Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

सीना नदी ने माढा में घर डुबो दिए, पीड़ितों की दुर्दशा उजागर

SKSACHIN KASABE
Sept 27, 2025 10:50:34
Pandharpur, Maharashtra
27092025 Slug - PPR_CASE_STUDY file 04 ---- Anchor - माढा तालुक्यातील सीना नदीला आलेलं पाणी पात्र सोडून अर्धा किलोमीटर दूर पर्यंत गेले. या पाण्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले शेतात घरात पाणी आल्यानंतर या ग्रामस्थांच्या डोळ्यातील पाणी वाहत आहे. उंदर गाव येथे अंगावरील कपड्या सोबत आपली जनावरे हाती लागेल ते साहित्य सोबत घेऊन ग्रामस्थ जीव वाचवत बाहेर पडली. उंदर गाव येथील चव्हाण कुटुंबाचे घरात जवळपास वीस फूट पाणी शिरले होते. त्यामुळे घरचा सर्व भाग पाण्याखाली होता. शालेय विद्यार्थ्यांचे वह्या पुस्तके , पेन दप्तर सर्व पावसात भिजून चिखल झाला आहे. त्यामुळे सोबत काहीही घेता आले नाही. हे कुटुंब आज शेल्टर कॅम्प मध्ये मागील सहा दिवसांपासून राहत आहे. चूल नाही गॅस नाही त्यामुळे सामाजिक संघटना असतील मदत करणारे लोक असतील त्यांनी दिलेल्या मदतीवर यांना आता दिवस काढावे लागत आहेत. काही दिवसांनी पूर ओसरेल घरातील स्वच्छता करावी लागेल. पण शाळेत जाण्यासाठी त्यांना आता ना वही आहे ना पुस्तक माढा करमाळा तालुक्यातील पूर स्थिती गंभीर आहे. आपल्याला दिसत आहे त्या पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकार माय बाप असते त्यांनी मायेचा हात पाठीवर फिरवण्याची परिस्थिती आहे. तरच ही लोक तातडीने उभा राहतील अन्यथा यांच्या जगण्याचा संघर्ष वाढत राहील ---- Byte - 1. आरती चव्हाण 2. कृष्णा चव्हाण 3. आई
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MNMAYUR NIKAM
Sept 27, 2025 15:30:13
Buldhana, Maharashtra:सिंदखेडराजा तालुक्यात अतिवृष्टी, जांभोरा आणि सोनोशीचा संपर्क तुटला अँकर - बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात गेल्या दोन तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. सर्वात गंभीर परिस्थिती राहेरी-शेवली रोडवर पाहायला मिळत आहे. या मार्गावरील जांभोरा आणि सोनोशी या गावांदरम्यान असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. या घटनेमुळे अनेक नागरिक पुलाच्या दोन्ही बाजूंना अडकून पडले आहेत. यामध्ये नोकरदार वर्ग, दवाखान्यात गेलेले नागरिक आणि इतर प्रवासी यांचा समावेश आहे. रात्रीची वेळ असल्याने अडकलेल्या नागरिकांची गैरसोय वाढली असून, पाण्याच्या पातळीत घट होण्याची ते प्रतीक्षा करत आहेत.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 27, 2025 15:18:03
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - महापुरामुळे सोलापुरातील अनेक भागात आढळतायत साप अँकर :- सोलापुरात मागील काही दिवसापासून पूरपरिस्थिती आहे. अनेक गावांना सीना नदीच्या पाण्याने वेढा दिलाय. या पुराच्या पाण्यात अनेकांच्या घरात साप येतं असल्याचे दिसून येतं आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ गावात साळींदर प्राणी आढळूबा आला. पाण्याच्या भीतीने साळींदर रस्त्यावर आला होता. त्याला वन्यजीवप्रेमीनी सुरक्षित रेस्क्यू केलं. दरम्यान शुक्रवारी सर्प दंशाने सोलापुरात एका व्यक्तीचा मृत्यू देखील झालंय. गावात पाण्याचा वेढा वाढल्याने नदीत असलेले साप तर वाहून येतायत मात्र विषारी साप देखील सुरक्षित जागा शोधण्याच्या प्रयत्नात लोकांच्या घरात घुसतायत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आलं आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 27, 2025 14:45:52
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दिग्रस च्या अरुणावती प्रकल्पात जलसाठा वाढला असून, अरुणावती धरणाचे सर्व अकराही दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे अरुणावती नदीला पूर आला असून, आर्णी दिग्रस मार्गावरील पूल पाण्याखाली आला आहे. त्यामुळे या पुलावरून माहूर आणि दिग्रस करणे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. धरणातून 940.50 घनमीटर प्रति सेकंद इतकं पाणी अरुणावती नदीपात्रात सोडण्यात येतं आहे, या विसर्गामुळे अरुणावती नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झालाय, दरम्यान प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, पुराचे पाणी आणि शहरातील काही भागांमध्ये देखील शिरले आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 27, 2025 14:35:05
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत कॉलेज तरुणाची आत्महत्या! प्रेम प्रकरणाच्या वादानंतर 11 व्या मजल्यावरून घेतली उडी डोंबिवली सुदामा कॉम्प्लेक्स मध्ये राहणारा ऋषिकेश शर्विल परब हा वंदे मातरम कॉलेजमध्ये शिकत होता. सकाळपासून तो आपल्या इमारतीत चिंतातुर अवस्थेत बसलेला होता. सकाळी 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत तो इमारतीत होता, मात्र त्यानंतर त्यानं थेट 11 व्या मजल्यावरून फायर डक मधून उडी घेतली.घटनेची माहिती मिळताच 11.46 वाजता अग्निशमन दलाला कॉल करण्यात आला. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले; तब्बल अर्धा तास अग्निशामक दलाचे अधिकारी पोलीस यंत्रणा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांच्या उपस्थितीतच दुपारी सुमारे 12 वाजता ऋषिकेशनं उडी मारल्याचं समजतं.प्राथमिक चौकशीत, प्रेम प्रकरणात आपल्या प्रियकरणीसबत झालेल्या वादाचा राग मनात धरून ऋषिकेशनं आत्महत्येचा मार्ग निवडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.या धक्कादायक घटनेनं डोंबिवली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विष्णुनगर पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.या घटनेतून तरुणांच्या मानसिक तणावाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. Byte;- सुहास हेमाडे ( डोंबिवली ACP)
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 27, 2025 14:34:44
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- लातूरच्या बेळसांगवी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा... ग्रामस्थांचं तात्काळ स्थलांतराला सुरवात.... प्रशासनाकडून १०० ग्रामस्थांचे स्थलांतर... स्थलांतराला ग्रामस्थांचा विरोध... आपत्ती व्यवस्थापन गावात तळ ठोकून.... AC ::- लातूरच्या जळकोट तालुक्यातील बेळसांगवी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय. गावातील तब्बल 1 हजार नागरिकांच्या स्थलांतराला सुरुवात झाली आहे. यापैकी शंभर नागरिकांना उदगीर तालुक्यातील वाढवावा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरक्षितपणे हलवण्यात आलं आहे. गावात एनडीआरएफचे जवान, जळकोट आणि उदगीरचे तहसीलदार तसेच पोलीस पथक तैनात आहेत. मात्र, गावकऱ्यांनी “आमची जनावरे सोडून आम्ही कुठेही जाणार नाही” असा ठाम पवित्रा घेतल्याने स्थलांतराला नागरिकातून विरोध होताना दिसत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून ग्रामस्थांना विनंती करण्यात येत आहे की, आज लातूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर आहे. कोणत्याही क्षणी मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो आणि पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ शकते आणि गावात पाणी शिरण्याचा धोका आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी तात्काळ स्थलांतर करून प्रशासनाला सहकार्य करावं. असं आवाहन तहसीलदारांकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे आता ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्या चर्चेनंतर ग्रामस्थ स्थलांतर होतात का हे पहावं लागणार आहे. बाईट ::- तहसीलदार
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 27, 2025 14:34:19
Kalyan, Maharashtra:डोंबिवली ग्रामीण भागातील संतापजनक प्रकार !! मुख्याध्यापकांना चिमुकलीवर केला लैंगिक अत्याचार मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मुख्याध्यापकाला बेड्या Anc..डोंबिवली जवळील ग्रामीण भागात निळले गावातील एका शाळेत मुख्याध्यापकाने सहा वर्षाच्या चिमुकलिवर लैंगिक अत्याचार केल्याची घतना उघडकीस आली आहे .या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात वासनांध मुख्याध्यापक महेंद्र खैरनार विरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत . Vo..डोंबिवली ग्रामीण भागातील निळजे गावातील एका शाळेत संतापजनक समोर आली आहे . निळजे गावातील एका शाळेत एका मुख्याध्यापिकेने सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली .दोन दिवसांपूर्वी त्याने हे कृत्य केले होते .घडल्या प्रकाराबाबत पीडित मुलीने कुटुंबियांना सांगताच कुटुंबीयांनी थेट मानपाडा पोलीस ठाणे गाठले .या वासनांध मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केली .पोलिसांनी तात्काळ या मुख्याध्यापका अटक करण्यात आली आहे .महेंद्र खैरनार असे या नराधमाचे नाव आहे .दरम्यान या आधी 2019 साली ग्रामस्थांनी या महेंद्र खैरनार हे मुलींसोबत गैरवर्तन करत असल्याची तक्रार गट विकास अधिकाऱ्याकडे करत त्याची बदली करण्याची मागणी केली होती मात्र प्रशासनाणे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय . या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे . Byte... सुहास हेगडे Acp
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 27, 2025 14:16:51
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 27, 2025 14:16:35
Pune, Maharashtra:लक्ष्मण हाके बाईट पॉइंटर - काल नैराश्यातून पोस्ट केली होती त्यावर आज सभेला निघताना माझ्यावर हल्ला झाला सरकार आमच्या बाजूने नाही विरोधक आमच्या बाजूने नाहीत आज पड पावसात आम्ही सभा घेतली आहे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी आम्ही जीवाच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणार.. - ओबीसी पड पावसात जर एकत्र येत असेल तर सरकारने ओळखून घ्यावं. अन्यथा ओबीसी तुम्हाला मतपेटीतून जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही... - स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असते तर इथल्या लोकांना अधिकार वाणीने सांगितलं असतं मुंडे असते तर त्यांनी सर्वांना सांगितल असतं हे मागासवर्गीयांचा आरक्षण आहे ओबीसीचं न्यायालयाला मान्य नसलेला आरक्षण सरकारने दिले त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांची आठवण येते ते असते तर ओबीसींवर ही वेळ आली नसती... - बीडच्या सभेविषयी बोलताना:- त्याबद्दल मला बोलायचं नाही आम्ही देखील पड पावसात सभा घेतली आहे हे शेतकऱ्यांची, मेंढपाळांची मुलं आहेत ती पावसाला घाबरणारी नाहीत सभे साठी समाज एकत्र येतो आगामी काळात आम्ही ओबीसी समाज एकत्र करण्यासाठी सभा घेणार आहोत...आम्ही कुठल्या पक्षाचे बांदिल नाहीत, फाइव्ह स्टार नेते नाहीत.... -
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 27, 2025 14:07:08
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - सांगली जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ,6 तालुक्यातील 43 ठिकाणी ओढ्यांवरील पूल पाण्याखाली... अँकर - सांगली जिल्ह्यात परतीच्या पाऊसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. सहा तालुक्यातील 43 ठिकाणी पूलांवर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे.यामध्ये चार राज्यमार्ग आणि 39 जिल्हा मार्गांचा समावेश आहे.जत,आटपाडी,खानापूर कवठेमहांकाळ,तासगावसह मिरज तालुक्यांमध्ये काल रात्रीपासून पडणाऱ्या संततधार पाऊसामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत.तासगाव तालुक्यातील सावळज,मणेराजुरी या ठिकाणचे असणारया ओढ्यांना पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे,या ठिकाणी ओढ्यांवरील पुलावरून पाऊसाचे पाणी वाहू लागलेला आहे,त्यामुळे वाहतूक बंद झालेली आहे.तर आटपाडी तालुक्यातील वाक्षेवाडी येथील ओढ्यावरील पूल वाहून गेलेला आहे, त्यामुळे वाक्षेवाडी कामत या दोन गावांचा संपर्क तुटला आहे.तसेच मिरज तालुक्यातल्या पूर्व भागात देखील अनेक ठिकाणी ओढ्यांवरील छोटे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत. प्रशासनाकडून ज्या ठिकाणी पुलावरून पाणी वाहू लागले आहे तिथून वाहतूक बंद करत नागरिकांनी या ठिकाणाहून प्रवास करू नये,असा आवाहन करण्यात आला आहे.
4
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 27, 2025 14:05:39
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 27, 2025 14:03:17
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - सांगली जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ,आटपाडी,खानापूर,तासगाव,मिरज तालुक्यात ओढ्यांवरील पूल पाण्याखाली... अँकर - सांगली जिल्ह्यात परतीच्या पाऊसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. आटपाडी,खानापूर,तासगावसह मिरज तालुक्यांमध्ये काल रात्रीपासून पडणाऱ्या संततधार पाऊसामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत. तासगाव तालुक्यातील सावळज,मणेराजुरी या ठिकाणचे असणारया ओढ्यांना पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे,या ठिकाणी अनेक वरून पावसाचे पाणी वाहू लागलेला आहे,त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक ती बंद झालेली आहे.तर आटपाडी तालुक्यातील वाक्षेवाडी येथील ओढ्यावरील पूल वाहून गेलेला आहे,त्यामुळे वाक्षेवाडी कामत या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच मिरज तालुक्यातल्या पूर्व भागात देखील अनेक ठिकाणी ओढ्यांवरील छोटे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत. प्रशासनाकडून ज्या ठिकाणी पुलावरून पाणी वाहू लागले आहे तिथून वाहतूक बंद करत नागरिकांनी या ठिकाणाहून प्रवास करू नये, असा आवाहन करण्यात आला आहे.
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top