Back

आर्णी रोडवर स्पीड ब्रेकरच व खड्डे बुजविण्याची मागणी
Waghapur, Maharashtra:
यवतमाळ बस स्टँडपासून आर्णी रोडवरील वनवासी मारुती मंदिरापर्यंतच्या मार्गावर वारंवार अपघात होत असून नागरिकांनी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी केली आहे. जिल्हा परिषद कार्यालय, शाळा आणि रुग्णालये या परिसरात असल्याने धोका वाढला आहे. तक्रारी असूनही नगरपरिषदेकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप आहे. तसेच विद्युत भवनसमोरील मोठ्या खड्ड्यामुळेही अपघात वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
12
Report
दिव्यांगांकडून निसर्ग संवर्धनाचा संदेश
Waghapur, Maharashtra:
यवतमाळ नगर परिषद आणि युवा जागर ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने सिकलसेल व थालेसेमिया ग्रस्त दिव्यांगांसाठी पर्यावरणपूरक गणपती विक्री स्टॉल सुरू करण्यात आला. मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांच्या हस्ते रिबन कापून व गणपती पूजन करून उद्घाटन झाले. लाल मातीपासून बनवलेल्या या मूर्ती घरातच विसर्जित करून रोप लागवडीसाठी वापरता येतात, ज्यामुळे जलस्रोत प्रदूषण टळेल. या उपक्रमात नगर परिषदेचे अधिकारी, मान्यवर आणि युवा जागर ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन रितेश गवारकर यांनी केले.
14
Report
यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे “फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह” रॅली उत्साहात पार
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ : भारत सरकारच्या क्रीडा विभागाच्या "फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह" या विशेष उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत “फिटनेस के डोस – आधा घंटा रोज” या संदेशाचा प्रसार करत नागरिकांना दररोज किमान अर्धा तास व्यायाम करण्याचे आवाहन करण्यात आले.
ही रॅली दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सायकलिंग ड्राईव्ह पोलीस मुख्यालय यवतमाळ ते दारव्हा रोड या 10 किलोमीटर अंतरावर शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाली.
14
Report