Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Raigad402305

स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा इशारा, दरडग्रस्त ग्रामस्थांची हताशता!

PPPRAFULLA PAWAR
Aug 14, 2025 08:19:15
Raigad, Maharashtra
Rgd_rehabilitation स्लग - साखर सुतारवाडीच्या दरडग्रस्त ग्रामस्थांनी रचले सरण पुनर्वसन न झाल्याने स्वातंत्र्यदिनी करणार आत्मदहन ...... अँकर - रायगडच्या पोलादपुर तालुक्यातील साखर सुतारवाडी येथील दरडग्रस्त ग्रामस्थांनी गावात सरण रचून शासनाला आत्मदहनाचा इशारा दिलाय. उद्या स्वातंत्र्य दिनी साखर सुतारवाडीतील हे आपद्ग्रस्त पुर्नवसनासाठी आत्मदहन करणार आहेत. 2021 च्या दरड दुर्घटनेतील दरडग्रस्त साखर सुतारवाडी ग्रामस्थांचे अद्याप पुर्नवसन झालेलं नसल्याने ते आक्रमक झाले आहेत. भाड्याच्या घरात रहाण्याची वेळ आली आहे. वाडीत पक्की घर आहेत पण शासनाने ती धोकादायक जाहीर केल्याने त्या घरात राहता येत नाही. पर्यायाने या 44 कुटुंबांना गेली चार वर्ष भाड्याने घर घेऊन रहाण्याची वेळ आली आहे.शासन पुनर्वसन करीत नसल्याने पुनर्वसनाच्या ठिकाणी सरण रचून आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. बाईट 1 - दरडग्रस्त ग्रामस्थ बाईट 2 - दरडग्रस्त ग्रामस्थ
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Aug 14, 2025 11:00:43
Shirdi, Maharashtra:
Sangmner News Flash संजय राऊत बाईट पॉईंटर्स - ऑन फडणविस - मोदी-फडणवीसांची सत्ता जाणारच! राहुल गांधींचे आंदोलन जयप्रकाश नारायणपेक्षा मोठे होणार – संजय राऊत “फसवणुकीच्या माध्यमातून दिल्लीत नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता मिळवली आहे. आता त्यांना ती सत्ता सोडावी लागणार आहे. राहुल गांधींनी सुरू केलेले आंदोलन हे जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापेक्षा निश्चितच मोठे होणार आहे,” अशी आक्रमक टिप्पणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी संगमनेर येथे केली. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. ऑन मतदार घोळ - राऊत म्हणाले, “देशभर मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झालेला आहे. महाराष्ट्रात तब्बल 58 मतदारसंघांमध्ये गोंधळ आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघ यात अपवाद नाही. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी उभे केलेले आंदोलन जनतेच्या हक्कासाठी निर्णायक ठरेल.” ऑन राज ठाकरे - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राऊत म्हणाले, “दिल्लीमध्ये महाविकास आघाडीची चर्चा झाली. कोणत्याही परिस्थितीत मुंबई देशाची राजधानी गुजरातला ‘शिफ्ट’ होता कामा नये यावर काँग्रेससह सर्व पक्ष एकमत झाले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचे स्वागत सर्वत्र होत आहे.” ऑन 15 ऑगस्ट उपवास - 15 ऑगस्ट उपवास आदेशावर टिका करताना राऊत म्हणाले, “मनपा सरकारचे नसते का? 27 महानगरपालिकांत सत्ता फडणविसांच्या हातात आहे. तेच प्रशासक नेमत आहेत, तेच आयुक्त नेमत आहेत. हा निर्णय सरकारचा नाही, असे म्हणणे म्हणजे प्रशासनाची अज्ञानता. 15 ऑगस्ट हा विजय उत्सवाचा दिवस आहे, त्याला धार्मिक उपवासाची जोड देणे योग्य नाही. असे कर्मकांड चालले असते, तर देशालाही स्वातंत्र्य मिळाले नसते.” ऑन नवनाथ बन वारकरी अपमान - भाजपावर हल्लाबोल करताना राऊत म्हणाले, “भाजपाला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंग यांचे साहित्य वाचावे लागेल. देशाला आदेश काढून स्वातंत्र्य मिळाले नाही, तर लढ्याने मिळाले आहे. आमच्या राज्यात वारकरी संप्रदायासह अनेक धार्मिक परंपरा आहेत, त्यांचा सन्मान केला जातो. मात्र, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या लढायांमध्ये मांसाहार दिला जायचा, असा ऐतिहासिक संदर्भ मी दिला होता.” ऑन फडणवीस वक्तव्य - फडणवीसांना थेट टोला देत राऊत म्हणाले, “राज्याचे दोन-तीन वेळा मुख्यमंत्री राहूनही फुटकळ विधाने करू नयेत. मुंबई, कल्याण किंवा कोणतीही महानगरपालिका असो – तुम्ही घेतलेला निर्णय जनतेला पटवून द्यावा.”
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Aug 14, 2025 10:32:30
Nashik, Maharashtra:
Feed send by mozo Reporter-sagar gaikwad Slug-nsk_voice_devendr_pc *नाशिक ब्रेकिंग* - व्हॉइस ऑफ देवेंद्र राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजकांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद - रोहित पवारांनी केलेल्या आरोपात कुठलेही तथ्य नाही - ही स्पर्धा चालूच राहणार पत्रकार परिषदेत आयोजकांकडून खुलासा - ही स्पर्धा पुणे विद्यापीठाकडून आयोजित करण्यात आलेली नाही , तर नाशिक प्रतिष्ठान स्वारंभ फाउंडेशन संस्था अशा तीन संस्था मिळून ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची दिली माहिती - शरद पवारांच्या संस्थेने देखील रंगी दिली आहे आम्हाला स्पर्धेची परवानगी दिल्याची माहिती - ही कुठेही राजकीय हेतूने सुरू केलेली स्पर्धा नाही - शरद पवारांच्या ही नावाने अनेक स्पर्धांचे करण्यात आले आयोजन पुरावे देत पत्रकार परिषदेत करण्यात आला खुलासा *नाशिक - सागर शेलार - आयोजक, व्हॉइस ऑफ देवेंद्र राज्यस्तरीय स्पर्धा* - विकसित महाराष्ट्र ही संकल्पना लोक चळवळ झाली पाहिजे - व्हॉइस ऑफ युथ, पीपल, नेशन असे विषय आहे - म्हणून व्हॉइस ऑफ देवेंद्र ही स्पर्धा आयोजित केली - १७ वर्षात त्यांचे पितृ छत्र हरपले तरी कमी वयात अनेक पदांवर गेले - देवेंद्र फडणवीस यांची कामे आणि वक्तृत्व सर्वांना माहिती आहे - कोणत्याही व्यक्तीचे महिमा मांडण्यात येणार नाही - तर विकसित महाराष्ट्रात काय हवे यासाठी विद्यार्थ्यांची मते जाणून घेतोय - *आमदार असलेला माणूस पांचट विषय का करतोय ?* - *सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ही स्पर्धा आयोजित केलेली नाही* - आम्ही अनेक संस्थांची परवानगी घेतली आहे - *शरद पवारांच्या रयत संस्थेने सुद्धा परवानगी दिली आहे* - बारामतीत सुद्धा परवानगी मिळाली आहे - सर्व सामान्य मुलं ही स्पर्धा आयोजित करत आहे - *रोहित पवारांनी बालिशपणा केला* - विद्यार्थ्यांना महाराष्ट्र कसा हवा यासाठी ही स्पर्धा - त्याचे नाव दिले व्हॉइस ऑफ देवेंद्र - *स्पर्धा होणार आहे, तीन टप्प्यात ही स्पर्धा होणार* - विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे प्रथमेश नाईक - आयोजक - शरद पवार, राहुल गांधी यांच्या नावाने स्पर्धा राबविल्या गेल्या तेव्हा राजकारण होत नाही - त्यांचा हेतू राजकारण करण्याचा आहे - पण विद्यार्थी हाणून पाडतील - विद्यापीठाने परिपत्रक मागे घेतले तरी आम्हाला फरक पडत नाही - यापूर्वी स्पर्धा झाल्या आहेत - तेव्हा शैक्षणिक संकुलात राजकारण होत नाही - रयत शिक्षण संस्थेत शरद पवारांच्या नावाने स्पर्धा होते - तेव्हा शिक्षणाच्या पंढरीचे राजकारण होत नाही का ? - डीपी भोसले कोरेगाव येथे शरद पवारांच्या नावाने स्पर्धा झाली - रोहित पवार यांचे कर्तृत्व नसतांना स्पर्धा झाल्या आहेत - स्पर्धा रद्द झालेली नाही, भव्य दिव्य होणार - स्पर्धेच्या अर्जाची तारीख वाढवली - 15 ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकतील - विद्यार्थी विद्यापीठ आणि शाळेतच सापडतील ना - विद्यार्थी थोडीच डान्सबार मध्ये सापडतात का - म्हणून आम्ही सर्वच विद्यापीठांना पत्रव्यवहार केला होता - त्या विद्यापीठाने पत्रक काढले होते - जबरदस्ती केलेली नव्हती - त्याचे परिपत्रक केवळ सहभागाचे होते - *शरद पवारांच्या संस्थांनीच आम्हाला स्पर्धेसाठी परवानगी दिली* - *नाशिक प्रतिष्ठान, स्वारंभ फाउंडेशन, आयफेलो संस्था असे आम्ही तिन्ही मिळून आयोजक आहोत*
1
comment0
Report
SKSACHIN KASABE
Aug 14, 2025 10:20:28
Pandharpur, Maharashtra:
14082025 Slug - PPR_KORTI_AGITATION file 01 ------ Anchor - करमाळा तालुक्यातील कोर्टी येथील गायरान जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी ग्रामस्थ ह.भ.प. रावसाहेब शेरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे. जोपर्यंत हा सौर ऊर्जा प्रकल्प बंद होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय शेरे यांनी घेतला आहे कोर्टी ग्रामपंचायत ग्रामसभेत ठराव होऊन सुद्धा हा प्रकल्प अद्याप बंद न झाल्यामुळे त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे
3
comment0
Report
SKSACHIN KASABE
Aug 14, 2025 10:19:14
Pandharpur, Maharashtra:
14082025 Slug - PPR_BIKE_RALLY file 01 ------ Anchor - पंढरपूर मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते महसूल ,पोलिस , नगर परिषद, सह पंढरपूर तालुक्यातील सर्व कार्यालयांचे विभागप्रमुख व कार्यालयीन कर्मचारी या तिरंगा बाईक रॅलीत सहभागी झाले होते. ही तिरंगा बाईक रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक चौफाळा नाथ चौक तांबडा मारुती महाद्वार चौक, कालिका देवी चौक ,काळा मारुती, चौफाळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत काढण्यात आली.
7
comment0
Report
SMSATISH MOHITE
Aug 14, 2025 10:18:36
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_PoliceRaid Feed on - 2C ---------------------------- Anchor - स्पा सेंटर च्या नावाखाली वैश्या व्यवसाय सुरु असनाऱ्या ठिकाणावर नांदेड पोलीसांनी छापा मारून अवैध्य धंद्याचा भांडाफोड केला. नांदेड शहरातील सर्वात मोठी आणि वर्दळीची बाजारपेठ असनाऱ्या वजीराबादमधील तरोडेकर मार्केटमध्ये हा प्रकार उघडकीस आला. काही महिन्यांपासून या ठिकाणी फ्युजन स्पा सेंटर सुरु होते. स्पा सेंटरच्या नावाखाली या ठिकाणी वैश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या स्पा सेंटर मध्ये पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. ग्राहकाने खात्री पटल्यावर पोलिसांना संपर्क केला आणि पोलिसांनी छापा मारला. या ठिकाणी दोन युवती आणि दोन ग्राहक आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. या स्पा सेंटर मधून 3 युवती, 1 महिला, 4 पुरुष आणि स्पा सेंटर चालक आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. रात्री उशिरा या प्रकरणी वाजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. Byte - परमेश्वर कदम - पोलीस निरीक्षक ---------------
7
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 14, 2025 10:17:00
Nashik, Maharashtra:
*Breaking... विशाल मोरे, मालेगाव..* - Anc: धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपला मालेगाव शहरातून मिळालेल्या हार नंतर आता भाजपा येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद ,पंचायत समितीच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाली नवतरुणांची मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली तसेच भाजप मालेगाव जिल्हा जम्बो कार्यकारिणीची घोषणा जिल्हाध्यक्ष निलेश कचवे यांनी केली. युवा नेते कमलेश निकम यांची पुन्हा जिल्हा महामंत्रीपदी निवड झाली असून, अनेक वरिष्ठ व नव्या कार्यकर्त्यांना विविध पदांवर संधी देण्यात आली आहे. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर भाजप नाशिक जिल्हा सक्रीय झाला असून त्या पार्श्वभूमीवर बैठका सत्र सुरू करण्यात आले आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाल किती यश मिळते हे बघणं महत्वाचे ठरेल. *बाईट: निलेश कचवे, भाजप जिल्हाध्यक्ष नाशिक*
5
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 14, 2025 10:02:16
Nashik, Maharashtra:
*Breaking... विशाल मोरे, बागलाण ( नाशिक )* Anc: बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथील नागरिक नेहमीप्रमाणे पहाटे मार्निंग वॉकसाठी मुंजवाड येथून खमताणे रस्त्यावर जात असत. आज गुरूवार दि.१४ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास खमताणे रस्त्यावर खमताणेकडून येत असलेल्या चारचाकी वाहनाने रस्त्याच्या बाजूला बसलेले वसंत जाधव यांना धडक देत पुढे पायी चालत असलेल्या सरला जाधव (48) यांना जोरदार पाठीमागून धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर सुनंदा जाधव (52), संगिता जाधव (48), अंजना जाधव (45) आणि वसंत जाधव (58) जखमी झाले आहेत. परिसरातील नागरिकांना अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली. सटाणा पोलीसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. *बाईट: जखमी वसंत जाधव*
10
comment0
Report
PNPratap Naik1
Aug 14, 2025 10:02:01
Kolhapur, Maharashtra:
Kop Shaktipith Andolan Feed :- File Anc :- प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी 15 ऑगस्ट निमित्त शुक्रवारी तिरंगा झळकाऊ शेतात..शक्तीपीठ नको आमच्या वावरात.. या टॅग लाईन खाली शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापुरात शेतात तिरंगा फडवण्याचा अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसचे विधान परिषद मधील गटनेते आमदार सतेज पाटील यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाची सुरुवात भुदरगड तालुक्यातील आकुर्डे इथल्या दौलत शिंदे यांच्या शेतातून होणार आहे. त्यानंतर कागल तालुक्यातील ऐकुंडी या गावात शिवाजी मगदूम यांच्या शेतात तिरंगा फडकावून शक्तीपीठला विरोध केला जाणार आहे तर सकाळी 11 वाजता करवीर तालुक्यातील कोगील बुद्रुक इथल्या गोपाळ पाटील यांच्या शेतात हे अभिनव आंदोलन केलं जाणार आहे.
7
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 14, 2025 09:50:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn cctv accident av Feed by tvu छत्रपती संभाजी नगरमध्ये बुधवारी  सकाळी एका गाडीने रस्त्यावर चालणा-या एका महिलेला उडवले  होते यात ही महिला गंभीर जखमी झाली होती, या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता पुढे आलेले आहे यात ही गाडी या महिलेला पहिले धडक देते आणि त्यानंतर फरफटत नेताना दिसत आहे.. धक्कादायक म्हणजे  या महिलेला रस्त्याच्या बाजूला घेऊन गाडी चालक पसार झाला होता हा सगळा प्रकार खासदार संदिपान भुमरे यांच्या कार्यालयासमोर घडलेला होता सदरील महिलेला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे...
10
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Aug 14, 2025 09:49:21
Palghar, Maharashtra:
Anch - पालघर मध्ये आज मोठ्या उत्साहात हुतात्मा दिन साजरा करण्यात आला . 14 ऑगस्ट 1942 रोजी इंग्रजांविरोधात चाले जाव आंदोलन करणाऱ्या क्रांतिकारांवर पालघर येथे गोळीबार करण्यात आला होता . या गोळीबारात पालघर मधील गोविंद गणेश ठाकूर , काशिनाथ पागधरे, रामप्रसाद भीमाशंकर तिवारी, रामचंद्र महादेव चुरी, आणि सुकुर गोविंंद मोरे या पाच स्वातंत्र्यसैनिकांना हौतात्म्य आलं होत . त्या दिवसापासून 14 ऑगस्ट हा पालघर मध्ये हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो . या दिवशी पालघर मधील बाजारपेठा कडकडीत बंद ठेऊन सदर घटना स्थळी उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्तंभ येथे पालघरकरांकडून या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली जाते . यावेळी पालघर मधील नागरिकांसह , विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून शहीद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केलं जात .
12
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 14, 2025 09:48:59
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1408ZT_JALNA_RAPE_CRIME(4 FILES) जालना : 7 वर्षाच्या चिमुकलीवर 14 वर्षाच्या सख्या चुलत भावाचा अत्याचार नवीन जालना भागात घडलेल्या घटनेनं परिसरात खळबळ सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अँकर : जालन्यात भाऊ - बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आलीय. जालन्यात एका 7 वर्षाच्या चिमुकलीवर 14 वर्षाच्या सख्या चुलत भावानं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जालना शहरातील नवीन जालना भागात ही घटना घडलीय. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन जालना भागात राहत असलेल्या एका 7 वर्षाच्या बालिकेवर तिच्याच 14 वर्षाच्या सख्ख्या चुलत भावाने अत्याचार केल्याची घटना काल रात्री घडली. अत्याचाराची घटना घडल्यानंतर पीडितेला तिचा आईने तातडीने  खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेलं. मात्र,डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवलं. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी ही घटना पोलिसांना कळवून त्या मुलीवर तातडीने उपचार सुरू केले.घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात धाव घेत पीडित मुलगी आणि तिच्या आईचा जवाब घेत तक्रार नोंदवून घेतली आहे. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या चुलत भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पिंक मोबाईल पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, नवीन जालना भागात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बाईट : संदीप भारती, पोलीस निरीक्षक, सदर बाजार पोलीस ठाणे,जालना
14
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 14, 2025 09:34:47
Yavatmal, Maharashtra:
AVB Anchor : यवतमाळ च्या वणी येथील नागरिक चिखलगाव रेल्वे गेट आणि रेल्वे सायडिंग जवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या संथ कामामुळे त्रस्त झाल्याने मनसे नेते राजु उंबरकर यांच्या नेतृत्वात महारेल प्रशासनाविरोधात अभिनव आंदोलन करण्यात आले. मनसैनिक उडानपुलाच्या पिलर वर चढले शिवाय येथील रस्ता देखील रोखून धरला. दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या उडानपुलाच्या कामामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी, चिखल, धुळीचे साम्राज्य आणि सततचे अपघात घडत आहे. कंत्राटदाराने सर्व्हिस रोडचे काम देखील पूर्ण न केल्याने नागरिकांच्या जिवाशी खेळ होत आहे. वारंवार निवेदन देऊनही हा बेजबाबदारपणा सुरु असल्याने वणीकरांच्या सहनशीलतेची परीक्षा घेणाऱ्यांना मनसे आपल्या पद्धतीने उत्तर देईल, असा इशारा राजु उंबरकर यांनी दिला. दरम्यान आंदोलनामुळे वाहतूक ठप्प पडल्याने पोलिसांनी मध्यस्ती करीत कंत्राटदार कंपनी आणि मनसे नेत्यांची बैठक बोलाविण्याचे आश्वासन दिले. बाईट : राजू उंबरकर : मनसे नेते
11
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 14, 2025 09:31:52
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1408ZT_JALNA_OFFER_PKG(30 FILES) जालना :जालन्यात ठाकरे गट सर्वांना हवाहवासा (पॅकेज) अँकर : जालन्यात नगरपरिषदेचं रूपांतर महानगरपालिकेत आधीच झालंय. त्यामुळे महापालिकेचा पहिला महापौर आपल्याच पक्षाचा व्हावा यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले जातायत.मात्र माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी कॉंग्रेस सोडुन भाजपात प्रवेश करताना जालना महानगरपालिका भाजपनं स्वबळावर लढवण्याची ईच्छा व्यक्त केली.त्यामुळे जालना महापालिका ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गटाला सोबत घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबरच भाजपने देखील ऑफर दिलीय.त्यामुळे जालन्यात ठाकरे गट सर्वानाच हवा हवासा झालाय का?.बघूया हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ :1: राज्य पातळीवर भलेही उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात असलेला 36 चा आकडा सर्वांनाच ठाऊक आहे.उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यातही विस्तव जात नाही हे वास्तव आहे.पण येत्या काही महिन्यात पार पडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीमुळे जालन्यातल्या राजकारणात मात्र भलतंच चित्र पाहायला मिळतंय.जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेला प्रचंड महत्व आलंय.जालन्यातील शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाला सोबत येण्याची ऑफर नुकताच भाजप प्रवेश केलेल्या माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी तिरंगा यात्रेच्या निमित्ताने दिलीय.काँग्रेस मधून भाजपात प्रवेश करताना गोरंटयाल यांनी भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याची ईच्छा व्यक्त केली होती.अर्थात अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंटयाल यांच्यात असलेलं राजकीय वैर सर्वांना माहितीय.त्यामुळे खोतकर यांना डिवचण्यासाठी गोरंटयाल यांनी महापालिका निवडणुक स्वबळावर लढवण्याची ईच्छा व्यक्त केल्याचं सांगण्यात येतंय.दरम्यान काल स्वातंत्र्यदिनानिमित्त भाजप कडून शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली.शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे नेते भास्कर आंबेकर यांच्या शांतिनिकेतन शाळेतून या रॅलीला सुरुवात करण्याआधी माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी थेट ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांना भाजपसोबत येण्याची खुली ऑफर देऊन टाकल्यानं चांगलीच खळबळ उडालीय. साऊंड बाईट : कैलास गोरंटयाल,माजी आमदार, (एक 21 सेकंदांचा बाईट आहे.दुसरा 02:17 मिनिटांचा बाईट आहे.यापैकी कोणताही घ्यावा) व्हिओ:०२: गोरंटयाल यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आंबेकर यांना ही खुली ऑफर देण्याआधी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनीही आंबेकर यांना महापालिका निवडणुकीसाठी सोबत येण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला महापालिका निवडणुकीत सोबत घेण्याचा खोतकर यांचा मनसुबा उधळण्यासाठी गोरंटयाल यांनी आंबेकर यांना सोबत येण्याची खुली ऑफर दिल्याच सांगितलं जातंय. दरम्यान आजघडीला आमचा युतीच्याच बाजूने कौल असून परिस्थिती वेगळी उदभवलीच तर वेगळा निर्णय अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली घेऊ असं सांगत ठाकरे गटाला निवडणूकीत सोबत घेण्याचे संकेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी दिलेत. बाईट : भाऊसाहेब घुगे,जिल्हाप्रमुख, शिवसेना शिंदे गट(भगवा शर्ट असलेले) व्हिओ :०३: दरम्यान भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या या ऑफरवर शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी भाष्य केलंय.ठाकरे गट या शहरातील निर्णायक गट आहे.त्यामुळे गोरंटयाल आणि खोतकर या दोघांनाही आम्ही सोबत राहावं असं वाटत असेल मात्र आम्ही कुणाच्या बाजूला न जाता स्वतः महापालिका ताब्यात घेऊ असं सांगत उध्दव ठाकरे सांगतील त्याप्रमाणे निवडणूक लढवू असं आंबेकर यांनी म्हटलंय. बाईट :;भास्कर आंबेकर, जिल्हाप्रमुख शिवसेना उध्दव ठाकरे पक्ष(पांढरा हाफ शर्ट, टक्कल असलेले,बाजूला निळ्या रंगाचा शर्ट घातलेली व्यक्ती आहे) व्हिओ : ०४:याआधी नगरपरिषद असलेल्या जालना नगरपरिषदेचं रूपांतर आता महानगरपालिकेत झालंय.त्यामुळे महापालिकेचा पहिला महापौर आपल्याच पक्षाचा करण्यासाठी सर्वच पक्षांनी आपापल्या पद्धतीने डावपेच खेळायला सुरुवात केलीय.आता वरीष्ठ पातळीवर होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असलं तरी सध्या मात्र महापालिका ताब्यात घेण्यासाठी शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या पक्षाला मोठं महत्व प्राप्त झालंय हे नक्की.
11
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 14, 2025 09:18:11
Beed, Maharashtra:
बीड : दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पत्नी ज्योती मेटे समाधी स्थळी नतमस्तक... जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर दोन समाजात सामाजिक दुभंग पडलाय : ज्योती मेटे यांची भावनिक प्रतिक्रिया Anc : बीड जिल्ह्यात आज मराठा समाजाचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पत्नी ज्योती मेटे यांनी समाधीस्थळी नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन केले. मराठा आरक्षणाच्या लढ्यामुळे राज्यात निर्माण झालेला सामाजिक दुभंग गंभीर असून, साहेबांच्या अनुपस्थितीची प्रकर्षाने जाणीव होते, असे त्या म्हणाल्या. मेटे साहेब हे असे नेते होते की, एका समाजासाठी लढताना दुसऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेत. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले तरी कामाला गती मिळालेली नाही. हे अधुरं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी शिवसंग्रामसोबतच शासनकर्त्यांचीही आहे. हे काम पूर्णत्वास नेऊनच साहेबांना खरी श्रद्धांजली वाहावी, अशी मागणी त्यांनी केली. बाईट : ज्योती मेटे, विनायक मेटे यांच्या पत्नी
14
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 14, 2025 09:17:59
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- MPSC प्रतिभा सेतू फीड 2C Anc:- केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारने देखील MPSC च्या स्पर्धकांसाठी प्रतिभा सेतू पोर्टल सुरू करावं यासाठी भाजप आमदार विक्रम पाचपुते प्रयत्न करत आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत काही गुणांनी निवड न झालेल्या स्पर्धकांठी प्रतिभा सेतू पोर्टल उपलब्ध करण्यात आलं आहे या पोर्टलच्या माध्यमातून खाजगी कंपन्या थोडक्यात निवड हुकलेल्या टॉपर स्पर्धकांना आपल्या कंपन्यांमध्ये चांगली नौकरी देत आहेत. UPSC प्रमाणेच MPSC च्या विद्यार्थ्यांना देखील प्रतिभा सेतू चा पर्याय उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी आमदार विक्रम पाचपुते यांनी मुख्यमंत्र्यांनी केली असून या बाबत मुख्यमंत्री देझील सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तर MPSC च्या स्पर्धकांना प्रतिभा सेतू सारखा पर्याय मिळाला तर खाजगी क्षेत्राला गुणवत्ता असलेले तरुण मिळतील आणि थोड्या गुणांनी निवड न झालेल्या स्पर्धकांना देखील नौकरी मिळेल अस स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी म्हटलं आहे बाईट:- विक्रम पाचपुते, आमदार भाजप बाईट:- बाळू पवार, MPSC स्पर्धक
13
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top