Back
वाशिम: शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे मोठे नुकसान!
Washim, Maharashtra
वाशिम:
File:0707ZT_WSM_WILD_ANIMALS_PROBLEM
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिमच्या मंगरूळपीर व मानोरा तालुक्यातील शेतकरी वन्य प्राण्यांच्या हैदोसांमुळे त्रस्त झाले आहेत.४०-५०रोहीं व नीलगाईचे कळपांनी शेतात घुसून सोयाबीन, तूर,उडीद, कापसासारखी खरीपची पिकं चरून व तुडवून मोठं नुकसान केलं आहे.काही शेतांतील पिकं पूर्णतः नष्ट झाली आहेत.शेतकरी हवालदिल असून वन विभागाकडे तातडीने वन्य प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0707_BHA_RAINFALL
FILE - 1 VIDEO
भंडाऱ्यात पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद........जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने दक्षता घेण्याचे आवाहन.....
ANCHOR :- भंडारा जिल्ह्यात कालपासून पावसाची रिपरिप सुरू होती. आज सकाळपासून मात्र संततधार पाऊस पडतोय यामुळे सर्वत्र पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन भंडाराच्यावतीने अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तशा सूचनाही देण्यात आल्या असून त्यामध्ये भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीवरील भंडारा ते कारधा लहान पुल, तुमसर तालुक्यातील गोंदेखारी ते टेमनी, चुल्हाड ते सुकळी नकुल अशा मार्गांचा समावेश आहे.
.....
.....
.....
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
टीप - मे महिन्यात गर्जा महाराष्ट्र साठी पोर्तुगीज लोकांची नॉलिंग भाषा यावर आपण कोरलई गावची स्टोरी केली होती. त्यात कोरलई गाव आणि समुद्र किनाऱ्यांचे भरपूर व्हिडिओ आणि ड्रोन शॉट्स आहेत.
स्लग – रायगडच्या कोर्लई समुद्रात संशयास्पद बोट ......... बोट पाकीस्तानी असल्याचा संशय .......जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर ......... ठिकठिकाणी नाकाबंदी आणि झाडाझडती ........ तटरक्षक दलाकडून बोटीचा शोध सुरू ........ सुरक्षा यंत्रणांच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह ...........
अँकर – रायगडच्या कोर्लई समुद्रात काल रात्री एक संशयास्पद बोट आढळून आली. या बोटीचे कनेक्शन थेट पाकीस्तानशी असल्याचं सांगितलं जातंय. मात्र या बाबत पोलीस किंवा महसूल यंत्रणा काहीच बोलत नसल्याने नागरीकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.
दुसरीकडे सागर सुरक्षा यंत्रणांच्या सक्षमतेबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
व्हिओ 1 – मुरूड तालुक्यातील कोर्लई जवळच्या समुद्रात रविवारी रात्री एक संशयास्पद बोट आढळून आली. याची माहिती पोलीसांना मिळताच सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. सतर्क झालेल्या पोलीस यंत्रणेने कोर्लई किनारी धाव घेतली. पोलीसांसह समुद्राशी संबंधित संर्व यंत्रणा कामाला लागल्या. सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. झाडाझडती सुरू झाली. परंतु यंत्रणेच्या हाती काहीच लागलं नाही. रात्री या बोटीचा एक लाल दिवा खोल समुद्रात चमकताना दिसत होता. सकाळपासून तोही दिसायचा बंद झाला. तटरक्षक दलाची बोट या संशयास्पद बोटीचा शोध घेते आहे.
बाईट – प्रशांत मिसाळ, माजी सरपंच कोर्लई
व्हिओ 2 – या संशयास्पद बोटीसंदर्भात पोलीस किंवा अन्य यंत्रणा काहीच बोलत नसल्याने या घटनेचे गुढ अधिकच वाढले आहे. या बोटीचे थेट पाकीस्तानशी कनेक्शन असल्याची चर्चा सुरू झाल्याने ही बाब तितकीच गंभीर आहे. मुंबईला लागून असलेला रायगडचा किनारा नेहमीच संवेदनशील राहिलाय. मार्च 1993 मध्ये झालेल्या मुंबईतील साखळी बॉंबस्फोटात वापरलेले आरडीएक्स रायगडच्या शेखाडी किनारी उतरवण्यात आले होते. तेव्हापासून रायगडच्या किनारपटटीवर सागरी सुरक्षा यंत्रणांची नजर अधिक असते. मात्र ही संशयित बोट सागरी सुरक्षा यंत्रणांच्या नजरेतून सुटली कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच यंत्रणा यावर अद्यापतरी काहीच बोलत नसल्याने त्याचे गुढ आणि गांभीर्य अधिकच वाढले आहे.
बाईट 2 – अद्याप बाईट मिळालेला नाही
(मुंबईतून बाईट घेवून वापरावा)
फायनल व्हिओ – 18 तास उलटून गेले तरी बोटीचा कुठलाच थांगपत्ता लागत नाही. सध्या भारत पाकिस्तान मधील तणावाची स्थिती पाहता या संशयास्पद बोटीचा शोध लागणे आणि ती इथवर कशी आली याचा उलगडा होणे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे.
प्रफुल्ल पवार झी 24 तास रायगड
0
Share
Report
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 0607ZT_INDAPURMURDER
FILE 3
इंदापुरात पोल्ट्री फार्मवर कोबड्यांच्या वादातून एकाला मारहाण...... मारहाण झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू..... इंदापूर पोलिसात चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल.... तिघांना अटक एक जण फरार
Anchor— इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी येथील कोंबड्यांच्या पोल्ट्रीमध्ये कोंबड्या भरताना झालेल्या किरकोळ वादातून एकाला मारहाण करण्यात आली होती. उपचारा दरम्यान या मारहाण झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रियाज चुन्नुमिया जगिरदार हडपसर असं मयत व्यक्तीचं नाव असून इंदापूर पोलिसांनी गलांडवाडी नंबर एक येथील चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून एक जण फरार आहे.
फिर्यादी आसिफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ५ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर एक येथील विशाल सूर्यवंशी यांच्या पोल्ट्री फार्म जवळ ही घटना घडली आहे.
त्यांचे मेव्हणे रियाज जगिरदार हे पोल्ट्री फार्मवर कोंबड्या भरत असताना, लंगड्या कोंबड्या गाडीत टाकू नका,असे सांगितल्यावर वाद निर्माण झाला. या वादातून निखील जाधव, विकी नलावडे, लहु शिंदे आणि विशाल कांबळे या चौघांनी मिळून रियाज यांना बेदम मारहाण केली.या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने बारामती आणि नंतर पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच ६ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी निखील जाधव सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
4 FILES
SLUG NAME -SAT_SEVIKA_ANDOLAN
सातारा - कोरोना काळात जीवाची पर्वा न करता सेवा करणाऱ्या आशा सेविकांना गेल्या अनेक महिन्यांपासून मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई)च्या वतीने वाईत ढोलताशा वाजवत आंदोलन करण्यात आलं.राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या आशा सेविका ग्रामीण भागात मातामुलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं योगदान देतात. मात्र शासनाकडून त्यांचं मानधन वेळेवर मिळत नाही.शासनाने दिव्यांग कल्याणासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला असताना, आशा सेविकांच्या मानधनासाठी निधी नाही, ही बाब दुर्दैवी असल्याची टीका आंदोलकांनी केली.पुढील आठ दिवसांत मानधनाचा प्रश्न मार्गी लावण्यात आला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
बाईट्स - स्वप्नील गायकवाड RPI नेते
बाईट्स - आशा सेविका
0
Share
Report
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - चार्जरच्या वायरने नवऱ्याने केला बायकोचा खून, घटनेनंतर नवऱ्याचीही गळफास घेत आत्महत्या
- दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावातून धक्कादायक घटना समोर
- उळेगावात राहणाऱ्या नवऱ्याने चार्जिंगचा वायरने गळा आवळत केला बायकोचा खून घटनेनंतर स्वतःनेही घेतला गळफास
- गोपाळ लक्ष्मण गुंड वय - 30 आणि गायत्री गोपाळ गुंड वय - 22 अशा दोघा पती-पत्नींची नावे
- दोनच महिन्यांपूर्वी प्रेम विवाह झालेल्या जोडप्याच्या बाबतीत दुःखद घटना घडल्याने सर्वत्र हळहळ
- पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे
बाईट -
मुलाचे वडील
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
ANCHOR - नंदुरबार जिल्ह्यातील नेसू नदी पार करत विद्यार्थी आणि नागरिक जीवघेणा प्रवास करीत आहेत. नवापूर तालुक्यातील वाघेरे गावातील विद्यार्थी आणि नागरिकांना दररोज नेसू नदीच्या धोकादायक पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. शिक्षणासाठी शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनाही आपल्या पालकांचा हात धरून पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागते, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ नेसू नदीवर पूल आणि रस्त्याची मागणी करत आहेत, परंतु त्यांच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थ हतबल झाले आहेत. पावसाळ्यात नदीला पूर आल्याने परिस्थिती आणखी गंभीर होते. खांडबारा गावाचे सरपंच अविनाश गावित आणि स्थानिकांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि ग्रामस्थांच्या सोयीसाठी नेसू नदीवर तातडीने पूल बांधण्याची मागणी त्यांनी केली आहे. या जीवघेण्या प्रवासातून लवकरात लवकर सुटका मिळण्याची अपेक्षा ग्रामस्थ करत आहेत.
byte - स्थानिक
byte - पालक
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report
Nagpur, Maharashtra:
वाठोडा पोलीस स्टेशनचे संग्रहित shots पाठवले आहे
----
नागपूर
*पत्नीने प्रियकराच्या सहाय्याने पतीला संपविल असल्याची घटना वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली आहे ...
पती अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानं खून केल्याच समोर आले....
*पत्नीने पतीच्या हत्येला नैसर्गिक मृत्यूचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला... मात्र पोस्टमॉर्टम अहवालातून ती हत्या असल्याचं आलं समोर.*
38 वर्षीय चंद्रसेन रामटेके असे मृताचे नाव आहे.
30 वर्षीय दिशा रामटेके ही पत्नी असून चंद्रसेन यांच्याशी तिचे तेरा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुली आणि एक सहा वर्षांचा मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी चंद्रसेन याला अर्धांगवायू गेल्यानं तेव्हा पासून तो घरीच राहत होता...
दिशा रामटेके खर्च भागविण्यासाठी पाण्याची कॅन भरून विक्रीचा व्यवसाय करत होती....
काही महिन्यांपूर्वी तिची आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबू टायरवाला या दुचाकी दुरुस्ती आणि पंक्चरचे काम करणाऱ्या व्यक्तीशी असलेली ओळख प्रेम संबंधात पडली...
*दिशांचे पती चंद्रसेन 4 जुलै रोजी घरी निपचित पडलेले दिसले. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोस्टमॉर्टम अहवालात गळा, नाक आणि तोंड दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे उघड झाल्याने तपासाची दिशा बदलली.*
पोलिसांनी शासकीय रुग्णालयाच्या पोस्टमॉर्टम कक्षाजवळ दिशाला बोलवून तीची चौकशी केल्यावर तिने हत्येची कबुली दिली.
*अनैतिक संबंधांची चंद्रसेन याला माहिती मिळाली होती... आणि त्यांचे कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे त्याला संपविण्याचा प्लॅन आखण्यात आल्याच तपासात समोर आल...*
*दोघांनी चंद्रसेन याचा गळा आवळला आणि नाका तोंडावर दाबून धरली. श्वास गुदमरून तडफडून चंद्रसेन याचा मृत्यू झाल्याच तपासात समोर आलं..*
---------------
नागपुर के वाठोड़ा थाना क्षेत्र के साईनाथ सोसायटी में, जहां 4 जुलाई को यह घटना हुई। इस घटना के सामने आने के बाद
पूरे इलाके खलबली मच गई है।
मृतक ३८ वर्षीय चंद्रसेन बालकृष्ण रामटेके था। डेढ़ साल पहले लकवा होने के बाद से वो घर पर ही रहते थे। उनकी पत्नी दिशा चंद्रसेन रामटेके ने घर चलाने के लिए वॉटर प्लांट शुरू किया था। इसी दौरान उसकी पहचान स्थानीय मैकेनिक आसिफ अंसारी उर्फ राजा बाबू टायरवाला से हुई और दोनों के बीच अवैध संबंध बन गए।
पुलिस जांच में सामने आया है कि चंद्रसेन को पत्नी के बदलते व्यवहार पर शक हुआ था। अक्सर इसी को लेकर घर में झगड़े होते थे। आरोप है कि पति की धमकियों और रोक-टोक से परेशान होकर दिशा ने प्रेमी आसिफ के साथ मिलकर हत्या की यह साजिश रच डाली।
4 जुलाई को दोपहर में, जब चंद्रसेन घर में सो रहे थे, उस वक्त दिशा और आसिफ ने तकिए से मुह और गला दबाकर उनकी जान ले ली। हत्या के बाद दिशा ने शव को दो घंटे तक वहीं पड़ा रहने दिया और फिर मेडिकल ले जाकर मौत की झूठी कहानी गढ़ी। लेकिन पोस्टमार्टम रिपोर्ट में सच्चाई सामने आ गई और पुलिस ने जब कड़ाई से पूछताछ की, तो दिशा ने अपना जुर्म कबूल कर लिया।
फिलहाल पुलिस ने दोनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है और आगे की जांच जारी है।
----
Byte api संतोष सपाटे
वाठोड़ा थाना
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी शिवारात शक्तीपीठ महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची मोजणी करण्यासाठी अधिकारी आले असता शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवित आपल्या जमिनी शक्तीपीठ महामार्गाला देण्यास विरोध दर्शवित अधिकाऱ्यांना परतावून लावले,शासनाचया वतिने देण्यात येत असलेल्या।नोटिसा ही घेण्यास विरोध दर्शवला. अगोदरच जमीनीचे आमच्या जमिनी कमी झाल्या असून आहेत त्या जमिनी जर गेल्या तर आम्ही भूमिहीन होऊत, तुम्ही आमच्या 20 गुंठ्यासाठी पन्नास लाख रुपये जरी दिलेत तर आम्ही आमच्या कपाळाच्या कुंकवा एवढी सुद्धा जमीन देणार नाही, बळजबरीने आमच्याकडून जमिनी घेतल्यास आम्ही आत्महत्या करू असा गर्भित ईशारा एका शेतकरी महिलेने सरकारला दिलाय. त्यामुळे शेतकरी महामार्ग रद्द झालाच पाहिजेत अश्या घोषणा यावेळी शेतकऱ्यांनी दिल्या...
बाईट- शेतकरी महिला,आहेरवाडी
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Road
Feed on - 2C
------------------------------
Anchor - महिनाभरापूर्वी झालेला डांबर रस्ता हाताने उखडून दाखवत निकृष्ट रस्त्याची पोलखोल एका ग्रामस्थाने केली. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील हा रस्ता आहे. दुगाव ते डोंगरगाव दरम्यान महिनाभरापूर्वी डांबर रस्ता करण्यात आलाय. पण महिनाभरातच रस्त्यावर खड्डे पडले असून रस्त्याला तडे गेले आहेत. रस्त्याच्या कामात डांबराचा अत्यंत कमी वापर करण्यात आलाय. डांबराच्या खाली बेडपण करण्यात आला नसून साधी माती वापरण्यात आली आहे. रस्त्यात डांबर कमी वापरल्याने चक्क हाताने रस्ता उखडला जातोय. पंधरा दिवसांपूर्वीच लोहा तालुक्यातील एक डांबर रस्ता अश्याच प्रकारे ग्रामस्थाने हाताने उखडून दाखवला होता. आता ह्या रस्त्याचा निकृष्ट दर्जा समोर आलाय. त्यामुळे बोगस कामे करणाऱ्या गुत्तेदारावर कारवाई होणे गरजेचे आहे.
---------
0
Share
Report
Latur, Maharashtra:
लातूर...
स्किप्ट ::- प्राणीप्रेमी दत्तात्रय पवार यांच्या अंत्ययात्रेत शेळीची भावनिक साथ...शेवटच्या यात्रेत शेळीची साथ... प्रेम इतकं की शेवटपर्यंत मुक्या जीवाची साथ... दत्तात्रय पवार यांच्या अंत्यविधीत हृदयस्पर्शी दृश्य... शेवटच्या प्रवासातही जिवंत राहिलं प्राणीप्रेम.... प्राणीप्रेमाची विलक्षण साक्ष... शेळीचं अंत्ययात्रेत सहभाग...
AC ::- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हाडोळती गावात एक हृदयस्पर्शी घटना घडली आहे. अल्पशा आजाराने दत्तात्रय पवार यांचं दुःखद निधन झालं त्यांच्या अंत्ययात्रेला गावातील साळवे चौकातून सुरुवात झाली. मात्र या अंत्यविधीत एक विलक्षण दृश्य पाहायला मिळालं... गावातील एक शेळीचं पिल्लू तब्बल दोन किलोमीटरपर्यंत दत्तात्रय पवार यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालं. अग्नीसंस्कार पूर्ण होईपर्यंत ती शेळी ग्रामस्थांसोबत होती आणि नंतरही ती त्यांच्यासोबत परत आली. दत्तात्रय पवार हे प्राणीप्रेमी होते. त्यांच्या शेळी, कुत्र्यांवर असलेल्या प्रेमाचा प्रत्यय आज संपूर्ण गावाने अनुभवला. दत्तात्रय पवार यांचं प्राण्यांवर असलेलं निस्वार्थ प्रेम, त्यांच्या शेवटच्या प्रवासातही जिवंत झालं... एक मुक्या जीवाने दाखवलेली ही नाती गावकऱ्यांना भावूक करून गेली.
0
Share
Report