Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
शिरूर आमदार कटकेच्या भावाची बदनामी: पोलीस तक्रार दाखल!
HCHEMANT CHAPUDE
Jul 23, 2025 18:00:05
Shirur, Maharashtra
Feed 2C Slug: Shirur Katke Badnami File:05 Rep: Hemant Chapude(Shirur) शिरूर पुणे.... Anc:शिरूर हवेली चे आमदार माऊली कटके आणि त्यांच्या भावाची सोशल मीडिया द्वारे बदनामी करणाऱ्यावरती शिरूर, लोणी काळभोर, उरळीकांचन आणि वाघोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच बदनामी करणाऱ्या वरती मानहानीचा दावाही ठोकणार असल्याची माहिती आमदार कटके यांच्या भावाकडून सांगण्यात येतीय.. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Jul 24, 2025 17:30:45
Niphad, Maharashtra:
अँकर :- नाशिकच्या निफाड तालुक्यातील पूर्व भागातील देवगाव येथील योगेश राजेंद्र खुळे या तरुण शेतकऱ्याने शेतात पाणी साचल्याने आणलेले सोयाबीनचे बियाणे पेरता आले नाही, त्यामुळे पडून असलेले सोयाबीनचे बियाणे विक्री करून थेट राज्याचे कृषिमंत्री ना.माणिकराव कोकाटे यांनाच वेगळ्या पद्धतीने साकडे घातलं आहे. आपले ५५५० रुपये मनीऑर्डरने कृषिमंत्री कार्यालय, मुंबई येथे पाठवून, ‘‘हे पैसे वापरून माझ्यासाठी एक रमीचा डाव खेळा आणि काहीतरी जिंकून पाठवा,’’ अशी विनंती करतो. बाईट :- योगेश खुळे (तरुण शेतकरी)
14
Report
JJJAYESH JAGAD
Jul 24, 2025 16:47:24
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यात हवामान विभागाने 2 दिवसांचा पावसाचा अंदाज वर्तवला होता, आणि त्यानुसार काल काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली..तर आज अकोला शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहेय..या पावसामुळे वातावरणात गारवा वाढला असून नागरिकांमध्ये आनंदाचा वातावरण आहेय.. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा मानला जात असल्याने, त्यांना त्यांच्या पिकांच्या वाढीसाठी सहाय्यभूत ठरू शकतो.
14
Report
KJKunal Jamdade
Jul 24, 2025 16:30:32
Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash *अहिल्यानगरच्या पुणतांबा गावात पुन्हा उभे राहाणार शेतकरी संपाचे आंदोलन?...* *कर्जमाफीसाठी पुन्हा संपाचे शस्त्र उभारण्याचा विचार सुरू...* *पुणतांबा येथील शेतकऱ्यांशी बैठकीनंतर बच्चू कडू यांचे वक्तव्य...* संताजी धनाजी जसे बिगर नेत्याचे लढले तसे पुणतांबा गावाने पुन्हा लढावं... पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, मी दिवसरात्र सोबत असेल... *पुन्हा शेतकरी संपासाठी बच्चू कडू यांची पुणतांबेकरांना साद...* कडू यांच्या आवाहनाला पुणतांबेकरांचा सकारात्मक प्रतिसाद... लवकरच पुन्हा पुणतांब्यात बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार... *सरसकट कर्जमाफीसाठी पुन्हा शेतकरी संपाचे हत्यार उपसण्याचे कडू यांचे संकेत...* बच्चू कडू बाईट पॉईंटर - शेतकऱ्यांनी बिगर नेत्यांचं आंदोलन सुरू करावं... संताजी धनाजी जसे बिगर नेत्याचे लढले तसे पुणतांबा गावाने पुन्हा लढावं... *बच्चू कडू एक कार्यकर्ता म्हणून दिवस-रात्र तुमच्या सोबत राहील...* *पुणतांब्यात पुन्हा बैठक घेऊ आणि नंतर पुढील दिशा ठरवू....* *ऑन कृषीमंत्री कोकाटे -* कोकाटेंनी शेतकऱ्यांना आणि शासनाला भिकारी म्हटलं... तेंडुलकरची जाहिरात पाहून त्यांच्यावर प्रभाव पडला... सभागृहात रमी खेळणं दुर्दैवी... कोकाटेंनी नैतिकता स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे... शेतकरी संपाचा निर्णय पुणतांबा गाव घेणार बच्चू कडू त्याला साथ देणार.... कोकाटे आमच्यासाठी मोठा विषय नाही, शेतकरी महत्वाचे... *कोकाटे गेल्यानंतर दुसरा कोकाटे कसा येतो? आम्हाला माहित नाही...* *तारीख न देता आम्ही मंत्रालयात घुसणार.....* आमचं भांडण सत्तेसाठी नाही, पैशासाठी आहे... पैसा गरीबाच्या घरी गेला पाहिजे... *ऑन रमी गेम टॅक्स -* *रमीच्या पैशातून सरकारला 9 हजार कोटींचा टॅक्स मिळतो...* हजारो युवकांची आत्महत्या करून सरकारला पैसा मिळाला...* गावात रमी पत्ता खेळला तर गुन्हा दाखल होतो मात्र मोबाईलवर खेळल्यावर गुन्हा दाखल होत नाही... हा कोणता कायदा?... रमीच्या पैशातून नाही, तर इमानदारीच्या पैशातून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी... कुणाला मारून आम्ही जगावं या वृत्तीचा शेतकरी नाही... कोकाटे सारखे अनेक आहे जे लपून रमी खेळतात... Byte - बच्चू कडू, अध्यक्ष प्रहार Byte - सुहास वहाडने, पुणतांबा येथील शेतकरी तथा 2017 सालच्या शेतकरी संपातील आंदोलक Byte - बाळासाहेब चव्हाण, पुणतांबा येथील शेतकरी तथा 2017 सालच्या शेतकरी संपातील आंदोलक
14
Report
AAASHISH AMBADE
Jul 24, 2025 16:15:28
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2407ZT_CHP_TRAINING ( single file sent on 2C) टायटल:-- चंद्रपूर वन अकॅडमीच्या पुढाकारातून व्याघ्र प्रकल्प आणि संरक्षित जंगल परिसरातील आदिवासी व ग्रामीण युवक युवतींना देण्यात येत आहे आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्रातील कौशल्य विकास प्रशिक्षण, देशाच्या उत्तमोत्तम हॉटेलमध्ये मिळत आहे नोकरी अँकर:--- चंद्रपूर जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्प व संरक्षित जंगल परिसरातील आदिवासी आणि ग्रामीण बेरोजगार तरुणांसाठी चंद्रपूर वन अकॅडमीने आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्रातील कौशल्य विकासाचे प्रशिक्षण सुरू केले आहे. ही अभिनव योजना पंतप्रधानांच्या ‘स्किल इंडिया मिशन’शी सुसंगत असून, ‘प्रथम’ या  प्रशिक्षण संस्थेसोबत यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. ६० दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात प्रशिक्षण, निवास, भोजन आदी संपूर्ण व्यवस्था अकॅडमीकडून मोफत करण्यात येते. शिवाय नोकरीची हमी देखील दिली जाते. यामध्ये हाऊसकीपिंग व फूड अँड बेव्हरेज सर्व्हिसेससारख्या कोर्सेसचा समावेश आहे. आगामी तीन वर्षांत चारचाकी वाहन दुरुस्ती, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, हॉस्पिटॅलिटी असिस्टंट, मल्टीफंक्शन ऑफिस असिस्टंट आणि ब्युटिशियन या कोर्सेसही सुरु होणार आहेत. आतापर्यंत हाऊसकीपिंगमध्ये ११० आणि फूड अँड बेव्हरेजमध्ये ९९ तरुणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. त्यापैकी अनेकांना थ्री, फोर, फाईव्ह स्टार हॉटेल्स व रिझॉर्टसारख्या नामांकित ठिकाणी (लोणावळा – ३३, गोवा – २०, पुणे – ७, मुंबई – १, हैदराबाद – ८, नागपूर – ७२, ताडोबा – ६०, उदयपूर – ७) नोकरी मिळाली आहे. वनसंवर्धनाबरोबरच स्थानिक तरुणांसाठी पर्यायी उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणारा हा प्रयोग मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यात उपकारक ठरला आहे.  नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने अनेक आदिवासी आणि ग्रामीण युवक-युवतींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येत आहे. बाईट १)  एस के गवळी, विभागप्रमुख, कौशल्य विकास प्रशिक्षण, वन अकॅडमी चंद्रपूर. बाईट २), ३) प्रशिक्षणार्थी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
14
Report
SKSudarshan Khillare
Jul 24, 2025 15:00:42
Yeola, Maharashtra:
अँकर- शेतकऱ्यांना कर्जमाफी,शेतमालाला हमीभाव ,दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन, या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची घोषणा केल्यानंतर राज्यात ठीक ठिकाणी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर नाशिकच्या चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले सुमारे एक तास हे चक्काजाम आंदोलन सुरू होते या आंदोलनामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.तर यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पत्ते खेळत कृषी मंत्र्यांचा निषेध केला तर आंदोलन संपल्यानंतर आंदोलनात सहभागी झालेल्या प्रहार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बाईट-गणेश निंबाळकर-जिल्हा अध्यक्ष प्रहार संघटना
14
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 24, 2025 15:00:28
Ambernath, Maharashtra:
गोवंशाची बेकायदेशीर कत्तल आणि विक्री; आरोपींवर थेट मोक्का कारवाई  राज्यात पहिल्यांदाच अशा गुन्हेगारी टोळीवर मोक्का  Bdl mococa       Anchor - बदलापुरातील  गोवंश जनावरांच्या बेकायदेशीर कत्तल आणि मांस विक्री प्रकरणातल्या आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलीय. राज्यात पहिल्यांदाच अशी कारवाई करण्यात आली असून या कारवाईमुळे अशा बेकायदेशीर धंद्यात गुंतलेल्या टोळ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.         बदलापुरात गोवंशाची कत्तल करून मांस विक्री करण्याचं प्रकरण समोर आल्यानंतर अंबरनाथ विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि टोळीचा म्होरक्या कैश मन्सूर शेख असून त्याचे साथीदार कैफ मन्सूर शेख आणि सैफ मन्सूर शेख या तिन्ही आरोपींवर मोक्का कारवाई करण्यात आलीय. तर या प्रकरणातील इतर आरोपींचा देखील शोध सुरू असल्याची माहिती पोलिस उपयुक्त सचिन गोरे यांनी दिलीय. Byte : सचिन गोरे, पोलीस उपायुक्त चंद्रशेखर भुयार , बदलापूर
14
Report
KJKunal Jamdade
Jul 24, 2025 14:34:52
Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash Big Breaking *बच्चू कडू अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल...* कडू यांचे राहाता तालुक्यातील पुणतांबा गावात आगमन... *शेतकरी संपाचे गाव म्हणून पुणतांबा गावाची ओळख...* *2017 साली कर्जमाफीसाठी पुणतांबा गावात झाला होता ऐतिहासिक शेतकरी संप...* शेतकरी संपानंतर फडणवीस सरकारने केली होती दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी... *बच्चू कडू साधताय पुणतांबा येथील तत्कालीन आंदोलक आणि शेतकऱ्यांशी संवाद...* कडू यांची शेतकऱ्यांसोबत बैठक सुरू... सरसकट कर्जमाफीसाठी पुणतांबा गावातून पुन्हा मोठे आंदोलन उभे राहणार का...? याकडे लक्ष...
14
Report
JMJAVED MULANI
Jul 24, 2025 14:34:27
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 2407ZT_DAUNDADVOKET BYTE 1 दौंड मधील गोळीबार प्रकरणातील आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी.... चौथा फरार असलेला आरोपी यवत पोलिसात हजर झाल्याची आरोपींच्या वकिलांची माहिती..... Anchor _दौंड तालुक्यातील न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणातील भोर मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ बाळासाहेब हिरामण मांडेकर, गणपत बाजीराव जगताप आणि रघुनाथ शंकर आव्हाड या तिघांना आज दौंड न्यायालयात हजर करण्यात आलं असता या तीनही आरोपींना सोमवार पर्यंत म्हणजे 28 जुलै पर्यंत चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. तर चौथा फरार असलेला आरोपी चंद्रकांत मारणे हा देखील यवत पोलिसात स्वतःहून हजर झाला असल्याची माहिती आरोपींचे वकील प्रशांत गिरमकर यांनी प्रसार माध्यमांना दिले आहे. बाईट _प्रशांत गिरमकर आरोपींचे वकील
14
Report
AAASHISH AMBADE
Jul 24, 2025 14:22:06
Chandrapur, Maharashtra:
​Feed slug :--- 2407ZT_GAD_RAIN_ALERT_1_2 ( 2 file sent on 2C)  टायटल:-- गडचिरोलीत मुसळधार पाऊस, ३ मार्ग बंद, आलापल्लीच्या ६४ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले, गडचिरोली जिल्ह्यासाठी २५ जुलै या दिवशी रेड अलर्ट जारी      अँकर:--  गडचिरोली जिल्ह्यासाठी २५ जुलै या दिवशी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि अत्याधिक मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यातील १५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुलचेरा तालुक्यात सर्वाधिक २४०.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल अहेरी तालुक्यात १२७.१ मिलिमीटर पाऊस पडला. हवामान विभागाने वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, इंद्रावती आणि गोदावरी नद्यांच्या उपखोऱ्यांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे, ज्यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोलीतर्फे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अहेरीनजीकच्या आलापल्ली येथील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने ६४ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. कढोलीनजीकच्या सती नदीला पूर आल्याने कुरखेडा-वैरागड मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. नाल्याच्या पुरामुळे तळेगाव-पलसगड मार्ग बंद आहे, तसेच गडचिरोली तालुक्यातील कुंभी-माडेमूल या मार्गावरील वाहतूकही प्रभावीत झाली आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली  
14
Report
JJJAYESH JAGAD
Jul 24, 2025 14:19:44
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर मार्गावर भीषण अपघात घडला..भरधाव चारचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. ही घटना वरखेड फाट्यानजीक घडली असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यादरम्यान, अपघातानंतर संतप्त जमावाने चारचाकी वाहनाची जोरदार तोडफोड केली. काही वेळातच दोन गट आमनेसामने उभे ठाकले आणि परिस्थिती अधिकच चिघळली. पत्रकारांवरही जमावाने धाव घेतल्याने अनेक पत्रकारांना जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळावे लागले. या घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून, पोलीस परिस्थिती आटोक्यात आणली.. अपघातात कारणीभूत ठरलेली चारचाकी एम.आर. असलेल्या एका युवकाची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत..
14
Report
SKShubham Koli
Jul 24, 2025 14:04:05
Thane, Maharashtra:
अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणीपुरवठा तात्काळ खंडीत करा महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मौजे शिळ येथील अनधिकृत बांधकामाच्या पाणी पुरवठ्याबाबत मा. उच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान अनधिकृत बांधकामांना होत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने तपास करण्याचे आदेश मा. उच्च न्यायालयाने ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले आहेत.. मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने पुर्तता होण्याच्या दृष्टीकोनातून आज (गुरुवार दिनांक 24/7/2025) पाणी पुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक आयुक्त दालनात आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा दिला असल्यास त्याची कागदपत्रे तपासण्यात यावी व बांधकाम अवैध असल्यास नळसंयोजन तात्काळ खंडीत करण्यात यावे, त्याचप्रमाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरुन अवैधरित्या नळसंयोजन घेतले असल्यास ते तात्काळ खंडीत करावे. तसेच यापुढे पाणीसंयोजन देत असताना महापालिकेच्या बांधकाम परवानगी शिवाय कोणत्याही अनधिकृत बांधकाम नळ संयोजन दिले जाणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी व यापूर्वी जी नळसंयोजने दिली आहे ती तात्काळ खंडीत करण्यात करण्याचे आदेशही आयुक्तांनी संबंधितांना या बैठकीत दिले..अनधिकृत बांधकामांना नळसंयोजने देताना कागदपत्रे न तपासता नळसंयोजने ‍दिली असतील तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही आयुक्त सौरभ राव यांनी दिले. ठाणे महापालिकेच्या 9 प्रभागसमिती कार्यक्षेत्रातील अनधिकृत इमारतींना परवानगीसह व परवानगी शिवाय देण्यात आलेल्या नळसंयोजनाची यादी तयार करुन त्यानुसार देण्यात आलेली सर्व नळसंयोजने तोडून टाकण्यात यावी तसेच अनधिकृतपणे तयार केलेल्या बोअरवेलवरही कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले.
14
Report
ABATISH BHOIR
Jul 24, 2025 13:51:46
Kalyan, Maharashtra:
न्यूज फ्लॅश.. केडीएमसी मध्ये एकाच दिवशी तीन अधिकाऱ्यांना ठाणे लाचलुचपत विभागाकडून रंगेहात अटक.. केडीएमसीचे तीन अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक ​ठाणे लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई. पालिकेचे ​घनकचरा विभागाचे अधिकारी वसंत देवळूरकर, सुदर्शन जाधव अटकेत. ​आजारी कर्मचाऱ्याला कामावर रुजू करण्यासाठी 25 हजार रुपयेची केली होती मागणी 20 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाची घेतले ताब्यात. तसेच केडीएमसी च्या सहाय्यक अभियंता रवींद्र आहिरे याला बांधकाम परवानगी देण्यासाठी बांधकाम व्यावसायिक कढून 40 हजार रुपये लाज घेताना रंगेहात अटक आता पर्यत केडीएमसी मधील अधिकारी व कर्मचारी 47 लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.
14
Report
SMSATISH MOHITE
Jul 24, 2025 13:51:36
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_Arrest Feed on - 2C -------------------------- Anchor - नांदेड शहरातील बस स्थानकातील शौच्छालय चालकाला मराठीच्या मुद्दयावरुन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चोप दिला होता. या प्रकरणी उत्तरभारतीय शौच्छालय चालक अमरेश झा याच्या तक्रारी वरुन वजीराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केलाय. आज मनसेच्या पाच कार्यकर्त्यांना पोलीसांनी अटक देखील केली. लघुशंखेसाठी महिलांकडून हा शौच्छालय चालक पाच रुपये आकारत होता. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर मनसेच्या विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष शुभम पाटील याच्यासह कार्यकर्त्यांनी त्याला मारहान केली होती. शौच्छालय चालक अमरेश झा याच्या तक्रारीवरून वजिराबाद पोलीसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दखल करून पाच कार्यकर्त्यांना अटक केली. Byte - परमेश्वर कदम - पोलीस निरीक्षक --------------------
14
Report
SMSarfaraj Musa
Jul 24, 2025 13:45:32
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - मंत्री आणि प्रशासनाचा दावा खोटा कंत्राटदार महासंघाचा आरोप, योजनेच्या भूमिपूजन आणि उद्घाटन फलकावर ठेकेदार म्हणून हर्षल पाटीलचं नाव ... अँकर - सांगलीच्या तांदूळवाडीच्या हर्षल पाटील आत्महत्येवरून राज्याचे मंत्र्यांपासून सांगलीच्या जिल्हा परिषद प्रशासनाकडून हर्षल पाटील हा कंत्राटदार नसल्याचं सांगण्यात येतंय,मात्र सरकारी दाव्यांवर कंत्राटदार असोशियनकडून आक्षेप घेण्यात आलाय इतकच,नव्हे तर तांदूळवाडी गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गतमी काम झाले त्या कामाच्या भूमिपूजन समारंभाच्या नाम फलकावर हर्षल पाटील आणि त्याचा भाऊ अक्षय पाटील या दोघांचं ठेकेदार म्हणून उल्लेख असल्याची बाब समोर आली आहे. मात्र सदरचं काम अधिकृतपणे ठेकेदार म्हणून चंद्रकांत पाटील यांनी घेतलं होतं आणि हर्षल पाटील आणि त्याचा भाऊ अक्षय पाटील यांना सबलेट म्हणून दिले होते. 3 मे 2022 रोजी कामाचे भूमिपूजन झाले आणि ऑगस्ट 2022 मध्ये, म्हणजे अवघ्या चार महिन्यात कामाचं उद्घाटन देखील झालं. या दोन्ही कामाच्या फलकांवर हर्षल पाटील आणि त्याचा भाऊ अक्षय पाटील यांचे नाव ठेकेदार म्हणून असल्याचं पाहायला मिळतंय. त्याशिवाय कंत्राटदार महासंघाकडून एक पत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे,ज्यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्याकडून घेण्यात आलेली तांदूळवाडी आणि मालेवाडी या दोन्ही गावांच्या जलजीवन मिशनची कामे शंभर टक्के पूर्ण झाली असून त्यापैकी अनुक्रमे 64 आणि 62 लाखांची रक्कम देयक रक्कम प्रलंबीत असल्याचं नमूद करण्यात आले आहे.त्यामुळे मंत्री आणि प्रशासन हे खोटे बोलतात का ? शिवाय कामाच्या मूळ ठेकेदार असणारया चंद्रकांत पाटील याच्या कडून हर्षल पाटलाला कामाचे पैसे देण्यात आले नाहीत का ? असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.
14
Report
AAASHISH AMBADE
Jul 24, 2025 13:37:01
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2407ZT_CHP_RED_ALERT ( single file sent on 2C)  टायटल:-- 25-26 जुलै दरम्यान विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज, उद्या  चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट, गेल्या 24 तासात 52 मिमी सरासरी पाऊस तर आतापर्यंत पावसाची वार्षिक टक्केवारी पोचली 45 वर अँकर:-- बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात (प्रामुख्याने पूर्व विदर्भात) 25-26 जुलै दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी दिलेल्या सूचनेनुसार शुक्रवार,  दिनांक 25 जुलै 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याकरिता रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. पूर्व आणि उत्तर विदर्भात सर्वात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 52 मिमी सरासरी पाऊस पडला आहे  तर आतापर्यंत पावसाची वार्षिक टक्केवारी 45 वर पोचली आहे. 4 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. सध्याच्या अंदाजानुसार 26 तारखेला पावसाचे प्रमाण सर्वात अधिक असण्याची शक्यता आहे.  25-26 जुलै दरम्यान पूर्व विदर्भात धरण साठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सखोल भागांमध्ये पुराची स्थिती निर्माण होऊ शकते. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
14
Report
Advertisement
Back to top