेकडो कोटींचं नुकसान झालंय... भारतातून दररोज शेकडो कोटींचा शेतीमाल आखादी देशात पाठवला जातो,जवळपास 60 ते 70 टक्के भाजीपाल्यासह खाद्य पदार्थ हे आखाती देशात निर्यात केले जातात मात्र सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्यातदारांसह शेतकय्रांनी पाठवलेल्या शेकडो कोटींचा शेतीमाल हा इराण,ओमान च्या समुद्र सीमांवरती अडकून पडलाय तर दुसरीकडे शिपिंग कंपन्यांनी या मालवाहतूक कंटेनर वरती वॉर सर चार्ज म्हणून चार हजार डॉलर (भारतीय रूपयांत 3 लाख 75 हजार रूपये) अतिरिक्त शुल्क आकारलंय, त्यामुळे निर्यातदारां सह शेतकऱ्यांच आधीच शेतीमाल समुद्र लाईन मध्ये अडकल्याने कोट्यावधी रूपयांचं नुकसान झालेलं असताना या अतिरिक्त शुल्काचा बोजा हो त्यांच्या डोक्यावरती पडलाय,महत्वाचं म्हणजे यातील सर्वाधिक शेतीमाल हा नाशवंत असल्याने हा शेतीमाल कंटेनर मध्येच खराब होऊन कोट्यावधी रुपयांचे नुकसान होण्याची भीतीही निर्माण झालीय. यातील पुढे नाशवंत शेतीमाल जर जहाजांमध्येच कंटेनर मध्ये खराब झाला तर हा शेतीमाल पुन्हा त्या देशांमध्ये नष्ट करण्यासाठी निर्यातदारांना अधिकच शुल्क मोजावं लागेल आणि हे शुल्क प्रतेक देशामध्ये कमी अधिक प्रमाणात वेगवेगळं आहे किंवा तो शेतीमाल पुन्हा रिएक्सपोर्ट करून पुन्हा माघारी आणावा लागेल त्याचा ही मोठा खर्च निर्यातदारांना सहन करावा लागत असताना या युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच मोठा तोटा सहन करावा लागत असताना शिपिंग कंपन्यांनी लावलेले अधिकचे वॉर चार्ज हे हटवण्याची मागणी निर्यातदार शेतकरी करत आहेत, अन्यथा आम्ही पूर्णपणे उध्वस्त होऊ संपून जाऊ असं निर्यातदार सांगत आहेत. भाजीपाला हा फार काळ टिकणारा नसल्याने या नाशवंत शेतीमालाच्या मालाचे मुंबई मध्ये JNPT बंदरावरती अडकलेल्या हजारो कंटेनर मधील शेतीमाल हे खाली करण्याचे आदेश हे शिपिंग कंपन्यांनी निर्यातदारांना दिलेत... आखाती देशात गेलेले हार्मोस सामुद्र ध्वनी ओमान ईरान सिमेवरती समुद्र लाईन मध्ये जवळपास 2500 ते 3000 हजार कंटेनर हे अडकून पडल्याची हि माहिती समोर येतेय. तर दुसरीकडे आखाती देशांना पाठवलेला शेतीमाला तिकडेच समुद्रात अडकून पडलाय तर मुंबईतील जेएनपीटी बंदरावरती अडकून पडलेला शेतीमाला शिपिंग कंपन्यांनी खाली उतरवण्याचे आदेश दिलेत तर दुसरीकडे सध्या भारतातील सर्वच फार्म प्रोडूसर कंपन्या कोल्ड स्टोरेज ही हाउसफुल(पुर्ण क्षमतेने) भरल्याने नवीन शेतीमाल साठवण्याची क्षमता संपल्याने हा शेतीमाल थेट आता निर्यात होण्याऐवजी भारतीय बाजारपेठेत दाखल होऊ लागल्याने सर्वच शेतीमालांचे बाजारभाव गडगडल्याने याचा मोठा फटका सर्वसामान्य शेतकय्रांना बसतोय. End Vo... या महायुद्धाची झळ सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसतेय त्यामुळे लवकरात लवकर ही युध्दजन्य परिस्थिती सुधारून पूर्ववत यावी आणि सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना दिलासा मिळावा हीच माफक अपेक्षा...प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 08, 2026 08:17:35
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 08, 2026 07:37:53
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 08, 2026 07:03:27
Malegaon, Maharashtra:मालेगावच्या किदवाई रोड वरील घड्याळाच्या दुकान महिला व तरुणांनी फोडले। आज सकाळी सेहरीची नमाज्याच्या वेळेच्या आसपास चार ते पाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली। हातात दंडुके सदृश्य हत्यार घेत मोठ्या प्रमाणावर या दुकानाची तोडफोड करण्यात आली, दुकानाचा बोर्ड देखील पाडण्यात आला। शहरातील कीदवाई रोडवरील टाईम शॉप नावाच्या दुकानाची तोडफोड। रमजान ईद निमित्त शहरातील कीदवाई रोडवर खरेदी साठी रात्रभर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते... मुस्लिम बांधव दिवस भर रोजा ठेवून सायंकाळी सोडून रात्री खरेदी साठी बाहेर निघतात... ही घटना नेमकी का घडली, दुकान फोडणारे तरुण, महिला कोण होत्या या बाबत आजुन पोलिस तपास करीत आहे... मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे..
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 08, 2026 07:01:36
Wardha, Maharashtra:वर्ध्यात राष्ट्रवादीच्या नेत्याने मुलीचे केले लैंगिक शोषण वर्ध्याच्या पुलगाव पोलिसांत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल दिवाकर गमे असे राष्ट्रवादीच्या नेत्याचे नाव 5 वर्षांपासून मुलीचे शोषण करीत असल्याची पोलिसांची माहिती - 'जागतिक महिला दिन' साजरा करत असताना, महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राला सुन्न करणारी एक अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक घटना - पीडितेचे वय अवघे १७ वर्षे असताना तिला नोकरीचे आमिष दाखवून गेल्या ५ वर्षांपासून हा ७८ वर्षीय नराधम तिचे सातत्याने लैंगिक शोषण करत असल्याची - दिवाकर गमे याला एका पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी ७ मार्चच्या सायंकाळी ठोकल्या बेड्या - आरोपी नराधम याने तीन दिवसापूर्वी अश्लील फोटो, विडिओ पाठवून छळ केल्याने पीडित मुलीने केली पोलिसांत तक्रार - पीडित मुलीच्या कुटुंबाशी दिवाकर गमे याचे अत्यंत जवळीक संबंध असल्याची माहिती - पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पॉक्सो आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल - दिवाकर गमे हे राजकीय नेते असून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दिग्गज नेत्याचे निकटवर्तीय असल्याची माहिती - या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत असल्याची माहिती - पीडित आरोपीचा पोलिसांनी मोबाईल जप्त केला असून यात पुन्हा आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविली आहे अँकर - वर्धा जिल्ह्यातून संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘जागतिक महिला दिना’च्या पार्श्वभूमीवर समाजाला हादरवून टाकणारी ही घटना उघडकीस आली आहे. वर्ध्यात राष्ट्रवादीशी संबंधित एका ज्येष्ठ नेत्यावर अल्पवयीन मुलीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिवाकर गमे असे या आरोपीचे नाव असून पुलगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पुलगाव पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलगी अवघी १७ वर्षांची असताना आरोपीने तिला नोकरीचे आमिष दाखवत गेल्या सुमारे पाच वर्षांपासून तिचे सातत्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीचे पीडित मुलीच्या कुटुंबाशी जवळचे संबंध असल्याची माहितीही समोर आली आहे.तसेच तीन दिवसापूर्वी आरोपीने पीडितेला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून छळ केल्याचा आरोप आहे. यामुळे त्रस्त झालेल्या पीडित मुलीने अखेर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत ७ मार्चच्या सायंकाळी आरोपी दिवाकर गमे याला अटक केली. पोलिसांनी आरोपीचा मोबाईलही जप्त केला असून त्यातून आणखी धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, आरोपी हा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाशी संबंधित एका दिग्गज नेत्याचा निकटवर्तीय असल्याची माहिती समोर येत असून या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.या संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 08, 2026 06:46:26
Baramati, Maharashtra:रासपचे नेते आणि माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातावर भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातील 99 टक्के जनतेच्या मनात अजित दादांचा घात झाला ही शंका आहे. हे जर केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला स्वच्छ करायचं असेल तर केंद्र सरकारने याबाबत सीबीआयचे नेमणूक करून सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करून दूध आणि पाणी वेगळे करून जनतेच्या समोर सत्य आणावं. तुमच्या अहवालावरती जनता विश्वास ठेवायला तयार नाही. जे सत्य आहे ते बाहेर यावं एवढीच राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी असल्याचं माजी मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. इंदापूर मध्ये बोलत होते.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 08, 2026 06:36:10
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीच्या क्रीडासंकुलात सामूहिक महिला लेझीम वादनात एक जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड.. ९१०७१ डोंबिवलीकरांनी रचला इतिहास गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद.. सामूहिक लेझीमसाठी नारीशक्ती एकवटली.. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील ९९११ महिला, विद्यार्थीनीनी एकत्र येत सामूहिक लेझीम वादनात एक जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करून डोंबिवलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक लेझीम वादन स्पर्धेत श्री संत सावळाराम क्रीडा संकुल या क्रीडांगणामध्ये ठाणे जिल्ह्यातील शेकडो शाळांच्या विद्यार्थीनी, महिला भगिनी आदींनी एकत्र येत ९,१११ एवढ्या मोठ्या संख्येने सामूहिकपणे लेझीम वादनाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 08, 2026 06:19:24
Nanded, Maharashtra:मैं मारने गैंग का शार्प शूटर हूँ, नांदेड बस स्टेशन की शिकायत पेटी में चिट्ठी डाल दी गई है। नांदेड शहर के कई प्रार्थना स्थलों (मस्जिद) में बॉम्ब स्फोट होने की जानकारी एक अज्ञात व्यक्ति ने पुलिस नियंत्रण कक्ष को फोन कर दी। पच्चिस मार्च दोपहर को अज्ञात ने फोन किया और इसके बाद पुलिस ने कॉलर की पहचान शुरू की। बस स्टॉप पर बंदोबस्त खड़े पुलिस कर्मियों को तक्रार पेटी की जांच करने को कहा गया, जिसमें बॉम्ब धमाके की लिखी चिट्ठी मिली। टेक्निकल जांच से यह फोन बीड जिले के अम्बेजोगाई से आया बताया गया। अम्बेजोगाई के एक पानीपुरी वाले के मोबाइल से कॉल किया गया था, यह स्पष्ट हुआ। पुलिस ने पानीपुरी वाले से पूछताछ की, तो उसने कहा कि किसी अज्ञात व्यक्ति ने महत्वपूर्ण कॉल करने के लिए मोबाइल लिया था। उससे पुलिस ने कॉल करने वाले व्यक्ति का स्केच बना लिया। अम्बेजोगाई की मनियार गली रविवार पेठ से 35 वर्षीय शेख सलीम शेख चांदपाशा को नांदेड पुलिस ने हिरासत में लिया। उसने खुद फोन कर बस स्टेशन में चिट्टी डालकर झूठी सूचना दी और अफवाह फैलाई—यह बात उसने पुलिस को भी बताई। यह व्यक्ति मनोरोगी पाया गया है और उसके बारे में अधिक जांच चल रही है।
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 08, 2026 06:08:22
Beed, Maharashtra:बीड:सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी 14 महिन्यानंतर जेल बाहेर पडणार भावाच्या निधनानंतर केल्या जाणाऱ्या धार्मिक विधीसाठी न्यायालयाची परवानगी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे 14 महिन्यानंतर जेल बाहेर पडणार आहे. निधनानंतर केल्या जाणाऱ्या धार्मिक विधीसाठी जयराम चाटेला न्यायालयाने पोलीस बंदोबस्तात उपस्थित राहण्याची परवानगी दिलीय. आरोपी जयराम चाटेचा धाकटा भाऊ श्रीराम चाटे याचे दोन मार्च रोजी तांबवा गावात निधन झाले. या निधनानंतर हिंदू रितीरिवाजानुसार 12 व्या दिवसाचा विधी महत्त्वाचा असल्याने या विधीला उपस्थित राहण्यासाठी जयरामच्या वकिलांकडून न्यायालयात परवानगी मागण्यात आली होती. यानुसार न्यायालयाने 13 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत आरोपीला अटी शर्ती घालून धार्मिक विधीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली. 6 मार्च रोजी जिल्हा व विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी अर्जाला विरोध केला होता. परंतु न्यायालयाने पोलीस बंदोबस्तात 12 व्याच्या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याची परवानगी दिली. यादरम्यान जयराम चाटेला पोलीस बंदोबस्ताचे शुल्क भरावे लागणार असून न्यायालयाने दिलेल्या अटींचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. जयरामच्या वकिलांकडून न्यायालयात अर्ज केल्यानंतर मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदार कोण? असा देखील सवाल उपस्थित केला होता.
0
comment0
Report
Advertisement
Back to top