Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
नाशिक की नई न्यायालय इमारत से हर कोई चकित, अंदरूनी कार्पोरेट लुक
YKYOGESH KHARE
Sept 27, 2025 10:38:44
Nashik, Maharashtra
*भूषण गवई भाषण पॉईंट्स* - नाशिक न्यायालयाची अतिशय सुंदर आणि आधुनिक इमारत आपल्याला मिळाली - माझ्या मते देशामध्ये कुठल्याही राज्यात एवढी सुंदर इमारत पाहिलेली नाही - आतून पूर्ण कार्पोरेट लूक, शासकीय इमारतीत प्रवेश करत अस कुठेच वाटत नाही - चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या चेंबरपेक्षा नाशिकच्या मुख्य न्यायाधीशांचे चेंबर मोठे आहे - ज्या इमारतीचं भूमिपूजन करण्याची आणि उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली, याचा आनंद - या इमारतीसाठी अनेकांचं योगदान - लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीच काम सुरू होणार आहे - महाराष्ट्र सरकार नेहमीच न्यायालयीन विकासाठी सकारात्मक राहिलेत - उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मदत केली - आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील तितकेच सकारात्मक - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमामुळे मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमासाठी येता आलं नाही - न्यायालयीन वास्तू उभारतांना सर्वांना सामावून घेण्याचा विचार केला - नाशिकच्या इमारतीत केवळ न्यायाधीश आणि वकीलच नाही तर पक्षकारांसाठी देखील सुविधा - *शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात पण नाशिकची इमारत पहिली तर नाशिककरांनी आपल्या खटल्यासाठी नव्हे तर सुंदर इमारत पाहण्यासाठी तरी कोर्टाची पायरी चढावी, कोर्ट पाहायला यावं* - महाराष्ट्रात सुरू असलेला लीगल एज्युकेशन प्रोग्राम देशभर सुरू करण्याचा विचार - भारताच्या राज्यघटनेने आपल्याला स्वातंत्र्य, बंधुत्व, समता दिलीय - *बाबासाहेब आंबेडकर नेहमीच महात्मा फुलेंना त्यांचे गुरु मानायचे* - फुले शाहूंचे विचार फार थोर - ४ नोव्हेंबर १९४८ ला बाबासाहेबांनी राज्यघटनेचा फायनल ड्राफ्ट समितीला दिला - काही अमेंडमेंट स्वीकारल्या गेल्या, काही ना मंजूर केल्या गेल्या - बाबासाहेब म्हणाले, एक व्यक्ती, एक मत या आधारावर राजकीय लोकशाही स्थापन झाली - मात्र जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक लोकशाही स्थापन होत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही उपयुक्त ठरणार नाही - राजकीय स्तरावर आपण समान आणली, मात्र सामाजिक स्तरावर चार कंपार्टमेंटमध्ये विभागला गेलाय - एका कंपार्टमेंट मधून दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये जाणं शक्य नाही - बाबासाहेब म्हणायचे, सामाजिक आणि आर्थिक समानता आणत नाही तोवर देशाचा लोकशाहीचा भव्य डोलारा कार्यरत राहण्यास अपेक्षित यश येणार नाही - मागील 75 वर्षात देशाचा प्रवास अतिशय सकारात्मक - पार्लमेंटने असे अनेक कायदे केले की ज्यामध्ये सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केलाय - 1973 नंतर भारतीय न्यायव्यवस्थेने देशातील सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करण्याच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतलेत - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होते, की देशाच्या सर्वात गरीब नागरिकाला कमी वेळात आणि कमी पैशात न्याय मिळेल असं काम सर्वोच्च न्यायालय आणि सर्व देशभरातील न्यायालयात होत आहे किंबहुना ते व्हावं ही अपेक्षा
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Sept 27, 2025 12:02:09
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_KADU_ON_KHOT एक फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 आता सदाभाऊ खोत यांना हाकलून लावले यापुढे जनता तुडवल्याशिवाय राहणार नाही; बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया आज सोलापूर मध्ये सदाभाऊ खोत यांना हाकलून लावण्यात आलं यावर प्रहार नेते बच्चू कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.... आज शेजाऱ्यांच घर,शेत जमीन पाण्याखाली गेल असेल तर किमान दोन वर्ष शेतकऱ्यांना सावरता येणार नाही.. सरकार एनडीआरएफच्या निकषा बाहेर जायला तयार नाही.. या निकषानुसार अनुदान कधी मिळेल याची शाश्वती नाही.. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि दुष्काळ घोषित करण्याची गरज सध्या आहे.. सरकार कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.. शेतकऱ्यांचा संताप का आहे हे सदाभाऊ खोत यांनी देखील समजून घेतलं पाहिजे.. गावातील प्रत्येक शेतकऱ्याने आता संताप व्यक्त करण्याची गरज आहे.. सरकार अजूनही बिनधास्त आहे.. मुख्यमंत्री म्हणतात कर्ज मार्चमध्ये फेडावे लागतं.. म्हणजे शेतकऱ्यांची स्थिती मार्चपर्यंत सुधारणार आहे असं मुख्यमंत्र्यांना वाटतं का ??असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला.. सरकार लबाड आहे.. आधी दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देऊ म्हणत होते.. दुष्काळ पडल्यावर मुख्यमंत्री मार्च पर्यंत कर्ज फेडायची व्यवस्था आहे असं म्हणतात शेतकऱ्यांच्या बाबतीत मुख्यमंत्री पावलोपावली बदलत असल्याचे चित्र दिसत आहे.. लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुकीच्या तोंडावर तीन हप्ते अगोदर दिले.. कारण सरकारला मत हवं होतं. दुसरीकडे शेतकरी अडचणीत आहे पण सरकारला मताचा काही संबंध नाही त्यामुळे सरकार कर्जमाफी करत नाही.. शेतकऱ्यांनी सदाभाऊंना केवळ हाकलून दिलं यानंतर मात्र शेतकरी नेत्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही संतप्त प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.... बाईट - बच्चू कडू,माजी मंत्री, नेते प्रहार
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 27, 2025 11:45:12
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 27, 2025 11:32:49
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Flood_WKT Feed on - 2C ------------------------------ Anchor - नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने नदी नाल्याना पुर आलाय. पुरामुळे शेकडो हेक्टरवरील शेती खरडून गेली असून पीक पाण्याखाली गेले आहे. लोहा तालुक्यात तब्बल 121 मिलिमिटर पावसाची नोंद झालीये. दरम्यान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना व्हिडीओ कॉल लावून पुरापरिस्थिती दाखवली. अजित पवार यांनी पुर परिस्थिती पाहून सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचा दिलासा दिला. लोहा तालुक्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून पुरापरिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी. WKT -------------
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 27, 2025 11:17:23
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणी जिल्ह्यात मध्यरात्री पासूनच जोरदार पाऊस पडू लागला असून एकूण 52 मंडळापैकी 21 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद शासन दरबारी झालीय. जिल्ह्यातील गळाटी नदीला आलेल्या पुरामुळे गंगाखेड पालम तसेच गंगाखेड राणीसावरगाव रस्ता बंद झालाय,गंगाखेड, पूर्णा, पालम या तीनही तालुक्यांमध्ये पूरस्थिती असून पोलीस ठाणे चुडावा हद्दीत पूर्णा ते नांदेड रोडवर मौजे चुडावा गावाजवळ पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद केलेली आहे. पूर्णा तालुक्यातील चुडावा येथील पाण्याच्या टाकीवर एक व्यक्ती पुराच्या पाण्याने वेढलेला होता. त्याला नगरपालिका महसूल पोलीस पथक पूर्णा तालुक्यातील सदर व्यक्तीला रेस्क्यू करण्यात आलं आहे. पालम शहर आणि तालुक्यातील नाव्हा येथे काही व्यक्तींच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे . पालम तालुक्यातील शेखराजूर येथे पुराच्या पाण्यामध्ये शेतात दोन व्यक्ती अडकलेले होते सदर दोघाना सुखरूप रेस्क्यू करण्यात आले आहे, पालम तालुक्यातील गुळखंड जवळा येथे पुराचे पाणी गावात शिरले असून काही लोकांना सुरक्षित स्थळी प्रशासनाने हलवले आहे.धानोरा काळे येथील गोदावरी नदीवरील पुलावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे. केरवाडी च्या पुलावर पाणी आल्याने गंगाखेड पालम रस्ता रस्ता बंद झाला आहे. निम्न दुधना धरणातून दुधना नदीत सोडलेल्या पाण्यामुळे निलवर्ण टाकळी गावाचा संपर्क तुटलाय, थुना नदीला पूर आल्याने झिरो माटेगाव पूर्णा मार्ग बंद पडला असून नावकी गावाच्या मंदिरा पर्यंत पाणी आले आहेत,जिल्ह्यतील नेक रस्ते बंद पडले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा ईशारा देण्यात आला असून गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं असे आवाहन ही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दुपारी साडे तीन वाजल्यापासून आता पावसाने खंड दिला आहे...
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 27, 2025 11:15:58
Pandharpur, Maharashtra:27092025 Slug - PPR_RAIN_CITY file 05 Anchor - पंढरपुरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या सखल भागामध्ये पाणी शिरले आहे. पंढरपूर शहरात शुक्रवारी 72 मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे ज्ञानेश्वर नगर, सेंट्रल नाका, बोहरी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असणाऱ्या लोकवस्तीतील घरांमध्ये पाणी शिरले आहे. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी पाहणी करून नागरिकांना धीर दिला अचानक आलेल्या पावसाने नागरिकांचे घराचे, संसाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश साठे यांनी पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला. प्रशासनाने नागरिकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 27, 2025 11:01:46
Ambernath, Maharashtra:अंबरनाथच्या आयटीआय जवळ आढळला गळा कापलेला रक्तबंबाळ तरुण! सेंट्रल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तरुणाचा जीव वाचवत  हत्येचा की आत्महत्येचा प्रयत्न पोलीस तपास सुरू Amb young boy attack  Anchor अंबरनाथ शहरातील कल्याण बदलापूर रस्त्यावरील आयटीआय जवळ एक गळा चिरलेला अवस्थेत एक तरुण आढळून आला , या तरुणाची अवस्था पाहून काही तरुणांनी त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णात दाखल केल, योग्य वेळी त्याला  उपचार मिळाल्याने त्या तरुणाचे प्राण वाचले आहेत मात्र  पुढील उपचारासाठी या तरुणाला मुंबईच्या रुग्णालयात घालवण्यात आला आहे , या तरुणाचं नाव ताज बुधा असून तो उल्हासनगर शहरात राहणार आहे . मात्र या तरुणाची कुडी हत्येचा प्रयत्न केला की  त्याने आत्महत्याचा प्रयत्न केला याचा पोलीस शोध घेत आहेत चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 27, 2025 10:54:12
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2709ZT_CHP_HEAVY_RAINS_1_2 ( 2 file sent on 2C)  टायटल:-- सुमारे दोन तासांच्या मुसळधार पावसाने चंद्रपूरला झोडपले ,राज्यभर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना रोज मुसळधार पावसाची हजेरी उरल्या-सुरल्या शेतपिकांना टाकत आहे संकटात    अँकर:-- चंद्रपूर शहर -जिल्ह्यात गेले आठ दिवस सकाळ अथवा रात्र अशा सुमारास तीन तासांचा मुसळधार पाऊस बरसत आहे. परिणामी सण-उत्सव प्रभावित झाले आहेत.  जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 116 टक्क्याहून अधिक पाऊस पडून गेलाय. आजही दुपारी सुमारे दोन तासांच्या मुसळधार पावसाने चंद्रपूरला झोडपले. यामुळे जुने शहर ठीकठिकाणी जलमय झाले. दुपारच्या सत्रातील शाळांच्या विद्यार्थ्यांना याचा जबर फटका बसला. शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले. राज्यभर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना चंद्रपूर जिल्ह्यात रोज होणाऱ्या मुसळधार पावसाने उरल्या सुरल्या शेत पिकांना संकटात टाकले आहे ----जुने शहर जलमग्न झाल्याचे vis----- आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
1
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 27, 2025 10:50:34
Pandharpur, Maharashtra: 27092025 Slug - PPR_CASE_STUDY file 04 ---- Anchor - माढा तालुक्यातील सीना नदीला आलेलं पाणी पात्र सोडून अर्धा किलोमीटर दूर पर्यंत गेले. या पाण्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले शेतात घरात पाणी आल्यानंतर या ग्रामस्थांच्या डोळ्यातील पाणी वाहत आहे. उंदर गाव येथे अंगावरील कपड्या सोबत आपली जनावरे हाती लागेल ते साहित्य सोबत घेऊन ग्रामस्थ जीव वाचवत बाहेर पडली. उंदर गाव येथील चव्हाण कुटुंबाचे घरात जवळपास वीस फूट पाणी शिरले होते. त्यामुळे घरचा सर्व भाग पाण्याखाली होता. शालेय विद्यार्थ्यांचे वह्या पुस्तके , पेन दप्तर सर्व पावसात भिजून चिखल झाला आहे. त्यामुळे सोबत काहीही घेता आले नाही. हे कुटुंब आज शेल्टर कॅम्प मध्ये मागील सहा दिवसांपासून राहत आहे. चूल नाही गॅस नाही त्यामुळे सामाजिक संघटना असतील मदत करणारे लोक असतील त्यांनी दिलेल्या मदतीवर यांना आता दिवस काढावे लागत आहेत. काही दिवसांनी पूर ओसरेल घरातील स्वच्छता करावी लागेल. पण शाळेत जाण्यासाठी त्यांना आता ना वही आहे ना पुस्तक माढा करमाळा तालुक्यातील पूर स्थिती गंभीर आहे. आपल्याला दिसत आहे त्या पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकार माय बाप असते त्यांनी मायेचा हात पाठीवर फिरवण्याची परिस्थिती आहे. तरच ही लोक तातडीने उभा राहतील अन्यथा यांच्या जगण्याचा संघर्ष वाढत राहील ---- Byte - 1. आरती चव्हाण 2. कृष्णा चव्हाण 3. आई
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 27, 2025 10:39:48
Kolhapur, Maharashtra:Kop MLA Kshirsagar Byte Feed:- Live U Anc:- येत्या काही दिवसात कोल्हापूर शहरातील रस्त्यांचा दर्जा सुधारा अन्यथा येत्या अधिवेशनात कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करणार असा इशारा कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिलाय. कोल्हापुरातील रस्त्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे, तरीदेखील कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकारी याकडे लक्ष देत नाहीयेत असा गंभीर आरोप क्षीरसागर यांनी केलाय. या पार्श्वभूमीवर क्षीरसागर यांनी कोल्हापुरातील सर्किट हाऊस मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक घेतली यामध्ये अधिकाऱ्यांना चांगलंच झापले.. पाहूया क्षीरसागर नेमकं काय म्हणाले ते. Play Byte:- राजेश क्षीरसागर, शिवसेना आमदार कोल्हापूर उत्तर
3
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 27, 2025 10:39:41
Dhule, Maharashtra:ANCHOR - धुळे शहर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धुळे जिल्ह्यात पोलिसांनी दोन लाखांचा सहायता धनादेश सुपूर्त केला. मुख्यमंत्री सहायता निधीत धुळे पोलीससांचे दोन लाखचे योगदान देण्यात आले. मुख्यमंत्री यांच्या कडे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धनादेश सुपूर्त केला. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ असतांना मुख्यमंतत्र्याचे स्वागत गुलाबाचे फुल देऊन न करता, धुळे पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या पगारातून “ २ लाख रुपये “ गोळा करून Chief Minister’s Relief Fund चा चेक मुख्यमंत्री महोदयांच्या हाती पोलिस अधीक्षक धुळे जिल्हा श्रीकांत धिवरे यांनी सुपूर्त केला. प्रशांत परदेशी, धुळे.
1
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 27, 2025 10:39:20
Parbhani, Maharashtra:अँकर - यंदाच्या खरीप हंगामामध्ये सततच्या पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल आहे, हाता तोंडाशी आलेला घास वाया गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय, गोदावरी, दुधना,पूर्णा,पैनगंगा या नदीच्या पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती वाया गेली असून शेतीचा जिवंत स्तर खरडून गेलाय,त्यामुळे शेती नापिक होण्याच्या मार्गावर आहे. तर पिकांचा अक्षरशः चिखल झालाय. त्यामुळे अन्नदाता शेतकर्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याच नाव घेत नाहीये. या परिस्थितीमुळे बळीराजा हवालदिल झालाय. आता पुढचं वर्ष कसं काढायचं लेकरा बाळाची शिक्षण,मुला मुलींची लग्न कशी करायची याची चिंता शेतकऱ्याला भेडसावत आहे. या शेतकऱ्याच्या परिस्थितीवर परभणी येथील ग्रामीण कवी राजकुमार नायक यांनी केलेली टीव्हीवाले साहेब जरा ऐका धीराणं - भिजलेल्या सोयाबीनची बातमी कराणं ही कविता समाज माध्यमावर धुमाकूळ घालत आहे. या कवितेच्या माध्यमातून राजकुमार नायक यांना आता सरकारपेक्षा पत्रकार अधिक जवळचे वाटतायेत,टीव्हीवाल्यांनी आपली दुःख मांडली तरच शेतकऱ्यांना मोबदला मिळेल अशी आशा आहे,त्यामुळे कवितेच्या माध्यमातून कवी मीडियाला शेतकर्यांची दुःख दाखविण्यासाठी आर्त हाक घालीत आहेत. या कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची दुःख मांडण्याचा प्रयत्न या कवितेतून केलाय... बघुयात ग्रामीण कवी राजकुमार नाईक यांची टीव्हीवाले साहेब जरा ऐका धिराणं भिजलेल्या सोयाबीन ची बातमी करा ना धमाल कविता.... कविता लावणे- राजकुमार नायक- ग्रामीण कवी,परभणी
2
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top