Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

अमरावतीतील पावसामुळे विद्यार्थ्यांना शाळा सोडावी लागली!

ADANIRUDHA DAWALE
Jul 09, 2025 07:31:54
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_RAIN_LOSS पाच फाईल आहे रिपोर्टर :–अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 अमरावतीच्या पार्डी देवी येथील अंडरपास मध्ये साचले पावसाचे पाणी; रेल्वे विभागाने रेल्वे क्रॉसिंग केले बंद, शाळकरी विद्यार्थ्यांना फटका अँकर :– अमरावतीच्या पार्डी देवी येथील अंडरपास मध्ये पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. पार्डी देवी येथील रेल्वे अंडरपास भुयारी मार्गाचे काम अपूर्ण असल्याने रेल्वे विभागाने रेल्वे क्रॉसिंग बंद केले आहे. दरम्यान भुयारी अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने पाणी साचल्याने नागरिकांना व विद्यार्थ्यांना याच गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत असून अनेक विद्यार्थी शाळेविना घरी परतले आहे. स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊनही अजून पर्यंत यावर कोणताही तोडगा निघाला नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप असून रेल्वेच्या अपूर्ण कामाचा नागरिकांना फटका बसला आहे.
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Aug 31, 2025 09:55:17
Waghapur, Maharashtra:
यवतमाळ, दि. ३१ ऑगस्ट – पुसद शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून २ किलो १७६ ग्रॅम गांजा जप्त केला असून गुलजमान ऊर्फ भु-या खान (४५), शेख फिरोज कुरेशी (४५) आणि सैफअली खान (२६) यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पल्सर मोटारसायकल, मोबाईलसह एकूण १.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 31, 2025 09:32:32
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 3108ZT_JALNA_BHAKRI(7 FILES) जालना: मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी 3 टन ठेचा भाकरी रवाना मुंबईतील आंदोलकांसाठी जालना तालुक्यातील अनेक गावं मदतीसाठी सरसावले अँकर- मुंबई येथील मराठा आंदोलकांसाठी जालन्यातून 3 टन ठेचा भाकरीची मदत रवाना झालीये.. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाला आहे. मात्र आंदोलनठिकाणी आंदोलकांची जेवनाची परवड होत आहेत. त्यामुळं अनेक गावं मदतीसाठी धावून येत आहेत. जालना तालुक्यातील दहा बारा गावांनी मिळून बनवलेलं 3 टन ठेचा भाकरी मुंबईकडे रवाना करण्यात आले आहेत. त्यामुळं मुंबईतील आंदोलकांना याची मदत होणार आहे.. बाईट- मराठा आंदोलक बाईट- मराठा आंदोलक
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 31, 2025 09:31:11
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 3108ZT_CHP_LEOPARD_ATTACK ( single file sent on 2C) टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यातील टेकडी गावात बिबट्याचा पोल्ट्रीफार्मवर हल्ला, १३५ कोंबड्या मृत्युमुखी, पोल्ट्रीफार्ममध्येच दडून बसला होता बिबट अँकर :- चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातल्या टेकाडी शेतशिवारात बिबट्याने पोल्ट्रीफार्ममध्ये शिरून हल्ला चढवला. या हल्ल्यात तब्बल १३५ कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. यात अंदाजे ६५ हजारांचे नुकसान झाल्याची तक्रार पोल्ट्रीफार्म चालकाने वन विभागाकडे केली आहे. हल्ल्यानंतर बिबट बराच वेळ पोल्ट्रीफार्ममध्येच दडून बसला होता. मात्र, वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा उघडताच तो जंगलात पसार झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.सुनील गेडाम यांनी दोन वर्षापूर्वी स्वतःच्या शेतात पोल्ट्रीफार्म सुरू केला. येथे सुमारे ६०० कोंबड्या व दुसऱ्या खोलीत आठ बकऱ्या ठेवण्यात आल्या होत्या.  नेहमीप्रमाणे गेडाम यांनी दरवाजा उघडून पाहणी केली असता, १३५ कोंबड्या रक्तबंबाळ अवस्थेत मृतावस्थेत पडलेल्या दिसल्या. पोल्ट्रीफार्मच्या एका कोपऱ्यात बिबट दहून बसलेला पाहून त्यांनी तत्काळ दरवाजा बंद करून सावली वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद दुर्वे यांना माहिती दिली. काही वेळातच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोल्ट्रीफार्मचा दरवाजा उघडताच बिबट जंगलात पसार झाला. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 31, 2025 09:30:48
Raigad, Maharashtra:
स्‍लग – कोकणात शक्‍ती - तुरा नाचांची धूम .......... नवीन पिढीही जपतेय पारंपारिक लोककला ..... पुरूषांची मक्‍तेदारी मोडत महिलांचा वाढता सहभाग ........ ही स्टोरी सकाळी पाठवली आहे. त्यासाठी अधिकचे व्हिडिओ सोबत पाठवत आहे
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 31, 2025 09:17:55
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 3108ZT_JALNA_DANVE_PRGRM(6 FILES) जालना  : ब्रेकिंग | मराठा आंदोलकांनी घातला माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यक्रमात गोंधळ जरांगे पाटिल तुम आगे बढोच्याही घोषणा जालना जिल्ह्यातील शिरसगाव वाघरुळ येथील कार्यक्रमात गोंधळ रस्त्याच्या मागणीसह आरक्षणाच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक अँकर : माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला आहे.जालन्यातील शिरसगाव जहागीर येथील कार्यक्रमात हा गोंधळ घातला.आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली.तसेच गावातील रस्त्याचा प्रश्न सोडवावा तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.शिरसगाव जहागीर येथे दानवे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासह ईतर काही उदघाटनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.या वेळी हा प्रकार घडला. कार्यक्रमादरम्यान  गावातील नागरीकांनी गोंधळ घालत समस्यांचा पाढा वाचला शिवाय मराठा आंदोलकांनी देखील एक मराठा लाख मराठा या घोषणा देत गोंधळ घातला.
4
comment0
Report
SKSACHIN KASABE
Aug 31, 2025 09:03:45
Pandharpur, Maharashtra:
31082025 slug - PPR_FUNCTION_PATIL file 01 ----- Anchor - पंढरपूर जवळील गोपाळपूर येथील श्री विठ्ठल अभियांत्रिकी आणि संशोधन संस्थेच्या विविध कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील , ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे संस्थेचे संस्थापक प्राचार्य बीपी रोंगे यांच्या उपस्थितीत झाले. भाजप सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अनेक सवलती सुविधा उपलब्ध केल्या असून ज्ञानामुळे समाजात महत्त्व वाढते असे मत मंत्री पाटील यांनी व्यक्त केले. अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनी साठी 9 मजली वसतिगृह इमारत पंढरपुरात उभी राहत आहे.
4
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 31, 2025 08:46:10
Raigad, Maharashtra:
स्लग - गणेशोत्सव देखाव्यातून कौटुंबिक हिंसाचारावर प्रकाश ..... महाडच्या सरेकर आळी सार्वजनिक मित्र मंडळाचा देखावा ...... अँकर - आजही रस्त्यावर होणाऱ्या महिला अत्याचाराचा प्रश्ना इतकीच घरांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची समस्या गंभीर बनली आहे. अनेक घटना समोर येतात तर अनेक घटना समाजाच्या समोर देखील येत नाहीत. समाजातील या ज्वलंत विषयाला हात घालणारा जिवंत देखावा यंदा महाडमधील सरेकर आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सादर केला आहे. विषेश म्हणजे हा जीवंत देखावा असून यामध्ये मंडळाच्या सदस्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत भुमिका पार पाडल्या आहेत. घरात सासुने आपल्या सुनेकडे मुली प्रमाणे पाहिले आणि वागवले तर कौटूंबीक हिंसाचाराच्या घटना कमी होतील असा संदेश मंडळाने या देखाव्याच्या माध्यमातून दिला आहे. बाईट - जयंत कदम, सदस्य, सरेकर आळी मित्र मंडळ
6
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Aug 31, 2025 08:45:58
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.name : 3108ZT_MAVAL_ACCIDENT Total files : 04 Headline : मुंबई-बेंगळुरू हायवेवर भीषण अपघात 28 वर्षीय नेपाळी युवकाचा मृत्यू Anchor: देहूरोड परिसरातील साई द्वारका सोसायटीसमोर आज सकाळी भीषण अपघात झाला. एका भरधाव हायवा ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत २८ वर्षीय दीपक साई या नेपाळी युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असून, धडक एवढी जबरदस्त होती की घटनास्थळी हाहाकार माजला. मात्र, इतका मोठा अपघात होऊनही पोलिसांचा निष्काळजीपणा यानिमित्ताने समोर आला. अपघात झाल्यानंतर तब्बल एक तास मृतदेह जागेवर पडून होता. पोलिसांच्या या निष्काळजीपणामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. स्थानिकांचा आरोप आहे की हायवेवर सुरू असलेल्या विकासकामांमुळे वाहने सर्व्हिस रोडकडे वळवली जातात आणि याच रस्त्यावरून शाळांची वाहतूक तसेच रहिवाशांची ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत भरधाव ट्रक येणं म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याचं मत रहिवाशांनी व्यक्त केलं.
3
comment0
Report
SGSagar Gaikwad
Aug 31, 2025 08:45:32
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_martha_kirana *मुंबईत मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा बांधवांसाठी खाणे पिण्याच्या वस्तू घेऊन नाशिकमधून पाच ते सहा पिकअप गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना...* अँकर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आझाद मैदानावर उपोषण करत आहे....राज्यभरातील  हजारो मराठा बांधव देखील मुंबईत ठाण मांडून आहेत... मराठाबांधवांची खाण्यापिण्याची सोय होत नसल्याने नाशिकमधून विविध गाव खेड्यातून मराठा बांधवांकडून पाच ते सात हजार चपाती- भाकरी, लोणचे, ठेचा तसेच पाणी बाटली आणि बिस्कीट, फरसाणचे पुडे घेऊन पाच ते सात गाड्यांमध्ये घेऊन मुंबईच्या दिशेला बना झाले आहेत. ...नाशिक मधून काही मराठा बांधव मुंबईत दोन दिवस आंदोलनात सहभागी झाले होते... मात्र सोबत असलेल्या मराठा बांधवांची गैरसोय बघून पुन्हा ते नाशिक मध्ये येऊन मोठी रसत घेऊन पुन्हा आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे... सरकारी कडून कोणतीही व्यवस्था होत नसल्याने पुढे कितीही दिवस आंदोलन सुरू राहिले तरी देखील आम्ही आमच्या बांधवांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था जबाबदाऱ्यांनी करू असे मत व्यक्त केले आहे...  बाईट-आंदोलक
2
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 31, 2025 08:33:55
Beed, Maharashtra:
बीड : मुंबईतील आंदोलकांसाठी गावखेड्यातून शिदोरी, चटणीसह 30 हजार भाकऱ्या मुंबईला रवाना..! Anc : मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या समर्थनात हजारो मराठा आंदोलक मुंबईत आहेत. मात्र आंदोलकांना अन्न पाण्याची सोय नसल्याचे समोर आल्यानंतर आता बीडकर पुढे धजावले आहेत. आंदोलकांना निदान दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी आता बीडकरांनी पुढाकार घेतला आहे..बीडच्या गांधनवाडी, पांढरवाडी, सकुंडवाडी, उंडेवाडी, कोतन, खलाटवाडी या गावांतून 30 ते 35 हजार भाकऱ्या, चटणी आणि लोणच्याची शिदोरी मुंबईला रवाना करण्यात आली आहे..
2
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Aug 31, 2025 08:17:17
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव DHARA_HELP मुंबईतल्या मराठा बांधवांसाठी कळंब हुन एक क्विंटल शेंगा चटणी व 20 हजार भाकरीची शिदोरी रवाना Anchor धाराशिव : मराठा आरक्षणासाठी मुंबईत ठिय्या मांडून बसलेल्या मराठा बांधवांचे अन्नपाण्यावाचून हाल होऊ नयेत, यासाठी कळंब तालुक्यातून मोठ्या प्रमाणात खाद्यसामग्रीची रसद मुंबईला रवाना करण्यात आली आहे. घराघरातून थापलेल्या भाकरी, कांदा-चटणी, बिस्कीट, औषधे अशा सर्व जीवनावश्यक वस्तू घेऊन तीन मालवाहू वाहने आज कळंब येथून मुंबईकडे रवाना झाली. मुंबईतील आंदोलनात धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने बांधव सहभागी झाले असून त्यांच्या खाण्या-पिण्याचे हाल होत असल्याने मदतीचा ओघ सुरू झाला आहे. कळंब शहर व तालुक्यातील नागरिकांनी ‘एक घर दोन भाकरी’ या सोशल मीडियावर फिरलेल्या संदेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मदतीचा हात पुढे केला. अखेर नागरीकांच्या सहभागातून तब्बल 20 हजार भाकरी, शेंगा चटणी आणि इतर खाद्यसामग्रीची वाहतूक मुंबईकडे करण्यात आली आहे.
3
comment0
Report
SNSWATI NAIK
Aug 31, 2025 08:04:34
Navi Mumbai, Maharashtra:
story slug -: नवी मुंबई मनपातर्फे अंघोळीसाठी 10 टँकर पाणी आणि 100 नळांची व्यवस्था. नवी मुंबई मे मराठा आंदोलको को पानी की व्यवस्था ftp slug - NM water supply byet- nmmc enginer shots- reporter- swati naik navi mumbai Anchor -: नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे मराठा आंदोलकांच्या अंघोळ आणि शौचाची व्यवस्था करण्यात आलेय. अंघोळीसाठी 10 टँकर पाणी तसेच 100 नळांची व्यवस्था करण्यात आलेय. यासोबतच शेकडो पोर्टेबल शौचालय आणि ते स्वच्छ करण्यासाठी संक्शन मशीन रुजू करण्यात आलेय. ्यासोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आलेय. बाईट -: सचिन शिंदे (अभियंता पाणी पुरवठा विभाग)
5
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Aug 31, 2025 08:04:28
Pune, Maharashtra:
Reporter name.: Chaitralli Raajapurkar Location ; Maval File name : 3108ZT_MAVAL_HELP Total files : 05 Headline : मुंबईतील मराठा बांधवांच्या मदतीसाठी मावळ तालुक्यातील मराठा बांधव एकवटले तब्बल दहा टेम्पो भरून अन्न पाणी आणि ब्लॅंकेट मुंबईकडे रवाना Anchor : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मागील तीन दिवसापासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणासाठी बसले आहेत त्यांच्याबरोबर हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत मात्र या मराठा बांधवांच्या जेवणाचे मुंबईमध्ये हाल होत असल्यामुळे मावळ तालुक्यातील मराठा बांधव आता एकवटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मावळ तालुक्यातील वडगाव मावळ भागातून तब्बल 7000 पेक्षा जास्त भाकऱ्या चटणी सुका खाऊ पाण्याच्या बॉटल ब्लॅंकेट अशा वस्तू मुंबईकडे रवाना होत आहेत मुंबईमध्ये असणारा मराठा बांधवाला कोणत्याही प्रकारची कमी भासू नये यासाठी मावळ तालुक्यातील मराठा बांधवांनी हा पुढाकार घेतलेला आहे जोपर्यंत जरांगे पाटील यांचे आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे तोपर्यंत मावळ तालुक्यातून ही मदत अविरतपणे चालूच राहणार असा निर्धार मावळ तालुक्यातील मराठा बांधवांनी केला आहे मावळ मधील वडगाव मावळ भागामधून तब्बल दहा टेम्पो सर्व अन्नधान्य पाणी आणि ब्लॅंकेट घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत. याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी Wkt Chaitralli (file.no.03) बाईट अतुल वायकर, मराठा बांधव (file.no.04) बाईट मयूर ढोरे, मराठा बांधव (file no.05)
7
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 31, 2025 08:01:30
Parbhani, Maharashtra:
अँकर- मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत,त्यांच्या सोबत लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. पण त्यांची तिथे मोठ्या प्रमाणात आबाळ सुरू आहे.त्यामुळे कळमनुरी तालुक्यातील नांदेड हिंगोली महामार्गावर मराठा बांधवांनी रास्तारोको करीत शासनाचा निषेध नोंदवत मुंबई येथील मराठा आंदोलक बांधवांना सुविधा देण्याची मागणी केली,
2
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Aug 31, 2025 07:19:59
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव DHARA_SINA_DAM *सीना-कोळेगाव धरण भरले १० दरवाजे खुले, १५२२५ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग* *धरण पाणलोट क्षेत्रात मागील २ दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे पाण्याची आवक वाढली, आसपासच्या गावाणा सतर्कतेचा इशारा* Anchor धाराशिव परंडा तालुक्यातील सीना-कोळेगाव धरणात मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे पाण्याची आवक वाढली. त्यामुळे शनिवारी रात्रीधरणाचे एक एक करत दहा दरवाजे उघडले असून, १५२२५ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. खासापुरी, चांदणी व - साकत मध्यम प्रकल्प तुडुंब भरल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नगर भागात मागील १५ दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने नद्या दुथडी वाहत आहेत. या आधीच्या पावसाने परंडा तालुक्यातील सीना, निम्नखैरी, उल्फा, चांदणी, नळी आदी नद्यांना पूर आला होता. अनेक भागातील शेतकऱ्यांच्या शेत जमिनीत पाणी शिरल्याने उसासह खरिपाचे नुकसान झाले आहे.आता सीना कोळेगाव धरण भरले असून त्याचे १० दरवाजे उघडले आहेत त्यापैकी ३ दरवाजे १० सेंटिमीटरने व ७ गेट ३० सेंटिमीटरने उघडले आहेत का सध्या एकूण पाण्याचा विसर्ग हा १५१२५.८७ क्यूसेकने विसर्ग - चालू धरण परिसरातील गावांना सतरकतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे
1
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top