Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिकमध्ये २५३ हॉस्पिटल्स आणि ४१४ हॉटेल्सवर फायर ऑडिट नाही!

Sagar Gaikwad
Jul 02, 2025 03:36:49
Nashik, Maharashtra
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_nmc_karvai २५३ हॉस्पिटलकडे आणि ४१४ हॉटेल चे फायर ऑडिटच नाही... पाणी आणि वीज खंडित करण्याचे आदेश, ४१४ हॉटेल्सवरही कारवाई.. अँकर अग्निप्रतिबंधक उपाय योजना नसल्यामुळे हटिल्स रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवित व वित्तहानी झाल्याचे अनेक प्रकार डोळ्यासमोर असताना नाशिक  महापालिका क्षेत्रामध्ये ४२४ हॉटेल्स व २५३ रुग्णालयांनी फायर ऑडिट केले नसल्याची धक्कादायक बाब समोर आलीये...विधिमंडळ अधिवेशनात यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित झाल्यानंतर जागे झालेल्या अग्निशमन विभागाने विभागीय कार्यालये तसेच महावितरणला पत्र देत संबंधित हॉटेल्स, रुग्णालयांचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आलेये..महापालिका क्षेत्रामध्ये जानेवारी व जुलै या दोन महिन्यांमध्ये खाजगी व सरकारी आस्थापनांना फायर ऑडिट करणे बंधनकारक आहे... राज्यात २००८ पासून महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ व सुधारित अधिनियम २०२३ व नियम २००९ लागू केले आहेत. या नियमानुसार अग्निप्रतिबंधक  उपाययोजना करणे तसेच संबंधीत उपाययोजना दुरुस्त व कार्यक्षम असल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्थात फायर ऑडिट अहवाल वर्षातून दोन वेळा सादर करणे बंधनकारक आहे. 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement