icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
431122
MMMahendrakumar Mudholkar31 Aug 2025, 08:33 am

बीडकरांनी मुंबईतील आंदोलकांसाठी 30 हजार भाकऱ्या पाठविल्या!

Beed, Maharashtra:बीड : मुंबईतील आंदोलकांसाठी गावखेड्यातून शिदोरी, चटणीसह 30 हजार भाकऱ्या मुंबईला रवाना..! Anc : मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या समर्थनात हजारो मराठा आंदोलक मुंबईत आहेत. मात्र आंदोलकांना अन्न पाण्याची सोय नसल्याचे समोर आल्यानंतर आता बीडकर पुढे धजावले आहेत. आंदोलकांना निदान दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी आता बीडकरांनी पुढाकार घेतला आहे..बीडच्या गांधनवाडी, पांढरवाडी, सकुंडवाडी, उंडेवाडी, कोतन, खलाटवाडी या गावांतून 30 ते 35 हजार भाकऱ्या, चटणी आणि लोणच्याची शिदोरी मुंबईला रवाना करण्यात आली आहे..
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चंद्रपुर में एसीबी ने भद्रावती वनक्षेत्र कर्मियों पर छापा, 20 हजार रिश्वत मांगने का आरोप

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भद्रावतीच्या वनक्षेत्र सहाय्यक कार्यालय कर्मचाऱ्यांवर धाड घातली आहे. हा तक्रारदार घराच्या कामासाठी अवैधरित्या ट्रॅक्टर मधून वाळू वाहतूक करत होता. या ट्रॅक्टरवर वनपथकाने कारवाई पूर्ण केली. या कारवाईतील प्रक्रिया पूर्ण करून ट्रॅक्टर लवकर सोडवण्यासाठी पथकातील सदस्यांनी 20 हजार रुपये लाच मागणी केली. याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. वनपाल कोमल घुगलोत, वनरक्षक संदीप पारवे आणि रक्कम स्वीकारणारा खाजगी इसम ललित नागपुरे अशा तिघांना एसीबीने या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास एसीबी चंद्रपूर करत आहे.
0
0
Report

सांगली कोर्ट ने पति को फांसी की सजा सुनाई, पत्नी की हत्या का मामला सामने

Sangli, Maharashtra:पत्नीचा गळा चिरून,जाळून हत्या केल्या प्रकरणी सांगलीच्या विटा न्यायालयाने एका पतीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. रामचंद्र ऊर्फ संतोष आनंदा कदम, व 41 असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. सात जून 2021 रोजी खानापूर तालुक्यातल्या भूड येथे चरित्राच्या संशयातून व कौटुंबिक वादातून संतोष कदम याने पत्नी दिपाली कदम यांचा झोपेत गळा चिरून, अँगावर पेट्रोल ओतून जाळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती, याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यामध्ये संतोष कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता, सदर खटल्याची सुनावणी विटा सत्र न्यायालयामध्ये सुरू होती, यामध्ये सबळ पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाब आधारे संतोष कदम याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावत एक लाखाचा दंड देखील न्यायालयाने ठोठावला आहे.
0
0
Report

यशोधरानगर पुलिस ने मकोका फरार आरोपी को हथियारों के साथ गिरफ्तार किया

Nagpur, Maharashtra:यशोधरानगर पुलिसोंने मकोका गुन्ह्यातील फरार आरोपीला देशी कट्टा आणि धारदार चाकूसह अटक केली आहे. शानु उर्फ गोलू मनोज वैद्य असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खुनाचा प्रयत्न आणि मकोका गुन्ह्यातील हा आरोपी घटनेनंतर फरार होता. गुप्त माहितीच्या आधारे ऑटोमोटिव्ह चौक ते विटाभट्टी चौक परिसरात सापळा रचून पोलيسांनी त्याला अॅक्टिव्हा वाहनासह ताब्यात घेतले. झडतीदरम्यान आरोपीकडून मॅगझीनसह गावठी पिस्तूल, वाहनाच्या डिकीतून धारदार चाकू आणि मोबाईल जप्त करण्यात आला. सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी कोणताही दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगत असल्याचा संशय असून त्याच्याविरुद्ध यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

चिपळूण-रत्नागिरी महामार्ग पर खड्डों से यात्रियों की परेशानी, मंत्री को जवाब

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी लोकेशन - बहादूर शेख नाका.. मुंबई-गोवा महामार्गाची चिपळूणमध्ये दैना! खड्ड्यांच्या साम्राज्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते चैतन्य पाटील आक्रमक.. अँकर मुंबई-गोवा महामार्गाच्या रेंगाळलेल्या रुंदीकरणाचा आणि बिकट अवस्थेचा फटका पुन्हा एकदा सर्वसामान्य प्रवाशांना बसताना दिसतोय.. चिपळूणमधील बहादूर शेख नाका परिसरात महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे.. चिखल आणि खड्ड्यांतून नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.. या भयानक परिस्थितीचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करून रायगडचे सामाजिक कार्यकर्ते चैतन्य पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना थेट ट्विटरवरून जाब विचारला आहे.. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच चैतन्य पाटील यांनी रायगड ते तळकोकण असा पायी प्रवास करत महामार्गाच्या निकृष्ट आणि रखडलेल्या कामाची पाहणी केली होती.. आता पुन्हा एकदा प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी त्यांनी हे ड्रोन छायाचित्रण समोर आणले असून,या रखडलेल्या महामार्गाचे काम नक्की कधी पूर्ण होणार? असा संतप्त सवाल विचारला जात आहे... या संपूर्ण प्रकरणावर आणि महामार्गाच्या दुर्दशेवर काय म्हणाले आहेत सामाजिक कार्यकर्ते चैतन्य पाटील, पाहुयात...
0
0
Report

एमपीएससी पेपर लीक घोटाला: प्रश्नपत्र पूर्व से पहुँचने का आरोप

Ahilyanagar, Maharashtra:एमपीएससी परीक्षा घोटाळा आरोप: एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेची प्रश्नपत्रिका काही उमेदवारांकडे परीक्षेच्या दोन दिवस आधीच आली असल्याचा गंभीर आरोप अहिल्यानगर येथील ऋषिकेश गांगर्डे यांनी केला आहे... याबाबत त्यांनी पोलीस प्रशासनाकडे देखील तक्रार करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नाही असा आरोप ऋषिकेशने केला आहे... 22 मार्च 2026 रोजी ही परीक्षा झाली... काही उमेदवारांकडे प्रश्न पत्रिकेतील प्रश्न आणि उत्तरांची माहिती आधीपासूनच उपलब्ध होती आणि ती WhatsApp च्या माध्यमातून संभाव्य उत्तर म्हणून देण्यात आली होती असा आरोप ऋषिकेशने केला आहे...
0
0
Report

जातीय प्रेम के चलते मां ने बेटी की हत्या, उल्हासनगर में गिरफ्तार

Ambernath, Maharashtra:परजातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्यानं आईने मुलीची हत्या झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडलीये. या घटनेनंतर उल्हासनगर पोलिसांनी आईला अटक केली आहे. उल्हासनगराच्या कॅम्प १ मधील भैय्यासाहेब आंबेडकरमध्ये राहणारी अमृता गरुड hichे त्याच परिसरात राहणाऱ्या एका परजातीतील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांना तिची आई आशा गरुड यांचा विरोध होता. याच कारणावरून रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अमृता आणि तिच्या आईचे वाद झाले. वादानंतर अमृताच्या वडिलांनी स्वतः उल्हासनगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी आई आशा गरुडला अटक केली.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के दापोली एसटी डपो में महिला विद्यार्थी के विनयभंग से खलबली; नागरिकों ने आगार प्रमुखों के केबिन में घेराव किया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीच्या दापोली एसटी डेपोत महिला विद्यार्थिनीच्या विनयभंगानंतर खळबळ; संतप्त नागरिकांचा आगार प्रमुखांना घेराव.. अँकर दापोली एसटी डेपोत महिला विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना घडल्याने रत्नागिरीत खळबळ उडाली आहे.. याप्रकरणी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर संतप्त नागरिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आगार प्रमुखांच्या केबिनमध्ये घुसून जोरदार घेराव घातला.. केबिनमध्ये काही काळ मोठा गोंधळ निर्माण झाला होता. दोषी कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.. ग्रामीण भागातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, कारवाई न झाल्यास डेपोला टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला आहे..
0
0
Report

गणेश मूर्तियाँ महंगी: मिट्टी-रंग की कीमतों से मूर्तिकार परेशान

Chandrapur, Maharashtra:गणेश मूर्ति बनाने के लिए लगने वाली मिट्टी मिलना अब मुश्किल हो गया है, सामग्री के दाम बढ़ने से मूर्तिकार परेशान हैं। गणेश मूर्तियाँ बनाने का काम तेज़ी से शुरू है और महाराष्ट्र के महोत्सव गणेशोत्सव तक पहुँचने वाला है। सितंबर 14 को घरों और सार्वजनिक स्थानों पर गणेश मूर्तियाँ स्थापित की जाएँगी, इसके लिए आवश्यक मूर्तियाँ, रंग और अन्य सामग्री महंगे हो रहे हैं। चंद्रपुर में मूर्तिकारों के लिए मिट्टी प्राप्त करना चुनौतीपूर्ण हो रहा है; यहाँ सैकड़ों मूर्तिकार इस काम में लगे हैं। मूर्तिकारों की वार्षिक आय का बड़ा हिस्सा गणेशोत्सव से आता है, इसलिए वे चाहते हैं कि कोई कमी न रहे, लेकिन मिट्टी और अन्य सामग्री की कीमत बढ़ना चिंता का विषय है। बारिश कम होने के बावजूद मूर्तियों के बनाने की गति तेज है।
0
0
Report

चांदोली डैम से पानी का विसर्जन: वारणा नदी किनारे सतर्कता आवश्यक

Sangli, Maharashtra:स्लग - चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू,वारणा नदीकाठी सतर्कतेचा इशारा.. अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धरणाच्या वक्र दरवाज्यातून २ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात करण्यात येत आहे, तर विद्युत पायथागृहातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे,त्यामुळे वारणा नदी पात्रात ३४०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ सुरू झाली आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊसाची संततधार कायम असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून धरण ८३.३०% इतके भरला आहे.२८.६६ टीएमसी इतकं पाणीसाठा धडा मध्ये निर्माण झाल्याने धरण प्रशासनाकडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे,त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

कल्याण पूर्व केचोरे में चिखल उड़ाने के आरोप पर मारामारी, महिला गंभीर जख्मी

Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्व कचोरेतील थरारक मारहाण सीसीटीव्हीत कैद महिला गंभीर जखमी, दो जण किरकोळ जखमी. कल्याण पूर्वेतील कचोरे परिसरात चिखल आणि पाणी अंगावर उडाल्याचा जाब विचारल्याने किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि लाठ्या-काठ्यांनी झालेल्या मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कल्याण पूर्वेतील कचोरे परिसरात राहणाऱ्या शेख आणि रेवडी कुटुं‍ंबांमध्ये हा वाद झाला. दुपारच्या सुमारास शेकू रेवडी हा भरधाव मोटारसायकल चालवत जात असताना चिखल आणि पाणी शेख कुटुंबाच्या अंगावर उडाले. यावेळी गाडी हळू चालवण्यास सांगितल्याचा राग मनात धरून वादाला सुरुवात झाल्याचा आरोप आहे.यानंतर शेकू रेवडी याने आपल्या वडिलांसह इतर कुटुंबीयांना बोलावून हिना शेख, तिचे पती मुजम्मिल शेख आणि आई जन्नत शेख यांच्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत जन्नत शेख गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर कल्याणमधील मीरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर हिना शेख आणि मुजम्मिल शेख हे किरकोळ जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी 50 हजार रुपयांच्या आर्थिक व्यवहारावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता. मात्र तो वाद मिटला असतानाच पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला. दरम्यान, मारहाणीची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत चौकशी सुरू केली असून तक्रारीनंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
0
0
Report

अहिरे में चोरों ने दुकान तोड़ने की कोशिश की, ग्रामीणों ने चोरी रोक दी

Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील अहिरे गावात मध्यरात्री सहा चोरट्यांनी रस्त्याच्या कडेला असलेले दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली. चोरीच्या प्रयत्नादरम्यान एका दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल आणि घड्याळ घेऊन चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा थरार दुकान परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरटे दुकान फोडण्याचा प्रयत्न करत असतानाच परिसरातील गावकऱ्यांना जाग आली. नागरिक जागे झाल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. त्यामुळे मोठी चोरी होण्यापासून बचाव झाला. घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून CCTV फुटेजच्या आधारे सहा चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. चोरट्यांनी परिसरात आणखी कुठे चोरी केली आहे का, याबाबतही पोलिसांकडून तपास केला जात आहे. या घटनेमुळे अहिरे गावासह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
0
0
Report
Advertisement

रायगड़ पुलिस ने 4 करोड़ रुपये अंबरग्रीस जैसी उल्टी के साथ एक आरोपी पकड़ा

Chendhare, Maharashtra:अलीबाग पोलिसांची पहाटे मोठी कारवाई. चार कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जपत. एक आरोपी पोलीसांच्या ताब्यात. रायगड पोलिसांनी वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल चार कोटी रुपयांची व्हेल माशाच्या उलटीसदृश अँबरग्रीस जप्त केले आहे. अलिबाग तालुक्यातील चाळमाळा परिसरात विशेष गस्तीदरम्यान ही धडक कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी राहुल पंढरीनाथ हातणी या संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पहाटे दीडच्या sुमारास पोलिसांना चाळमाळा जेटीजवळ एक संशयास्पद दुचाकीस्वार आढळला. त्याची तपासणी केली असता दुचाकीच्या डिकीत कापडी पिशवीत सुमारे चार किलो वजनाचे अँबरग्रीस सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारात या पदार्थाची किंमत सुमारे चार कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याशिवाय संशयिताची दुचाकीही जप्त करण्यात आली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सव्वाचार कोटी रुपये इतकी आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीविरुद्ध यापुढे कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे समोर आले.
0
0
Report

चिपळूण में सावर्डे-डेरवण फाटे पर भीषण सड़क हादसा, चालक गंभीर घायल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे-डेरवण फाटा येथे दुचाकी आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार शंकर पाटील, जे सावर्डा भुवडवाडी जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत, ते गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. अपघातानंतर सावर्डे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top