Back
फलटण के किसान मोर्चे ने गोमाते की मान्यता और दामों की मांग तेज की
TTTUSHAR TAPASE
Sept 23, 2025 12:03:39
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE
4 FILES
SLUG NAME -SAT_PHALTAN_MORCHA
सातारा: फलटण येथे रयत क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर जनावरांना घेऊन शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शेतकऱ्यांच्या विविध पाच महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत हे सहभागी झाले होते यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मध्ये देशी गाईला गोमातेचा दर्जा द्यावा.संकरित जनावरे — जर्सी गाई, हॉलस्टिन, जर्सी बैल — यांना गोहत्याच्या बंदी कायद्यापासून वगळावे. गाईच्या दुधाला प्रती लिटर ४० रुपये दर जाहीर करावा.साखरेची आधारभूत किंमत ४० रुपये निश्चित करावी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १ लाख रुपयांचे अनुदान द्यावे. या प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
बाईट - सदाभाऊ खोत
बाईट पॉइंटर
“ परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, कापूस, कडधान्य, ऊस यांसह अनेक पिके उध्वस्त झाली असून शेतीची जमीन सुद्धा खचून गेली आहे. “हाता तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातातून निसटला आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मोठी मदत करावी,” अशी मागणी माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी केली.
खोत म्हणाले की, “शेतकरी देशी गाय विकत नाही, ती लक्ष्मी म्हणून पाळतो. घरात लग्न असेल, संकट असेल, गरिबी असेल तरी देशी गायच शेतकऱ्याला आधार देते. मात्र, जर्सी गाईंची संख्या वाढत चालली असून देशी गाई-म्हशींची संख्या राज्यात चिंताजनकरीत्या घटली आहे. या परिस्थितीचा सखोल अभ्यास सरकारने करणे आवश्यक आहे.”
त्यांनी पुढे राज्यातील गोशाळांचा मुद्दा उपस्थित केला. “गोशाळा जनावर सांभाळण्याच्या लायकीच्या आहेत का? तिथे स्वच्छता आहे का? जनावरांना चारापाणी व्यवस्थित मिळते का? पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या जनावरांचे नेमके काय होते? या सर्व गोष्टींची काटेकोर चौकशी व्हायला हवी,” अशी ठाम मागणी खोत यांनी केली.
यासोबतच त्यांनी गोशाळांवर गंभीर आरोप करताना म्हटलं की, “जेव्हा न्यायालयाचा निकाल लागतो, तेव्हा हे गोशाळेवाले पुन्हा वरच्या कोर्टात वकील लावून का जातात? त्यामागे कोणते स्वार्थ आहेत? सरकारनं अशा बनावट गोशाळांना पाठिंबा देऊ नये. जप्त केलेली जनावरं शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावीत. शेतकऱ्याचं घरटंच खरी गोशाळा आहे, हीच आमची भूमिका आहे,” असे खोत यांनी ठामपणे स्पष्ट केले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowSept 23, 2025 14:22:390
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 23, 2025 13:48:250
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 23, 2025 13:31:110
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 23, 2025 13:30:560
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 23, 2025 13:30:280
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 23, 2025 13:20:240
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 23, 2025 13:07:190
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 23, 2025 13:07:050
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 23, 2025 12:19:252
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 23, 2025 12:19:141
Report
KJKunal Jamdade
FollowSept 23, 2025 12:17:552
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 23, 2025 12:07:330
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 23, 2025 12:07:160
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 23, 2025 12:02:480
Report