Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412106

लोणावळ्यात हुल्लडबाजांना पोलिसांचा चाप, सावधान पर्यटक!

CRCHAITRALI RAJAPURKAR
Aug 14, 2025 02:30:11
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.name : 1408ZT_MAVAL_PARYATAK Total files : 05 Headline : लोणावळ्यात हुल्लडबाजांना चाप, साध्या वेशातील पोलिसांची राहणार गस्त, लॉंग वीकेंडसाठी पोलिसांची कडक नजर Anchor: पर्यटकांनो, लोणावळ्यात येताय तर सावधान! सलग सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी देशभरातील पर्यटक आपल्या परिवारासह; लोणावळ्याकडे येत आहेत.पावसाच्या सरी, डोंगरावरची हिरवाई, धबधब्यांचा आवाज आणि थंडगार हवा या सगळ्याच्या मोहात पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. मात्र, काही बेफाम तरुणाईच्या हुल्लडबाजीमुळे इतरांचा आनंद मातीमोल होऊ नये, यासाठी लोणावळा शहर पोलीस सज्ज झाले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या माहितीनुसार, साध्या वेशातील पोलीस थेट गर्दीत फिरणार असून, लॉंग वीकेंड दरम्यान टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, बाजारपेठ परिसर आणि इतर लोकप्रिय पर्यटनस्थळांवर पोलीसांची करडी नजर ठेवली जाणार आहे. मद्यप्राशन, धोकादायक स्टंट, वाहनांचे अवाजवी हॉर्न व वेगवान ड्रायव्हिंग अशा प्रकारांना पोलिसांचा चाप बसणार आहे. लोणावळा येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी नियमांचे पालन करून, शांततेत व सुरक्षिततेत पर्यटन करावे, अन्यथा थेट पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे... बाईट : राजेश रामाघरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणावळा (file.no.05)
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Aug 14, 2025 09:18:11
Beed, Maharashtra:
बीड : दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पत्नी ज्योती मेटे समाधी स्थळी नतमस्तक... जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर दोन समाजात सामाजिक दुभंग पडलाय : ज्योती मेटे यांची भावनिक प्रतिक्रिया Anc : बीड जिल्ह्यात आज मराठा समाजाचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पत्नी ज्योती मेटे यांनी समाधीस्थळी नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन केले. मराठा आरक्षणाच्या लढ्यामुळे राज्यात निर्माण झालेला सामाजिक दुभंग गंभीर असून, साहेबांच्या अनुपस्थितीची प्रकर्षाने जाणीव होते, असे त्या म्हणाल्या. मेटे साहेब हे असे नेते होते की, एका समाजासाठी लढताना दुसऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेत. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले तरी कामाला गती मिळालेली नाही. हे अधुरं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी शिवसंग्रामसोबतच शासनकर्त्यांचीही आहे. हे काम पूर्णत्वास नेऊनच साहेबांना खरी श्रद्धांजली वाहावी, अशी मागणी त्यांनी केली. बाईट : ज्योती मेटे, विनायक मेटे यांच्या पत्नी
4
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 14, 2025 09:17:59
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- MPSC प्रतिभा सेतू फीड 2C Anc:- केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारने देखील MPSC च्या स्पर्धकांसाठी प्रतिभा सेतू पोर्टल सुरू करावं यासाठी भाजप आमदार विक्रम पाचपुते प्रयत्न करत आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत काही गुणांनी निवड न झालेल्या स्पर्धकांठी प्रतिभा सेतू पोर्टल उपलब्ध करण्यात आलं आहे या पोर्टलच्या माध्यमातून खाजगी कंपन्या थोडक्यात निवड हुकलेल्या टॉपर स्पर्धकांना आपल्या कंपन्यांमध्ये चांगली नौकरी देत आहेत. UPSC प्रमाणेच MPSC च्या विद्यार्थ्यांना देखील प्रतिभा सेतू चा पर्याय उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी आमदार विक्रम पाचपुते यांनी मुख्यमंत्र्यांनी केली असून या बाबत मुख्यमंत्री देझील सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तर MPSC च्या स्पर्धकांना प्रतिभा सेतू सारखा पर्याय मिळाला तर खाजगी क्षेत्राला गुणवत्ता असलेले तरुण मिळतील आणि थोड्या गुणांनी निवड न झालेल्या स्पर्धकांना देखील नौकरी मिळेल अस स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी म्हटलं आहे बाईट:- विक्रम पाचपुते, आमदार भाजप बाईट:- बाळू पवार, MPSC स्पर्धक
2
comment0
Report
GMGANESH MOHALE
Aug 14, 2025 09:16:02
Washim, Maharashtra:
वाशिम: File:1408ZT_WSM_BHARANE_PC3 रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर :राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्याच्या दौऱ्यात शेतकऱ्यांना दिलासा देणारे संकेत दिले आहेत.या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या भूमिकेतून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय प्राधान्याने घेण्यात येतील,असं कृषी मंत्री भरणे यांनी स्पष्ट केलं की, कृषी मंत्री म्हणून राज्यभरातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे ही जबाबदारी आहे. त्यात काही अडचणी आणि आव्हाने असली तरी, त्या अडचणींमधून मार्ग काढण्याचा आणि शेतकऱ्यांना मदत करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल असे भरणे यांनी सांगितले. On भास्कर जाधव. वाद होईल असं कुणीही स्टेटमेंट करू नये. भास्कर जाधव सिनियर लीडर आहेत पण ते काय टेट्स आहे मी बघितलं नाही. On राहुल गांधी याबद्दल मला माहिती नाही. On सूरज चव्हाण अजितदादा,सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचा निर्णय आहे. याबद्दल मला विचारण्या पेक्षा हे तिघे योग्य उत्तर देतील. बाईट: दत्तात्रय भरणे,कृषिमंत्री
1
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 14, 2025 09:03:45
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 8 FILE SLUG NAME -SAT_HSRP_ISSUE सातारा- HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट या नंबर प्लेट ची सक्ती देशभरात करण्यात आली आहे.ही नंबर प्लेट 15 ऑगस्ट पर्यंत बसवण्याचे आदेश देण्यात आले आहे.वाहन चोरी आणि फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने या प्लेट्स अनिवार्य केल्या आहेत. त्यावर विशिष्ट लेझर-कोरलेला कोड, क्रोमियम-आधारित होलोग्राम आणि स्नॅप-लॉक यंत्रणा असते, ज्यामुळे त्यांची बनावट किंवा छेडछाड करणे जवळजवळ अशक्य होते. यामुळे वाहनांची सुरक्षा वाढते आणि चोरी झालेल्या वाहनांचा शोध घेणे अधिक सोपे होते.एकीकडे वाहनांचा सुरक्षितते साठी या नंबर प्लेट सक्ती केली जात असताना साताऱ्यात मात्र या HSRP नंबर प्लेटचीच चोरी होण्याचे प्रकार होत असल्याचे समोर आले आहे.नंबर प्लेट चोरीला गेल्यावर त्याचा गैरवापर होऊ शकतो .त्याच बरोबर जर नव्याने पुन्हा डुप्लिकेट नंबर प्लेट काढायची कशी याबाबत अनेकांना काहीच माहिती नाही त्यामुळे अशा लोकांचा मनात अनेक प्रश्न उपस्थितीत होत आहेत. Byte - सागर घोलप (तक्रारदार) विओ 2- एखादी नंबर प्लेट गहाळ किंवा चोरीला गेली तर नवीन दुसरी नंबर प्लेट मिळू शकते पण त्यासाठीची प्रक्रिया खूप मोठी आहे. Byte - सचिन देवकर - नंबर प्लेट डिस्ट्रीब्यूटर विओ 3- जर वाहनांची HSRP नंबर प्लेट चोरीला गेली तर नागरिकांनी तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी जेणे करून त्याचा गैरवापर केला जाणार नाही असं आवाहन सातारा पोलिस प्रमुखांनी केलं आहे. Byte - तुषार दोशी पोलिस जिल्हा प्रमुख व्हिओ 4- HSRP नंबर प्लेटमुळे वाहनांची सुरक्षा वाढते, पण ती चोरीला गेल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी प्लेट सुरक्षित ठेवावी, चोरी झाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे आणि नियमांनुसार डुप्लिकेट प्लेटची प्रक्रिया पूर्ण करून वाहन पुन्हा सुरक्षित करण्याची गरज आहे. तुषार तपासे झी 24 तास सातारा
7
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 14, 2025 08:51:53
Nashik, Maharashtra:
nsk_varunpc Nashik breaking वरून सरदेसाई Byte points - नाराजीचा विषय नाही आदित्य ठाकरे यांनी यासाठी खूप प्रयत्न केले होते - नवीन सरकार निवडून आले तेव्हा मुख्यमंत्री स्वतः बोलले होते विरोधकांचा मान राखणार - तरी देखील असे होते नाही - गेल्या अनेक वर्षे हा प्रकल्प रखडला होता - *आदित्य ठाकरे यांनी याचा पाठवपूरवा करून काम करून घेतला* - *चांगल्या कंत्राटदार ला सांगून काम करूम घेतले* - आज प्रकल्प पूर्ण होऊन चावी वाटप करण्यात येत आहे - स्थानिक लोकप्रतिनिधी असतात त्यांना अजून काही सांगायचे असेल - ते देखील एक सिस्टीम चे भाग असतात पण त्यांना आज भाषणाची संधी दिली नाही - *माझ्या देखील मतदारसंघात दोन पुलाचे उद्घाटन होणार आहे* - *पत्रिकेत माझं साधं नाव देखील छापण्यात आले नाही* - मी गेल्या तीन महिन्यापासून याकामासाठी पाठपुरावा करत आहे - सभागृहात या कामासाठी मी मुद्दा मांडला होता - पूल तयार होऊन देखील मंत्र्यांचे वेळ मिळत नाही म्हणून उद्घाटन थांबवला - *आगामी महापालिका निवडणुका आहेत त्यामुळे आम्हीच काम केले आणि क्रेडिट घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे* - *आम्ही विरोधक आहे म्हणून आम्हाला डावलण्यात येत आहे* - मी असतो तर अजून काही मुद्दे मांडले असते - वाहूतुक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे यावर देखील उपाययोजना केले पाहिजे On सुरज चव्हाण बढती - तू मारल्या सारखं कर मी राडल्या सारखं करतो अशी परिस्थिती आहे - लोकशाही मार्गाने तटकरे यांचया विरोधात आंदोलन झाला - पत्ते फेकणे अयोग्य की योग्य हा भाग वेगळा आहे - पण त्यात शिवीगाळ झाला नाही - आमच्या प्रदेशाध्यक्ष विरोधात बोलला तर आम्ही तुम्हाला मारू असा संदेश देण्यातच प्रयत्न आहे On ed कारवाई - ज्याचे नातेवाईक आहेत त्यांची प्रतिक्रिया घेतले पाहिजे - शिंदे गटातील नेत्यांचे विडिओ कसे बाहेर येतायत - बेडरूममध्ये मंत्र्यांचे असलेले पैशाचे बॅग,घरी अघोरी पूजा करताना विडिओ कसे येतात - त्यांच्याच मंत्र्यांच्या नातेवाइकांवर ed चे कारवाई कसे होतात त्यांना विचार On नितेश राणे निधी - अजून किती सत्ता पाहिजे तो त्यांचा अंतर्गत विषय आहे - त्यांचे भूक भरणार आहे का नाही On राज ठाकरे - त्यांच भूमिकेशी मी सहमत आहे कोर्टाचे निर्णयाचे पालन केले पाहिजे - धर्माचा विषय यात आणू नये - जैन मुनी यांनी शास्त्राची भाषा केली हे त्यांच्या लोकांना पण आवडले नाहीये - ज्यावेळी धार्मिक स्थळाचे भोंगे काढले तेव्हा कोर्टाच्या निर्णयामुळे काढले अस सरकारने सांगितले - मुस्लीम समाजाने तेव्हा रस्त्यावर उतरून आंदोलन केले का - किव्हा त्यावेळी मुस्लीम संघटना किव्हा एक मौलाना ने आम्ही शस्त्र हातात घेऊन असे म्हणाले असते तेव्हा भाजप मोठा गदारोळ केला असता - जैन समाज त्यानं मतदान करतात म्हणून त्यांच्यावर कारवाई नाही - मुस्लिम समाज मतदान करत नाही म्हणून त्यांच्यावर जबरदस्ती On बोगस मतदार - मला वाटत विरोधीपक्ष आणि जनतेचे डोळे उघडले असतील - आपणच या बाबत आता जवाबदारी घेतली पाहिजे - राहुल गांधी यांनी देखील निवडणूक आयोगाने मृत घोषित लोकांना भेटले आहेत
11
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Aug 14, 2025 08:50:14
Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे शहरातून 1 हजार 111 फूट भव्य तिरंगा ध्वज पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. शहराचे आमदार अनुप अग्रवाल आणि हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने यां तिरंगा यात्रेच आयोजन करण्यात आले. ग्रँड मास्टर शिफुजी शौर्य भारद्वाज यांच्या उपस्थितीत ही तिरंगा यात्रा संपन्न झाली. या तिरंगा यात्रेत हजारो देशभक्त सहभागी झाले होते. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर यां तिरंगा यात्रेमुळे देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यां यात्रेत 1 हजार 111 फुटाची तिरंगा झेंडडा शाळकरी मुलांनी धरला होता. यात माध्यमिक विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी याचबरोबर जेष्ठ नागरिक महिलांचा मोठा सहभाग होता. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त, आमदार, माजी खासदार यांचा यात्रेत सहभाग होता. प्रशांत परदेशी, धुळे.
5
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 14, 2025 08:32:02
Bhandara, Maharashtra:
गोसीखुर्द धरणाला केली तिरंग्याच्या रंगानी विद्युत रोषणाई Anchor :- देश उद्या 79 वा स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे. तर भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाला तिरंग्याच्या रंगानी विद्युत रोषणाई करण्यात आली. रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईमुळे गोसीखुर्द धरणाचं दृश्य पाहण्यासारख आहे...
11
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 14, 2025 08:21:25
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला शहरातील गीता नगर भागात आज पहाटे झालेल्या अपघातात एका शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे..अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक या परिसरातील पूल दुरुस्तीसाठी मागणी करत आहेत, मात्र प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी सोयाबीन आणि तूर बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना, जीर्ण पुलावरून जाताना पिकअप व्हॅन पाण्यात कोसळली..या अपघातात गाडीत असलेले तिघे जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, पूल दुरुस्तीची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.
11
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 14, 2025 08:19:15
Raigad, Maharashtra:
Rgd_rehabilitation स्लग - साखर सुतारवाडीच्या दरडग्रस्त ग्रामस्थांनी रचले सरण पुनर्वसन न झाल्याने स्वातंत्र्यदिनी करणार आत्मदहन ...... अँकर - रायगडच्या पोलादपुर तालुक्यातील साखर सुतारवाडी येथील दरडग्रस्त ग्रामस्थांनी गावात सरण रचून शासनाला आत्मदहनाचा इशारा दिलाय. उद्या स्वातंत्र्य दिनी साखर सुतारवाडीतील हे आपद्ग्रस्त पुर्नवसनासाठी आत्मदहन करणार आहेत. 2021 च्या दरड दुर्घटनेतील दरडग्रस्त साखर सुतारवाडी ग्रामस्थांचे अद्याप पुर्नवसन झालेलं नसल्याने ते आक्रमक झाले आहेत. भाड्याच्या घरात रहाण्याची वेळ आली आहे. वाडीत पक्की घर आहेत पण शासनाने ती धोकादायक जाहीर केल्याने त्या घरात राहता येत नाही. पर्यायाने या 44 कुटुंबांना गेली चार वर्ष भाड्याने घर घेऊन रहाण्याची वेळ आली आहे.शासन पुनर्वसन करीत नसल्याने पुनर्वसनाच्या ठिकाणी सरण रचून आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. बाईट 1 - दरडग्रस्त ग्रामस्थ बाईट 2 - दरडग्रस्त ग्रामस्थ
11
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 14, 2025 08:08:11
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 1408_BHA_FARMER FILE - 5 VIDEO शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थाना समोर शेतकऱ्यांचा आंदोलन होणार होतं.... आज शेतकरी नागपूरला निघालेल्या असताना पोलिसांनी रस्त्यातच शेतकऱ्यांना घेतल ताब्यात..... Anchor : भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवले आहे..... खरिप हंगामात शेतकऱ्यांना शासनाने बोनस जाहीर केलं होत. पण अद्याप पूर्ण शेतकऱ्यांना बोनस मिळाले नाही. तसेच उन्हाळी धानाचे चुकारे शासनाकडे थकीत आहेत व राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा मागण्यांना घेऊन उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुर येथील निवासस्थानासमोर आमरण उपोषण करण्याकरिता शेतकरी निघाले होते. तर सर्व शेतकऱ्यांना पोलिसांनी वाटेत अडवून अटक केली. त्यानंतर शेतकऱ्यांना दिघोरी पोलीस स्टेशन मध्ये नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. तरी पण शेतकऱ्यांनी आम्ही येथेच ठिय्या मांडू अशी भूमिका घेतली आहे... BYTE :- चंद्रशेखर टेंभुर्णे, शेतकरी BYTE :- श्रीहरी भेंडारकर, शेतकरी
14
comment0
Report
SKSACHIN KASABE
Aug 14, 2025 08:08:03
Pandharpur, Maharashtra:
14082025 Slug - PPR_EVM_MORCHA file 01 --- Anchor - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीला सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी मधून सुद्धा पाठिंबा मिळत आहे. ईव्हीएम मशीनद्वारे मतांची चोरी केली असा आरोप करत निवडणूक आयोगाच्या विरोधात टेंभुर्णी मध्ये अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. काळया फीती लावून हे आंदोलन करण्यात आले.
14
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 14, 2025 08:07:55
Shirur, Maharashtra:
Feed 2C Slug: Bhimashankar Vikhe File:01 Rep: Hemant Chapude(Bhimashankar) *भीमाशंकर, पुणे* Slug : श्रावण महिन्यानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भीमाशंकर मंदिराला भेट Anc : श्रावण महिन्यानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिराला भेट देऊन पवित्र शिवलिंगाची विधिवत पूजा केली व आरती केली. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया भिमाशंकर पुणे....
13
comment0
Report
SKShubham Koli
Aug 14, 2025 08:07:21
Thane, Maharashtra:
नुतनीकृत राम गणेश गडकरी रंगायतनचे भव्य लोकार्पण १५ ऑगस्टला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार लोकार्पण, ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांची प्रमुख उपस्थिती मान्यवरांची उपस्थिती सोबत फोकलोक'चे आयोजन ठाणे शहराचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नुतनीकृत वास्तूचा भव्य लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यदिनी, शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात येणार आहे. इमारतीची संपूर्ण स्ट्रक्चरल दुरुस्ती, इमारतीवरील नवीन शेड, नाट्यगृहामधील संपूर्ण नवीन फ्लोअरिंग, रंगमंचाचे नुतनीकरण, नवीन खुर्च्या, नवीन फॉल सिलिंग, नवीन अकॉस्टिक पॅनल, संपूर्ण रंगरंगोटी, नवीन अग्निशमन यंत्रणा, नवीन दरवाजे-खिडक्या, नवीन गालिचा व फर्निचर, समोरील व मागील बाजूच्या दर्शनी बाजूचे सुशोभीकरण, नवीन सुरक्षा केबिन, संपूर्ण वायरिंग आणि विद्युतीकरण नव्याने करणे, नवीन ट्रान्सफॉर्मर व जनरेटर बसविणे, ज्येष्ठ नागरिकांकरिता उद्वाहक (लिफ्ट) बसविणे, रंगमंचावरील लाईट्स व ध्वनी यंत्रणा, नवीन वातानुकूलित यंत्रणा आदी कामे या निधीतून करण्यात आली आहेत याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी
14
comment0
Report
PNPratap Naik1
Aug 14, 2025 08:07:11
Kolhapur, Maharashtra:
Kolhapur कोल्हापुरात बनावट नोटा तयार करणारे टोळीस जेरबंद भारतीय चलनातील 2,24,200/- रूपये किंमतीच्या हुबेहुब बनावट नोटा, 70, 700 /- रुपयांचे बनावट नोटा जप्त बनावट नोटा आणि नोटा तयार करणेस वापरलेले साहित्य असा एकुण 2,94,900/- रुपयांचा मुददेमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. इचलकरंजी परीसरातील नारायण टॉकीज परीसरात बनावट नोटा विक्री करीता आल्यानंतर कारवाई. बनावट नोटा करणाऱ्या एकूण तीन आरोपींना अटक.
13
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 14, 2025 07:34:12
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज स्किप्ट ::- स्मृति दिनानिमित्त विलासराव देशमुख यांना विलास बागेत आदरांजली....देशमुख कुटुंबीय सोबत पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि कार्यकर्ते उपस्थित... AC ::- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा आज १३ वा स्मृतिदिन. या निमित्ताने लातूरच्या बाभळगाव इथल्या विलास बागेत, संपूर्ण देशमुख कुटुंबीय, आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्मृतिस्थळावर आदरांजली आणि वंदन केले आहे. यावेळी मोठ्या संख्येने विलासराव देशमुख यांच्यावर प्रेम करणारे नागरिक जमा झाले आहेत.
13
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top