Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

नवनीत राणा ने गरबा में मचाया धमाल, आयुक्त संग की खास पलों की तस्वीरें

ADANIRUDHA DAWALE
Sept 23, 2025 03:33:34
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_RANA_GARBA चार फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 नवनीत राणांचा महापालिका आयुक्त यांच्या सोबत गरबा डान्स; अमरावतीत अंबा महा कुंभ भव्य रास गरबाचे उदघाटन अँकर :- कालपासून नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. नवरात्रोत्सवात राजकीय नेतेमंडळीसुद्धा रमलेले दिसत आहे. अमरावतीच्या माजी खासदार भाजपा नेत्या नवनीत राणा यांना देखील उपस्थित महिलांसोबत गरबा नृत्य खेळण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी नवनीत राणा गरब्याचा आनंद घेताना दिसून आल्या. मोठ्या उत्साहात व जल्लोषात नवनीत राणा यांनी गरबा खेळण्याचा आनंद लुटला. अमरावती शहरात परंपरा ग्रुपच्या वतीने अबा महा कुंभ रास गरबा चे आयोजन करण्यात आले या उद्घाटनाला नवनीत राणा यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी महापालिक आयुक्त सौम्य चांडक यांच्या सोबत गरबा नृत्य केल्याचे पाहायला मिळाले आहे.
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
Sept 23, 2025 05:33:40
Nala Sopara, Maharashtra: Date-23sep2025 Rep- Prathamesh tawade Loc-nalasopara Slug-NALASOPARA BLAST Feed send by 2c Type-AVB Slug- नालासोपाऱ्यात ट्रान्सफॉर्मरचां भीषण स्फोट नालासोपारा पश्चिम डांगेवाडी परिसरातील घटना आगीच्या लोळांमुळे परिसरात एकच खळबळ दोन जण भाजले , रुग्णालयात उपचार सुरू अँकर - नालासोपारा पश्चिमेतील डांगेवाडी परिसरात सोमवारी रात्री महावितरणच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट झाला.भरपावसात झालेल्या या दुर्घटनेत चार वर्षीय चिमुरडी नसरीन परवीन आणि 30 वर्षीय जावेद अन्सारी हे गंभीररीत्या होरपळले. अचानक झालेल्या या स्फोटामुळे परिसरात मोठी धावपळ उडाली. नागरिकांनी तत्काळ जखमींना पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोघांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार दोन्ही जखमी 80 ते 95 टक्के भाजले असून त्यांची स्थिती चिंताजनक आहे. पावसाच्या पाण्यात विद्युत उपकरणे धोकादायक ठरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर महावितरणकडून चौकशी सुरू करण्यात आली असून ट्रान्सफॉर्मर का फुटला याची कारणे शोधली जात आहेत. स्थानिक नागरिकांनी ट्रान्सफॉर्मरच्या देखभालीतील निष्काळजीपणाबद्दल महावितरणकडे तक्रारी केल्या होत्या मात्र महावितरणने नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडला आहे , असा रोष नागरिक व्यक्त करत आहेत... बाईट- स्थानिक
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 23, 2025 05:33:28
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर रेल्वे स्थानकावर भटक्या श्वानांचा वावर ,प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण Anchor  मध्य रेल्वेच्या उल्हासनगर  रेल्वे स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांची संख्या वाढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालय, Vo  ऐन गर्दीच्या वेळी प्लॅटफॉर्मवर तसेच स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ हे श्वान मुक्तपणे फिरताना दिसतात. काही वेळा ते प्रवाशांच्या अगदी जवळ येतात, तर काही फलाटावरील आसनांवर बसून किंवा झोपून राहतात. यामुळे प्रवाशांमध्ये सतत भीतीचे वातावरण निर्माण होते. “कुठे चावतील का?” ही भीती मनात ठेवूनच प्रवास करावा लागतो, अशी प्रवाशांची भावना आहे.प्रशासनाने तात्काळ निर्बीजीकरण करून उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी प्रवासी करत आहेत, चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 23, 2025 05:05:22
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 23, 2025 05:05:11
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरातील सीना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ ( WHATS'UP LIVE ) (((( व्हाट्सअप लाईव्ह दिलेले आहे )))) - सोलापुरातील सीना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ - सीना नदीमध्ये 2 लाख क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू - सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गांवरील लांबोटी जवळील पूल पाण्याखाली जाण्याची परिस्थिती निर्माण झालीय - सीना -कोळेगाव, खासापुरी आणि चांदनी प्रकल्पातून सीना नदीमध्ये सुमारे 2 लाख क्यूसेक पाणी सोडले - सीना नदी पात्रातील माढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावात पाणी शिरले. - सीना नदीच्या प्रवण क्षेत्रामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने सीना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ - धाराशिव, बार्शी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ - सीना नदीवरील बापले, अनगर, मालिकपेठ, आष्टे हे सर्व बंधारे पाण्याखाली - मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 23, 2025 05:01:21
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सीना नदीत सुरु असलेल्या 2 लाख क्यूसेक विसर्गमुळे तिऱ्हे गावातील दगडी पूल पाण्याखाली ( Choupal ) सीना नदीत सुरु असलेल्या 2 लाख क्यूसेक विसर्गमुळे तिऱ्हे गावातील दगडी पूल पाण्याखाली काही वेळापूर्वी दगडी पुलावर पाणी नव्हतं, मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्याने पूल पाण्याखाली खबरदारी म्हणून प्रशासनाने सकाळपासूनचं या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद केलीय सीना नदीच्या काठावरील शेकडो एकर शेती ही पाण्याखाली गेलीय तर उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी, पाकणी, तिऱ्हे, पाथरी, तेलगाव, नंदुर, डोणगाव आणि मोहोळ तालुक्यातील विरवडे, पिरटाकळी, अकोले, शिंगोली-तरटगाव या गावांना पुराचा मोठा फटका 2020 नंतर पुन्हा एकदा सीना नदीला पूर आल्याने शेतकरी चिंतेत चौपाल : ग्रामस्थ आणि शेतकरी....
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 23, 2025 05:01:05
Dhule, Maharashtra:ANCHOR - नवापूर शहरातून वाहणारी रंगवली नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. रंगवली नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याने रंगवली धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून, ओसंडून वाहत आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने 16 हजार क्यूसेकने पाण्याच्या विसर्ग केला जात आहे. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने नदीकाठाच्या गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आलेला आहे. नवापूर तालुक्यासह शेजारील असलेल्या गुजरात राज्यात होत असलेल्या पावसाच्या परिणाम रंगवली नदीच्या पाणी पातळी वाढला आहे. नवापूर तालुक्यात परतीच्या पावसामुळे अनेक शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 23, 2025 05:00:40
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 23, 2025 04:31:01
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव – DHARA_FLOOD_R5 धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. शिवारात चिखल साचला असून अनेक गावांमध्ये घराघरांत पाणी शिरलं आहे. त्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू, धान्य, कपडे वाहून गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गोठ्यात बांधून ठेवलेली जनावरे जागेवर मृत्युमुखी पडली असून शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. जिल्ह्यातील पोराचं हे विदारक चित्र पाहून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील नदी-नाल्यांना महापूर आला आहे. रस्ते वाहून गेले, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावात तर वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिक अंधारात रात्री काढत आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. मात्र अजूनही अनेक कुटुंबे अडकलेली असल्याने भीतीचे वातावरण आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 23, 2025 04:17:46
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला... नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा..... AC ::- लातूर जिल्ह्यात अजूनही अनेक भागात मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे नदी नाली ओसंडून वाहत आहेत. त्यात आता धरण क्षेत्रात ही पावसाचा जोर कायम असल्यामुळे मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाची सहा गेट प्रत्येकी तीन मीटरने उघडण्यात आली असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याच्या विसर्गामुळे लातूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीकाठावरील गावकऱ्यांनी तसेच पूर प्रवण भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या पुरनियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 23, 2025 04:17:06
0
comment0
Report
Advertisement
Back to top