Back
कल्याणमधील खड्डे: करोडो रुपये खर्चूनही वाहतूक कोंडी!
ABATISH BHOIR
FollowJul 15, 2025 01:00:15
Kalyan, Maharashtra
कल्याण ध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवरती खड्डे.
करोड रुपये खर्च करून अनेक रस्त्यांवरती खड्डेच खड
खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी..
Anc..कल्याण डोंबिवली परिसरामध्ये अनेक अंतर्गत रस्त्यानवर खड्डे पडलेले पाहायला मिळत आहे पावसाळ्या अगोदर आणि पावसाळ्यानंतर खड्डे बुजवन्यासाठी करोडो रुपये चा डेंटर काढला जातो तरी सुद्धा अनेक रस्त्यांमध्ये खड्डे पडलेले दिसून येत आहे कल्याण मधला स्मार्ट प्रभाग म्हणून ओळखला जाणारा ब प्रभाग आहे आणि या रस्त्यावरती अनेक असे खड्डे पडल्यामुळे वाहतूक कोंडी देखील होते याचा फटका शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील होतो ब प्रभाग क्षेत्र कार्यालय याचं रस्त्यावर असल्यामुळे अनेक अधिकारी देखील याच रस्त्यावरुण ये जा करतात मात्र अधिकाऱ्यांना खड्डे दिसत नाहीत का ? त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
Wkt.. आतिश भोईर
कल्याण
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 15, 2025 08:31:54Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे जिल्ह्यात यां वर्षी कपाशी खालोखल मक्याची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात धुळे आणो शिंदखेडा तालुक्यात कमी पाऊस असल्याने शेतकऱ्यांनी मक्याला पसंती दिली आहे. मात्र मक्यावर सुरुवातीलाच लष्करी अळीचा प्रदुर्भाव दिसुन येत आहे. अनेक शेतकऱ्यांना त्यामुळे दुरबार पेरणी करावी लागली आहे. पावसाच्या अनियमित्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा मका विरळ झाला त्यांनाही दुबार पेरणी करावी लागली, मका लहावाफ केलेल्या शेतकऱ्यांनी पिकाला फवारणीचा सल्ला दिला आहे. दोन फवारण्या शेतकऱ्यांनी घ्याव्यात असा सल्ला तज्ञ् देत आहेत.
byte - जगदीश काठ्यपुरे, तज्ञ्
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 15, 2025 08:31:01Dhule, Maharashtra:
anchor - नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा डोंगर रंगांमध्ये यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथील धबधबे प्रावाहित झाले असून, दऱ्या खोऱ्याधे हिरवळ दाटली आहे, अश्या स्थितीत काही तरुण पर्यटक हुल्लडबाजी करत असल्याची दृश्य येथे नित्याची झाली आहेत. प्रसिद्ध सीताखाई पॉईंट वर जीव धोक्यात घालून तरुण फोटोशूट करीत आहेत. दोनशे पन्नास फूट खोल असल्याने सीताखाई पॉईंट असलेल्या दगडातून उभे राहून जीवघेणा फोटोशूट केले जातं आहे, याआधी येथे अनेकांना जीव गमावावा लागला आहे. काही तरुणांकडून सेल्फी आणि फोटो साठी अशी स्टबाजी सुरू. असून,याला कोणी अटकवा करतांना दिसून येत नाही. तोरणमाळ परिसरात सुरक्षेचा कोणत्याही उपाययोजना नाहीत. सर्व पर्यटन क्षेत्र रामभरोसे सुरू आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 15, 2025 08:05:42Dhule, Maharashtra:
Anchor- धुळे शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अनोखा आंदोलन करून निश्चित करण्यात आला. यावेळी संतप्त शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये बसून कीर्तन केलं. यावेळी खड्ड्यांना फुले वाहत शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महापालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांची चाळण झाली असून धुळे शहरातील पारोळा रोडवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचा साम्राज्य पसरल आहे. ऐन पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने धुळेकरांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. असं असताना मनपा तसेच बांधकाम विभाग मात्र फक्त ठेकेदारांना खुश करण्यात मश्गूल असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला. यावेळी महापालिका तसेच बांधकाम विभागाचे विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Byte- कार्यकर्ता, उबाठा
प्रशांत परदेशी, धुळे.
3
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 15, 2025 08:05:32Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरणी आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरणी आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
- सदा प्रकरणातील आरोपी दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्याला अक्कलकोट येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर केले असता मिळाली दोन दिवसांची पोलीस कोठडी
- पोलीस बंदोबस्तात आरोपींची पोलीस कोठडीत केली रवानगी
- प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी दीपक काटे सह सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासंदर्भात वाढत होता दबाव
- आता दोन दिवसांच्या पोलीस कस्टडीमध्ये अधिकची माहिती समोर येण्याची शक्यता
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 15, 2025 08:05:23Navi Mumbai, Maharashtra:
story slug - नवी मुंबई मद्ये सखल भागात साचले पाणी
नवी मुंबई मे बारीश के कारण पाणी
ftp slug - nm water logging
shots-
reporter- swati naik
navi mumbai
Anchor - नवी मुंबई मद्ये सकाळी 11 वाजल्या पासून पावसाची संततधार सुरू झाली आहे, यामुळे नवी मुंबई मधील सखल भागात पाणी साचले आहे , यात सायन पनवेल महामार्गावर उरण फाटा येथे सखल भागात पाणी साचलं असून एपीएमसी मार्केट ,तुर्भे , येथे रस्त्यावर पाणी साचलं आहे ,तर पनवेल मद्ये देखील पावसाची जोरदार हजेरी लावली आहे।
Gf-
0
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 15, 2025 08:03:35Pandharpur, Maharashtra:
15072025
Slug - PPR_HAKE_GAYKAWAD
feed on 2c
file 01
----
Anchor - संभाजी ब्रिगेडने जे पेरले तेच उगवले प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या प्रकरणात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची उडी
प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेध हाके यांनी केला आहे. मात्र रस्त्यावर दहशत माजवण्याच्या अनेक घटना संभाजी ब्रिगेड माध्यमातून घडल्याचा आरोप हाके यांनी केला. यामध्ये भांडारकर प्रकरण, वाघ्याचे स्मारक उखडणे, गडकरींचा पुतळा काढणे, चळवळी बदनाम करणे, गाड्या फोडणे अशा घटनांचा उल्लेख त्यांनी केला.
संभाजी ब्रिगेड कडून हिंसाचार माजविण्या काम करणाऱ्या लोकांचे सत्कार केले. हिंसाचाराचे सामान्यकरण केले.आता त्यांच्याच प्रदेशाध्यक्षावर ही वेळ आली आहे. अशी टीका या वादात उडी घेत लक्ष्मण हाके यांनी केली आहे
----
Byte - लक्ष्मण हाके
4
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 15, 2025 08:01:16Raigad, Maharashtra:
स्लग : रोह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी ....... सर्वत्र पाणीच पाणी ...... रायगड जिल्ह्यात २४ तासांचा रेड अलर्ट .....
अँकर - रोहा तालुक्यात आज पहाटेपासून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली. रोहा शहराच्या बाजारपेठ, दमखाडी, छत्रपती शिवाजी नगर, त्रिमूर्ती नगर, नगर परिषद परिसर, वरसे आणि भुवनेश्वर येथे रस्त्यांवर पाणी साचले. पावसाने अचानक घेतलेल्या जोरदार धरल्याने काही घरांमध्ये पाणी शिरले आणि नागरिकांची धांदल उडाली. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यास पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नदीकाठच्या गावांसह सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
0
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 15, 2025 07:34:59Ratnagiri, Maharashtra:
खेड येथे मच्छी मार्केटच्या पाठीमागे रस्त्यावर महिला पुराच्या पाण्यामध्ये फसली होती त्या महिलांना सुरक्षित पाण्यातून बाहेर काढून तिला सुखरूप घरी पाठवण्यात आलं त्यावेळी सरफराज पांगारकर एजाज खेडेकर, खालील जुईकर उपस्थित होते
अल सफा वेल्फेअर फाउंडेशनचे कार्यकर्ते सोबत होते
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 15, 2025 07:34:47Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या झिरो फाटा येथील हायटेक रेसिडेन्सीअल स्कुलमध्ये आपल्या पाल्याची टीसी काढण्यासाठी गेलेले पालक जगन्नाथ हेंडगे यांना स्कुल संस्थाचालक चव्हाण दाम्पत्याने मारहाण केल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला होता, या घटनेने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली होती,पोलिसांनी पूर्णा पोलीस ठाण्यात या आरोपी रत्नमाला आणि प्रभाकर चव्हाण दाम्पत्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता,पण या घटनेला पाच दिवस उलटून ही आरोपी दाम्पत्य पोलिसांना सापडत नसल्याने आज मयताच गाव आसलेल्या उखळद येथील ग्रामस्थांनी मयत जगन्नाथ हेंडगे यांच्या कुटुंबियांना ज्ञाय मिळावा म्हणून मोर्चाची हाक दिली होती,त्याप्रमाणे आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर वसमत रोडवरून भव्य मोर्चा निघालाय, यात मोठ्या संख्यने महिलांचा ही समावेश आहे, जगन्नाथ हेंडगे यांच्या कुटुंबियांना ज्ञाय मिळावा म्हणून सर्व गाव रस्त्यावर उतरले आहे, या मोर्चात हजारो ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करीत आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे...
0
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 15, 2025 07:34:40Akola, Maharashtra:
Anchor : राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारी पातळीवर प्रत्यक्षात पहिले पाऊल म्हणून प्रभाग रचना जाहीर करून पडले आहेय..जिल्हा परिषद संदर्भात अधिसूचना प्रसिद्ध झाली असून सदस्य संख्या ५२ राहणार आहेय..
५३ वर असणारी सदस्य संख्या आता ५२ वर आलीय, हिवरखेड नगर परिषद झाल्याने तेल्हारा तालुक्यातील एक सर्कल कमी झाल्याने गावे अन्य सर्कलमध्ये समाविष्ट आहेय..१८ ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहेय..
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या तेव्हापासून अकोला जिल्हा परिषद व सातही पंचायत समितीवर प्रशासक नेमण्यात आलेय.. ६ मे २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याला हिरवा कंदील मिळाला. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक पूर्वीची प्रक्रिया करण्यासंदर्भात शासनाला निर्देश दिले त्यानुसार प्रभाग रचनेच्या कार्यक्रम जाहीर झाला आहेय..२०२० व्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत गटांची संख्या ५३ होती, मात्र हिवरखेड नगर परिषद झाल्याने एक सर्कल कमी झालेय..
0
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 15, 2025 07:31:26kolhapur, Maharashtra:
Ngp Bhonga Byte
live u ने फीड पाठवले (DCP बाईट आहे)
(भोंग्याचे shots --2c ला जोडले आहे)
---------
मुंबई प्रमाणेच उपराजधानी नागपुरात ही धार्मिक स्थळावरील अनधिकृत भोंगे, लाऊडस्पीकर काढण्याची कारवाई केली जात आहे.. आतापर्यंत 300 पेक्षा जास्त भोंगे व लाऊडस्पीकर पोलिसांकडून काढण्यात आले असून आज आणि उद्या असे दोन दिवस ही कारवाई पुन्हा केली जाणार आहे... पोलिसांनी काढलेल्या ठिकाणी पुन्हा भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावल्यास फौजदारी कारवाई केली जाईल असा इशाराही नागपूर पोलिसांकडून दिला जात आहे..
----
Byte - राहुल मदने, पोलीस उपयुक्त, झोन 3
4
Share
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 15, 2025 07:31:11Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 1507ZT_MAVAL_TAXI_CAB
Total files : 04
Headline -ई-बाईक टॅक्सीविरोधात आज मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन
-पुण्यातून दोन हजार चालकांनी सहभाग घेतलाय
-पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणी या कॅब चालकांना अडविले आहे
-पुण्यातील काही भागात तर पिंपरी चिंचवड च्या वाकडला, तसेच देहूरोड सेंट्रल चौक, जुना पुणे महामार्गावरील सोमाटणे टोल नाका दरम्यान आणि उर्से टोल नाक्यावर आंदोलक कॅब चालकांची अडवणूक
Anchor:
राज्य सरकारकडून ई-बाईक टॅक्सीला दिलेल्या परवानगीविरोधात पुण्यातील बघतोय रिक्षावाला संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात पुण्यातून ५०० कॅब्समधून दोन हजार चालक सहभागी झाले आहेत. ई-बाईकमुळे पारंपरिक रिक्षाचालकांचे उत्पन्न घटण्याची भीती आहे. तसेच अँपवर शासनाने निश्चित केलेले दर न दर्शवता जास्तीचे भाडे आकारले जात असल्याचा आरोप आहे. कंपन्यांना यापूर्वी निवेदने देऊनही दखल न घेतल्याने आता सरकारने कारवाई करावी, अशी संघटनेची मागणी आहे. दरम्यान पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेसह विविध ठिकाणी या सर्व कॅब चालकांना प्रशासनाने अडवले असून पुढे त्यांना सोडलं जात नाही मात्र हे कॅबचालक आपल्या भूमिकेवरती ठाम असून प्रशासनाने आम्हाला सहकार्य न केल्यास आम्ही या मुंबई पुणे महामार्गावरती चक्काजाम आंदोलन करणार असल्याचं या आंदोलनकर्त्यांचे म्हणणं आहे आत्ता सरकारी याबाबत काय भूमिका घेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
0
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 15, 2025 07:06:05Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. लांजा तालुक्याला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. दरम्यान काजळी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने लांजा तालुक्यातील अंजणारी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली गेलं आहे. काजळी नदी पात्रा बाहेर आल्यामुळे दत्त मंदिराच्या परिसरात मोठया प्रमाणात पाणी आहे. रात्रीपासूनच लांजा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे दत्त मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून, दत्त मंदिर परिसरात तीन ते चार फुटांपर्यंत पाणी आहे.
0
Share
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 15, 2025 07:03:50Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Language
Feed on - 2C
--------------------------
Anchor - बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे, संभाजी महाराजांना 16 भाषा येत होत्या असे वक्तव्य राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. काल नांदेड मधील नेताजी सुभाषाचंद्र बोस म्हविद्यालयातील कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. तिसरी भाषा नको म्हणता असा सवालाही हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांना जेव्हढं शिक्षण घेता येतं ते घ्यावे त्यांची बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे असे राज्यपाल बागडे म्हणाले.
Sound Byte - हरिभाऊ बागडे - राज्यपाल राजस्थान
------------------
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 15, 2025 07:03:26Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - चांदोली धरण क्षेत्रात पावसाची पुन्हा दमदार हजेरी,धरणातुन साडेआठ हजार क्यूसेक पाणी सोडण्याचा निर्णय,वारणा नदी काठी सतर्कतेचा इशारा..
अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून उसंती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा दमदार हजेरी लावली आहे.24 तासामध्ये 53 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे.गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे चांदोली धरण 82 टक्के इतकं भरले आहे,तर पुन्हा पावसाचे हजेरी सुरू झाल्याने धरणातून आता पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज सायंकाळी चार वाजल्यानंतर धरणातून वारणा नदीत साडेआठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे असा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
4
Share
Report