Back
मराठवाडा के चार जिलों में आंधी-बारिश से रबी फसलें बर्बाद, किसानों की चिंता बढ़ी
NMNITESH MAHAJAN
Mar 20, 2026 08:00:48
Jalna, Maharashtra
जालना : मराठवाड्यात अवकाळीचा कहर, हजारो हेक्टरवरील पिकं गारपीट, वादळी वाऱ्यासह पावसानं आडवी (पॅकेज)\n\nजालना, हिंगोली, लातूर, धाराशिव जिल्ह्यात रब्बी पिकं मातीमोल\n\nजालना : मराठवाड्यातील जालना, लातूर, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीने तडाखा दिलाय. वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे जालना, लातूर, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील रब्बी पिकांचं अतोनात नुकसान झालंय. जमिनीवर पिकं आडवी झाल्यानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय.\n\nजालना जिल्ह्यात दुपारी आणि रात्रीच्या sुमारास झालेल्या पावसामुळे गहू, हरभरा, मका, ज्वारी, कांदा बियाणे आणि आंबा फळबागांचं अतोनात नुकसान झालंय. ज्वारी आणि गहू ही पिकं दाणे भरण्याच्या अवस्थेतच जमिनीवर आडवी झाल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलेय. जिल्ह्यातील तिन्ही तालुक्यात दिड तास अवकाळी पावसानं हजेरी लावली तर वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे जिल्ह्यात हजारो एकरावरील रब्बी पिकं आडवी झालीयत. असं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या नशिबात पुन्हा निसर्गाने थट्टाच लिहून ठेवलीय की काय असा प्रश्न पडलाय.\n\nलातूर जिल्ह्यात देखील दोन दिवस झालेल्या गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि आंबा पिकांचे हाल झालेत. जिल्ह्यातील शेकडो एकरावरील पिकं अवकाळीच्या कहरामुळे आडवी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास गळून पडलाय.\n\nहिंगोली जिल्ह्यातील बासंबा भागात देखील काल रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यात गहू, ज्वारी आणि हरभरा ही रब्बीतील शेकडो एकरावरील मुख्य पिकं उध्वस्त झाल्याने शेतकरी चिंतेच्या गर्तेत सापडलाय. या अवकाळी पावसामुळे रब्बीतील पिकातून शेतकऱ्यांच्या पदरात पडणारा पैसा हिरावून घेतल्यानं वर्षभर कुटुंब चालवायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय.\n\nधाराशिव जिल्ह्यात देखील अवकाळीचा असाच कहर पाहायला मिळाला. जिल्ह्यात अवकाळीने सलग दोन दिवस हजेरी लावत रब्बी पिकांची नासाडी केली. यात गहू, ज्वारी, हरभरा पिकांचा समावेश आहे. दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टरवरील पिकं नेस्तनाबूत झालीय. शेतकरी पूर्ण खचून गेलाय. नुकसान शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचं असल्यानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अवकाळीमुळे कंबरडं मोडलं गेलंय.\n\nहा अंश पंचनामे सुरू असून अद्याप मदत मिळण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांच्या नजरेत आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ADAnup Das
FollowMar 20, 2026 09:21:360
Report
AOAjay Ojha
FollowMar 20, 2026 09:19:370
Report
ASAJEET SINGH
FollowMar 20, 2026 09:19:190
Report
VAVINEET AGARWAL
FollowMar 20, 2026 09:19:040
Report
KBKuldeep Babele
FollowMar 20, 2026 09:18:400
Report
GSGajendra Sinha
FollowMar 20, 2026 09:18:030
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowMar 20, 2026 09:17:340
Report
DKDAVESH KUMAR
FollowMar 20, 2026 09:17:140
Report
PKPRINCE KUMAR KUSHWAHA
FollowMar 20, 2026 09:17:000
Report
RSRUPENDRA SHRIWASTVA
FollowMar 20, 2026 09:16:380
Report
PKPradeep Kumar
FollowMar 20, 2026 09:15:510
Report
ASABHISHEK SHARMA1
FollowMar 20, 2026 09:15:360
Report
KRKishore Roy
FollowMar 20, 2026 09:15:230
Report
861
Report
MDMahendra Dubey
FollowMar 20, 2026 09:07:36754
Report