Back
अकोला में बारिश ने कपास बर्बाद, किसान राहत मांग रहे
JJJAYESH JAGAD
Sept 27, 2025 10:08:46
Akola, Maharashtra
Anchor : अकोला जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे कापसाच्या उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. परतीच्या पावसामुळे शेतात फुटलेला कापूस ओला राहून सडत आहे, त्यामुळे बोन्ड सडण्याचे प्रमाण वाढले आहे.
Vo 1 : दरवर्षी दसऱ्याच्या सुमारास ‘सीतादही’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाच्या तोडणीला सुरुवात होते. मात्र, यंदा पावसाचा जोर कमी न झाल्याने आणि हवामान अनुकूल न ठरल्याने कापसाची तोडणी सुरूच होऊ शकलेली नाही. शेतात पिकलेला व फुटलेला कापूस ओलसर राहिल्यामुळे कापसाची गुणवत्ता घटली असून बाजारपेठेत त्याला चांगला दर मिळण्याची शक्यता नाही.
Byte : सचिन बोदडे , शेतकरी
Vo 2 : याशिवाय, कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. सततचा पाऊस, ओलसर हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे पिकावर रोग व कीड नियंत्रणात येत नाही. कपाशी पिवळी पडली असून शेतकऱ्यांच्या हंगामभराच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.
Byte : मनोज गावंडे , शेतकरी.
Vo 3 : कापूस हा विदर्भातील शेतकऱ्यांचा मुख्य आधार आहे. मात्र, यंदा अतिवृष्टी, बोंडअळीचा प्रादुर्भाव आणि हवामानातील बदलामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक शेतकरी हंगामभर कर्ज काढून शेती करतात. परंतु पिकाचे उत्पादन घटल्याने व बाजारात भाव न मिळाल्याने त्यांना कर्ज परतफेडीची मोठी अडचण निर्माण झाली आहे.परिस्थिती लक्षात घेता अकोला जिल्ह्यासह विदर्भातील शेतकऱ्यांकडून सरकारकडे सरसकट कर्जमाफीची मागणी केली जात आहे. शेतकरी संघटना व स्थानिक नेतेही शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करावी, अशी जोरदार मागणी करीत आहेत.
Byte : दिलीप नाईक , शेतकरी .
Final Vo: या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा सरकारच्या मदतीकडे लागल्या आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 27, 2025 11:34:440
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 27, 2025 11:32:490
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 27, 2025 11:17:230
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 27, 2025 11:15:580
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 27, 2025 11:01:460
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 27, 2025 10:55:341
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 27, 2025 10:54:121
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 27, 2025 10:50:340
Report
PNPratap Naik1
FollowSept 27, 2025 10:39:483
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 27, 2025 10:39:410
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 27, 2025 10:39:200
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 27, 2025 10:38:560
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 27, 2025 10:38:440
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 27, 2025 10:19:350
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 27, 2025 10:19:260
Report