Back
डोंबिवली: ठाकरे गट के प्रमुख के ऑडियो से उठे सवाल, माघार के आदेश पर खलबली
ABATISH BHOIR
Jan 05, 2026 05:05:35
Kalyan, Maharashtra
वरून आदेश आला की माघार घ्यावीच लागते… आता माझाच बळी?”
डोंबिवलीत ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांचा ऑडिओ व्हायरल, राजकीय वर्तुळात खळबळ
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 122 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच, अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात अनेक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.
याचा थेट फायदा महायुतीला झाला आणि महायुतीचे तब्बल 20 उमेदवार बिनविरोध विजयी झाले. या बिनविरोध विजयावर एकीकडे विरोधकांनी टीका सुरू केली असतानाच, दुसरीकडे ठाकरे गटातच अंतर्गत वाद उफाळून आला दोन दिवसापूर्वी डोंबिवलीतील शहर शाखेत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख तात्या माने यांनी उमेदवारांवर फोन करून माघार घेण्याचा दबाव टाकल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे शहर प्रमुख, उमेदवारी मिळालेली उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालत तात्या माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती पक्षाचा हा अंतर्गत वाद सुरू असतानाच आता या मागणीदरम्यानच तात्या माने आणि प्रभाग क्रमांक 22 मधील उमेदवार वैशाली म्हात्रे (पोटे) यांच्यातील संभाषणाचा ऑडिओ व्हायरल झाला.
या ऑडिओ क्लिपमध्ये, “पक्षांचा आदेश आहे, वरून सांगितलं आहे, काही गोष्टी आदेशानुसार कराव्याच लागतात” असे शब्द जिल्हाप्रमुखांकडून ऐकू येतात.
यावर उमेदवाराकडून “म्हणजे आता माझाच बळी देतात का?”
असा सवाल केला जातो. या ऑडिओमुळे उबाठा–मनसे युतीत जागावाटपात समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे. काही प्रभागांमध्ये उबाठाचे उमेदवार असतानाच मनसेने देखील उमेदवारी दिल्याने, वरिष्ठ पातळीवरून उबाठाच्या उमेदवारांना माघार घेण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर डोंबिवली शहर शाखेत
ठाकरे गटातील उमेदवार, इच्छुक व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे. जिल्हाप्रमुखांनी हकालपट्टीची जोरदार मागणी करत जिल्हाप्रमुखांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाने माघार घेण्याचा आरोप,एबी फॉर्म गोंडळ, महिला उमेदवारांवर फोनद्वारे दबाव,आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचे गंभीर आरोप इच्छुक उमेदवार पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आला होता मात्र या सर्व प्रकरणावर जिल्हाप्रमुखांची बातचीत केली असता त्यांनी उमेदवारी देताना अभ्यास केला जातो, मात्र त्रुटी लक्षात आल्यास पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार निर्णय बदलावे लागतात निर्णय बदलल्यामुळे नाराजी होते हे स्वाभाविक असून आनंद आणि नाराजी या दोन्ही गोष्टी राजकारणात अपेक्षित 30 तारखेनंतर दुरुस्ती शक्य नसल्याने मर्यादित कालावधीतच उमेदवारांच्या याद्या दुरुस्त कराव्या लागल्यामनसे–शिवसेना जागावाटपातील दुरुस्ती आदेशांची अंमलबजावणी केली, यापलीकडे काहीही वेगळं केले नाही असे सांगत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेचे पालन केलं असल्याचं तात्या माने यांनी सांगितले आरोप प्रत्यारोप व अंतर्गत वादाचा फेरा सुरू असतानाच आता ठाकरे गटाची अंतर्गत घडी विस्कळीत झाल्याचं चित्र दिसत आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
KCKumar Chandan
FollowJan 06, 2026 11:02:460
Report
SPSatya Prakash
FollowJan 06, 2026 11:02:280
Report
AMAjay Mishra
FollowJan 06, 2026 11:02:100
Report
VSVaibhav Sharma
FollowJan 06, 2026 11:01:530
Report
RSRUPENDRA SHRIWASTVA
FollowJan 06, 2026 11:01:400
Report
RRRikeshwar Rana
FollowJan 06, 2026 11:01:30Dantewada, Chhattisgarh:दंतेवाड़ा- कावड़गांव के पास KK रेललाइन की चपेट में आने से एक महिला हुई घायल। घायल महिला को जिला अस्पताल दंतेवाड़ा लाया गया जहाँ इलाज के दौरान हुई मौत। कटेकल्याण थानाक्षेत्र की घटना
0
Report
HGHarish Gupta
FollowJan 06, 2026 11:01:230
Report
RNRajesh Nilshad
FollowJan 06, 2026 11:01:070
Report
MSMrinal Sinha
FollowJan 06, 2026 11:00:510
Report
AAANOOP AWASTHI
FollowJan 06, 2026 11:00:020
Report
NCNITIN CHAWRE
FollowJan 06, 2026 10:59:150
Report
0
Report
RRRakesh Ranjan
FollowJan 06, 2026 10:58:470
Report
FWFAROOQ WANI
FollowJan 06, 2026 10:58:250
Report