Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

संभाजी नगरच्या बालगृहात धक्कादायक अत्याचार, मुलींनी न्यायालय गाठले!

VISHAL KAROLE
Jul 04, 2025 03:03:27
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn balgruh update av Feed attached संभाजी नगरच्या  विद्यादीप बालगृहातील अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. याच कारणांमुळे मुलींनी न्यायालय गाठत बालगृह प्रशासन आणि बालकल्याण समितीवर अविश्वास दाखवला. 'पोलिसांकडेच आम्ही म्हणणे मांडू' असा आग्रह त्यांनी धरला. याची दखल पोलिस आयुक्तांनी घेतली आहे. त्यांनी तत्काळ या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून पीडित मुलींची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र तीन महिला अधिकाऱ्याची समिती नेमली आहे. या महिला अधिकारी मुलींचा जबाब नोंदवणार आहेत. ३० जून रोजी या बालगृहातून ९ मुलींनी पळ काढत विद्यादीप बालगृहात आमच्यावर अन्याय होतो असा आरोप करत थेट सत्र न्यायालय गाठले होते. त्यानंतर या बालगृहात होणारे अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. बालगृहातील मुलींना असुविधा मिळतात, काही मुलींना हा त्रास असह्य झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या हातावर काचेने जखमाही केल्या होत्या...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement