Back
अकोट तालुक्यातील भिंत कोसळल्याने 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू!
JJJAYESH JAGAD
Aug 19, 2025 02:15:24
Akola, Maharashtra
Anchor : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील अंबोडा येथे संततधार पाऊस पडल्याने एका घराच्या भिंतीत पाणी मुरले आणि त्यामुळे घरची भिंत कोसळून शरवी शिरसाट या ३ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला..पावसाने मुरलेल्या पाण्याने घराची मुख्य भिंत कोसळल्याने शरवी तिच्या खाली दबली, तिला तात्काळ अकोट ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले..या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे...
12
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UPUmesh Parab
FollowAug 19, 2025 03:49:20Oros, Maharashtra:
अँकर ---- सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी ऑरेंज अलर्ट जारो करण्यात आलाय. मागील दोन दिवस सिंधुदुर्गात जोरदार पाऊस कोसळतोय त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गडनदीचे पाणी कणकवली मालवण मार्गांवर आल्याने सलग दुसऱ्या दिवशी हा मार्ग बंद झालाय तर पूर्णतः पाणी भरलेल्या मार्गांवरून वाहतूक करण्याचा प्रयत्न वाहन चालकाच्या अंगलट आलाय. ऑरेंज अलर्ट च्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहवं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी
wkt ---- उमेश परब
4
Report
KPKAILAS PURI
FollowAug 19, 2025 03:49:08Pimpri-Chinchwad, Pune, Maharashtra:
pimpri rain
kailas puri Pune 19-8-25
feed by 2c
Anchor - .... पिंपरी चिंचवड शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची दमदार हजेरी असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील अनेक भागात रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. पडणाऱ्या पावसाचा जोर जास्त नसला तरी सलग दुसऱ्या दिवस सातत्याने सुरू असलेल्या संततधारेमुळे जनजीवनावर परिणाम होत आहे. दरम्यान 14 धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने नदीकाठच्या रहिवाशांना महापालिका प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.
3
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 19, 2025 03:48:11Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_tadipar
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातून २०० गुन्हेगार तडीपार
अँकर
नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्याला गणेशोत्सवाचे वेध लागण्यास सुरुवात झालीये या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनीही जय्यत तयारी करत बंदोबस्ताच्या नियोजनासह सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याला जाणार आहे... आयुक्तालयाच्या हद्दीत सुमारे एक हजार गुन्हेगारांवर वर्षभर किंवा सहा महिन्यांसाठी तडीपार करणे, तात्पुरत्या कालावधीसाठी कारागृहात बंदिस्त करणे, पोलिस ठाण्यात बसवून ठेवणे यांसारखी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सुमारे दोनशे गुन्हेगारांना हद्दपार केले जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आलीये... गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखली जावी कुठेही कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी आतापासूनच घेतली जात आहे. आयुक्तालयाच्या परिमंडळ-१ व २ अंतर्गत असलेल्या सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी पोलिस निरीक्षकांकडून सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. शहर गुन्हे शाखेकडूनदेखील तसे निर्देश देण्यात आले आहे....
0
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 19, 2025 03:48:03Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी- जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार
काजळी नदीने ओलांडली इशारा पातळी
नदीने पातळी ओलांडल्याने चांदेराई लांजा रस्त्यावर पाणी
रसत्यावर जवळपास तीन फुट पाणी,चांदेराई लांजा अशी वाहतुक ठप्प
हरचेरी बाजारपेठेत पाणी भरण्याची शक्यता
भितीने व्यापाऱ्यांची सामानाची हलवाहलव
0
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 19, 2025 03:47:50Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_SHINDE_DANCE
सातारा: पुसेगाव येथे सेवागिरी रयत संघटनेच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी हजेरी लावली. या दरम्यान मोठ्या संख्येने युवा वर्गाने दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे या ठिकाणी सुरू असणाऱ्या दहीहंडी सोहळ्यात गाण्याच्या ठेक्यावर थिरकलेले पाहायला मिळाले.
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 19, 2025 03:47:42Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn cm dcm av
Use file shots of leaders
छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या
मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण होईपर्यंत शहराला वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी १९३ कोटी रुपये खर्चुन ९०० मिमीची नवीन जलवाहिनी टाकण्यात आली. या वाढीव २६ एमएलडी पाण्याच्या शुद्धीकरणासाठी फारोळा येथे नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प तयार करण्यात आला आहे. याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या उद्घाटनानंतर शहराला वाढीव पाणीपुरवठा होईल. त्यामुळे ८ ते १० दिवसांआड होणारा पाणीपुरवठा किमान ४ दिवसांवर येईल अशी अपेक्षा आहे. आता शहरासाठी १३० एमएलडी पाणीपुरवठा होऊन शहरात सुमारे ११० एमएलडी पाणी पोहोचते.
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 19, 2025 03:47:37Beed, Maharashtra:
बीड : मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले – पावसाचा जोर कायम
Anc- बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवरील धनेगाव येथील मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात आणि आसपासच्या भागात पावसाचा जोर कायम असून धरण परिसरातही पाण्याचा मोठा साठा झाला आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने धरणाचे सहा दरवाजे ०.२५ मीटरने उघडले आहेत. नदीपात्रात ५२४१.४२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या या पाण्यामुळे मांजरा नदीकाठच्या परिसरातील गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषत: नदीपात्रात जाणे टाळावे, अशी सूचना देण्यात आली आहे.
दरम्यान, सततचा पाऊस आणि धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासन सतर्क आहे. गावकऱ्यांना खबरदारी घेण्याचे तसेच प्रशासनाशी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0
Report
KPKAILAS PURI
FollowAug 19, 2025 03:47:24Pimpri-Chinchwad, Pune, Maharashtra:
pimpri cyber
kailas puri Pune 19-8-25
feed by 2c
Anchor - पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी ५७ लाखांहून अधिक रुपयांच्या सायबर फसवणुक प्रकरणी पैसे रोख स्वरूपात काढून क्रिप्टोकरन्सीत रुपांतर करणाऱ्या तीन जणांना अटक केलीय.
या प्रकरणामध्ये फिर्यादी यांना युट्यूबवरील गुंतवणूक व्हिडिओद्वारे Abbott wealth अॅप वर ५७ लाख ७० हजार ६७० रुपये गुंतवण्यास प्रवृत्त करण्यात आले. सुरुवातीला ५.१५ कोटींचा नफा दाखवून नंतर पैसे काढताना विविध चार्जेस मागण्यात आले. संशय आल्यावर फिर्यादींनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात या रकमेपैकी काही भाग बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातून काढण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले. हे खाते मारुफ रिअल इस्टेट नावाने उघडण्यात आले होते. पोलिसांनी तपास करून साहिल अनवर सय्यद , भुपेंद्र अवतार सिंग आणि सर्फराज रफीक सय्यद यांना अटक करण्यात आली. त्यांनी रोख रक्कम घेऊन USDT क्रिप्टोकरन्सीत रुपांतर केल्याचे स्पष्ट झाले.
0
Report
SNSWATI NAIK
FollowAug 19, 2025 03:31:02Navi Mumbai, Maharashtra:
story slug- नवी मुंबई मद्ये पावसाची संततधार
नवी मुंबई मे बारीश
ftp slug - nm Tuesday rain
shots- rain
shots-
reporter- swati naik
navi mumbai
anchor - नवी मुंबई मद्ये पावसाने रात्री काहीशी विश्राती घेतली होती परंतु पहाटे पासून पावसाने जोर धरला असून पावसाची संततधार नवी मुंबई मद्ये बरसत आहे , गेल्या 12 तासात 80 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे ।
काही ठिकाणी पावसामुळे वृक्ष पडण्याच्या घटना घडल्या आहेत , पाऊस पडत असल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमानी पावसातून भिजत आपले कार्यालय गाठावे लागत आहे ।
gf -
2
Report
AKAMAR KANE
FollowAug 19, 2025 03:30:54Nagpur, Maharashtra:
Ngp Teacher problem
Ngp Teacher problem Byte
Live u ने फीड पाठवले
-------------------
Ngp Bawankule Byte
Live u ने फीड काल पाठवले होते (त्यामधे 3 वा 4 क्रमांकावर बाईट आहे यासादर्भने)
------------------------------------------
शालार्थ ID घोट्याळ्याबाबत ज्या संचालकांनी बदमाशी केली त्यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे... यासंदर्भात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याशी बोलणार असल्याच महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. याप्रकरणी अनेक शिक्षकांनी आपली व्यथा बावनकुळे यांच्यासमोर नियोजन भवन येथे मांडली.. त्यानंतर बावनकुळे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली
-----
बाईट --शिक्षक
बाईट - शिक्षक
बाईट -- चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
1
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 19, 2025 03:30:50Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn rohayo problem av
Feed attached
रोजगार हमी योजनेसाठी एकीकडे निधी नाही म्हणून सातत्याने आरडाओरड केली जाते. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील महिनाभरापासून तब्बल ७ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी खर्च झाला नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेचे आयुक्त यांनी आश्चर्य व्यक्त करत अधिकाऱ्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली. याबाबत १८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.
रोहयोसाठी छत्रपती संभाजीनगरचा प्रस्ताव आल्यानंतर महिनाभरापूर्वी १५३ कोटी दिले होते. त्यामुळे हा निधी वेळेत खर्च करणे अपेक्षित होते. केंद्र सरकारकडून सुरुवातीचा निधी खर्च केला, तर पुढील निधी मिळतो. त्यामुळं निधी खर्च करावा लागणार आहे तर काही तांत्रिक अडचणीमुळे निधी खर्च झाला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी दिली मात्र पुढील दोन दिवसात रोहयो चे पेंडिंग बिल अदा करण्यात येईल, निधी खर्च करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितलं..
1
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 19, 2025 03:30:25Ambernath, Maharashtra:
बदलापूर ,आंबरनाथ, उल्हासनगर परिसरात पावसाची संततधार
मात्र जनजीवन सुरळीत, कुठे पाणी साचल्याच्या घटना नाही,
Bdl rain
Anchor मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला आहे. मात्र काल रात्रीपासूनच बदलापूर ,अंबरनाथ आणि उल्हासनगर परिसरात पावसाने उसंती घेतली होती. मात्र पहाटेपासूनच पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे . मात्र पावसाचा जोर कमी असल्याने कुठेही पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या नाहीत, रस्ते वाहतूकही सुरळीत सुरू असून लोकल वाहतुकीही वेळेवर सुरू आहे, खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम सज्ज ठेवण्यात आली आहे.
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
4
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 19, 2025 03:18:32Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn marathwada rain av
Use nanded shots
मराठवाड्यात मुसळधार आणि काही ठिकाणी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने दाणादाण उडविली असून, पावसाने ६ नागरिकांचे बळी घेतले आहेत. नांदेड जिल्ह्यात ३, बीडमध्ये १ आणि हिंगोलीमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय शंभरपेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला असून, हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे.
मागील २४ तासांत मराठवाड्यातील ५७ मंडळांत अतिवृष्टी झाली. चार दिवसांपासून पाऊस मराठवाड्याला झोडपत असून, अनेक धरणे शंभर टक्के भरली असून, मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. रविवारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाचे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात हाहाकार उडाला असून, पाण्यात वाहून गेल्याने तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. पुराच्या पाण्यामुळे काही ठिकाणचे पूल वाहून गेल्याने व अनेक ठिकाणी पुलावर आहे. दरम्यान, मुखेड तालुक्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'एनडीआरएफ'सह छत्रपती संभाजीनगरहून सैन्यदलाला पाचारण करण्यात आले आहे. मराठवाडधात आठही जिल्ह्यांत रविवारी रात्री जोरदार पाऊस बरसला.
6
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 19, 2025 03:18:28Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - डॉल्बीच्या विरोधात हजारो सोलापूरकर एकवटले, डॉल्बीमुक्त सोलापूरसाठी घेतला पुढाकार
- सोलापुरात डॉल्बीच्या विरोधात एकवटले हजारो सोलापूरकर
- विविध जयंती, उत्सव मिरवणुकांमध्ये कर्णकरकश्य आवाजात लावण्यात येणाऱ्या डॉल्बीच्या विरोधात सोलापूरकर आक्रमक
- डॉल्बीमुक्त सोलापूरसाठी महापालिका आयुक्त, पोलीस अधिकाऱ्यांसह सर्वसामान्य सोलापूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग
- सोलापूर डॉल्बीमुक्त करण्यासाठी लाखो सोलापूरकरांच्या स्वाक्षऱ्या पोहोचणार मुख्यमंत्र्यांच्या दरबारी
- डॉल्बी बंद करा यासाठी सोलापूरकरांनी व्यक्त केल्या तीव्र भावना
बाईट -
नागरिक
4
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 19, 2025 03:18:16Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_md_karvai
पावणे दोन लाखांचे ३४ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त
अँकर
नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने उपनगर पोलिसांच्या हद्दीतील जय भवानी रोडवरील फर्नाडीसवाडीमध्ये एका घरावर छापा टाकून सुमारे ३४ ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर जप्त केलीये... विक्रीसाठी घरात ड्रग्ज साठविणाऱ्या एकासह परिसरात विक्री करणाऱ्या दोघा पेडलर्सलासुद्धा पोलिसांच्या पथकाने अटक केलीये...विजय सोनवणे ,रोहित नेने, कैफ पठाण अस अटक केलेल्या संशयतांची नावे आहे... शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी बदकाला गोपनीय माहिती मिळाली...शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास येथील मराठा निवास नावाच्या घरावर छापा टाकला. तेथे राहणारा संशयित विजय सुखदेव सोनवणे याच्या ताब्यात एक लाख ७० हजार रुपये किमतीचे ३४ ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आले.. पोलिसांनी सोनवणे याची कसून तपासणी केली असता त्याने हे अमली पदार्थ विक्री करण्यासाठी मुंबई वाशी येथील स्टेफनभाई याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिलीये...
4
Report