Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

मोहोळ की पांढरे वस्ती बाढ़ में डूबीं, ड्रोन कैद कर रहा मंजर

AAABHISHEK ADEPPA
Sept 23, 2025 12:19:25
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - मोहोळ मधील पांढरे वस्तीतील अनेक घरे पाण्याखाली ( DRONE ) *ड्रोन सौजन्य - नागेश राशिनकर* - मोहोळ मधील पांढरे वस्तीतील अनेक घरे पाण्याखाली - पांढरे वस्तीतील भीषण परिस्थिती ड्रोन कॅमेरात कैद - अनेक घरे, जनावरे अक्षरशः पाण्याखाली - खास झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी ड्रोन पायलट नागेश राशिनकर यांनी घेतलेले चित्रीकरण - मोहोळ तालुक्यातील अत्यन्त विदारक परिस्थिती ड्रोन कॅमेऱ्यात कैद *ड्रोन सौजन्य - नागेश राशिनकर*
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Sept 23, 2025 14:22:39
Kalyan, Maharashtra:अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, 8 नराधमांचा घृणास्पद कृत्य Anc..कल्याणमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणात 8 नराधमांनी वेळोवेळी या मुलीवर अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे, यातील एका आरोपीने, जो तिचाच नातेवाईक आहे, त्याने सोशल मीडियावर 'बॉयफ्रेंड देतो' असं सांगून मित्रांकडून हे घृणास्पद कृत्य घडवून आणलं. Vo..हा प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हा पीडित मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर तिच्यावर झालेल्या अत्याचाराची धक्कादायक बाब तिच्या कुटुंबीयांना समजली. तात्काळ मुलीच्या वडिलांनी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेत या नराधमांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला.​पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाई केली. त्यांनी 8 पैकी 7 आरोपींना अटक केली असून, एका आरोपीचा शोध सुरू आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने गाडी आणि मोबाईल जप्तीसह पुढील तपासासाठी या आरोपींना 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील पीडित मुलगी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आहे. या प्रकरणातील आरोपींच्या वकिलांनी पीडित मुलीच्या वयाची चौकशी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पोलिसांच्या पुढील तपासाकडे आणि न्यायालयाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे byte.. हरीश सरोदे फिर्यादी वकील
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 23, 2025 13:31:11
Pandharpur, Maharashtra:23092025 Slug - PPR_SECONDDAY_NAVRAT file 01 ----- Anchor - नवरात्री निमित्ताने प्रथा-परंपरेप्रमाणे दुसऱ्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणी यांना पारंपारिक पोषाख व अलंकार परिधान करण्यात आले. रूक्मिणी मातेस लमाणी पोषाख परिधान करण्यात आला आहे. रूक्मिणी मातेस परिधान केलेले अलंकार: चिंचपेटी, तनमई मोठा, भोर, झेला, ठुशी, लहान सरी, मन्या मोत्याच्या पाटल्या जोड, रूळ जोड, पैंजण जोड, लमाणी नथ, चिंचपेटी तांबडी, जवमानी पदक, पुतळ्यांच्या माळा, तारा मंडळ, कर्णफुले जोड आदी अलंकार. श्री विठ्ठलास परिधान केलेले अलंकार: सोने मुकुट, बालाजी नाम, कौस्तुक मणी, दंडपेट्या जोड, हिऱ्याचा कंगण जोड, मोत्याचा तुरा, शिरपेच, मस्त्य जोड, तोडे जोड, चंद्रहार (पंधरा पदरी), अष्टपैलू मण्याची कठी, पाच पदरी लॉकेट, जवेची माळ सात पदरी, पदकासह लॉकेट इत्यादी पारंपारिक अलंकार. परिधान केले आहेत.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 23, 2025 13:30:28
Parbhani, Maharashtra:feed on whatsapp अँकर - जायकवाडी आणि सिंधफणा धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडल्याने परभणी जिल्ह्यातील अनेक गावात पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावात पुराचे पाणी शिरलय, त्यामुळे गावकरी भीतीच्या सावटाखाली जगात असून प्रशासनाने ग्रामस्थांना सतर्कतेचा ईशारा दिलाय. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी पाथरी तालुक्यातील नाथरा या गावाला भेट देऊन गावात शिरलेल्या पूर परिस्थितीचे पाहणी केली, अनवाणी पायानेच खासदार नाथरा गावात पोहोचले होते,यावेळी खासदार संजय जाधव यांनी एनडीआरएफचे निकष बदलून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी. शिवाय कर्जमाफी करण्याकही ही योग्य वेळ असल्याची मागणी खासदार जाधव यांनी केलीय, त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी 121 संजय जाधव- खासदार
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 23, 2025 13:20:24
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2309ZT_CHP_PROTEST_END ( single file sent on 2C)  टायटल:-- बच्चू कडू यांच्या आंदोलनाची सांगता, हमीभाव आणि कर्जमाफी प्रश्नावर चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाडा येथे केले आंदोलन अँकर:-- स्थानिक तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर खांबाडा येथील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. प्रशासनाच्या वतीने पंधरा दिवसात सोयाबीन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून देण्याचे लिखित आश्वासन देण्यात आले.  प्रशासनाच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी चंद्रपूर-नागपूर महामार्ग मोकळा केला. पंधरा दिवसात प्रशासनाने आश्वासनांची पूर्ती केली नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा शेतकऱ्यानी दिला.  बाईट १) किशोर डुकरे, आंदोलक नेते आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 23, 2025 13:07:05
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_AdiwasiMorcha Feed on - 2C --------------------------- Anchor - एस टी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना आता मूळ आदिवासी समाजही रस्त्यावर उतरलाय. कोणत्याही समजाला एस टी प्रवर्गात आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी आज नांदेड जिल्हयातील किनवटमध्ये आज आदिवासी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. आदिवासी समाज आरक्षण बचाव मोर्चा' या नावाने मोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जमाती मध्ये बंजारा समजाला प्रवेश द्यावा अशी मागणी बंजारा समाजाची आहे मात्र या मागणीला आदिवासी समाजाचा विरोध होत आहे. एसटी प्रवर्गात इतर कोणत्याही जातीला आरक्षण देऊ नये, ​यासोबतच, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या 17 संवर्गातील भरती तात्काळ पूर्ण करावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोच्या संख्येने आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते. Byte - आ. भीमराव केराम ------------
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 23, 2025 12:19:14
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- गुणरत्न सदावर्ते फीड 2C Anc- ॲड.गुणरत्न सदावर्ते यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील रस्त्यांच्या प्रश्नावरून थेट नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सुनावले आहे...जीआर आणि कुणबी नोंदी नंतर शोधा आधी रस्त्यांचे काम करा असं सदावर्ते यांनी म्हंटले आहे... वाहतूकदारांना,नागरिकांना, रस्त्यांचा मोठा त्रास होत असल्यामुळे रस्ते दुरुस्त करा अशी मागणी ॲड.गुणरत्न सदावर्ते यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. बाईट- ॲड.गुणरत्न सदावर्ते Anc- राज्यात झालेल्या पावसामुळे नुकसान हे राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी ॲड.गुणरत्न सदावर्ते यांची सरकारकडे मागणी केलीये...नवरात्र महोत्सव आहे यामुळे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन शेतकऱ्यांना मदत मिळेल यासाठी कामाला लावण्याची ॲड.गुणरत्न सदावर्ते यांची मागणी केलीये बाईट:- ॲड.गुणरत्न सदावर्ते Anc- मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे हे शरद पवार यांच्या हातातील बाहुली असून ते जेवढी चावी देतील तेवढेच बोलणारे आहेत असं म्हणत ॲड.गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केलीये..."जितनी चाबी दे उतना चले खिलौना" असं सदावर्ते यांनी म्हंटलंय. बाईट:- ॲड.गुणरत्न सदावर्ते
1
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 23, 2025 12:17:55
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दणका... राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला स्थगिती... साईबाबा संस्थानवर सहा सदस्यीय समिती नेमणूकीसाठी केली होती शिफारस... अनेक वर्षांपासून साईबाबा संस्थानचा कारभार त्रिसदस्यीय समितीकडे... साई संस्थानवर सहा सदस्यीय समिती नेमणूकीसाठी साई संस्थानने उच्च न्यायालयात शिफारस करण्याचे होते राज्य शासनाचे निर्देश... राज्यसरकारच्या निर्णया विरोधात सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी घेतली होती कोर्टात धाव... आज झालेल्या सुनावणीत साईबाबा संस्थानने घेतली माघार... *संभाजीनगर उच्च न्यायालयात झाली आज सुनावणी...* साई संस्थानने प्रस्ताव माघार घेतल्याने राज्य सरकारला झटका... आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानवर विश्वस्त मंडळ स्थापन होणार का? याकडे लक्ष...
2
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 23, 2025 12:07:16
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- रोहित पवार ऑन सरकार अतिवृष्टी मदत, भोपळा आंदोलन फीड 2C Anc- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हातात भोपळा घेऊन आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना भोपळा दिला असल्याच म्हटलं आहे राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आज झालेल्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय होतील अशी अपेक्षा असताना अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून कसल्याही निर्णय झालेला नाही सरकार कडून आज अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरीव मदत करतील अशी अपेक्षा असताना या प्रश्नाकडे बगल दिली असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे बाईट:- रोहित पवार ,आमदार राष्ट्रवादी SP
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 23, 2025 12:03:39
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 4 FILES SLUG NAME -SAT_PHALTAN_MORCHA सातारा: फलटण येथे रयत क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर जनावरांना घेऊन शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शेतकऱ्यांच्या विविध पाच महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत हे सहभागी झाले होते यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मध्ये देशी गाईला गोमातेचा दर्जा द्यावा.संकरित जनावरे — जर्सी गाई, हॉलस्टिन, जर्सी बैल — यांना गोहत्याच्या बंदी कायद्यापासून वगळावे. गाईच्या दुधाला प्रती लिटर ४० रुपये दर जाहीर करावा.साखरेची आधारभूत किंमत ४० रुपये निश्चित करावी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १ लाख रुपयांचे अनुदान द्यावे. या प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. बाईट - सदाभाऊ खोत बाईट पॉइंटर “ परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, कापूस, कडधान्य, ऊस यांसह अनेक पिके उध्वस्त झाली असून शेतीची जमीन सुद्धा खचून गेली आहे. “हाता तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातातून निसटला आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मोठी मदत करावी,” अशी मागणी माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. खोत म्हणाले की, “शेतकरी देशी गाय विकत नाही, ती लक्ष्मी म्हणून पाळतो. घरात लग्न असेल, संकट असेल, गरिबी असेल तरी देशी गायच शेतकऱ्याला आधार देते. मात्र, जर्सी गाईंची संख्या वाढत चालली असून देशी गाई-म्हशींची संख्या राज्यात चिंताजनकरीत्या घटली आहे. या परिस्थितीचा सखोल अभ्यास सरकारने करणे आवश्यक आहे.” त्यांनी पुढे राज्यातील गोशाळांचा मुद्दा उपस्थित केला. “गोशाळा जनावर सांभाळण्याच्या लायकीच्या आहेत का? तिथे स्वच्छता आहे का? जनावरांना चारापाणी व्यवस्थित मिळते का? पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या जनावरांचे नेमके काय होते? या सर्व गोष्टींची काटेकोर चौकशी व्हायला हवी,” अशी ठाम मागणी खोत यांनी केली. यासोबतच त्यांनी गोशाळांवर गंभीर आरोप करताना म्हटलं की, “जेव्हा न्यायालयाचा निकाल लागतो, तेव्हा हे गोशाळेवाले पुन्हा वरच्या कोर्टात वकील लावून का जातात? त्यामागे कोणते स्वार्थ आहेत? सरकारनं अशा बनावट गोशाळांना पाठिंबा देऊ नये. जप्त केलेली जनावरं शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावीत. शेतकऱ्याचं घरटंच खरी गोशाळा आहे, हीच आमची भूमिका आहे,” असे खोत यांनी ठामपणे स्पष्ट केले.
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top