Back
शिरूर चव्हाणवाडी के स्क्रॅप गोदाम में भीषण आग, बड़ी आर्थिक नुकसान
HCHEMANT CHAPUDE
Mar 08, 2026 05:49:09
Shirur, Maharashtra
शिरूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथे स्क्रॅपच्या गोडाऊनला भीषण आग,परिसरात काळ्या धुराच्या लाटा
शिरूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथे असलेल्या स्क्रॅपच्या गोडाऊनला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले असून परिसरात प्रचंड काळ्या धुराच्या लाटा पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहितीनुसार, गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व इतर ज्वलनशील स्क्रॅप साहित्य साठवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे आग लागल्यानंतर काही क्षणातच तिने भीषण रूप धारण केले. आगीमुळे आकाशात काळा धूर मोठ्या प्रमाणात पसरल्याचे नागरिकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र गोडाऊनमध्ये असलेल्या प्लास्टिक सदृश वस्तूंमुळे आगीची तीव्रता वाढल्याने संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले. या घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 08, 2026 07:16:520
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 08, 2026 07:03:270
Report
MAMILIND ANDE
FollowMar 08, 2026 07:01:360
Report
JMJAVED MULANI
FollowMar 08, 2026 06:46:260
Report
ABATISH BHOIR
FollowMar 08, 2026 06:36:100
Report
KJKunal Jamdade
FollowMar 08, 2026 06:33:590
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 08, 2026 06:19:240
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 08, 2026 06:08:220
Report
SNSWATI NAIK
FollowMar 08, 2026 05:47:490
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 08, 2026 05:46:480
Report
SNSWATI NAIK
FollowMar 08, 2026 05:33:450
Report
AKAMAR KANE
FollowMar 08, 2026 05:33:330
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 08, 2026 05:15:440
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 08, 2026 05:02:150
Report