Back
धुळगावमध्ये झाड कोसळले, हॉटेल आणि गॅरेजचे झाले मोठे नुकसान!
SKSudarshan Khillare
Aug 19, 2025 01:15:59
Yeola, Maharashtra
अँकर:-
येवला तालुक्यातील धुळगाव येथे झालेल्या पावसामुळे गावातील मुख्य रस्त्यालगत असलेले एक जुने भेंडीचे प्रचंड झाड कोसळले. झाड कोसळताना हॉटेल व शेजारील मोटार सायकल दुरुस्ती दुकानावर ते आदळण्याच्या बेतात होते.घटनेवेळी हॉटेलमध्ये ग्राहक बसले होते. झाड अचानक कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने नागरिक घाबरून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. झाड हॉटेलवर मोटरसायकल गॅरेजवर पडल्याने दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowAug 19, 2025 03:02:08Kolhapur, Maharashtra:
Kop Rain Update
Feed :- 2C
Anc :- कोल्हापूर जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील 45 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गगनबावडा, राधानगरी तालुक्यासह तुळशी, कुंभी, पाडगाव, चिकोत्रा, घटप्रभा, धामणी धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. राधानगरी धरणाचे सहा दरवाजे उघडले असून त्यातून साडेअकरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी आपले पात्र सोडले असून अनेक नद्यांचे पाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. कोल्हापूर - गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावरती मांडूकली जवळ रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कोल्हापूर - राजापूर हा राज्य मार्ग देखील नदीच्या पाण्यामुळे बंद झाला आहे.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 19, 2025 03:01:59Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - बार्शी तालुक्यात 18 दिवसात सरासरीच्या 129% टक्के पाऊस, नदी - नाले झाले तुडुंब
- सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी
- बार्शी तालुक्यात ऑगस्ट महिन्याच्या 18 दिवसात सरासरीच्या 129% टक्के पावसाची नोंद
- सतत कोसळणाऱ्या पावसामुळे बोरगाव - उपळे, वैराग - माळेगाव, पिंपरी ते वैराग या सर्व मार्गावरील पूल गेले पाण्याखाली
- तालुक्यातील भोगावती नदी दुथडी भरून वाहायला सुरुवात तर चांदणी नदीची पाणीपातळी वाढल्याने पूरपर्जन्य परिस्थिती
- मात्र जोरदार पावसामुळे तालुक्यातील अनेक खरीपाची पिके पाण्याखाली गेल्यानंतर शेतकरी चिंतेत
0
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 19, 2025 03:01:50Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_citylink
अँकर
नाशिककरांची जीवन वहिनी मानले जाणारी सिटीलींक बसचा प्रवास धोकादायक असल्याचे समोर आलं आहे....चक्क नाशिक त्र्यंबक बसचा टायर फुटल्यानंतर देखील चालकांनी प्रवासांचा जीव धोक्यात टाकून गाडी चालवलीये.. गाडीचा टायर फुटला तरी बस चालकाच्या लक्षात आले कशे नाही एवढंच नव्हे तर चालती बसच टायर पूर्ण फाटून गेला रस्त्यावर चालणाऱ्या इतर वाहनचालकांनी सिटीलिंग बचालकाला सांगितल्यानंतर त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला लावली... मात्र गाडीचा टायर फुटून देखील बस चालकाने गाडी चालवून स्वतःचा आणि प्रवासांचा जीव धोक्यात घातलाय... प्रवासादरम्यान सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही... त्यामुळे सिटी लिंक प्रशासनाने असे बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे... जेणेकरून नाशिककरांचा महापालिकेच्या सिटीलींक बस चा प्रवास सुखरूप होईल....
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 19, 2025 03:01:33Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1908ZT_NANDED_MUKHED(3 FILES)
नांदेड : मुखेड तालुक्यात एकूण 6 जणांचा शोध सुरु
अँकर : नांदेड मधील मुखेड तालुक्यात वाहून गेलेल्या 9 पैकी तीन महिलांचे मृतदेह सापडले आहेत.तर उर्वरीत 6 जणांचा शोध सुरू आहे. आज नांदेड मधील मुखेड तालुक्यात रिमझिम पाऊस सुरु आहे.त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून वाहून गेलेल्या सहा जणांचा शोध सकाळ पासूनच सुरु करण्यात आला आहे.दरम्यान हसनाळ गावातून वाहून गेलेल्या ग्रामस्थांच्या नातेवाईकांचा काल आक्रोश पाहायला मिळाला.
बाईट :वाहून गेलेल्या ग्रामस्थांच्या नातेवाईक महिला
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 19, 2025 02:45:29Parbhani, Maharashtra:
drone shots....
अँकर - मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे धरण अशी ओळख असलेल्या परभणीच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पामधून आता पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. येलदरी धरणात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात येत असल्याने येलदरी धरणाने पाण्याचा विसर्ग वाढवून 10 गेट मधून आता 63 हजार 600 क्यूसेक्सने पूर्णा नदी पात्रात विसर्ग सुरू केलाय. यामुळे जिंतूर एलदरी सेनगाव राज्य महामार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी 24 तासापासून बंद पडलाय. ड्रोन मधून येलदरी धरणाचा विसर्गाचे खास दृश्य झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी....
3
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 19, 2025 02:32:45Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1908ZT_NANDED_HASNAL(2 FILES)
नांदेड : हसनाळ येथून वाहून गेलेल्या दोघांचा शोध सुरु,
अँकर: नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हसनाळ या ठिकाणाहून 5 जण वाहून गेले होते. यापैकी तीन महिलांचे मृतदेह काल संध्याकाळी पाण्याबाहेर काढण्यात यश आलं आहे.दरम्यान हसनाळ येथून वाहून गेलेल्या आणखी दोघांचा शोध SDRF च्या पथकासह नागरीकांकडून घेण्यात येत आहे
2
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 19, 2025 02:32:38Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी जिल्हाला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व भागांमध्ये पावसानं दमदार हजेत लावलेली पाहायला मिळते सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली राजापूरच्या अर्जुन आणि कोदिवली नदीने देखील दुथडी भरून वाहत आहेत किनारपट्टी भागामध्ये मासेमारीसाठी कोणीही जाऊ नये अस पद्धतीच आव्हान जिल्हा प्रशासन केलाय तर गरज असेल तरच घराबाहेर पडा असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलाय रत्नागिरीतील जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलीय रत्नागिरीतला पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी
5
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 19, 2025 02:32:07Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - अतिवृष्टी कायम,चांदोली धरण 94 टक्के भरल्याने विसर्ग आणखी वाढवला, वारणा नदी काठी सतर्कतेचा इशारा..
अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम आहे.गेल्या 24 तासात 92 मिलीमीटर इतक्या पाऊसाची नोंद झाली आहे,त्यामुळे चांदोली धरण जवळपास 95 टक्के इतकं भरले आहे. यामुळे चांदोली धरणातून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात आला असून 18 हजार 630 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे.34.40 टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात 32 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे,त्यामुळे धरण जवळपास भरत आले आहे.तर सकाळपासून धरणातून वारणा नदी पात्रात सुरू असलेला विसर्ग वाढवुन 18 हजार क्यूसेक करण्यात आलाय,यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून वारणा नदीकाठच्या गावाने सतर्क राहावे,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
4
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 19, 2025 02:31:16Parbhani, Maharashtra:
अँकर - मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे धरण अशी ओळख असलेल्या परभणीच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पामधून आता पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. येलदरी धरणात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात येत असल्याने येलदरी धरणाने पाण्याचा विसर्ग वाढवून 10 गेट मधून आता 63 हजार 600 क्यूसेक्सने पूर्णा नदी पात्रात विसर्ग सुरू केलाय. यामुळे जिंतूर एलदरी सेनगाव राज्य महामार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी 24 तासापासून बंद पडलाय. पाण्याचा येवा बघून कमी अधिक विसर्ग करण्यात येणार असल्याचे एलदरी धरण पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने सांगण्यात येत आहे. नदी काठच्या गावांनी सतर्क राहण्याचा ईशारा देण्यात आलाय...
2
Report
HPHARSHAD PATIL
FollowAug 19, 2025 02:30:34Palghar, Maharashtra:
पालघर _हवामान विभागाने पालघर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. कित्येक दिवस पडणाऱ्या पावसाची रात्रीपासून रीपरिप कायम आहे.आज दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाचा अंदाज वर्तवला असल्याने जिल्ह्यातील शाळा ,अंगणवाडी आणि महाविद्यालयाला जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या सूर्य नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे . त्यामुळे आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडू नका जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.
3
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 19, 2025 02:15:24Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील अंबोडा येथे संततधार पाऊस पडल्याने एका घराच्या भिंतीत पाणी मुरले आणि त्यामुळे घरची भिंत कोसळून शरवी शिरसाट या ३ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला..पावसाने मुरलेल्या पाण्याने घराची मुख्य भिंत कोसळल्याने शरवी तिच्या खाली दबली, तिला तात्काळ अकोट ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले..या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे...
4
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 19, 2025 02:01:10Bhandara, Maharashtra:
भंडारा जिल्हा परिषद मध्ये असलेल्या भंगार वाहनाच्या विल सहित चाकाणची चोरी.....
Anchor :- भंडारा जिल्हा परिषद येथील अनेक वाहने भंगारात आहेत. ही वाहने जिल्हा परिषदेच्या आवारात ठेवली आहे. मात्र याच वाहनाच्या विल सहित चाके चोरी गेल्याचे प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या आवारात येऊन अज्ञात चोरट्याने विल सहित चाके खोलून नेली मात्र जिल्हा परिषद प्रशासनाला याची साधी भनक सुद्धा नाही. शासनाच्या मालाची चोरी होत असताना जिल्हा परिषद गप्प का असा प्रश्न आता उपस्थित केला जातो.
3
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 19, 2025 02:01:03Akola, Maharashtra:
Anchor : अकोल्यात श्रावण महिन्याचा शेवटच्या सोमवारी असलेली प्रसिद्ध कावड आणि पालखी यात्रा शांततेत पार पडली..या यात्रे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही..रविवार पासून सुरू असलेली ही कावड यात्रा रात्री संपन्न झाली..या यात्रेत सुमारे 200 पालख्या आणि 150 कावड सहभागी होत्या..या यात्रेत अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री राज राजेश्वर देवाला जल अर्पण करण्यासाठी हजारो भाविक १७ किलोमीटर अंतरावरील पूर्णा नदीकडे पायी जातात..यात्रेच मुख्य आकर्षण होत अकोला शहरातील सर्वात मोठी डाबकी रोडची महाकाय कावड..तब्बल १०५ फूट लांबीची २१०० भरण्यांची ही कावड आणि यात सुमारे ३००० युवकांचा उत्साही सहभाग पाहायला मिळाला...
5
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 19, 2025 01:16:07Yeola, Maharashtra:
अँकर:-येवला तालुक्यातील येवला तालुक्यातील 600 लोकसंख्या असलेले गणेशपुर हे गाव असून या गावांमध्ये अनेक दिवसांपासून एसटी बस सेवा सुरू करावी अशी मागणी होती याकरता येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांच्यामार्फत निवेदन देऊन पाठपुरावा केला दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार महामंडळाच्या वतीने या गावासाठी बस सेवा सुरू करून देण्यात आली. याप्रसंगी पेढे वाटून विद्यार्थ्यांनी आनंद उत्सव साजरा केला व मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानले
12
Report