Back
युद्ध से भारत के कृषि उत्पादों के निर्यात पर भारी असर, बंदरगाह अड़चन और शुल्क बढ़े
HCHEMANT CHAPUDE
Mar 08, 2026 08:18:46
Junnar, Pune, Maharashtra
इराण इजराइल अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा भारतातील शेतीमालाला मोठा फटका बसला असून या युद्धामुळे भारतात शेतीमालाचे बाजारभाव गडगडलेत तर दुसरीकडे भारतातून आखाती देशांमध्ये पाठवलेला शेतीमाल हा समुद्र लाईनमध्येच अडकल्याने शेकडो कोटींचं नुकसान झालंय... भारतातून दररोज शेकडो कोटींचा शेतीमाल आखादी देशात पाठवला जातो,जवळपास 60 ते 70 टक्के भाजीपाल्यासह खाद्य पदार्थ हे आखाती देशात निर्यात केले जातात मात्र सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्यातदारांसह शेतकय्रांनी पाठवलेल्या शेकडो कोटींचा शेतीमाल हा इराण,ओमान च्या समुद्र सीमांवरती अडकून पडलाय तर दुसरीकडे शिपिंग कंपन्यांनी या मालवाहतूक कंटेनर वरती वॉर सर चार्ज म्हणून चार हजार डॉलर (भारतीय रूपयांत 3 लाख 75 हजार रूपये) अतिरिक्त शुल्क आकारलंय, त्यामुळे निर्यातदारां सह शेतकऱ्यांच आधीच शेतीमाल समुद्र लाईन मध्ये अडकल्याने कोट्यावधी रूपयांचं नुकसान झालेलं असताना या अतिरिक्त शुल्काचा बोजा हो त्यांच्या डोक्यावरती पडलाय,महत्वाचं म्हणजे यातील सर्वाधिक शेतीमाल हा नाशवंत असल्याने हा शेतीमाल कंटेनर मध्येच खराब होऊन कोट्यावधी रुपयांचे नुकसान होण्याची भीतीही निर्माण झालीय. यातील पुढे नाशवंत शेतीमाल जर जहाजांमध्येच कंटेनर मध्ये खराब झाला तर हा शेतीमाल पुन्हा त्या देशांमध्ये नष्ट करण्यासाठी निर्यातदारांना अधिकच शुल्क मोजावं लागेल आणि हे शुल्क प्रतेक देशामध्ये कमी अधिक प्रमाणात वेगवेगळं आहे किंवा तो शेतीमाल पुन्हा रिएक्सपोर्ट करून पुन्हा माघारी आणावा लागेल त्याचा ही मोठा खर्च निर्यातदारांना सहन करावा लागत असताना या युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच मोठा तोटा सहन करावा लागत असताना शिपिंग कंपन्यांनी लावलेले अधिकचे वॉर चार्ज हे हटवण्याची मागणी निर्यातदार शेतकरी करत आहेत, अन्यथा आम्ही पूर्णपणे उध्वस्त होऊ संपून जाऊ असं निर्यातदार सांगत आहेत. भाजीपाला हा फार काळ टिकणारा नसल्याने या नाशवंत शेतीमालाच्या मालाचे मुंबई मध्ये JNPT बंदरावरती अडकलेल्या हजारो कंटेनर मधील शेतीमाल हे खाली करण्याचे आदेश हे शिपिंग कंपन्यांनी निर्यातदारांना दिलेत... आखाती देशात गेलेले हार्मोस सामुद्र ध्वनी ओमान ईरान सिमेवरती समुद्र लाईन मध्ये जवळपास 2500 ते 3000 हजार कंटेनर हे अडकून पडल्याची हि माहिती समोर येतेय. तर दुसरीकडे आखाती देशांना पाठवलेला शेतीमाला तिकडेच समुद्रात अडकून पडलाय तर मुंबईतील जेएनपीटी बंदरावरती अडकून पडलेला शेतीमाला शिपिंग कंपन्यांनी खाली उतरवण्याचे आदेश दिलेत तर दुसरीकडे सध्या भारतातील सर्वच फार्म प्रोडूसर कंपन्या कोल्ड स्टोरेज ही हाउसफुल(पुर्ण क्षमतेने) भरल्याने नवीन शेतीमाल साठवण्याची क्षमता संपल्याने हा शेतीमाल थेट आता निर्यात होण्याऐवजी भारतीय बाजारपेठेत दाखल होऊ लागल्याने सर्वच शेतीमालांचे बाजारभाव गडगडल्याने याचा मोठा फटका सर्वसामान्य शेतकय्रांना बसतोय. End Vo... या महायुद्धाची झळ सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसतेय त्यामुळे लवकरात लवकर ही युध्दजन्य परिस्थिती सुधारून पूर्ववत यावी आणि सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना दिलासा मिळावा हीच माफक अपेक्षा...प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowMar 09, 2026 01:30:150
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowMar 09, 2026 01:16:430
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 09, 2026 01:16:230
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 09, 2026 01:01:250
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 09, 2026 01:01:060
Report
ABATISH BHOIR
FollowMar 09, 2026 01:00:500
Report
SNSWATI NAIK
FollowMar 08, 2026 17:16:110
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 08, 2026 15:30:100
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 08, 2026 14:47:090
Report
UPUmesh Parab
FollowMar 08, 2026 14:32:490
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 08, 2026 14:15:530
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 08, 2026 13:48:040
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 08, 2026 13:00:210
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 08, 2026 12:36:450
Report