Back
चंद्रपूर भाजपा में फिर टूटी गुटबाज़ी, महापौर चुनाव से पहले बखेड़ा बढ़ा
AAASHISH AMBADE
Feb 07, 2026 09:45:58
Chandrapur, Maharashtra
च chandपूर भाजपात पुन्हा एकदा ऑल इज नॉट वेल चे चित्र दिसत आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत न विचारता दुस-या उमेदवाराचा अर्ज दाखल केल्यानंतर आ. मुनगंटीवार संतापले आहेत. त्याला उत्तर देताना जोरगेवार यांनी मात्र वरिष्ठांना विचारून हा निर्णय घेतल्याचे सांगत विधानसभा निवडणुूक आणि मनपा निवडणुकीतील बंडखोरीचा विषय काढत मुनगंटीवारांना डिवचले आहे.
व्हीओ 1) चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासंघर्ष सुरू झाल्यापासून भाजपमधील अंतर्गत वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. तिकीट वाटपावरून सुरू झालेला वाद, एबी फॉर्म चोरीचा आरोप, किशोर जोरगेवार समर्थक असलेले सुभाष कासनगोट्टूवार यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी आणि त्यानंतर महापौर पदासाठी सुरू झालेली फिल्डिंग या सगळ्या घडामोडींमुळे पक्षातील संघर्ष अधिकच तीव्र झालाय. हा वाद मिटवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यांच्या निर्देशानुसार सुधीर मुनगंटीवार यांचा शब्द अंतिम मानत भाजप प्रदेश कार्यकारिणीकडून आलेल्या संगीता खांडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मात्र ऐनवेळी किशोर जोरगेवार गटाकडून सारिका संदुरकर यांचा अतिरिक्त उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आणि पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटलं आहे. संतापलेल्या सुधीर मुनगंटीवारांनी मात्र बोलताना माझ्यासाठी ही आश्चर्यकारक बाब आहे, मुख्यमंत्र्यांकडे जी बैठक झाली त्यात प्रदेशाध्यक्षांनी संगीता खांडेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी सांगितलं होते असे सांगितले. आता जे काही झाले आहे, याची नोंद पक्ष घेईल आणि योग्य क्षणी कारवाई होईल असे सांगत भाजपमध्ये काँग्रेस प्रमाणे वागणं नंतर महागात पडते हे अनेकांनी अनुभवलं आहे असा टोला लगावला
बाईट 1) आ. सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
व्हीओ 2) यावर प्रतिक्रिया देताना आमदार किशोर जोरगेवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पक्षाच्या वतीने भरल्या जाणा-या खांडेकर यांच्या फॉर्ममध्ये एखादी त्रुटी निघू शकते आणि अडचण येऊ शकते, असं आमच्या जेव्हा लक्षात आलं, तेव्हा मी निवडणूक प्रमुख म्हणून इतर नेत्यांशी चर्चा करून संदूरकर यांचा फॉर्म वेळेवर भरल्याचे सांगितले. सावधानता म्हणून आम्ही हा फॉर्म भरला आणि तेव्हाच आम्ही उमेदवाराकडून विड्रॉल वर सही देखील घेतल्याचे सांगितले. मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या विरोधात बंडखोर उभे केले होते त्यांचे मोबाईल देखील काढून घेण्यात आले होते असे सांगत मनपा निवडणुकीतही 28 बंडखोर अधिकृत उमेदवारांच्या विरोधात उतरवून घात करण्याचा प्रयत्न झाला असे सांगत मुनगंटीवार गटाकडे अंगुली निर्देश केला.
बाईट 2) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर
व्हीओ 3) या सगळ्या घडामोडींमुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला असून, महापौर निवडणुकीआधीच पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. नेतृत्वाचा आदेश अंतिम मानला जाईल की स्थानिक राजकारण वरचढ ठरेल, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. येत्या 10 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत हा अंतर्गत वाद भाजपसाठी किती महागात पडतो, हे निकालातूनच स्पष्ट होणार आहे. या नव्या संघर्षाने कार्यकर्ते आणि उमेदवार मात्र धास्तावले आहेत
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
MJManoj Jain
FollowFeb 07, 2026 11:04:590
Report
RJRahul Joshi
FollowFeb 07, 2026 11:04:430
Report
VAVINEET AGARWAL
FollowFeb 07, 2026 11:04:280
Report
DSDanvir Sahu
FollowFeb 07, 2026 11:04:130
Report
ASAshutosh Sharma1
FollowFeb 07, 2026 11:03:450
Report
AMAjay Mishra
FollowFeb 07, 2026 11:03:290
Report
NBNARAYAN BEHERA
FollowFeb 07, 2026 11:03:140
Report
SBShowket Beigh
FollowFeb 07, 2026 11:02:450
Report
PSPIYUSH SHUKLA
FollowFeb 07, 2026 11:02:280
Report
DCDhruv Chaudhary
FollowFeb 07, 2026 11:02:120
Report
JKJitendra Kanwar
FollowFeb 07, 2026 11:01:470
Report
KCKULDEEP CHAUHAN
FollowFeb 07, 2026 11:01:160
Report
DKDeepesh Kumar
FollowFeb 07, 2026 11:01:000
Report
SLSanjay Lohani
FollowFeb 07, 2026 11:00:370
Report