Back
मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण: लाखोंचा पाठिंबा मुंबईत!
GDGAJANAN DESHMUKH
Aug 31, 2025 08:01:30
Parbhani, Maharashtra
अँकर- मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत,त्यांच्या सोबत लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. पण त्यांची तिथे मोठ्या प्रमाणात आबाळ सुरू आहे.त्यामुळे कळमनुरी तालुक्यातील नांदेड हिंगोली महामार्गावर मराठा बांधवांनी रास्तारोको करीत शासनाचा निषेध नोंदवत मुंबई येथील मराठा आंदोलक बांधवांना सुविधा देण्याची मागणी केली,
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KPKAILAS PURI
FollowSept 01, 2025 12:30:54Pimpri-Chinchwad, Maharashtra:
*नात्यातील मुलीच्या प्रियकराची हत्या......*
*पिंपरी चिंचवडमध्ये 11 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, 9 जणांना अटक*
pimpri murder
kailas puri Pune 1-9-25
feed by 2c
for web also...!
ANCHOR - पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे... नात्यातील एका मुलीच्या 26 वर्षीय प्रियकराला 11 जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी 11 आरोपींविरुद्ध कट रचून खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे. ही घटना 22 जुलै रोजी पिंपरीतील सांगवी परिसरात असलेल्या देवकर पार्कमधील एका खोलीत घडली. मयत तरुणाचे नाव रामेश्वर घेंगट असून, त्याचे त्याच्याच नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, रामेश्वरचा स्वभाव आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून तरुणीच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता. दोघेही लग्नावर ठाम असल्याने, तरुणीच्या कुटुंबियांनी रामेश्वरला लग्नाबद्दल बोलणी करण्यासाठी बोलावले. रामेश्वर त्याच्या आई-वडिलांसोबत त्यांच्या घरी गेला. तिथे दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला आणि याच वादातून तरुणीचे वडील आणि इतरांनी रामेश्वरला एका खोलीत नेले. तिथे त्याच्या गुप्तांगावर, डोक्यात आणि शरीराच्या इतर भागांवर बेदम मारहाण केली. या मारहाणीत रामेश्वर गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही.
ही माहिती सांगवी पोलिसांना मिळाल्यानंतर, त्यांनी रामेश्वरच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर घेंगटला मारहाण करून खून केल्याप्रकरणी तरुणीचे वडील प्रशांत सारसर, करण खोकरसह एकूण 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य फरार 2 आरोपींचा शोध सुरू आहे.
BYTE: जितेंद्र कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगवी
0
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 01, 2025 12:15:13Pandharpur, Maharashtra:
01092025
slug - PPR_KALE_SUGER
file 02
----
Anchor - पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाड्या देण्याचा डाव हाणून पाडला जाईल. असा इशारा माजी संचालक दीपक पवार यांनी दिला आहे. यावेळी प्राचार्य बीपी रोंगे, सभासद, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सदर सहकारी साखर कारखाना भाड्याने देण्याची प्रक्रिया सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर कारखाना बचाव समितीची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत संचालक मंडळाने कारखाना भाड्याने चालवण्यास देऊ नये अशी मागणी करण्यात आली. तसेच जर असा प्रकार घडला तर जो व्यक्ती अथवा संस्था भाड्याने चालवण्यास घेईल त्याला कारखान्यात पाऊल टाकू दिले जाणार नाही अशी भूमिका उपस्थित सभासदांनी घेतली.
,----
बाईट दीपक पवार, माजी संचालक
0
Report
AKAMAR KANE
FollowSept 01, 2025 12:01:58kolhapur, Maharashtra:
Ngp Bhosale mahalakshmi
live u ने फीड पाठवले
---------*---
नागपुरचे राजे मुधोजी महाराज भोसले यांच्या निवासस्थानी सिनीयर भोंसला पॅलेसमध्ये पारंपारिक पद्धतीने महालक्ष्मी स्थापना करण्यात आलीय. 1728 पासून म्हणजे तब्बल 297 महालक्ष्मी विराजमान होतात. जुन्या अलंकार जडित चांदीच्या महालक्ष्मीनी आज फुलोरा आणि नैवद्य दाखवण्यात आल
--------
बाईट - मुधोजी राजे भोसले
-----------------
0
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 01, 2025 12:01:54Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_OBC_RASTA_ROKO
सातारा - फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकामध्ये ओबीसी समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला या आंदोलनात मोठ्या संख्येने ओबीसी बांधव दाखल झाले होते. दरम्यान ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसाठी हा रास्ता रोको करण्यात आला. यामुळे काही वेळासाठी या परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. होती
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 01, 2025 10:50:58Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0109ZT_JALNA_GANPATI(6 FILES)
जालना | गणपती समोर गणितीय प्रयोगशाळेचा साकारला देखावा
प्राध्यापक श्रीकांत चिंचखेडकर यांचा उपक्रम
वाक थ्रू +121
गेल्या 21 ते 22 वर्षांपासून दरवर्षी वेगवेगळे देखावे
अँकर : विद्यार्थ्यांना गणित हा किचकट विषय मनोरंजनातून शिकता यावा या उद्देशानं जालन्यात गणपती समोर गणितीय प्रयोगशाळेचा देखावा साकारण्यात आला आहे.जालन्यातील प्राध्यापक श्रीकांत चिंचखेडकर यांनी त्यांच्या घरघुती गणपती समोर हा देखावा साकारला आहे.या प्रयोगशाळेत गणित श्रीधराचार्य,श्रीनिवास रामाणूजन,जॉन नेपियर,भास्कराचार्य यांच्या प्रतिमा देखील साकारण्यात आल्यायत. आणि या गणितीय प्रयोगशाळेचा आढावा घेऊन प्रा.श्रीकांत चिंचखेडकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी.
वाक थ्रू +121 विथ प्रा.श्रीकांत चिंचखेडकर
0
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 01, 2025 10:05:45Washim, Maharashtra:
वाशिम :
File:0109ZT_WSM_GAURI_SANKRANTI_DECORATION
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यातील जऊळका येथील विद्या चव्हाण व चव्हाण कुटुंबीयांनी यंदा गौरी स्थापनेत आगळावेगळा देखावा साकारला आहे.पारंपरिक पद्धतीनं होत असलेल्या गौरी पूजनाला त्यांनी यंदा मकर संक्रांती या सणावर आधारित रुप दिलं आहे.या देखाव्यात महिलांनी हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात घेतलेले उखाणे,लहान मुलं तिळगुळाचा आनंद घेत असलेले प्रसंग, साखरपुडा व “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” या संदेशाचं दर्शन घडवलं आहे.गौरीच्या माध्यमातून उभारलेला हा देखावा समाजात ऐक्य,सौहार्द आणि गोडवा टिकवण्याचा संदेश देणारा ठरला आहे.
बाईट : विद्या चव्हाण
2
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 01, 2025 10:04:31Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0109ZT_CHP_OBC_DECISION
( single file sent on 2C)
टायटल:-- बस्स... आता ओबीसींचेही ठरले, मराठा समावेशाविरोधात चंद्रपुरात 2 सप्टेंबरला धरणे तर 13 सप्टेंबरला महामोर्चा, जरांगेचा जोरदार विरोध करण्याचा निर्धार
अँकर:-- राज्याची राजधानी मुंबईत मराठ्यांनी ओबीसी आरक्षण समावेशासाठी जोरदार आंदोलन पुकारले आहे. या विरोधात विदर्भातआता वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. चंद्रपुरात ओबीसी संघटनांनी आज एक मोठी बैठक घेत जरांगेंच्या प्रयत्नांना जोरदार विरोध करण्याचे ठरविले आहे. चंद्रपूर शहरातील गांधी चौकात उद्या 2 सप्टेंबर रोजी ओबीसी निदर्शने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 13 सप्टेंबर रोजी शहरात ओबीसी महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. आधीपासून मराठ्यांना एसबीसी आणि ईडब्ल्यूएस या दोन्ही गटातून आरक्षण दिले गेले आहे. मात्र आता ओबीसी गटातून त्यांनी चालवलेल्या प्रयत्नांना राज्यभर जोरदार विरोध करू अशी भूमिका ओबीसी आंदोलकांनी घेतली आहे. राज्यात ओबीसी आंदोलन पेटून उठले असून विविध जिल्ह्यातही अशाच प्रकारचे मोर्चे आयोजित करण्याचा निर्धार ओबीसी कार्यकर्त्यांनी केला आहे.
बाईट १) प्रा. अनिल डाहाके, ओबीसी नेते
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
1
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 01, 2025 09:47:55Raigad, Maharashtra:
स्लग - रायगडात गौरी पूजन उत्साहात .......
अँकर - रायगड जिल्ह्यात आज गौरी पूजन उत्साहात पार पडले. बांबूच्या सुपामध्ये विविध वाण साहित्य तसेच पत्री, फूले, फळे ठेवून गौराईची ओटी भरण्यात आली. ही सुपे जवळच्या नातेवाईकांना भेट देण्यात आली. यंदा पूर्वा नक्षत्रावर गौरी पूजन आल्याने नव विवाहितांचे ओवसे पार पडले. महिलांनी गौरीचे पूजन करून आरती म्हटली. तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवण्यात आला.
5
Report
KJKunal Jamdade
FollowSept 01, 2025 09:47:48Shirdi, Maharashtra:
Anc - मनोज जरांगे यांची प्रकृती चांगली रहावी आणि मराठा आरक्षणाचा तिढा सुटावा यासाठी शिर्डीतील मराठा बांधवांनी साईबाबा चरणी साकडं घातलं आहे.. जरांगे यांची प्रतिमा साई समाधीवर ठेवत मराठा बांधवांनी मुंबईतील आंदोलकांसाठी प्रार्थना केली आहे..राज्यभरातील मराठा बांधव मनोज जरांगे यांना विविध माध्यमातून पाठिंबा देत आहेत.. शिर्डीतील मराठा बांधवांनी साई चरणी साकडं घालत जरांगे यांची प्रकृती चांगली रहावी यासाठी प्रार्थना केली.. यासह शिर्डी नगरपरिषेदेसमोर आज एकदिवसाचे लाक्षणिक उपोषण करत आरक्षणाचा तिढा लवकर सुटावा आणि आंदोलक मराठे सुखरूप घरी परतावेत अशी प्रार्थना करण्यात आली.या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
Wkt/tiktak kunal jamdade
4
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 01, 2025 09:21:13Washim, Maharashtra:
वाशिम :
File:0109ZT_WSM_CONGRESS_ANDOLAN
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम शहरातून जाणाऱ्या अकोला -नांदेड महामार्गाचे नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे.मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी या महामार्गाचे चौपदरीकरण होईल असे आश्वासन दिले होते.परंतु सध्या या रस्त्याचे फक्त दुपदरीकरण सुरू असून यामुळे जनतेत नाराजी व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आज वाशिम शहरातील वसंतराव नाईक चौकात रास्ता रोको आंदोलन केले. शहर पोलिस ठाण्याजवळ झालेल्या या आंदोलनातून भाजप सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.आंदोलकांनी महामार्गाचे काम दर्जेदार करण्याची आणि वाशिम शहरातून जाणाऱ्या या महामार्गाचे चौपदरीकरण तातडीने करण्याची मागणी केली.
4
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 01, 2025 09:15:20Ratnagiri, Maharashtra:
मंत्री नितेश राणे पॉइंटर्स
कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी, कामांसाठी वैभव खेडेकर भेटत होते
पक्षासाठी दिवस रात्र एक करतो, पण ज्यांच्यासाठी आपण करतो त्यांनी आपणाला साथ द्यावी अशी अपेक्षा प्रत्येकाची असते
त्यांच्याबरोबर जे घडलं ते त्यांनाही कदाचित अपेक्षित नव्हतं
अतिशय प्रामाणिकपणे ते पक्षाचे काम करत होते
ते पत्र त्यांना मिळाल्यावर मी त्यांना फोन करून आम्ही बरोबर आहोत हे सांगितलं
भाजपमध्ये येण्याचा विचार करावा हे मी सांगितलं
प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब यांच्याशीही याबाबत बोललो
त्यांची आणि चव्हाण साहेबांची भेट झाली
वैभव खेडेकर 4 सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार - नितेश राणे यांची माहिती
मुंबईत नरिमन पॉईंट कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होईल
जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार
मंत्री नितेश राणे
भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांचा संदेश घेउन मी इथे आलो आहे
4 तारखेला अधिकृत भाजपमध्ये स्वागत करणार
On स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
जे चेहरे येताहेत ते त्या भागाचे नेतृत्व करताहेत
तर निश्चितपणे याचा फायदा आम्हाला होईल
अजून रांग फार मोठी आहे, येणाऱ्या काळात अनेकजण भाजपमध्ये येतील
खेडेकर यांच्यावर निश्चितपणे टाकली जाईल
वैभवजिना योग्य पद्धतीने ताकद देऊ
प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार
On आंदोल
उपसमिती गठीत आहे
मराठा आरक्षण 10 टक्के कोणी घालवलं
यांनी आरक्षण घालवलं, हे सर्व पापी आहेत
हे करणारे कोण आहेत हे शोधलं पाहिजे
आंदोलनाला कोणाचं बळ आहे यासाठी एक पत्रकार परिषद घेऊ
फडणवीस साहेबाचं नाव घेतल्याशिवाय हे पुढे जाऊच शकत नाही, विरोधकांवर हल्लाबोल
ज्या झाडाला फळे लागतात त्याच झाडावर दगड मारले जातात
सर्व परिस्थितीवर लक्ष आहे
कायदा सुव्यवस्था बिघडवू देणार आहे
*पोलिस आंदोलक वेशात जाताहेत.. जरांगे वक्तव्यावर प्रत्युत्तर*
पोलिसांवर एवढा अविश्वास दाखवू नका
ते नितेश राणेवर टीका करणारच
कालपासून दाढीवाले भेटताहेत
अब्बाला खुश करायचं आहे त्यामुळे मला शिव्या ते देणारच
मी हिंदुत्वचं काम करतो त्यामुळे त्यांना खुश करण्यासाठी मला शिव्या ते देणारच
त्यांच्या बरोबर जे आता व्यासपीठावर बसायला येताहेत, ते जिहादी मानसिकतेचे, ते कसं चालतं आता
गोमूत्र शिंपडलं पाहिजे व्यासपीठावर
कोकणात काही प्रॉब्लेम नाही
आम्ही सर्व इथे गुण्यागोविंदाने राहतो
नितेश राणे
आंदोलन उग्र होण्याची वेळ येणार नाही
On रो रो
थोडा पाऊस जाऊदे रो रो सुरू होईल
5
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 01, 2025 08:51:41Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_DOG_BYTE एक फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावती शहरासह जिल्ह्यात मोकाट श्वानांच्या झुंडीमुळे वाहनधारकांमध्ये मोठी दहशत; सात महिन्यात तब्बल 15 हजारांवर नागरिकांना घेतला चावा
अँकर :– अमरावती शहरासह जिल्ह्यात मोकाट श्वानांच्या झुंडीमुळे वाहनधारकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून सात महिन्यात तब्बल 15 हजारांवर नागरिकांना श्वानांनी चावा घेतल्याची आरोग्य विभागाची माहिती असून अमरावती शहरात चौका चौकात मोकाट श्वानांची दहशत पाहायला मिळत आहे. अनेक श्वान दुचाकी स्वारांवर झडप घेत असल्याचे प्रकार समोर महानगरपालिकेने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
4
Report
AKAMAR KANE
FollowSept 01, 2025 08:50:57kolhapur, Maharashtra:
Ngp Mudhoji raje Byte
live u ने फीड पाठवले
----------
नागपूर--- मुधोजीराजे भोसले बाईट
Ngp Mudhojiraje byte
(मुंबईत आंदोलन)
--मोठ्या संख्येने आंदोलन आंदोलनासाठी गोळा झाले, तर ज्या ठिकाणी आंदोलन होत आहे, त्या भागातील लोकांना काही त्रास होणे स्वाभाविक आहे.. त्यामुळे आंदोलनासंदर्भात लवकर तोडगा काढणे आवश्यक असते..
मराठा म्हणूनच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते टिकाऊ असल पाहिजे.. कोणाकडून आरक्षण काढून मराठ्यांना आरक्षण न देता, मराठ्यांसाठी विशेष प्रवर्ग निर्माण करून आरक्षण दिलं पाहिजे..
--आंदोलनात गेलेल्या तरुणांनी शांततेने आंदोलन केलं पाहिजे.. आंदोलनाची एकी कायम राहिली पाहिजे.. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण आजच्या स्थितीमध्ये तर शक्य नाही..
--आंदोलन पुढे वाढत जाताना मागण्यांमध्ये काहीच अंतर होत जातो.. ज्यांच्याकडे कुणबी मराठा म्हणून दस्तावेज आहे, त्यांना सरकार ओबीसी मध्ये घेण्यास तयार आहे, त्यांना घेतलेच(गेले पाहिजे) पाहिजे.. मात्र ज्यांच्याकडे दस्तावेज नाही, त्यांना ओबीसी मध्ये घेणे शक्य नाही.. त्यामुळे मराठ्यांना वेगळं स्वतंत्र आरक्षण देणंच योग्य राहील..
आरक्षण संपलं तर सर्वांसाठी चांगलं होईल.. आज मराठा मागत आहे उद्या ब्राह्मण ही आरक्षणाची मागणी करतील.. मुळात आरक्षण दहा वर्षासाठी लागू झालं होतं.. फक्त राजकीय पुढाऱ्यांमुळे तो कायम राहिलं आहे.. आरक्षण सरसकट रद्द झालं, तर हुशार विद्यार्थ्यांना संधी मिळेल, मग तो कुठल्याही समाजाचाच असो.. आरक्षणाची भानगड संपली पाहिजे असं मला वाटते...
4
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 01, 2025 08:46:02Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव:
DHARA_R2_HELP
डीजेमुक्त गणेश मिरवणुकीचा संकल्प करत गणेश मंडळाकडून मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मदत रवाना
धाराशिच्या कळंब मधील मोहा येथील स्वराज गणेश मंडळाकडून मदत, सर्व जाती-धर्माच्या लोकांकडून वर्गणी
मुंबईत ताज जेवण बनवून आंदोलकांना देणार, गावाकडून नेलेली भाजी भाकरी खराब होईल म्हणून निर्णय
Anc: मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्व सुरू असलेल्या मराठा आंदोलकांना राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. धाराशिवच्या कळंब मधील मोहा गावातील स्वराज गणेश मंडळाने डीजे मुक्त मिरवणूक काढायचा संकल्प करत मदत मुंबईकडे रवाना केली. गावातील अठरापगड जातीतील लोकांनी मदतीचा हात दिला. राज्यभर अनेक गावातून भाकरी आणि भाजी बनवून मुंबईकडे रवाना होत आहे. मात्र मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या भाकरी खराब होऊ शकतात म्हणून मुंबईतच जेवण बनवून देण्याचा निर्णय करत मोहा येथील तरुण मुंबईकडे रवाना झाले.
Byt: मदत घेऊन गेलेलं तरुण
6
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 01, 2025 08:19:01Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0109ZT_JALNA_OBC_UPOSHAN(6 FILES)
जालना | ब्रेकिंग
अंतरवाली सराटीत ओबीसींच्या उपोषणाला सुरुवात
अंतरवाली सराटीच्या सोनिया नगरमध्ये ओबीसींचं उपोषण सुरु
मनोज जरांगे यांच्या झुंडशाहीविरोधात आंदोलन
जरांगेंच्या झुंडशाहीला बळी पडून सरकारने ओबीसींवर नांगर फिरु नये
ओबीसी कार्यकर्ते बाबासाहेब बटुळे, विठ्ठल तळेकर, बाळासाहेब दखने आणि श्रीहरी निर्मळ यांचं उपोषण सुरु
अँकर : अंतरवाली सराटीत ओबीसींच्या उपोषण आंदोलनाला सुरुवात झालीये.. अंतरवाली सराटीच्या सोनियानगरमध्ये हे आंदोलन सुरु झालंय.. ओबीसी कार्यकर्ते बाबासाहेब बटुळे, विठ्ठल तळेकर, बाळासाहेब दखने आणि श्रीहरी निर्मळ उपोषणाला बसले आहेत.. मनोज जरांगे यांच्या झुंडशाहीला बळी पडून सरकारनं ओबीसींवर नांगर फिरु नये, वाटप झालेले बोगस दाखले रद्द करण्यात यावेत, त्याचबरोबर सरकारनं केलेला मराठा समाजाचा मागास अहवालही बोगस असून त्याचं पुन्हा सर्वेक्षण करावे अशा मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत ओबीसी बांधवांनी उपोषण सुरु केलंय..
बाईट- विठ्ठल तळेकर, ओबीसी आंदोलक
बाईट- बाबासाहेब बटुळे, ओबीसी आंदोलक (टोपी घातलेले)
बाईट- बाळासाहेब दखने, ओबीसी आंदोलक(हिरवा शर्ट असलेले)
4
Report