Back
येवला शहरात संत सावता माळींची भव्य रथ मिरवणूक, अनुभव घ्या!
SKSudarshan Khillare
FollowJul 24, 2025 01:01:13
Yeola, Maharashtra
अँकर+
संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त येवला शहरातून भव्य अशी रथाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. मोट ओढतानाचा अप्रतिम देखावा यावेळी मिरवणुकीत सादर करण्यात आला.संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येवल्यातील दत्तवाडी येथे अखंड त्रिदिनी हरिनाम सप्ताहाचे आयोजन देखील करण्यात आले होते. आज सोहळ्याची सांगता होऊन सावता माळी पुण्यतिथी निमित्त शहरातील मुख्य रस्त्यावरून रथ मिरवणूक काढण्यात आली. मोठ्या संख्येने समाज बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 25, 2025 03:02:19Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 2507ZT_MAVAL_PAWAR
Total files : 02
Headline -मावळात पोहोचला सातारा जिल्ह्यातील पायी मोर्चातील नागरिकांची आमदार रोहित पवार यांनी घेतली भेट
Anchor:
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कुसगाव येथील ग्रामस्थांनी प्रस्तावित स्टोन क्रशर प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कुसगाव ते मुंबई मंत्रालय असा पायी लॉगं मार्च त्यांनी सुरू केला असून, तीन गावांचे शेतकरी आणि ग्रामस्थ या मोर्चात सहभागी झाले आहेत. हा मोर्चा सध्या मावळ तालुक्यात दाखल झाला आहे. मावळ मध्ये हे मोर्चेकरी रात्री वास्तव्यास होते. यावेळी रात्री उशिरा आमदार रोहित पवार यांनी या मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन याविषयी लवकरच राज्य सरकार बरोबर बोलून न्याय देण्याचे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी मोर्चेकऱ्यांना दिले.
0
Report
HPHARSHAD PATIL
FollowJul 25, 2025 03:02:10Palghar, Maharashtra:
पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभाग व सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या बालचिकित्सा विभागाच्या संयुक्त विद्यमाने लहान 10 बालकांवर मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पुढे जिल्ह्यातील लहान बालकांना असलेल्या गंभीर आजारावर टप्प्याटप्प्याने अश्या मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. त्यामुळे अनेक पीडित नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 25, 2025 03:01:59Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2507_BHA_NCP_ANDOLAN
FILE - 3 VIDEO
राष्ट्रवादी शरद पवार गटाचा अनोखा आंदोलन.... मुख्याधिकाऱ्यांना गढूळ पाणी दिले भेट
Anchor :- भंडारा नगरपालिकेमध्ये प्रशासक राज असल्यामुळे शहरातील अनेक प्रभागांतील समस्या रेंगाळत आहेत. रस्ते, नाल्या, स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा यासह अनेक प्रश्नांवर आक्रमक होत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगर पदाधिकाऱ्यांनी पालिकेत धडक दिली, मुख्याधिकाऱ्यांना समस्यांचा जाब विचारला. एवढेच नाही तर, गढूळ
पाण्याच्या बाटल्याही त्यांना भेट दिल्या आहेत.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 25, 2025 03:01:44Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - श्रावण मासानिमित्त अक्कलकोट मध्ये स्वामी भक्तांसाठी धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी
- श्रावण मासानिमित्त वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- 25 जुलै ते 23 ऑगस्ट पर्यंत भक्तांना विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
- प्रत्येक श्रावण सोमवारी नित्यनिमित्त नियमाने होणारी नैवैद्य आरती सकाळी 11.30 ऐवजी सायंकाळी 5.30 वाजता होणार
- राज्यभरातील नामांकित कीर्तनकारांचे श्रावण मासानिमित्त किर्तनाचे आयोजन
- सर्व स्वामी भक्तांनी धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे मंदिरसमितीचे आवाहन
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 25, 2025 03:01:27Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn bhadra maruti av
Feed attached
यंदा श्रावणाच्या दुसऱ्याच दिवशी शनिवार येत असल्याने आज रात्रीच भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी जाणारे भाविक पायी निघणार आहेत. हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना पहाटे ४ वाजता अभिषेकाचा साक्षीदार होता येणार आहे. मोठी गर्दी होईल त्यामुळं यंदा प्रथमच भद्रा मारुतीच्या भक्तांना गाभाऱ्यात बसून अभिषेक करता येणार नसल्याची माहिती भद्रा मारुती संस्थानने दिलीय.. यासोबतच यंदा पहिल्यांदाच भाविकांना शनिवार ते सोमवार घृष्णेश्वराचाही अभिषेक करता येणार नाही. श्रावण महिन्यात या दोन्ही धार्मिक स्थळी मोठी गर्दी असते त्यामुळे अभिषेक टाळून वेळ वाचवणं शक्य असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे..
0
Report
ABATISH BHOIR
FollowJul 25, 2025 03:01:20Kalyan, Maharashtra:
वयोवृद्धाला वाचवताना बस चालक आणि बाईकस्वारात भरचौकात मारहाण.
Anc... डोंबिवली पूर्व येथील इंदिरा चौकात काल रात्री घटना घडली. वयोवृद्ध व्यक्तीला वाचवताना बस चालकाने रस्तामध्ये बस थांबवली या कारणावरून मोटरसायकल आणि बस चालकामध्ये तुफान वाद झाला. एवढंच नाही तर भर रस्त्यात कॉलर पकडून शिवीगाळ, दगड फिरकावलं आणि हल्ल्यापर्यंत हा वाद पोहोचला. या घटनेमुळे अर्धा तास ट्राफिक जाम झाली होती.
Vio :- डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशनजवळील इंदिरा चौक परिसरात काल रात्री च्या सुमारास कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवासी बस चालवत असलेल्या गणेश पोटे नावाच्या चालका समोर अचानक एक वयोवृद्ध व्यक्ती समोर आल्याने त्याने रस्त्यात बस थांबवली रस्त्यात बस का थांबवली या रागातून मोटरसायकल चालकालाने वाद झाला, मागून आलेल्या मोटरसायकल चालकाने रागाच्या भरात खाली उतरलेल्या बस चालकाची कॉलर पकडत शिवीगाळ करत गोंधळ सुरू केला. अचानक उफाळून आलेल्या वादामुळे परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. आणि शिवीगाळीवरून संतप्त झालेल्या बस चालकाने थेट दगड उचलून मोटरसायकल चालकावर मारला ज्यामुळे मोटर सायकल चालक जखमी झाला.घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला व या नंतर बस चालक आणि मोटरसायकल चालक या दोघांच्या तक्रारीनंतर दोघांविरोधात परस्पर गुन्हे दाखल करत या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे
Byte.. गणेश पोटे
बस चालक
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 25, 2025 03:00:58Ambegaon, Maharashtra:
Feed 2C
Slug: Ambegaon Three Leopard
File:02
Rep: Hemant Chapude(Ambegaon)
ब्रेकींग न्युज
आंबेगाव पुणे...
आंबेगाव तालुक्याच्या वडगाव काशिंबे परिसरात बिबट्याची दहशत.... एक साथ तीन बिबटे सीसीटीव्ही कॅमेरा चित्रित.... शेतकऱ्याच्या घरासमोरून बिबट्यांचा शेतकऱ्यांच्या गोठ्यातील कालवडी वरती हल्ला.... सुदैवाने गोठ्यात झोपलेल्या शेतकऱ्याला जागा आल्याने शेतकऱ्याने काठी वाजवल्याने बिबट्याने ठोकली धूम.... एक साथ तीन बिबट्या टोळक्याने फिरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण....बिबट्यांचा सर्व थरार CCTV कँमेय्रात चित्रीत...या बिबट्यांना जेरबंद करण्याच मोठ आव्हान वनविभागा पुढे असणार....
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया आंबेगाव पुणे...
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 25, 2025 02:49:05Yavatmal, Maharashtra:
Anchor : राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे नावं ठळक अक्षरात लिहिलेल्या ट्रकमधून दारूची हेराफेरी केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळच्या पुसद पोलिसांनी उघडकीस आणला आहे. हडपसर येथून नागपुरकडे निघालेल्या या ट्रकवर राज्यमंत्री मेघनादिदी साकोरे (बोर्डिकर) असे ठळक अक्षरात लिहून आहे. हा ट्रक थेट जाण्याऐवजी पुसद मध्ये थांबला होता. ज्यातून विदेशी कंपनीच्या दारूचे बॉक्स उतरविताना पोलिसांना दिसले आणि अवैधपणे होणाऱ्या या दारूच्या हेराफेरीचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी 40 लाख 23 हजार रुपयांची दारू, ट्रक, सात मोबाईल, तीन दुचाकी असा एकूण 64 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी पकडलेला ट्रक हा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या चुलतभावाच्या मालकीचा असल्याचे समोर आले आहे.
5
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 25, 2025 02:48:33Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2507_BHA_OBC_HOSTEL
FILE - 7 VIDEO
महाराष्ट्रातील ओबीसी मुलींचे वसतिगृह असुरक्षित...नागपूर येथील ओबीसी मुलींच्या वस्तीगृहात सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण ऐरणीवर तर भंडाऱ्यात ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने महिला वसतिगृहाची पाहणी
Anchor ;- महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील मुलींच्या वस्तीगृहात बाहेरील दोन व्यक्ती शिरून विनयभंग केल्याची घटना समोर आली होती. राज्यातील महायुतीचे सरकार राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या गृह जिल्ह्यात ही घटना घडलेली आहे. आमच्या डीएनए ओबीसीचा आहे ओबीसीसाठी आम्ही काहीही स्मार्ट सिटी करू शकतो असे सरकार म्हणत असून ओबीसींच्या मुलींच्या वस्तीगृहात सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावू शकत नाही.गेटला लॉक लावू शकत नाही तर गेटवर चौकीदार ठेवू शकत नाही.अश्या नागपूर सारख्या शहरात जर अशी सुरक्षेची व्यवस्था असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात वस्तीगृहांची काय स्थिती असेल हे विचार न केलेले बरे..याच पार्श्वभूमीवर भंडाऱ्यातील महिला वस्तीगृहाला ओबीसी क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी यांनी भेट देत पाहणी केली असून काही त्रुटी दिसून आले आहे. ह्या समस्या सरकार तात्काळ सोडवावे अशी मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येशील असा इशारा सुद्धा देण्यात आलं आहे.
BYTE ;- संजय मते , ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष
BYTE ;- महिला
5
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 25, 2025 02:48:19Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 2507ZT_MAVAL_LON_RAIN
Total files : 02
Headline -लोणावळ्यात मागील २४ तासांत १२० मिमी पावसाची नोंद; पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट
-पावसाचा जोर वाढला! यंदा लोणावळ्यात पावसाचे प्रमाण अधिक
Anchor:
लोणावळा शहरात गेल्या २४ तासांत १२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून, आज दिवसभरही पावसाचा तेवढ्याच तीव्रतेने सुरू राहण्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी आतापर्यंत लोणावळ्यात एकूण ३३०८ मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली असून, गेल्या वर्षी याच दिवशीपर्यंत ही आकडेवारी फक्त २९७१ मिमी इतकी होती. म्हणजेच यंदा पावसाळा लवकर सुरू झाला असून प्रमाणही अधिक आहे. मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. मात्र, श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे.
4
Report
AKAMAR KANE
FollowJul 25, 2025 02:47:56kolhapur, Maharashtra:
नागपूर
बुद्धिबळ वर्ल्ड कप भारताकडेच राहणार असल्याचे निश्चित झाले आहे..
महिलांच्या बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामना कोनेरू हम्पी विरुद्ध दिव्या देशमुख असा दोन भारतीय बुद्धिबळपटूंमध्येच राहणार आहे.. जॉर्जीया येथील या स्पर्धेच्या उपांत्य फेरी टप्पा पूर्ण झाला असून तो भारतात विरुद्ध चीन असा होता.. त्यामध्ये भारताने सरशी साधली
8
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 25, 2025 02:46:44Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_SAJJANGAD
सातारा - सज्जनगड पायरी मार्गावरील गायमुख मंदिरासमोरील मारुती मंदिरालगतचा भराव पावसामुळे ढासळला असून मंदिराला आणि पायरी मार्गाला धोका निर्माण झाला आहे. या भागात अजूनही खचण्याची शक्यता आहे. दरवर्षी गडावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावर दरडी कोसळणे आणि माती खचण्याचे प्रकार घडत आहेत.गडावरील बसस्थानकाजवळील रस्त्यालाही अशाच समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, याबाबत आजवर कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसर अधिकच धोकादायक होत चालला आहे.सज्जनगडच्या सुरक्षिततेसाठी पुरातत्त्व विभाग, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन विकास आराखडा तयार करणे अत्यावश्यक आहे.
4
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 25, 2025 02:46:21Nandgaon Rural, Uttar Pradesh:
अँकर - नांदगाव तालुक्यातील कासारी गावाजवळील चांदेश्वरी धरण परिसरात आयशर आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत राहुल खोडके व रोहित खोडके या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला, तर समाधान मेंगाळ हे गंभीर जखमी झाले.गॅस सिलेंडर भरून संभाजीनगरहून मनमाडकडे जात असताना आयशरची दुचाकीला जोरदार धडक बसली.या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला.जखमी समाधान मेंगाळ यास नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलीस करत आहेत..
2
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 25, 2025 02:46:13Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील पोपटखेड ते शहानुर दरम्यानचा रस्ता गेल्या सहा महिन्यापासून रखडलेला आहेय...या मार्गावर नरनाळा किल्ला आहे , किल्ला हा ऐतिहासिक असून या मार्गावरून मोठ्या संख्येने पर्यटक किल्ला पाहण्यासाठी जातात त्याच प्रमाणे या रस्त्यावर काही गावा सुद्धा आहेत मात्र रस्त्याची दुरवस्था असल्याने याचा मोठा परिणाम पर्यटन वर झाला आहेय..
विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यापासून या रस्त्याचे बांधकामचे आदेश निघाले असून या ठिकाणी रस्ता बांधण्यासाठी साहित्य सुद्धा पडून आहे.. मात्र राजकीय आणि शासकीय उदासीनतेमुळे हा रस्ता अद्यापही रखडलेला आहेय..
1
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 25, 2025 02:45:56Raigad, Maharashtra:
स्लग - यंदाही चाकरमान्यांचा प्रवास खडतर ...... मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे ...... 14 वर्षांच्या त्रासाला वैतागले कोकणवासी ...... गणेशोत्सवापूर्वी महामार्ग खड्डेमुक्त होणार का ?
अँकर - यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यातून प्रवास करावा लागणार आहे. महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य आहे. रस्त्यांची अर्धवट कामं , रखडलेले उड्डाणपूल यामुळे थोड्याशा पावसात देखील रस्त्यावर पाणी साचते आहे. खड्ड्यांची डागडुजी केली जाते पण ती तात्पुरती मलमपट्टी असते. वडखळ पासून लोणेरे पर्यंत प्रवाशांना खड्ड्यांचा सामना करावा लागतो आहे. वर्षानुवर्षे या खड्डेमय रस्त्याला कोकणकर वैतागले आहेत.
बाईट - राकेश पाटील, प्रवासी
वॉक थ्रू - महामार्गाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी
3
Report