Back
यशश्री मुंडे ने वैद्यनाथ बँक निवडणुकीत अर्ज भरला!
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 12, 2025 04:33:41
Beed, Maharashtra
बीड: वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत यशश्री मुंडे यांनी भरला अर्ज
Anc: वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या निवडणुकीनिमित्त यशश्री मुंडे यांनी अर्ज केला आहे. परळी वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यशश्री मुंडे या भगिनींसह 71 अर्ज दाखल झाले.
14 जुलैला छाननी आणि 15 ते 19 जुलै दरम्यान अर्ज मागे घेण्याचा कालावधी असून यानंतरच याचे चित्र स्पष्ट होणार आहे. एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होत असून 10 ऑगस्टला मतदान तर 12 रोजी मतमोजणी होणार आहे.
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowJul 12, 2025 08:36:42Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_FORT_PRATIKRUTI
सातारा – युनेस्कोने नुकतीच भारतातील महाराष्ट्र राज्यातील 11 आणि तमिळनाडूतील 1 अशा एकूण 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. या ऐतिहासिक निर्णया नंतर राज्यात आनंदाचे वातावरण आहे. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात करण्यात आला असून, या सर्व 12 गडकिल्ल्यांच्या हुबेहूब, भव्य अशा प्रतिकृती संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत.युनेस्कोच्या टीमने साताऱ्यातील या संग्रहालयाला नुकतीच भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी प्रत्यक्ष प्रतिकृती पाहून त्याची बारकाईने पाहणी केली तसेच गडकिल्ल्यांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. ऐतिहासिक, स्थापत्य आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून या प्रतिकृती अत्यंत महत्त्वाच्या आहेत.संग्रहालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रतिकृती लवकरच सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहेत. त्यामुळे इतिहासप्रेमींना एकाच ठिकाणी जागतिक वारसा मिळवलेल्या सर्व गडकिल्ल्यांचे दर्शन घेता येणार आहे.याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी...
Wkt..
संग्रहालय अभिरक्षक प्रवीण शिंदे
0
Share
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 12, 2025 08:35:20Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1207ZT_JALNA_FIRE(3 FILES)
जालना :एकाने दुचाकीला लावली आग, नंतर ठोकली धूम,भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना
अँकर :अज्ञात व्यक्तीने दुचाकीवर येऊन नंतर या दुचाकीला पेटवून देत पळ काढल्याची घटना भोकरदन शहरात घडलीय.भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घटना घडली.या घटनेची माहिती मिळताच
भोकरदन पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ही आग विझवली.दरम्यान पोलिसांनी या घटनेतील संशयीताचा शोध सुरु केला आहे.
3
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 12, 2025 08:34:43Raigad, Maharashtra:
स्लग - रायगडसह राज्यातील 11 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत ..... खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आनंद ......रायगड किल्ल्याच्या संवर्धन कामाला वेग येण्याची गरज .....तटकरे यांनी व्यक्त केली अपेक्षा ........राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार ......
अँकर - रायगडसह राज्यभरातील 11 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश झाल्याबद्दल खासदार सुनील तटकरे यांनी आनंद व्यक्त केलाय. मात्र ज्या पद्धतीने राज्य सरकार रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देत आहे त्या तुलनेत संवर्धन कामाला वेग दिसत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यासाठी आपण राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
बाईट - सुनील तटकरे, खासदार
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 12, 2025 08:34:31Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1207ZT_CHP_STN_DEMAND
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारशाह रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार, स्थानकावर स्वतंत्र रेल्वे पोलिस ठाणे करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुख्यमंत्र्यांनी दिल्या बल्लारपूर येथे स्वतंत्र जीआरपी पोलिस ठाणे करण्याच्या सूचना
अँकर:-- चंद्रपूर माजी पालकमंत्री आणि बल्लारपूर क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. बल्लारशाह रेल्वे स्टेशनवरील रेल्वे पोलिस दूरक्षेत्र चौकीचे स्वतंत्र पोलिस ठाण्यात रूपांतर करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेत त्यांनी हे लेखी निवेदन दिले. अशीच मागणी आ. मुनगंटीवार यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना भेटून केली. बल्लारशाह हे महाराष्ट्र व तेलंगणाच्या सीमेवरील एक अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून, येथे दररोज ३००० हून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. सध्या येथे केवळ जीआरपीची आऊट पोस्ट कार्यरत असून, तिची कार्यक्षमता अत्यंत मर्यादित आहे. या ठिकाणी जवळचे जीआरपी स्टेशन वर्धा येथे आहे. ते तब्बल १२० किमी अंतरावर आहे. वर्धा जीआरपीचे कार्यक्षेत्र राजुरा आणि यवतमाळपर्यंत पसरले असून, एकूण १९ रेल्वे स्थानके यामध्ये समाविष्ट आहेत. रेल्वे स्टेशनवर गंभीर घटनांचे प्रमाण वाढत असताना, स्वतंत्र पोलिस स्टेशन नसल्यामुळे तपास प्रक्रिया, प्रवाशांच्या मदतीसाठीची तत्परता आणि एकूणच कायदा-सुव्यवस्था यावर परिणाम करणारी ठरत आहे. त्यामुळे स्वतंत्र जीआरपी पोलिस ठाण्याची आवश्यकता असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत तात्काळ स्वतंत्र जीआरपी पोलिस ठाणे करण्यासंदर्भातील सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 12, 2025 08:34:21Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1207ZT_CHP_LIQUOR_RAIDD
( single file sent on 2C)
टायटल:--चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरात बनावट दारूचा साठा जप्त, एका आरोपीला अटक, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात बनावट आणि विषारी दारूचा अवैध व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान,चंद्रपुरचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने बल्लारपूर शहरात धाड टाकून लाखो रुपयांची बनावट देशी आणि विदेशी दारू जप्त केली आहे. या कारवाईत एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून बनावट देशी, विदेशी दारू आणि बिअरचे ४१ बॉक्स जप्त केले. यापैकी काही बॉक्समध्ये पॅकेजिंग आणि लेबलिंग मूळ ब्रँडसारखेच होते, परंतु आतील दारू बनावट असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. संशयाच्या आधारे, पथकाने दारू चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवली आहे. अहवाल आल्यानंतरच दारू किती हानिकारक किंवा बनावट होती हे स्पष्ट होईल. उत्पादन शुल्क विभाग अधिक चौकशी करत आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 12, 2025 08:34:05Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1207ZT_JALNA_AMBAD_CRIME(3 FILES)
जालना : काळवीट प्राण्याचे शिंगं घरात ठेवणं पडलं महागात,आरोपीला अटक,
अँकर : काळवीट प्राण्याचे शिंगं घरात ठेवणं एका आरोपीला चांगलंच महागात पडलं आहे.जालन्यातील अंबड पोलिसांनी या संशयीत आरोपीला अटक केली असून त्याच्या ताब्यातून काळविटाची दोन शिंगं जप्त करण्यात आली आहे. दादासाहेब दिवटे असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याने घरात काळवीटाची शिंगं ठेवली असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या म्हाडा कॉलनीतील घरात झाडाझडती घेतली असता ही शिंगं जप्त करण्यात आली असून आरोपीला पोलिसांनी अटक केलीय.
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 12, 2025 08:32:46Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात सांगलीत भाजपाचे आंदोलन,बांगड्यांचा आहेर आणि जोडे मारत केला निषेध..
अँकर - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बद्दल बदनामीकारक विधान केल्या प्रकरणी सांगलीमध्ये भाजपा व पडळकर समर्थकांकडुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आला आहे.संतप्त पडळकर समर्थकांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतीकात्मक पुतळाला जोडे मारत, बांगड्यांचा आहेर करत निषेध नोंदवला आहे.शहरातल्या कॉलेज कॉर्नर या ठिकाणी भाजपा व पडळकर समर्थकांच्याकडून निदर्शने करत आमदार जितेंद्र आव्हाडांचा निषेध नोंदवण्यात आला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर मंगळसूत्र चोर, अशी टीका करण्यात आली होती.तसेच पडळकर यांच्या बाबतीत आव्हाडांकडून पुन्हा बदनामीकारक विधान झाल्यास,त्यांना जशास तसे उत्तर देऊ,असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.
बाईट - राहुल पुजारी - पडळकर समर्थक, सांगली.
0
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 12, 2025 08:03:49Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
छत्रपती संभाजीनगर..
अर्धनग्न करून केलेल्या अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू....
अंगावरील कपडे काढून तीन ते चार जणांनी बेदम मारहाण केल्याचा पोलिसांना संशय...
मृत तरुणाच्या संपूर्ण अंगावर मारहाणीचे व्रण...
अर्जुन प्रधान असे मृत कंपनी कामगाराचे नाव आहे. कालच त्याचा पगार झाला होता अशी माहिती आहे...
आज मृतदेह आढळल्यानंतर नातेवाईकांनी हंबरडा फोडला...
या प्रकरणी एम.आय. डी.सी.वाळूज पोलिसात आज्ञात विरोधात हत्येचा गुन्हा दाखल.
0
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 12, 2025 07:36:11Kalyan, Maharashtra:
डोंबिवली पश्चिम परिसरात MMRDAच्या ठेकेदाराचा भ्रष्ट कारभार कॅमेरात कैद.
गटारात पाणी असताना सुरू आहे गटाराचे काँक्रीटीकरणाचे काम.
व्हिडियो व्हायरल
Anchor :- डोंबिवली पश्चिम परिसरात एमएमआरडीएच्या ठेकेदाराचा गंठण कारभार मोबाईलच्या कॅमेरात कैद झालाय . डोंबिवली पश्चिम परिसरात गटाराच्या काँक्रिटीकरणाचे काम हे एम एम आर डी ए च्या माध्यमातून हाती घेण्यात आले मात्र या गटारात पाणी असतानाच गटारात काँक्रीट टाकण्याचे काम सुरू असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होतोय . या व्हिडिओमुळे या कामाच्या दर्जाबाबतच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले संबंधित अधिकारी या ठेकेदारावर काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे
9
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 12, 2025 07:33:55Washim, Maharashtra:
वाशिम :
File:1207ZT_WSM_CROP_DAMAGE
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: जून महिन्यात पावसाने दिलेला खंड आणि नंतर जुलैमधील अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.शासकीय आकडेवारीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत 3.62 लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली असून त्यातील 13,152 हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे.रिसोड तालुक्यात सर्वाधिक 9,450 हेक्टरवर, मालेगावमध्ये 2,380 हेक्टरवर, वाशिम तालुक्यात 700 हेक्टरवर तर मंगरूळपीरमध्ये 590 हेक्टरवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. 25-26 जूनला झालेल्या अतिवृष्टीमुळे मालेगाव आणि रिसोडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. जुलैमध्येही जोरदार पावसामुळे ही परिस्थिती गंभीर बनली आहे.त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत.
3
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 12, 2025 07:33:36Pandharpur, Maharashtra:
12072025
Slug - PPR_CURRENT_IN_QUE
feed on 2c
file 04
-----
Anchor - विठुरायाच्या पदस्पर्श दर्शन रांगेतील अनर्थ टळला, गर्दी कमी झाली आणि वायर तुटल्याने रांगेत उतरला विद्युत प्रवाह, तीन श्वानाचा दुर्दैवी मृत्यू
विठ्ठल रुक्मिणी दर्शन रांगेत वायर तुटल्याने पंचमुखी मारुती मंदिराजवळ विद्युत प्रवाह सुरू झाला. त्याच्या संपर्कात आलेल्या तीन श्वानाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अवघ्या काही वेळ आधी त्या भागातून दर्शन रांग पुढे गेली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या ढिसाळ कार्यपद्धतीचा नमुना समोर आला आहे.
----
byte - मनोज श्रोत्री, व्यवस्थापक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती
4
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 12, 2025 07:30:11Yeola, Maharashtra:
अँकर :- येवला तालुक्यातील धामोडा येथील पैठणी विणकर असलेला सागर वाल्मीक भड हा तरुण नाशिक संभाजीनगर महामार्गावर जळगाव नेऊर येथून घराकडे परतत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला दरम्यान या घटनेची नोंद येवला तालुका पोलिसात करण्यात आली असून शोकाकुल वातावरणात सागर भड यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
0
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 12, 2025 07:04:58Shirdi, Maharashtra:
Rahata News Flash
*राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात हिंदुत्ववादी संघटनांचा भव्य मोर्चा...*
चिकन विक्रेत्याच्या व्हायरल व्हिडिओनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक...
चिकनविक्रेता चिकन धुण्यासाठी वापरत असलेल्या पाण्यात लघुशंका करत असल्याचा आरोप...
*आरोपीवर कठोर कारवाईसह दुकानावर तोडक कारवाईची मागणी...*
हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चाला सुरुवात...
मोर्चात साधू महंत, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि किन्नर प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी...
लोणी पोलिस ठाण्यावर धडकणार मोर्चा...
WKT_kunal jamdade
14
Share
Report
UPUmesh Parab
FollowJul 12, 2025 07:02:53Oros, Maharashtra:
अँकर --- महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 11 किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलाय. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला तर देवगड येथील विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश आहे. या दोन्ही किल्ल्याचा समावेश झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवप्रेमीनी आंनदोस्तव साजरा केला. ढोल ताशाचा गजर करत व फटाके वाजवत शिवप्रेमीनी जल्लोष केलाय. युनिस्कोच्या जागतिक वासरा यादीत समावेश झाल्याने किल्ल्याचे संवर्धन होईल असा विश्वास शिवप्रेमीनी व्यक्त केलाय. याचा विजयदुर्ग किल्ल्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी.
Wkt ( 121 ) --- उमेश परब, सिंधुदुर्ग
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 12, 2025 06:33:37Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - कर्नाटक व महाराष्ट्र सरकारला सुबुद्धी द्यावी,यासाठी कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे थेट कृष्णा नदीला साकडे..
अँकर - अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात सांगलीमध्ये कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीकडून आंदोलन करण्यात आले आहे.
कर्नाटक व महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी द्यावी,यासाठी थेट कृष्णा नदीला साकडे घालण्यात आले आहे.कृष्णा नदीची ओटी भरत राज्य सरकारने अलमट्टी धरणाच्या उंची वाढी विरोधात ठोस भूमिका घ्यावी,अशी मागणी देखील करण्यात आली आहे.अलमट्टी धरणाच्या उंची वाढीमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा धोका निर्माण होणार आहे,त्यामुळे राज्य सरकारने याबाबतीतल्या उपायोजना व अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात भूमिका व उपाययोजना करण्यासाठी कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्यावतीने थेट कृष्णा नदीला आज साकडे घालण्यात आले,यावेळी कृष्णा नदीचे पूजन करत अलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
बाईट - सर्जेराव पाटील - अध्यक्ष ,कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समिती- सांगली.
11
Share
Report