Back
वर्ध्यात शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाच्या अंगावर मुंग्या, धक्कादायक घटना!
MAMILIND ANDE
FollowJul 23, 2025 16:46:23
Wardha, Maharashtra
*वर्धा ब्रेकिंग*
SLUG- 2307_WARDHA_HOSPITAL
वर्ध्यात शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाच्या अंगावर चढल्या मुंग्या
- हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
अँकर- वर्ध्याच्या हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाच्या अंगावर मुंग्याच मुंग्या चढल्या.शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला आंतररुग्ण वॉर्डमध्ये भरती ठेवल्यानंतर सदर घटना घडली. शस्त्रक्रिया करण्यात आली,यावेळी सदर व्यक्ती सुंगणी दिल्याने बेशुद्ध अवस्थेत होता.नजीकच्या चिचघाट (लाडकी) येथील रुग्णावर रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर या रुग्णाला पुरुष आंतररुग्ण वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले, तेथे त्याचे सर्वांगावर मुंग्या चढल्या.ही बाब लक्षात आल्यानंतर त्याच्या सोबतच्या मित्राने याची माहिती वार्डमधील उपस्थित कर्मचाऱ्यास दिली.. रुग्णाला शस्त्रक्रिया कक्षात नेऊन पुन्हा तपासणी करण्यात आली आणि मुंग्या काढून टाकल्यानंतर रुग्णाची स्वच्छता करण्यात आली..शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाचे शरीरावर मुंग्यांचा मोठ्या प्रमाणात प्रकोप झाल्याचे घटनेने रुग्णालयाच्या स्वच्छतेवर तसेच रुग्णांच्या काळजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
विवो - रुग्णालयाच्या परिसरात मुंग्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असल्याची कबुली दिली...या घटनेमुळे रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला असून रुग्णांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. यासोबतच हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात अनेक सुविधांचा अभाव दिसून येतो.संबंधित घटनेची चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले.
तपासात कोणी दोषी आढळल्यास कारवाईसुध्दा करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.
बाईट - डॉ. राहुल भोयर,प्रभारी वैद्यकीय अधीक्षक
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowJul 24, 2025 01:01:38Sinnar, Maharashtra:
अँकर:- पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सिन्नर शहर परिसरात अवैधरित्या गुटख्याची चोरटी वाहतूक होणार असून यावेळी पोलिसांनी सापळा रचत शमशाह जुल्फेखार ,राहणार, उत्तर प्रदेश याला वाहनासह ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातून तब्बल साडेतेरा लाखांचा गुटखा सुगंधी तंबाखू पानमसाला जप्त करण्यात आला असून आरोपीवर सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिन्नर पोलीस करत आहेत
0
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 24, 2025 01:01:22Yeola, Maharashtra:
अँकर:-
संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्ताने येवला शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज तसेच विठ्ठल-रुक्मिणीचा सजीव देखावा हे प्रमुख आकर्षण ठरले.पालखी मिरवणुकीची सुरुवात संत नामदेव महाराजांच्या मंदिरातून करण्यात आली. टाळ-मृदंग, अभंगवाणी, भजन आणि कीर्तनाच्या सुरांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. पालखी सजवण्यासाठी फुलांच्या आरास, विद्युत रोषणाई करण्यात आली होती. हजारोंच्या संख्येने भाविकांनी सहभाग घेत संत नामदेव महाराजांना अभिवादन केले.
शहरातील विविध भागातून पालखी मार्गक्रमण करत असताना ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, आरती आणि स्वागताची रेलचेल पाहायला मिळाली. पालखी पुन्हा मंदिरात आगमन होऊन दहीहंडी झाल्यानंतर महाआरती व प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
0
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 24, 2025 01:01:13Yeola, Maharashtra:
अँकर+
संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त येवला शहरातून भव्य अशी रथाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. मोट ओढतानाचा अप्रतिम देखावा यावेळी मिरवणुकीत सादर करण्यात आला.संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येवल्यातील दत्तवाडी येथे अखंड त्रिदिनी हरिनाम सप्ताहाचे आयोजन देखील करण्यात आले होते. आज सोहळ्याची सांगता होऊन सावता माळी पुण्यतिथी निमित्त शहरातील मुख्य रस्त्यावरून रथ मिरवणूक काढण्यात आली. मोठ्या संख्येने समाज बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
0
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 24, 2025 01:01:04Yeola, Maharashtra:
अँकर :- नाशिकच्या येवला तालुक्यातील एरंडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी लावण्यात आलेल्या दोन एलईडी सेटची चोरी करण्यात आली असून शालेय साहित्य देखील चोरी करण्यात आले आहे तसेच चोरट्यांनी तोडफोड देखील केली असून याच प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
0
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 24, 2025 01:00:55Yeola, Maharashtra:
अँकर:-निफाड तालुक्यातील शिरवाडे या ठिकाणी असलेल्या एका किराणा दुकानाचा पत्रा कापून चोरट्यांनी गल्ल्यातील पंधरा हजार रुपये रोख रक्कम लंपास केली या घटनेमुळे व्यावसायिकाचे नुकसान झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे
0
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 24, 2025 01:00:42Yeola, Maharashtra:
अँकर:-येवला शहरातील विंचूर चौफुली परिसरातील व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव लवकरात लवकर करून विस्थापित गाळेधारकांना न्याय द्यावा , ई लिलाव पद्धत रद्द करावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने विस्थापित गाळेधारकांच्या कुटुंबासह विंचूर चौफुली येवला येथे दिनांक २५ जुलै रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे या या रास्ता रोको आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सह, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने देखील पाठिंबा दिला असून येवल्यातील व्यापारी महासंघ देखील या आंदोलनात सहभागी होणार आहे या पार्श्वभूमीवर नियोजन समितीने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
0
Report
ABATISH BHOIR
FollowJul 23, 2025 18:01:03Kalyan, Maharashtra:
कल्याण डोंबिवलीत चालले तरी काय? महिलांची सुरक्षा वाऱ्यावर..
कल्याण पूर्व मधील मराठी तरुणीला मारहाण झाल्याची घटना ताजी असतांना डोंबिवलीत नवीनच प्रकार उघडकिस.आला आहे.
डोंबिवलीतील खबळापाडा परिसरात राहणारा 19 वर्षीय अल्पवयीन तरुण एका अल्पवईन मुलीचा करत होता पाठलाग...
डोंबिवली शहरात चार ते पाच महिन्यांपासून अल्पवईन मुलीचा केला पाठलाग...
रिलेशन शिप ठेवल्यासाठी स्वतःची नस कापुन आरोपीकडून केले ब्लॅकमेल..
टिळकनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल...
आरोपीचे नाव स्वामी राठोड
वय - १९...
कॉलेज व इतर ठिकाणी जात असतांना पाठनाग करुन रिलेशनशिप ठेवण्याबाबत वारंवार बोलुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग करुन स्वताची नस कापून घेण्याची धमकी देत असतो म्हणुन पोलिसांनी केला गुन्हा दाखल...
आरोपीला टिळकनगर पोलिसांनी केली अटक.केली असून उद्या दुपारी न्यायालयात करणार हजर
14
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 23, 2025 18:00:05Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur Katke Badnami
File:05
Rep: Hemant Chapude(Shirur)
शिरूर पुणे....
Anc:शिरूर हवेली चे आमदार माऊली कटके आणि त्यांच्या भावाची सोशल मीडिया द्वारे बदनामी करणाऱ्यावरती शिरूर, लोणी काळभोर, उरळीकांचन आणि वाघोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच बदनामी करणाऱ्या वरती मानहानीचा दावाही ठोकणार असल्याची माहिती आमदार कटके यांच्या भावाकडून सांगण्यात येतीय..
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
14
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 23, 2025 16:32:22Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
सांगली ब्रेकिंग
जल जीवन मिशन योजनेतल्या तरुण कंत्राटदाराची आत्महत्या.
वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथे कंत्राटदार हर्षल पाटील ,वय 35 या तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या.
जल जीवन मिशन योजनेचे काम पूर्ण करून देखील एक वर्षापासून कामाचे पैसे मिळत नसल्याच्या कारणातून संपवले जीवन.
1 कोटी 40 लाखांची रक्कम शासनाकडे थकीत असल्याने हर्षल याने उचलले पाऊल.
स्वतःच्या शेतात गळफास घेऊन केली आत्महत्या
हात उसने आणि सावकारांच्याकडून घेतलेले पैसे परतफेड कशी करायची आणि बिल मिळत नसल्याने आश्चर्याने आत्महत्या केल्याचा कंत्राटदार असोसिएशनचा आरोप.
बाईट - मिलिंद भोसले - अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ
14
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 23, 2025 16:04:07Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_RegistryMatter
Feed on - 2C
---------------------------
Anchor - नांदेडमध्ये रजिस्ट्री करण्यासाठी आलेल्या एका हैद्राबादच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार भरदिवसा घडलाय. कुटुंबाची कार फोडत जबरदस्तीने नेऊन रजिस्ट्री करवून घेत असल्याचा प्रकार घडत असताना माजी आमदारांनी धाव घेत रजिस्ट्री रोखली. हैद्राबादच्या एल. बी. नगरमधील रहिवाशी असलेल्या ठाकूर कुटुंबाचे नांदेड शहराजवळील विष्णुपुरी भागात चार प्लॉट आहेत. 2009 साली त्यांनी हे प्लॉट खरेदी केले होते. त्या प्लॉटची रजिस्ट्री करून देण्यासाठी वडील, मुलगा आणि आजी नांदेडमध्ये आले होते. पण ठरलेल्या रकमेच्या 25% रक्कमच दिल्याने कुटुंबाने रजिस्ट्रीसाठी नकार दिला. कुटुंब थार गाडीतून जात असताना त्यांना आय टी आय जवळ त्यांच्या गाडीची काच फोडून त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप या कुटुंबाने केला. जबरदस्तीने रजिस्ट्री कार्यालयात नेऊन रजिस्ट्री करवून घेतली जात होती. मात्र दरम्यान कुटुंबाने हैद्राबाद मधील राजकीय व्यक्तीशी संपर्क केला. त्या राजकीय व्यक्तीने इकडे माजी आमदार ओमाप्रकाश पोकर्णा यांना प्रकार सांगितल्या नंतर तात्काळ त्यांनी रजिस्ट्री कार्यालयात धाव घेऊन रजिस्ट्री थांबवली. त्यानंतर पोकर्णा कुटुंबाला घेऊन शिवाजीनगर ठाण्यात गेले.
Byte - दयानंद ठाकूर - हैद्राबाद येथील रहिवाशी
Byte- आरशरासिंग ठाकूर
Byte - वृद्ध महिला
Byte -
Byte - ओमप्रकाश पोकर्णा - माजी आमदार विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष
-------------------
14
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 23, 2025 16:00:45Nala Sopara, Maharashtra:
date-23july2025
rep-prathamesh tawade
loc-nalasopara
Slug-NALASOPARA STORY
feed send by 2c
type-AVb
नालासोपाऱ्यातील धानीव बाग परिसरात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घरात खणलेल्या खड्ड्यात पुरला होता.... विशेष म्हणजे, मृतदेह पुरल्यानंतर त्यावर टाइल्स लावून तो भाग झाकण्यात आला होता,
या क्रूर घटनेनंतर आरोपी पत्नी चमनदेवी चौहान आणि तिचा प्रियकर सोनू शर्मा घरातून फरार झाले होते. मात्र स्थानिक पोलिसांनी कौशल्य आणि शिताफीने तपास करत या दोघांचा माग काढला आणि त्यांना अटक करण्यात यश मिळवलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या दोघांमध्ये गेल्या काही काळापासून अनैतिक संबंध होते. पती विजय चौहान दोघांच्या नात्यात आड येत असल्याने त्यांनी त्याचा खून करण्याचा कट रचला. हे प्रकरण समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या दोघांना पुण्यातून अटक केली आहे .... आज दोघांना वसई सत्र न्यायालयात हजर केले असता दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.. पोलीस उपयुक्त सुहास बावचे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली..
बाईट- सुहास बावचे,
14
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 23, 2025 15:32:15Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- राधाकृष्ण विखे पाटील
फीड 2C
राधाकृष्ण विखे ऑन रोहित पवार
Anc:- राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कृषी खात्याची जबाबदारी अजित पवारांनी स्वीकारावी असं वक्तव्य पत्रकार परिषदेत केल होत... याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता रोहित पवारांनी त्यांच्या पक्षाची चिंता करावी, इतरांना सल्ला देऊ नये असा टोला लगावला... माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात स्वतः कोकाटे यांनी आपली भूमिका मांडलेली आहे...त्यांच्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील भूमिका मांडली आहे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
बाईट- राधाकृष्ण विखे, जलसंपदा मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील ऑन योगेश कदम
Anc:- डान्सबार प्रकरण आणि योगेश कदम यांच्याबाबत सरकार काहीतरी लपवू पाहतंय अशी विरोधकांकडून तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून टीका होते आहे... सोबतच योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे... याबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊ दिली पाहिजे, कुणालाही दोषी ठरवून थेट राजीनामा मागणं चुकीच आहे... अनिल परब यांनी आरोप केल्यानंतर योगेश कदम यांनी तर थेट हक्कभंग आणण्यासंदर्भामध्ये त्यांचा विचार सुरू आहे असेही विखे म्हणाले.
बाईट:- राधाकृष्ण विखे, जलसंपदा मंत्री
राधाकृष्ण विखे ऑन शनिशिंगणापूर
Anc:- शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या बनावट ऍपबाबत आता काही पुजारी देखील चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे...या संदर्भामध्ये बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले की, शनिदेवाच्या दानपेटीत ज्यांनी ज्यांनी हात घातला आहे त्या सगळ्यांना सरकारमार्फत तर शासन होईलच... मात्र शनिदेवाच्या प्रकोपाला देखील त्यांना सामोरे जावे लागेल असं विखे म्हणाले.
बाईट:- राधाकृष्ण विखे, जलसंपदा मंत्री
14
Report
ABATISH BHOIR
FollowJul 23, 2025 15:17:54Kalyan, Maharashtra:
मराठी माणसाच्या नादी लागल तर मराठी माणूस शांत राहणार नाही मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष देशमुख यांनी दिला इशारा..
मराठी एकीकरण समिती पदाधिकारी कार्यकर्ते मानपाडा पोलीस ठाण्यात पोलिसांची घेतली भेट
मानपाडा पोलीस ठाण्याचे सीनियर संदीपपान शिंदे यांची भेट घेत दिलेली निवेदन
यावेळी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी मराठी माणसाच्या पाठीमागे आम्ही नेहमी उभे राहणार
यापुढे परप्रांती गुन्हेगारांनी माज केला तर पोलिसांनी त्यांची धिंड काढावी
न्यायालय मध्ये गेल्यावर तू लगेच सुटतो अशामध्ये मराठी माणूस सुरक्षित आहे की नाही असे प्रश्न उपस्थित होते आहे
आमचे राज्यकर्ते आहेत आता कुठे आहे
बाहेरून येऊन या ठिकाणी परप्रांती माज करत असतील तर पोलिसांनी त्यांना प्रवृत्तीच्या लोकांचे माहिती पोलिसांनी ठेवावी
यापुढे मराठी एकीकरण समिती देखील गप्प बसणार नाही.. असा इशारा पोलिसांना एकीकरण समितीकडून देण्यात आला आहे.
महाराष्ट्र मध्ये परप्रांतीय लोकांना कायदा सूवेवस्था ची भीती राहिलेली नाहीये. पोलिसांचा काय करतील हे मजुरीमध्ये वागतात यांना भीती राहिलेली नाही.
Byte.. गोवर्धन देशमुख
मराठी एकीकरण समिती अध्यक्ष
14
Report
AKAMAR KANE
FollowJul 23, 2025 14:47:10kolhapur, Maharashtra:
2c ला फोटो आणि व्हिडिओ जोडले आहे
( असाइनमेंट नंबर वर व्हाट्सअप केल आहे.. व्हिडिओ सीसीटीव्ही आणि बाईट ).. खूप प्रयत्न केले. री इन्स्टॉल पण केले तरी 2cला व्हिडिओ आणि बाईट जोडल्या जात नाही )
--------
नागपूर-
नागपूरच्या भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर एका महिलेची हत्या
वाहतुकीच्या रस्त्यावर जवाहर वस्तीगृह समोरील फुटपाथवर ही धक्कादायक घटना घडलीय
.माया पसेरकर असे मयत महिलेचे नाव
हत्या करणारे आरोपी सीसीटीव्ही पळताना दिसत आहे
आरोपीने मयत माया पसेरकर यांचा पाठलाग केला,त्यानंतर संधी मिळताच महिलेवर चाकूने वार हत्या केलीय
त्यानंतर आरोपी हा पळून जात असताना ही सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्या आधारे सीताबर्डी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केलाय.
मयत माया पसेरकर या सिव्हिल लाईन भागात वास्तव्यास होत्या. कौटुंबिक कारणावरून खून झाल्याचा संशय पोलिसांना आहे.त्या अनुषंगाने
पोलिसांनी तपास सुरू केलाय. मयत महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
बाईट:- नित्यानंद झा- पोलिस उपायुक्त.
14
Report