Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईमंदिर रात्रभर खुले, भक्तांचा उत्साह!

KJKunal Jamdade
Jul 09, 2025 04:01:29
Shirdi, Maharashtra
Ank - लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या दर्शनासाठी अनेक भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. राज्यभरातून अनेक पालख्या साईदर्शनासाठी शिर्डीत दाखल होत असतात.श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी 9 जुलै ते 11 जुलै या कालावधीत गुरूपौर्णिमा उत्‍सव साजरा होत असून आजपासून गुरुपोर्णिमा उत्सवाला सुरुवात झालिये.. V/O - श्री साईबाबा हयातीत असल्यापासुन गुरुपौर्णिमा शिर्डीत मोठया उत्‍साहात साजरी केली जात आहे. त्‍यामुळे या दिवसाला आजही अनन्‍य साधारण महत्‍व आहे.श्री साईबाबांवर श्रध्‍दा असणारे असंख्‍य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीला येऊन समाधीचे दर्शन घेतात व या उत्‍सवास हजेरी लावतात.तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सव साजरा होणार असून गुरुवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे.उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने साईमंदिर भाविकांसाठी रात्रभर खुलं राहणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी झी 24 तासशी बोलतांना दिलीये.. Tiktak - kunal jamdade with ceo gorksh gadilkar *तीन दिवसीय गुरुपोर्णिमा उत्सवानिमित्त अशी असणार साईभक्तांची व्यवस्था..!!* १) गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी साईमंदिर असणार रात्रभर खुले... २) नोंदणी झालेल्या 25 हून अधिक पालख्या होणार साईनगरीत दाखल... ३) पावसाच्या वातावरणामुळे 80 हजार हून अधिक स्केअर फुटाच्या मंडपाची व्यवस्था.. ४) रेल्वेस्टेशन , बसस्थानक , साईभक्त निवास जवळून साईमंदिरात येण्यासाठी भक्तांसाठी २२ सेसच्या माध्यमातून मोफत बससेवा... ५) गुरु पूर्णिमा उत्सवानिमित्त तीन लाख खाऊन अधिक साईभक्त शिर्डीला येतील असा साई संस्थानचा अंदाज.. ६) उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाच नवीन लाडू विक्री केंद्र.. ७) साईभक्तांसोबत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असणार...
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top