Back
इंदापुर नगरपालिका चुनाव: भरत शाह को अध्यक्ष पद के लिए NCP ने उतारा
JMJAVED MULANI
Nov 15, 2025 12:05:09
Baramati, Maharashtra
पुण्याच्या इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग..... जिल्हाध्यक्ष गारटकरांच्या विरोधाला डावलून भरत शहांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून भरत शहा यांना उमेदवारी......माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी दाखल केली नगराध्यक्ष पदाची उमेदवारी.... कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आणखी एक अर्ज दाखल करणार.... राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करणार... पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या भूमिकेकडे लक्ष....भरत शहा यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीला गारटकर यांचा विरोध कायम....
Date 15 Nov 25
Anchor_ इंदापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज भरत शहा यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
*मुदत संपण्याच्या आत भरत शहा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांसह इतर नेते मंडळींच्या उपस्थितीत मोठे शक्ती प्रदर्शन करीत आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.*
इंदापूर नगरपालिका अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कोणाला उमेदवारी देणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागलं होतं. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून यावरती शिक्कामोर्तब झाले असून भरत शहा यांना इंदापूर नगरपालिका अध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे जिल्हाध्यक्ष गारटकर यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना अजित पवार गटात घेऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यास अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी कडाडून विरोध दर्शवला होता. असं असताना ही पक्षाने जिल्हाध्यक्ष गारटकर विरोधी भूमिका घेत भरत शहा यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कायम केली आहे.आज भरत शहा यांनी इंदापूर नगर नगरपालिका परिषदच्या नगराध्यक्ष पदाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. त्यामुळे आता जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
जिल्हाध्यक्ष गारटकर यांच्या भूमिकेकडे लक्ष...
इंदापूर नगरपालिका परिषदेचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण असून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचन्द्र पवार पक्षात असलेले इंदापूर नगरपालिका परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात घेऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यास पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर आणि त्यांच्या समर्थकांचा प्रचंड विरोध आहे.
नगराध्यक्ष पदाचा हा तिढा सोडवण्यासाठी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यात दोन दिवसापूर्वी बैठक पार पडली. मात्र या बैठकीत देखील जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या इच्छेप्रमाणे तोडगा निघाला नाही. त्यानंतर जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी इंदापूर मध्ये त्यांच्या निवासस्थानी दाखल होत कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
या बैठकीत जर पक्षाने गारटकर समर्थक विरोधी भूमिका घेतली तर मात्र आपल्या पदाचा राजीनामा देऊ आणि इंदापूर मध्ये स्थानिक आघाडी करून नगर परिषदेची निवडणूक लढवू असा पवित्रा गारटकर आणि त्यांच्या समर्थकांनी घेतला. एकूणच नगराध्यक्ष पदाच्या मुद्द्यावरून गारटकर यांनी पक्षाला रामराम ठोकण्याची तयारी देखील दर्शवली आहे.
जर पक्षाने आपल्या विरोधी निर्णय घेतला तर स्थानिक आघाडी करून निवडणुकांच्या आखाड्यात उतरू, उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघू आणि राजीनामा देऊ.जर पक्षाने आमचं ऐकलं,योग्य सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळा वरती आहोत पक्षाने जर आम्हाला कोलल तर आम्ही सुद्धा पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही.असा थेट इशाराच इंदापूरातून जिल्हाध्यक्ष गारटकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह इंदापूरचे आमदार राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिलेला आहे.
एकूणच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर कोणती भूमिका घेणार ? पक्षाला सोडचिट्टी देणार की अन्य मार्ग अवलंबणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
गारटकर पाटील माने आघाडीतून मंत्री भरणेंपुढे उभे केले जाणार आव्हान....
इंदापूर मध्ये शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपचे नेते प्रवीण माने आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या स्थानिक आघाडीची चर्चा सुरू झाली असून इंदापूर मध्ये यातून एक नव समीकरण पाहायला मिळेल. गेले कित्येक वर्ष एकमेकांच्या विरोधात असलेले गारटकर आणि पाटील या नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येत मानेंना सोबत घेत दत्तात्रय भरणे यांच्या समोर 2029 साठी मोठं आव्हान उभा करतील अशी चर्चा आता तालुक्यात रंगू लागली आहे.
75
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 15, 2025 14:21:090
Report
PNPratap Naik1
FollowNov 15, 2025 14:19:3589
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 15, 2025 14:01:160
Report
ABATISH BHOIR
FollowNov 15, 2025 13:48:0696
Report
UPUmesh Parab
FollowNov 15, 2025 13:46:2461
Report
KJKunal Jamdade
FollowNov 15, 2025 13:19:2280
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 15, 2025 13:17:03134
Report
PNPratap Naik1
FollowNov 15, 2025 13:01:58100
Report
KJKunal Jamdade
FollowNov 15, 2025 12:47:5475
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 15, 2025 12:36:01112
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 15, 2025 12:33:5290
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 15, 2025 12:31:12151
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 15, 2025 12:20:0788
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 15, 2025 12:19:44156
Report