Back
संत नामदेव महाराजांची भव्य पालखी मिरवणूक, भाविकांची धूमधडाक!
SKSudarshan Khillare
FollowJul 24, 2025 01:01:22
Yeola, Maharashtra
अँकर:-
संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्ताने येवला शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज तसेच विठ्ठल-रुक्मिणीचा सजीव देखावा हे प्रमुख आकर्षण ठरले.पालखी मिरवणुकीची सुरुवात संत नामदेव महाराजांच्या मंदिरातून करण्यात आली. टाळ-मृदंग, अभंगवाणी, भजन आणि कीर्तनाच्या सुरांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. पालखी सजवण्यासाठी फुलांच्या आरास, विद्युत रोषणाई करण्यात आली होती. हजारोंच्या संख्येने भाविकांनी सहभाग घेत संत नामदेव महाराजांना अभिवादन केले.
शहरातील विविध भागातून पालखी मार्गक्रमण करत असताना ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, आरती आणि स्वागताची रेलचेल पाहायला मिळाली. पालखी पुन्हा मंदिरात आगमन होऊन दहीहंडी झाल्यानंतर महाआरती व प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowJul 25, 2025 03:32:59Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_police_karvai
( पोलीस कारवाईचे स्टॉक वापरा)
२२ कोटींचे २३ हजार किलो अमलीपदार्थ जप्त
अँकर
अमलीपदार्थ खरेदी-विक्री व तस्करीबाबत नाशिक परिक्षेत्रात 'झिरो टॉलरन्स' नुसार कारवाईचे आदेश उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांना देण्यात आले आहे. जूनअखेरपर्यंत एकूण ५५२ कारवायांमध्ये २२ कोटी ३७ लाख ५७हजार रुपये किमतीचा २३ हजार ७६० किलो इतका विविध प्रकारच्या अमली पदार्थाचा साठा पोलिसांनी जप्त करण्यात यश मिळविले आहे....नाशिक परिक्षेत्रातील नाशिक ग्रामिण, अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार अशा पाचही जिल्ह्यांमध्ये गांजा, एमडी ड्रग्ज, कुत्तागोळी, चरस, आदी अमली पदार्थांची खरेदी-विक्रीवर पूर्णपणे बंदी घालून कठोर कारवाईचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिले आहे. यानुसार नाशिक ग्रामीण धुळ्याचे अधीक्षक, अहिल्यानगरचे अधीक्षक जळगावचे , नंदुरबारचे यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, उपअधीक्षक यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. जानेवारीपासून जून अखेरपर्यंत नाशिक परिक्षेत्रात एकूण ५५२ अमली पदार्थविरोधी कारवायांमध्ये एकूण ४७३ आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती कराळे यांनी दिलीये...
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 25, 2025 03:31:15Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोटकरांसाठी मोठी गुड न्यूज... तालुक्याची वरदायीनी असणाऱ्या कुरनूर धरणाची शंभरीकडे वाटचाल
- अक्कलकोट तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या कुरनूर धरणाची शंभरी कडे वाटचाल..
- तालुक्यात दोन दिवसात दमदार पावसामुळे कुरनूर धरण 95% यांनी भरले
- कुरनूर धरणात 822 दशलक्ष घनफूट पाणी क्षमता असताना सध्या स्थिती 781 दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध..
- अक्कलकोट तालुक्यातील तीन नगरपरिषद आणि 52 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटला..
- बोरी आणि हरणा नदीच्या पाण्याचा विसर्ग कुरनूर धरणात पाणी प्रवाह सुरू
- बोरी पाटबंधारे विभागाकडून नदीकाठच्या ग्रामस्थांना लेखी स्वरूपात सतर्कतेचा इशारा..
0
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 25, 2025 03:31:08Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_Dwarka_trafik
द्वारका परिसरातील वाहतूक कोंडी साठी आता दहा पोलिसांची नियुक्ती
अँकर
नाशिकच्या द्वारका चौकात सातत्याने वाहतुकीचा उडणारा बोजवारा अन् वाहनांची लागणारी रांग त्यामुळे आणखी प्रयोग पोलिस एक नवा आयुक्तालयाकडून करण्यात आलाय... वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त यांच्या आदेशान्वये द्वारका चौकासाठी एका सत्रात एक वाहतूक अधिकारी व दहा अंमलदारांची नियुक्ती करण्यात आलीये...नाशिक शहराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वारका चौकात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी शहर वाहतूक शाखा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका प्रशासन अशा सर्वच यंत्रणांकडून संयुक्तरीत्या त्यांच्या अखत्यारीत असलेल्या वेगवेगळ्या उपाययोजना करण्यावर मागील महिनाभरापासून भर दिला जातोय... द्वारका चौक हा शहराच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा चौक आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी द्वारका चौकासाठी स्वतंत्ररित्या 'द्वारका' हे स्वतंत्र युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. यानुसार उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी काल याबाबतचे आदेश पारित केले आहेत....
0
Report
HPHARSHAD PATIL
FollowJul 25, 2025 03:31:02Palghar, Maharashtra:
पालघर _
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या व्हाईट टॅपिंगचा मुद्दा पालघर जिल्हा नियोजन समितीमध्ये चांगलाच गाजला. या राष्ट्रीय महामार्गावर तलासरी ते दहिसर दरम्यान वीस हजार मध्ये खड्डे असल्याचं आरोप पालघर आमदार राजेंद्र गावित यांनी केला आहे. शिवाय पालकमंत्री गणेश नाईक यांनीही सदर रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचं मान्य केले आहे.मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर जवळपास सहाशे कोटी अधिक खर्च करून काँक्रिटीकरण करण्यात आलं आहेत.
0
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 25, 2025 03:18:01Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_Suicide_attempt
काम द्या म्हणत कामगाराने अंगावर ओतले पेट्रोल
अँकर
नाशिकरोड येथील रेल्वे मालधक्क्यावर काम मिळावे, या मागणीसाठी येथील एका माथाडी कामगाराने नाशिकच्या सातपूरच्या उपायुक्त कार्यालयासमोर काल अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडलीये... संशयित प्रमोद चंद्रकांत सोनकांबळे असे कामगाराचे नाव असून त्याच्याविरुद्ध सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय..काल दुपारच्या सुमारास सोनकांबळे यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिस अंमलदारांनी त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून त्यास ताब्यात घेतले. कामगार उपायुक्त, सहायक कामगार आयुक्त आणि अन्य माथाडी कामगार संघटना काम देत नसल्याचा आरोप सोनकांबळे यांनी केला आहे. ते प्रहार संघटनाप्रणीत माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. मला जर न्याय मिळाला नाही, तर मी पुन्हा आत्मदहन करेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय... या प्रकरणी अधिक तपास सातपूर पोलिसांसह कामगार उपायुक्त कार्यालयाकडून केला जातोय...
बाईट-प्रमोद सोनकांबळे...
5
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 25, 2025 03:17:52Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या रेमंड कंपनीत कामगारांनी सुरू केलेला संप पाचव्या दिवशीही सुरु असून, कामगारांच्या जीवाला धोका असल्याचे मान्यताप्राप्त रेमंड कामगार संघाने म्हटले आहे. कंपनीसोबत संघटनेची चर्चा सुरू होती मात्र, अचानक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण झाली, इतर कामगारांनाही धमकविण्यात आले. त्यामुळे भीतीपोटी कामगार रुजू होत नाही, त्यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी संघटनेने केली आहे. सोबतच संप ज्या मागण्यांसाठी सुरू आहे त्या मागण्या पूर्ण करावयाच्या असतील तर आधी कंपनी सुरू झाली पाहिजे असेही मान्यताप्राप्त संघटनेने म्हटले आहे. कामगारांचे एग्रीमेंट करताना वेतन वाढीची रक्कम 7250 पेक्षा जास्त करावी अशी प्रमुख मागणी कामगारांनी केली आहे.
बाईट : पदाधिकारी
5
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 25, 2025 03:17:38Pandharpur, Maharashtra:
Anchor - श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दि. 01 ऑगस्ट ते 31 डिसेंबर, 2025 मधील पुजांची ऑनलाईन नोंदणी 28 जुलै पासून समितीच्या संकेतस्थळावर सुरू होणार
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, महानैवेद्य सहभाग योजना इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. दि. 01 ऑगस्ट ते 31 डिसेंबर, 2025 या कालावधीतील पुजांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुरवात दि.28 जुलै रोजी स.11.00 पासून होत असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे.
.
आता दि. 01 ऑगस्ट ते 31 डिसेंबर, 2025 या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा व पाद्यपूजा तसेच दि. 01 ते 31 ऑगस्ट, 2025 कालावधीतील तुळशी अर्चन पुजा व महानैवेद्य सहभाग योजना ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑनलाइन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या 02186 -299299 या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा. याशिवाय पूजेचे बुकिंग मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच करावे कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीस संपर्क करू नये असे आवाहन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी सांगितले.
श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे रु.25,000/-, रू.11,000/- तसेच पाद्यपूजेसाठी रू.5,000/- व तुळशी अर्चन पूजेसाठी रू.2100/- तसेच महानैवेद्य सहभाग योजनेसाठी रू.7,000/- इतके देणगी मुल्य आहे.
2
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 25, 2025 03:17:05Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2507ZT_JALNA_ZP(1 FILE)
जालना : जिल्हा परिषदेत थुंकल्यास 5 हजारांचा दंड,नव्या सिईओंनी लागू केली नियमावली
अँकर : जालना जिल्हा परिषदेच्या कार्यालयात गुटखा,पान, तंबाखू खाऊन थुंकल्यास 5 हजारांचा दंड आकारला जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या नवीन सिईओंनी पदभार घेतल्यानं नवीन नियमावली लागू केली जाणार आहे.या दंडाची सर्वच विभागप्रमुखांनी अंमलबजावणी करावी असे आदेश सिईओ पी.एम.मिन्नू यांनी दिलेत.
2
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 25, 2025 03:16:07Bhandara, Maharashtra:
मित्राच्या घरुन परत येताना नाल्याच्या पुरात वाहून तरुणाचा मृत्यू घात कि अपघात पालकांना संशय
Anchor :- मित्राच्या घरून जेवण करून परत येत असताना ४५ वर्षीय इसमाचा नाल्याला आलेल्या पुरात वाहून मृत्यू मुखी पडल्याची घटना गोंदिया जिल्याच्या सालेकसा तालुक्यातील जमाकुडो गावात उघडकीस आली असून यात टीकेस मडावी यांचा समावेश असून हा घात कि अपघात असा संशय व्यक्त केला जात आहे
vo :- सालेकसा तालुक्यातील आदिवासी नेते माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर मडावी यांचे पुत्र टीकेस मडावी हे काल संध्याकाळी कोपाल गड येथील मित्र दिनेश मडावी यांच्या घरी जेवण करण्याकरिता गेला असता रात्र होऊनही टीकेस परत न आल्याने घरच्या लोकांनी त्याच्याशी संपर्क केला मात्र संपर्क न झल्याने शंकर मडावी यांनी टीकेशचा मित्र दिनेश मडावी याला फोन केला असता एका तासा आधीच टीकेश आपल्या स्कुटी वहानाने गावाकडे जायला निघाल्याची माहिती दिनेश यांनी शंकर मडावी याना दिली तर दुसरीकडे आज सकाळी टीकेस याचा मृतदेह कोपालगड नाल्यात आढळून आला मात्र दुचाकी वाहन न मिळाल्याने टीकेस चा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झाला कि त्याच्या सोबत घात झाला असा संशय व्यक्त केला जात असून या संदर्भात शंकर मडावी यांनी सालेकसा पोलिसात तक्रार केली असून पुढील तपास सुरु असून टीकेस च्या सव विच्छेदन अहवाला नंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल
4
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 25, 2025 03:16:00Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात मन सुन्न करणारी घटना.. सोळा वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या
Anc : जुळे सोलापूर येथे एका सोळा वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. आईच्या मृत्यूच्या नैराश्यातून युवकांनी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन मामाच्या घरी आत्महत्या केली. शिवशरण भुताळी तळकोटी असे आत्महत्या केलेल्या अकरावीत शिकणाऱ्या युवकाचे नाव आहे. तीन महिन्यापूर्वी आईचं कावीळ झाल्यामुळे निधन झालं होतं. शिवशरण याला आईच्या मृत्यूमुळे मोठा धक्का बसला होता.. शिवशरण यांनी मरताना आपल्या व्यथा चिठ्ठीच्या माध्यमातून व्यक्त केले आहेत.. सोलापूर शहरातील पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शिवशरण याला दहावी 92 टक्के मिळाले होते. नीटचा अभ्यास करून त्याला डॉक्टर व्हायचे होते. कावीळ आजारामुळे आईचं तीन महिन्यापूर्वी दुःखद निधन झालं. त्यानंतर शिवशरण हा मानसिक त्यांना खाली होता. वडील एका खाजगी संस्थेत कमी मानधनावर काम करत होते त्यामुळे मामा महादेव तोळनुरे यांनी कोंढवा येथून सोलापुरात कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतला होता. मात्र आईच्या जाण्यामुळे मानसिक धक्का बसला होता. मामा आणि आजीकडे बघून शिवशरण यांनी जगण्याचा प्रयत्न केला..
मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिताना शिवशरण म्हणाला, 'मी शिवशरण. मी मरत आहे.. कारण मला जगण्याची इच्छा नाही. माझी आई गेली तेव्हाच जायला पाहिजे होते पण मी मामा व आजीचे तोंड बघून जिवंत होतो. माझ्या मरण्याचे कारण म्हणजे.. आई काल स्वप्नात आली होती. 'तू जास्त तणावात का आहेस ? माझ्याकडे ये..' असे म्हणून तिने मला बोलावले. त्यामुळे मी मरण्याचा विचार केला. मी मामाचे व आजीचे खूप आभार मानतो, कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझे लाड पुरवले. मामा.... मी मरत आहे. मी गेल्यावर माझ्या बहिणीला सुखात ठेव. मी कुठेही नाही जाणार. परत येणार आहे, वाट पाहा. मामा, मला तुला एक सांगायचं आहे. आजीला पप्पाकडे पाठवू नको. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. तू मला आईबाबांपेक्षा जास्त केलंस'
त्याबद्दल धन्यवाद. तुमचा पिंट्या
( माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे)
हसा उल्लेख मरणापूर्वीच्या चिठ्ठीत करण्यात आलाय...
2
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 25, 2025 03:15:50Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 2507ZT_MAVAL_ACCIDENT
Total files : 03
Headline -पवना रस्त्यावर कार झाडावर धडकून भीषण अपघात
Anchor:
पवना धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर कडधे गावच्या हद्दीत रात्रीच्या अंधारात एक कार निलगिरीच्या झाडावर धडकल्याची घटना घडली आहे. कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून, कार चालकाचा पाय मोडला आहे. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ रेस्क्यू टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अपघातग्रस्त चालकाला सुरक्षित बाहेर काढून तात्काळ पवना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं.
1
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 25, 2025 03:15:43Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_combing
दिवसभर कोम्बिंग ऑपरेशन; १६६ गुन्हेगारांची केली धरपकड
अँकर
नाशकात वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस आयुक्ताने एरवी रात्री होणाऱ्या होमविंग ऑपरेशनला पहाटेच्या सुमारास गुन्हेगारांची झाड जगती घेत कोंबिंग ऑपरेशन राबवले.... यात परिमंडळ एक व परिमंडळ दोन च्या हद्दीत अचानकपणे भर दिवसा कोंबिंग ऑपरेशन करून एकूण 166 सराईत गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली.... त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करत कुसुम चौकशी करण्यात आली आहे....शहर व परिसरात वाढत्या जबरी चोरी, वाहनचोरी, हाणामारी, घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याचा धाक वाढीस लागावा या उद्देशाने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सराईत गुन्हेगारांवर भरदिवसा कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले होते.... यानुसार गुन्हे शाखेचे 3 पोलिस उपायुक्त यांच्या नेतृत्वाखाली सर्व सहायक पोलिस आयुक्तांसह १३ पोलिस ठाण्यांचे प्रभारी पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांसह गुन्हे शाखा युनिट-१ व युनिट-२चे पथकांनी या विशेष कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला....
2
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 25, 2025 03:15:10Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 2507ZT_MAVAL_KASARSAI
Total files : 01
Headline -कासारसाई धरण सांडव्यातून विसर्ग सुरू.. पावसाने पुन्हा जोर धरला
Anchor:
मावळ आणि मुळशी तालुक्यांतील पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचे असलेले कासारसाई धरण पुन्हा एकदा भरू लागले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून, काल रात्री कासारसाई धरणाच्या सांडव्यातून ४१४ क्यूसेस पाण्याचा विसर्ग कासारसाई नालापात्रात करण्यात आला. गेल्या आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर मावळ आणि मुळशीत पावसाची संततधार सुरू झाली असून, त्यामुळे धरण परिसरात असलेली पर्यटनस्थळं फुलू लागली आहेत. या पावसामुळे मावळ, मुळशीतील दहा प्रमुख गावांना पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची चिंता मिटली आहे.
0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 25, 2025 03:02:19Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 2507ZT_MAVAL_PAWAR
Total files : 02
Headline -मावळात पोहोचला सातारा जिल्ह्यातील पायी मोर्चातील नागरिकांची आमदार रोहित पवार यांनी घेतली भेट
Anchor:
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कुसगाव येथील ग्रामस्थांनी प्रस्तावित स्टोन क्रशर प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कुसगाव ते मुंबई मंत्रालय असा पायी लॉगं मार्च त्यांनी सुरू केला असून, तीन गावांचे शेतकरी आणि ग्रामस्थ या मोर्चात सहभागी झाले आहेत. हा मोर्चा सध्या मावळ तालुक्यात दाखल झाला आहे. मावळ मध्ये हे मोर्चेकरी रात्री वास्तव्यास होते. यावेळी रात्री उशिरा आमदार रोहित पवार यांनी या मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन याविषयी लवकरच राज्य सरकार बरोबर बोलून न्याय देण्याचे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी मोर्चेकऱ्यांना दिले.
1
Report
HPHARSHAD PATIL
FollowJul 25, 2025 03:02:10Palghar, Maharashtra:
पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभाग व सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या बालचिकित्सा विभागाच्या संयुक्त विद्यमाने लहान 10 बालकांवर मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पुढे जिल्ह्यातील लहान बालकांना असलेल्या गंभीर आजारावर टप्प्याटप्प्याने अश्या मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. त्यामुळे अनेक पीडित नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
1
Report