Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिकरोड करन्सी नोट प्रेस घोटाळा: तरुणावर गुन्हा दाखल!

SGSagar Gaikwad
Jul 14, 2025 10:37:35
Nashik, Maharashtra
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_dcp_byte *नाशिकरोड करन्सी नोट प्रेस घोटाळा; उत्तरप्रदेशमधील तरुणावर गुन्हा दाखल ...* *बनावट प्रमाणपत्र सादर करुन मिळवली नोकरी, परप्रांतीय टोळी सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय...*  अँकर : करन्सी नोट प्रेस नाशिकरोडमध्ये डमी परीक्षार्थी बसवून आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळविल्याचा प्रकार उघडकीस आला असतानाच आता २०२३ मधील पर्यवेक्षक भरतीप्रक्रियेत एका उमेदवाराने बनावट प्रमाणपत्राव्दारे फसवणूक करून नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २१ मार्च २०२३ ते ३ जुलै २०२५ या कालावधीत घडला.  याप्रकरणी करन्सी नोट प्रेस, नाशिकरोडचे उप प्रबंधक विक्रमसिंग सूर्यकांत चौधरी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखाल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित विवेक पनवार पाल सिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बाईट: किशोर काळे, उपायुक्त परिमंडळ - 2.    करन्सी नोट प्रेस नाशिकरोडच्या पर्यवेक्षक पदासाठी २०२३ मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या भरती प्रक्रियेमध्ये संशयित विवेक सिंग याने बनावट वीर बहादूर सिंह पूर्वांचल विश्वविद्यालय, जौनपूर यांच्याकडील प्रमाणपत्र क्रमांक ०१३७३ असे डिप्लोमा इन इंजिनिअरींग (प्रिटींग)चे प्रमाणपत्र बनावटीकरण केले. गैरमार्गाने नोकरी मिळवून पात्र उमेदवारांना वंचित ठेवले व जनता व करन्सी नोट प्रेसची फसवणूक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दाभाडे करीत आहेत.
10
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top