Back
हिंगोली-परभणी में रेड अलर्ट: मध्यरात्रि से मुसलधार पावस का तांडव!
GDGAJANAN DESHMUKH
Sept 27, 2025 10:19:17
Hingoli, Maharashtra
अँकर- हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात ४ वाजेपर्यंत अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अलर्ट देण्यात आला असून मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला रेड अलर्ट तर छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशीव ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून हिंगोली जिल्ह्यातील 30 महसूल मंडळापैकी 19 मंडळात माध्यरात्री अतिवृष्टी झालीय, वसमत आणि हयातनगर मंडळात 128 मिलिमीटर एवढ्या सर्वाधिक पावसाची नोंद झालीय. तर सकाळ पासून पावसाला खंड नाहीये, आज दुपारी चार वाजे पर्यंत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील सर्व धरण, साठवण तलाव तुडुंब भरले असून सर्व नदी नाले ओढ्यांना पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक महत्त्वाचे महामार्ग बंद पडलीयेत. तर अनेक गावांचा संपर्क तुटलाय, वसमत तालुक्यातील कुरुंदा गावात मधुमती नदीचे पाणी शिरल्याने गावातील प्रमुख रस्त्यांवर पाणीच पाणी झालं आहे.. हिंगोली जिल्ह्यात मागील चोविस तासात ३० पैकी १९ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये हयातनगर मंडळात १२८.८ मिलीमिटर, वसमत १२८.८, आंबा ११२, गिरगाव ६७.५, हट्टा ७३, टेंभूर्णी ७८.३, कुरुंदा १०४.८, औंढा ७७.८, हिंगोली ८०, सिरसम ८०, डिग्रस कऱ्हाळे ७१.३, माळहिवरा ८०, कळमनुरी १०३.८, वाकोडी १०७, डोंगरकडा ७०, येहळेगाव ७१.३, साळणा ६६.३, जवळा ६६.५ मिलीमिटर पाऊस झाला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 27, 2025 12:02:090
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 27, 2025 11:45:120
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 27, 2025 11:34:440
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 27, 2025 11:32:490
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 27, 2025 11:17:230
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 27, 2025 11:15:580
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 27, 2025 11:01:460
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 27, 2025 10:55:341
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 27, 2025 10:54:121
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 27, 2025 10:50:340
Report
PNPratap Naik1
FollowSept 27, 2025 10:39:483
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 27, 2025 10:39:411
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 27, 2025 10:39:202
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 27, 2025 10:38:560
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 27, 2025 10:38:440
Report