Back
मावळ में एसआईटी खोजे मास्टरमाइंड: सुनील शेळके हत्या के राज खुलेंगे
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 26, 2025 04:15:19
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location ; Maval
File.name : 2609ZT_MAVAL_SIT
Total files : 02
Headline : मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मास्टरमाइंडचा शोध घेण्यासाठी
एसआयटीची स्थापना
गृह राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एसआयटीची स्थापना
Anchor :
मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट मागील काळामध्ये उघडकीस आला होता. तसेच तळेगाव परिसरामध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांचा सखोल तपास करण्यासाठी व या कटा मागे नेमकं कोण आहे याचा शोध घेण्यासाठी शासनाकडून विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड झोन दोनचे उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड झोन दोनचे उपायुक्त विशाल गायकवाड हे समितीचे प्रमुख असणार आहेत. यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, तळेगाव दाभाडे पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलीस उप निरीक्षक रवींद्र खामगळ, पोलीस हवालदार अंकुश लांडे, सचिन बेंबाळे, सुनील सगर यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या कट प्रकरणातील सात आरोपींना नऊ पिस्तूल, ४२ काडतुसे, कोयते अशा हत्यारांसह पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी अटक केलेले आरोपी पुणे, जालना, मध्य प्रदेश येथील गुन्हेगार आहेत. या आरोपींवर खून, खंडणी, वाहनांची तोडफोड, जाळपोळ, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी सुरुवातीला दोघांना अटक करून त्यांच्याकडून चार पिस्तूल जप्त केले. त्यानंतर आणखी तिघांना अटक करून पाच पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली. त्यानंतर या आरोपींना फंडिंग करणाऱ्यासह दोघांना अटक करण्यात आली होती. हे गुन्हेगार मध्य प्रदेशात गेले. उत्तर प्रदेश मधील देवराज नावाच्या कुख्यात गुन्हेगाराकडून या आरोपींनी मध्य प्रदेश मधून हत्यारे आणली होती. हे आरोपी जामिनावर कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा तळेगाव परिसरामध्ये दिसून आल्याबाबत तक्रार देखील दाखल झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये 4 जुलै रोजी लक्षवेधी उपस्थित करत या गंभीर विषयावर चर्चा करण्याची व तपास पथक स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यावेळी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या बाबीची एसआयटी मार्फत सखोल चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. ही एसआयटी आता सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मास्टरमाईंडचा शोध घेणार आहे.
बाईट : सुनील शेळके, आमदार, मावळ (file no.02)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowSept 26, 2025 05:50:080
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 26, 2025 05:48:460
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 26, 2025 05:48:080
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 26, 2025 05:47:500
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 26, 2025 05:02:490
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 26, 2025 05:02:360
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 26, 2025 04:48:226
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 04:48:070
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 26, 2025 04:47:470
Report
UPUmesh Parab
FollowSept 26, 2025 04:47:370
Report
KPKAILAS PURI
FollowSept 26, 2025 04:33:120
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 26, 2025 04:32:260
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 26, 2025 04:32:030
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 26, 2025 04:31:520
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 04:30:270
Report