Back
14 महीने बाद जेल से बाहर आएंगे सरपंच हत्या आरोपी, कोर्ट ने अनुमति दी
MMMahendrakumar Mudholkar
Mar 08, 2026 06:08:22
Beed, Maharashtra
बीड:सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी 14 महिन्यानंतर जेल बाहेर पडणार
भावाच्या निधनानंतर केल्या जाणाऱ्या धार्मिक विधीसाठी न्यायालयाची परवानगी
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे 14 महिन्यानंतर जेल बाहेर पडणार आहे. निधनानंतर केल्या जाणाऱ्या धार्मिक विधीसाठी जयराम चाटेला न्यायालयाने पोलीस बंदोबस्तात उपस्थित राहण्याची परवानगी दिलीय.
आरोपी जयराम चाटेचा धाकटा भाऊ श्रीराम चाटे याचे दोन मार्च रोजी तांबवा गावात निधन झाले. या निधनानंतर हिंदू रितीरिवाजानुसार 12 व्या दिवसाचा विधी महत्त्वाचा असल्याने या विधीला उपस्थित राहण्यासाठी जयरामच्या वकिलांकडून न्यायालयात परवानगी मागण्यात आली होती. यानुसार न्यायालयाने 13 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत आरोपीला अटी शर्ती घालून धार्मिक विधीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली.
6 मार्च रोजी जिल्हा व विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी अर्जाला विरोध केला होता. परंतु न्यायालयाने पोलीस बंदोबस्तात 12 व्याच्या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याची परवानगी दिली. यादरम्यान जयराम चाटेला पोलीस बंदोबस्ताचे शुल्क भरावे लागणार असून न्यायालयाने दिलेल्या अटींचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
जयरामच्या वकिलांकडून न्यायालयात अर्ज केल्यानंतर मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदार कोण? असा देखील सवाल उपस्थित केला होता.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 08, 2026 07:37:530
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 08, 2026 07:16:520
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 08, 2026 07:03:270
Report
MAMILIND ANDE
FollowMar 08, 2026 07:01:360
Report
JMJAVED MULANI
FollowMar 08, 2026 06:46:260
Report
ABATISH BHOIR
FollowMar 08, 2026 06:36:100
Report
KJKunal Jamdade
FollowMar 08, 2026 06:33:590
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 08, 2026 06:19:240
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 08, 2026 05:49:090
Report
SNSWATI NAIK
FollowMar 08, 2026 05:47:490
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 08, 2026 05:46:480
Report
SNSWATI NAIK
FollowMar 08, 2026 05:33:450
Report
AKAMAR KANE
FollowMar 08, 2026 05:33:330
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 08, 2026 05:15:440
Report