Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

Satish Mohite: नांदेड बाढ़ पीड़ितों को 25 हजार की मांग तेज

SMSATISH MOHITE
Sept 15, 2025 11:39:34
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_Agitation Feed on - 2C -------------------------- Anchor - अतिवृष्टीमूळे नुकसान झालेल्या नांदेड शहरातील पूरग्रस्तांना प्रत्येकी 25 हजार रुपये देण्याच्या प्रमूख मागणीसाठी आज ठाकरे गटाकडून महापालिके समोर बोंबमारो आंदोलन करण्यात आले. पूरग्रस्तांना तातडीने आथिर्क मदत द्यावी, घरकुल घोटाळ्याची चौकशी करावी, गेल्या वेळी 100 कोटीत देण्यात आलेले कचरा उचलन्याचे कंत्राट यंदा 250 कोटी रुपयात का दीले याचे स्पष्टीकरण आयुक्तांनी द्यावे अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. महापालिकेसमोर कचरा जाळून यावेळी निषेध करण्यात आला. Byte - प्रकाश मारावार - महानगराध्यक्ष ठाकरे सेना ------------------------------
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Sept 15, 2025 13:06:12
Parbhani, Maharashtra: अँकर- परभणी जिल्ह्यात जुलै, ऑगष्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यामध्ये मोठया प्रमाणावर अतीवृष्टी व ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जिल्ह्यामध्ये कापूस, सोयाबीन,उडीद मूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज पर्यंत जिल्ह्यात ६५० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झालाय. काही मंडळात दीडशे पेक्षा अधिक मिलिमीटर एवढा पाऊस कोसळलाय, पण प्रत्यक्ष बांधावर जाऊन आतापर्यंत कोणत्याच नुकसानीचे पंचनामे झाले नसून प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवीत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत होत नसल्याचा आरोप करीत आज प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकार्यांना सोयाबीनचे सडलेले धान भेट देत जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली, सरसगट शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये अर्थिक मदत तात्काळ देऊन देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांचा आधार शासनाने बनण्याची मागणी केलीय,शेतकर्यांना वेळीच मदत न दिल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा ईशारा ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आलाय... बाईट- शिवलिंग बोधने- जिल्हाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 15, 2025 13:03:34
Kalyan, Maharashtra:कल्याणच्या पटेल मार्ट मध्ये मराठी बोलण्यावरून वाद मराठी बोलायची सक्ती आहे का महिला कर्मचाऱ्याची सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांच्यासोबत आरेरावी 15 ऑक्टोबर पर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन करणार Anc कल्याणमध्ये पटेल मार्ट या दुकानात मराठी बोलण्यावरून वाद झाला. सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर याठिकाणी खरेदी करण्यासाठी गेले होते, यादरम्यान दुकानातील एका महिला कर्मचारी सोबत त्यांचा मराठी बोलण्यावरून वाद झाला. घाणेकर यांनी सांगितले तू मराठी का नाही बोलत, यांवर महिला कर्मचारी संतापत जोराने टेबलवर हात आपटले. मराठी बोलण्याची सक्ती आहे का मी मराठी नाही बोलणार. कर्मचारी महिला असल्याने घाणेकर यांनी पटेल मार्ट च्या मॅनेजरला ही घटना सांगितली. याच दरम्यान मनसेचे कार्यकर्ता देखील दुकानात पोहोचले. मॅनेजर मनीषा धस यांनी दिलगिरी व्यक्त केली. घाणेकर यांनी पटेल मार्ट ला इशारा दिला आहे, 15 ऑक्टोबर पर्यंत मार्ट मधील सर्व कर्मचाऱ्यांना मराठी बोलता आली पाहिजे. असे नाही झाले तर मी दुकानाबाहेर उभं राहून येथून खरेदी करू नका असे आवाहन लोकांना करणार असल्याचे सांगितले. मार्ट मधील सर्व कर्मचारी मराठीत बोलणार मॅनेजर मनीषा धस यांनी आश्वासन दिला आहे.. बाईट.. श्रीनिवास घाणेकर सामाजिक कार्यकर्ते बाईट..मोनिका धस पटेल मार्ट मॅनेजर
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 15, 2025 12:31:13
Akola, Maharashtra:Anchor : राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध करत ओबीसी समाजातील नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. अकोल्यामध्ये सकल ओबीसी संघटनाच्या वतीने उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.उपोषणकर्त्यांचा स्पष्ट आक्षेप आहे की, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून आरक्षण देणे म्हणजे मूळ ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणणे आहे त्यामुळे सरकारने अशा निर्णयापासून मागे हटावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.ओबीसी आरक्षण हे ओबीसींच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर मिळालेले आहे. या आरक्षणामध्ये कोणतीही दुसरी जात सामील झाल्यास आमच्यावर अन्याय होईल असे मतही आंदोलकांनी व्यक्त केले आहे.अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू असून, विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत मराठा आरक्षणासाठी वेगळा मार्ग शोधण्याची मागणी केली आहे.दरम्यान, सरकारने या विषयावर लवकरात लवकर निर्णय घेऊन गोंधळ दूर करावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. राजकीय वर्तुळातही या मुद्द्यावरून चांगलाच कलगट सुरू असून, पुढील काही दिवसांत हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Byte : शंकर पोरेकर , ओबीसी आंदोलक.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 15, 2025 12:19:15
Thane, Maharashtra:शहापूर...... श्रमजीवी संघटनेचे एकाच दिवशी चार शासकीय कार्यालयावर धरणे आंदोलन... आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीतर आंदोलन तीव्र करू..... श्रमजीवीच्या प्रशासनाला इशारा... ॲंकर.... शहापूर तालुक्यात श्रमजीवी संघटनेच्या वतीने एकाच दिवशी चार शासकीय कार्यालयांवर मोर्चा काढण्यात आला. पिढ्यान् पिढ्या राहणारे आदिवासी आजही मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित आहेत. वन विभागाने रस्त्यांसाठी जागा नाकारल्यामुळे अनेक पाड्यांना अजूनही पक्के रस्ते मिळालेले नाहीत. उलट आजही खाजगी मालकांच्या जमिनीतून वाड्या-पाड्यांनाला जोडणारे फक्त वहिवाटीचे रस्ते वापरले जातात, पण ते अधिकृत वा कायमस्वरूपी नसल्याने जनतेला प्रचंड हाल सोसावे लागतात. याबाबत आम्ही मागील वर्षी 17 डिसेंबर 2024 रोजी आयोजित मोर्चामध्ये ठोस आमच्या मागण्या मांडल्या होत्या. तसेच कातकरी वस्तीस्थान मोजणी करणार व हद्द कायम करून देणार असे सांगितले होते. आदिवासी आणि कातकरी समाजाला आधार कार्ड व रेशनकार्ड नाहीत तसेच जन्म मृत्यू दाखले नाहीत. नगरपंचायत शहापूर हद्दीतील आदिवासी बांधवांना शासकीय घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही. रस्ते नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, वीज नाही, गावठाण व स्मशानभूमी यांचा अभाव आहे. ही परिस्थिती पाहता स्थानिक आदिवासी समाजात तीव्र नाराजी आहे. आजही अनेक पाड्यांना जाण्यासाठी पावसाळ्यात रस्ते वाहून जातात. एखादा रुग्ण झाल्यास दवाखान्यात पोहोचवणे ही जीवाशी खेळण्यासारखी परिस्थिती आहे. गावठाण हक्क अद्यापही मिळालेले नाहीत. वनहक्क कायद्यामुळे आदिवासीला स्वतःच्या जमिनीवरही अधिकार नाही. मृत व्यक्तीला सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यासाठीसुद्धा योग्य स्मशानभूमी उपलब्ध नाही या बाबतीत जर आपल्या स्तरवरुन पुर्तात झाली नाही तर यापुढे आपल्या कार्यालया समोर संघटने मार्फत तिव्र आंदोलन करण्यात येईल यांची आपण दखल घ्यावी.
2
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 15, 2025 12:02:13
Washim, Maharashtra:वाशिम: File:1509ZT_WSM_ST_MORCHA रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर:अनुसूचित जमातीमध्ये(आदिवासींमध्ये) इतर जातींचा समावेश कोणत्याही परिस्थितीत होऊ नये,अशी ठाम भूमिका आदिवासी समाजाने मांडली असून या मागणीसाठी आज वाशीमच्या मंगरूळपीर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी आदिवासी बांधवांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री तसेच आदिवासी विकास मंत्र्यांना निवेदन सादर केले.निवेदनात आदिवासी समाज हा भारताचा मूळ रहिवासी असून त्यांची स्वतंत्र संस्कृती असल्याचे नमूद करण्यात आले आहे.आजही आदिवासी समाज दऱ्याखोऱ्यात राहतो, त्यामुळे मूलभूत विकासापासून वंचित असल्याचेही निदर्शनास आणले आहे.सध्या महाराष्ट्रात अनुसूचित जमातींमध्ये एकूण ४५ जमातींचा समावेश आहे.त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही जातीला अनुसूचित जमातीचा दर्जा देऊ नये, अशी स्पष्ट मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.अन्यथा आदिवासी समाज संविधानिक मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभारेल, असा इशाराही देण्यात आला आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्याने आदिवासी महिला,पुरुष व युवक सहभागी झाले होते.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 15, 2025 12:01:56
Shirur, Maharashtra:Feed 2C Slug: Haveli 20 Family Rain Damage File:05 Rep: Hemant Chapude(Haveli) Anc: पुण्याच्या थेऊर परिसरात मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने गाठ झोपेत असताना पुराच्या पाण्यात २० कुटुंब अडकली जीवाच्या आकांताने टाहो फोडत असताना तब्बल 70 नागरिकांना रेस्क्यू करत वाचवण्यात आलं मात्र या पुरामध्ये 46 शेळ्या एक गाय एक म्हैस यांचा दुर्दैव रित्या मृत्यू झालाय,तर घरातील संसार उपयोगी सर्व साहित्य पुराच्या पाण्यात उध्वस्त झालं,आमच कुटुंब संसार उघड्यावरती आलाय आम्ही जगायचं कसं याच्या चिंतेने नुकसानग्रस्त कुटुंबांना अश्रू अनावर झालेत याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... Wkt+121: हेमंत चापुडे To नुकसान ग्रस्त महिला प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया हवेली पुणे...
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 15, 2025 11:48:40
3
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 15, 2025 11:48:30
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1509ZT_GAD_RADA ( single file sent on 2C)  टायटल:-- गडचिरोली  जिल्ह्यातील अहेरी लगतच्या नागेपल्ली येथे  धक्कादायक प्रकार,अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नागरिकांवर स्मशानभूमीत अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी केला धावा     अँकर:--गडचिरोली  जिल्ह्यातील अहेरी लगतच्या नागेपल्ली येथे  धक्कादायक प्रकार घडला. अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नागरिकांवर स्मशानभूमीत अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी धावून गेल्याने दोन गटात तुफान राडा झाला आणि एकमेकांवर लाट्याकट्याने मारहाण केल्याचा प्रकार घडला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून स्मशानभूमीत घडलेल्या या प्रकारावरून संताप व्यक्त केला जात आहे. नागेपली ग्रामपंचायत प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सदर जागा स्मशानभूमीची असून येथे गावातील नागरिकांची अंत्यविधी केली जाते. मात्र या जागेवर बाहेरून आलेल्या काही वराह पालन व्यवसायिकांनी अतिक्रमण करून कच्च्या झोपड्या बांधल्या. दरम्यान आज गावातील एकाचा निधन झाल्यानंतर गावकऱ्यांनी या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी गेले असता अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी त्यांना अडवणूक केली. या वादाचे पर्यावरण हाणामारीत झाली आणि जोरदार मारहाणीत अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. झाली. या प्रकरणी पोलिसात कारवाई करणे सुरू आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
2
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 15, 2025 11:46:10
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : गावात रुग्णवाहिका पोहोचू न शकल्याने बैलगाडीवरून रुग्णाला घेऊन जायची वेळ - अक्कलकोट तालुक्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरी नदी परिसरातील गावात पूरजन्य परिस्थिती. - पुराच्या पाण्यात रुग्णांना स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचे पाहायला मिळाले. - आंदेवाडी गावात पुराच्या पाण्यामुळे रुग्णवाहिका गावात पोहोचू न शकल्याने रुग्णाला गावातील ओढयाचा पूल बैलगाडीने पार करावा लागल्याचे पाहायला मिळाले. - बोरी नदीच्या पूरजन्य परिस्थितीमुळे गावातील मार्ग झाले बंद . - गावातील वृद्ध महिलेला दवाखान्यात जाण्यासाठी गावात रुग्णवाहिका पोहोचत नसल्याने नागरिकांनी बैलगाडीने रुग्णवाहिके पर्यंत नेले. - अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी (जहागीर ) गावातील धक्कादायक घटना.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 15, 2025 11:39:51
Beed, Maharashtra:बीड: आष्टी तालुक्यात ढगफुटी, कडा शहराला पुराने वेढले ... EXCLUSIVE ड्रोन सौजन्य: शरद गर्जे Anc- काल आणि आज पहाटे झालेल्या ढगफुटी पावसाने कडा शहर व परिसरात भीषण पुरस्थिती निर्माण झाली आहे.. अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र नाले-ओढ्यांना पूर आले आहे. कडा शहर पूर्णपणे पाण्याखाली गेले असून, रस्ते, घरे व दुकाने जलमय झाली आहेत. पूरपाण्याने कडा नगरीचे सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. घरे, दुकाने, बाजारपेठ, रस्ते यामध्ये पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. वाहनांची चळवळ ठप्प झाली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ढगफुटी पावसाने शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभे पिके, फळबागा व जनावरांच्या चाऱ्याचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या आपत्तीमुळे शेतकऱ्यांबरोबरच शहरातील लहान व्यापाऱ्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे.
4
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 15, 2025 11:33:42
Nashik, Maharashtra:सुप्रिया सुळे - - जय जवान जय किसान - सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे - विनम्रपणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्या - सरसकट कर्जमाफी द्या म्हणून सांगा - *१ महिन्यात कर्जमाफी दिली नाही तर सरकारला आम्ही फिरू देणार नाही* - २५ लाख महिलांची नावे लाडक्या बहीण योजनेतून नाव वगळले - सरसकट शब्द दिला तेव्हा कर्जमाफी केली होती - आम्ही सातबारा कोरा केला होता - आता तुम्ही आश्वासन दिले ते पाळा - ६५ हजार शेतकरी नावे उताऱ्यावरून कमी केली - भ्रष्टाचार सुरू केला आहे - आम्ही ८ खासदार शब्द देतो - *जिल्हा बँकेची चौकशी लावू हा शब्द देतो* - नाशिकच्या टीमने अतिशय चांगला मोर्चा केला - मोठ्या कामाची ही छोटी सुरुवात आहे - शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही - *एक महिना आदराने घेऊ कर्जमाफी दिली नाहीतर मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, नाही, नाही*
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 15, 2025 11:31:25
Shirur, Maharashtra:Feed 2C Slug: Theur Cow Death File:02 Rep: Hemant Chapude(Haveli) Anc: पुण्याच्या थेऊर परिसराला ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपलं आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं नागरिक मध्यरात्री रात्रीच्या अंधारात शिवांच्या आकांताने टाहो फोडत होते तर मुके प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी हंबरडा फोडत होते अशा परिस्थितीत शेतकरी आपल्या प्राण्यांना वाचवण्यासाठी रात्रीच्या अंधारात पुराच्या पाण्यात पोहून कसरत करत आपला आणि आपल्या प्राण्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते मात्र या पुराच्या पाण्यात गाई म्हशी सह शेळ्यांचाही मृत्यू झालाय त्यामुळे शेतकय्रांचे लाखो रूपयांचे नुकसान झालंय,नुकसान ग्रस्त पशुपालकांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी Wkt+121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To नुकसान ग्रस्त पशुपालक प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया हवेली पुणे...
0
comment0
Report
Advertisement
Back to top