Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ के अरनी में खड्डों के खिलाफ मनसे ने रंगोली से सरकार को चेताया

SRSHRIKANT RAUT
Sept 18, 2025 02:46:14
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ च्या आर्णी शहरात रस्त्यांवरील खड्ड्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोख्या पद्धतीने आंदोलन करून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. खड्ड्याभोवती रांगोळ्या काढून मनसैनिकांनी नगर परिषद प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबासुरक्षित प्रवास नागरिकांना करता येईल अशी मागणी करण्यात आली. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघात वाढले आहे, वाहतूक खोळंबते, शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास होतो याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष् केल्या जात असल्याने मनसेने आगामी आंदोलन तीव्र करण्याचा ईशारा दिला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MNMAYUR NIKAM
Sept 18, 2025 04:32:43
Buldhana, Maharashtra:बुलढाणा .. पुरातून वाट काढत आरोग्य कर्मचारी पोहचले गावात. . नांदुरा तालुक्यातील अवधा बुद्रुक गावात पोहचून दिली सेवा .. नांदुरा तालुक्यातील पूर्णा नदीला पूर .. Anchor - गेल्या तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. नांदुरा तालुक्यातील पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे अवधा बुद्रुक गावाचा संपर्क तुटला असतानाही आरोग्य कर्मचाऱ्यांनी हार मानली नाही. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी पुराच्या पाण्यातून मार्ग काढत गावात प्रवेश केला आणि नागरिकांना आरोग्य सेवा पुरवली. त्यांच्या या धैर्याचे गावकऱ्यांनी आभार मानले. कर्तव्यासाठी पुराच्या पाण्यातून वाट काढणाऱ्या या कर्मचाऱ्यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Sept 18, 2025 04:18:43
Pimpri-Chinchwad, Maharashtra:pimpri hinjwadi kailas puri Pune 18-9-25 feed by 2c Anchor - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीची वाहतूक कोंडी फुटावी यासाठी दोन महिन्यापूर्वी हिंजवडीचा अगदी पहाटेच पाहणे दौरा केला होता. अनेक बैठका ही आयोजित केल्या. त्यानंतर पीएमआरडीए ने अजित पवार यांच्या सूचनेनुसार अनेक भागातील अतिक्रमण काढली. पण ज्या गतीने रस्त्याचे काम सुरू होणं आवश्यक होतं ते सुरू झालं नसून वाहतूक कोंडी जैसे थे आहे. त्यातच सलग पडलेल्या पावसामुळे हिंजवडीतील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्याचाही त्रास आयटीएन्सला होत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या भेटींचा काहीही फायदा झाला नसल्याचे समोर येत आहे....याच सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...! Kailas wkt +vis
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 18, 2025 04:02:45
kolhapur, Maharashtra:2c ला व्हिडिओ आणि फोटो जोडले आहे ------- नागपूर * *नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात बाथरूमचे घाण पाणी शिरले.* * त्यामुळे गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या बाळाचे आरोग्य धोक्यात आले.. या निष्काळजीपणाला कोण जवाबदार? - या वॉर्डमध्ये 26 चिमुकले उपचार घेत होते. असे असताना अतिदक्षता विभागात घाण पाणी शिरल्याने चिमुकल्याचा आरोग्याचा प्रश्न - सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मेडिकलमधील काही वॉर्डचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू * तब्बल नऊ महिन्यापेक्षा अधिक काळ उलटूनही संथ गतीने सुरू,चुकीच्या कामाचा फटका रुग्णांना बसतोय.. * लहान मुलांचे अतिदक्षता विभाग वॉर्ड क्र.25 आणि 26 चे नूतनीकरण सुरू असताना बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बांधकामाचा कचरा दुसऱ्या मजल्यावरून खाली टाकायला सुरुवात केली.. त्यामुळे गटार तुंबल * त्यामुळे वॉर्ड 25 मधील बाथरूमचे घाणेरडे पाणी तुंबून संपूर्ण वॉर्डमध्ये पसरले, पाहता पाहता दुर्गंधी सुटली आणि वॉर्डमध्ये पाणी साचले गेले.... - या घटनेनंतर सफाई कर्मचाऱ्यांनी पाणी काढले, जवळपास दोन तासाच्या प्रयत्नानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.. - *अतिदक्षता विभागासारख्या संवेदनशील ठिकाणी अशी घटना घडल्याने बांधकाम विभागाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे..*
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 18, 2025 04:02:33
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - खाद्य विक्रेत्यांच्या गाड्या समोर कचरा गाड्या लावत हातगाड्या हटवण्याचा अजब प्रकार.. अँकर - सांगलीतल्या प्रतापसिंह उद्यानासमोर असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांच्या गाड्या हटवण्यावरून वाद उफाळून आलाय. उद्यानासमोर असणाऱ्या फुटपात वरील खाद्य विक्रेत्यांच्या गाड्या हटवण्यासाठी महापालिककडुन हातगाड्यांच्या समोर आणि गाड्यांच्या जागेवर कचरा गाड्या लावण्यात येत आहे.त्यामुळे गाडी चालक विरुद्ध महापालिका प्रशासन,असं संघर्ष निर्माण झाला आहे. व्ही वो - सांगली शहरातल्या महापालिका कार्यालया शेजारी असणाऱ्या प्रतापसिंह उद्यान समोरील खाद्य विक्रेत्यांच्या गाड्या काढण्यावरून वाद सुरू झाला आहे. प्रतापसिंह उद्यानाच्या समोर गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे खाद्यपदार्थांच्या गाड्या फुटपाथवर आहेत.विरंगुळा म्हणून प्रतापसिंह उद्यानामध्ये येणाऱ्या नागरिकांकडून या ठिकाणी भेळ,पाणीपुरी अशा वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यात येतो,मात्र पालिका कार्यालया शेजारीच असणाऱ्या उद्यानासमोरील खाद्य पदार्थांच्या गाड्या हटवण्याची मोहीम सुरू केली आहे,मात्र थेट गाड्या हटवण्याऐवजी सांगली महापालिका प्रशासनाकडून एक नामी शकल लढवण्यात आली आहे.ज्या ठिकाणी खाद्य विक्रेत्यांच्या गाड्या लागतात त्याच ठिकाणी किंवा त्याच्या समोर कचरा गाड्या महापालिकेकडून पार्किंग करण्यात येत आहेत.ज्यामुळे ग्राहक येऊ नयेत आणि अपोआप खाद्य विक्रेत्यांचा व्यवसाय बंद पडून हातगाडे हटतील,अशी कल्पना करण्यात आली आहे.मात्र पालिकेच्या या अजब प्रकारामुळे हातगाडी चालक व पालिका प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाला आहे.तर शिवसेना ठाकरे गटाकडून पालिका प्रशासनाच्या अजब कारभाराचा निषेध नोंदवत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. बाईट - शंभूराज काटकर - जिल्हा प्रमुख, शिवसेना ठाकरे गट- सांगली. बाईट - महेश शेट्टी - भेळ विक्रेता - सांगली
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 18, 2025 04:01:39
Kalyan, Maharashtra: शिवसेना शिंदे गट आणि भाजपा मध्ये बॅनर लावण्या वरून राडा. भाजपा ने नवरात्री च्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आल्या होत्या फ्रेम.. फ्रेम वर शिंदे गटाने लावले बॅनर.. कल्याण शहाडमध्ये भाजपच्या फ्रेम वर शिवसेना शिंदे गटाचे नवरात्र शुभेच्छा बॅनर लावल्याने भाजप–शिंदे गटात राडा!.... तीन जखमी" भाजप वॉर्ड अध्यक्ष मोहन कोणकर आणि शिंदे गटाचे माजी नगरसेवक गणेश कोट यांचा मुलगा मुकेश कोट याच्यात झाला राडा तुफान राड्यात भाजपचे मोहन कोणकर, शिंदे गटाचे मुकेश कोट व अन्य एक जण जखमी कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल बाईट : मोहन कोनकर – भाजपा पदाधिकारी बाईट :- मुकेश कोट – ( शिवसेना शिंदे गट माजी नगरसेवकाचा मुलगा)
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 18, 2025 04:01:08
Ratnagiri, Maharashtra:उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात एचएसआरपी बसवण्याच्या मोहिमेत रत्नागिरीकर सर्वात पुढे आहेत. नोंदणीकृत असलेल्या २ लाख ११ हजार ४२३ वाहनांपैकी १ लाख १५ हजार ५३४ बाहनांवर एचएसआरपी नंबर बसवण्यात आल्या आहेत तर २४ हजार ७४ वाहनांनी नंबर प्लेट बुकींग केली आहे. एकंदरीत, एचएसआरपी नंबर प्लेट वसवण्यात रत्नागिरी राज्यात अव्वल ठरला असल्याचं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी सांगितलं. दरम्यान वाहनधारकांनी शेवटच्या वेळी धावपळ न करता त्वरित नंबरप्लेट बसवून घ्यावी, ३० नोव्हेंबरपर्यंत उर्वरित वाहनधारकही एचएसआरपी बसवून घेतील. त्यामुळे मुदतीपूर्वी जिल्ह्यात १०० टक्के काम पूर्ण होईल असा विश्वास करपे यांनी व्यक्त केला आहे..
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 18, 2025 03:49:16
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शीतील 8 मंडळात अतिवृष्टी, चांदणी, भोगावती, नागझरी नद्यांना पूर ( DRONE ) *ड्रोन सौजन्य - नागेश राशिनकर* - सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात 8 मंडळात अतिवृष्टी - चांदणी, भोगावती, नागझरी नद्यांना पूर - पाण्याच्या इतक्या मोठ्या प्रवाहात तरुणांची जीव धोक्यात घालून मासेमारी होत असल्याच ड्रोन कॅमेरात कैद - चांदणी नदीकाठच्या शिवारातील शेकडो पिके आडवी - बार्शीतील चांदणी नदीचे रौद्ररूप खास झी - 24 तासच्या प्रेक्षकांसाठी आपल्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद केलय नागेश राशिनकर यांनी.... - बुधवारी पांगरी, आगळगाव, पानगाव, सौन्दरे अशा चार मंडळात झाली अतिवृष्टी - त्यामुळे आता आणखी जोराचा पाऊस झाला तर बार्शीकरांची चिंता वाढणार आहे *ड्रोन सौजन्य - नागेश राशिनकर*
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 18, 2025 03:49:02
kolhapur, Maharashtra:2c ला फोटो जोडला आहे -------- .नागपूर *नागपुरातील कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील यवतमाळ मधील नेत्याला अटक..* सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार पेनमाचा वेंकटेश्वर (पी.व्ही.) वर्मा ऊर्फ मुन्ना वर्मा (६१) यांच्या आत्महत्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे... एका आरोपीला यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मधून अटक करण्यात आली असून त्याचे नाव शरद मैंद आहे.. ते पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेशी संबंधित असून यवतमाळ मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेतेही आहेत.. शरद मैंद यांच्याशी संबंधित पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतून वर्मा यांनी मोठे कर्ज घेतले होते... तर याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव मंजित वाडे आहे.. मंजीत वाडे अवैध सावकारी करत होता आणि त्याने वर्मा यांना मोठ्या व्याजावर कर्ज देऊन त्याच्या वसुलीसाठी तगादा लगावला होता... ६१ वर्षीय वर्मा यांनी १ सप्टेंबर रोजी सकाळी नागपूर येथील राजनगर परिसरात त्यांच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. विविध कंत्राटी कामांचे त्यांचे कोट्यवधी रुपयांचे बिल सरकार थकल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे तेव्हा समोर आले होते...
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 18, 2025 03:46:55
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_MOJHARI एक फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 अमरावती-नागपूर महामार्गावर मोझरी गुरुकुंज मध्ये मोकाट जनावरांचा महामार्गावरच मुक्काम; IBR प्रशासनाचे मोकाट जनावरांकडे दुर्लक्ष अँकर :– अमरावती-नागपूर महामार्गावर मोझरी गुरुकुंज मध्ये मोकाट जनावरांनी महामार्गावरच मुक्काम ठोकला आहे. मोकाट जनावरे महामार्गाच्या मधोमध सतत बसत असल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना मोठा अडथळा निर्माण होतो. दरम्यान या प्रकाराकडे IBR प्रशासनाचे मोकाट जनावरांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. मोकाट जनावरांमुळे महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून महामार्गावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची वाहन चालकांची मागणी आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 18, 2025 03:46:43
Pandharpur, Maharashtra:file - 03 slug -PPR_CHADCHAN_ROBBERY Anchor - कर्नाटक राज्यातील विजय पुरा जिल्ह्यातील चडचन येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर 16 सप्टेंबर रोजी पडलेल्या दरोड्यात एक कोटी रुपयांच्या आसपास सर्वप्रथम आणि वीस किलो सोने 7 ते 8 दरोडेखोरांनी लुटले याप्रकरणी अद्याप ठोस माहिती उपलब्ध झाली नसली तरी पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असतो याची माहिती मिळत आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चडचण (जि. विजापूर) येथील शाखेत मंगळवारी सायंकाळी पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील काही रक्कम व सोने कर्नाटक पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती मिळत आहे.दरोडेखोरांच्या मोटारीतून जप्त केलेली रक्कम व सोन्याची किंमत किती, हे स्पष्ट झाले नाही. महाराष्ट्र-कर्नाटक पोलिस या दरोड्याची सीमाभागातील गावांमधून कसून चौकशी करत आहेत. लवकरच छडा लावला जाईल, अशी ग्वाही पोलिस सूत्रांनी दिली. या दरोड्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात खळबळ उडाली आहे. लष्करी गणवेशातील दरोडेखोरांनी अवघ्या वीस मिनिटांत कोट्यवधीचे सोने व रोख रक्कम लुटली. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावजवळ दरोडेखोरांनी वापरलेली मोटार मिळून आली होती. तेथील सीमाभागातील गावांमध्ये पोलिस कसून चौकशी करत आहेत. बँक लुटल्यानंतर दरोडेखोरांनी एका गाडीतून ( KA 24 DA 2456 ) चडचण येथून हुलजंती गावाकडे पलायन केले. त्यांच्या गाडीने रस्त्यावरील काही दुचाकींनाही धडक दिली. हुलजंती येथे त्यांनी रस्ता बदलण्याचा प्रयत्न केला, मात्र गावभागातील रस्ता बंद असल्याने त्यांना गाडी थांबवावी लागली. गावकऱ्यांनी पाठलाग करताच दरोडेखोरांनी काही सोने आणि रोकड घेऊन पायीच पळ काढला. ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले होते. दरम्यान, काही नागरिकांनी पोलिसांना तत्काळ याची माहिती दिली होती. यानंतर कर्नाटक महाराष्ट्र पोलिस पथक हुलजंती जवळ सोडलेल्या गाडी परिसरात दाखल झाले होते.पोलिसांनी संशयस्पद मोटारीचा पंचनामा केला. मोटारीत काही सोने, रोख रक्कम, डीव्हीआर मिळून आले. पोलिसांनी सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला. दरोडेखोरांच्या शोधासाठी कर्नाटक व महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्त पथके तैनात केली आहेत
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 18, 2025 03:34:21
Nashik, Maharashtra:feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_kothambir गावठी कोथिंबिर 151 रुपये जुडी अँकर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवारात काल सायंकाळी झालेल्या लिलावात गावठी कोथिंबीर किमान पंधराशे, सरासरी सात हजार, तर सर्वाधिक कोथिंबिरीला पंधरा हजार शंभर रुपये भाव मिळालाय. सर्वाधिक 151 रुपये प्रति जुडी बाजारभाव मिळालाय... भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने हा दर मिळालाय....कृषी उपन्न बाजार समितीत नाशिक तालुक्यातील म्हसरूळ मखमलाबाद, दरी, मातोरी, कळवण, अभोणा, दिंडोरी, वनारवाडी, धोंडेगाव , मुंगसरा, गिरणारे, गोवर्धन, दूगाव, धोंडेगाव, सिन्नर , निफाड, दिंडोरी, पेठ, पालेभाज्याची आवक होत असते. काल रोजी सायंकाळी पालेभाज्या चे लिलाव झाले. शिवांजली कंपनीत पालेभाज्या घेऊन आलेल्या वणी येथील डूबेर वाडी गावातील शेतकरी अवंतिका तानाजी गोफणे या तीनशे गावठी कोथंबीर घेऊन आल्या होत्या. यांच्या गावठी कोथंबीरीस पंधरा हजार शंभर रुपये शेकडा बाजार भाव मिळालाय.
2
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 18, 2025 03:23:36
Nashik, Maharashtra:feed send by TVU 51 reporter-sagar gaikwad slug-nsk_nmc_meting ( काल रात्री गिरीश महाजनांचा बाईट झाला आहे टीव्ही फिफ्टी वन आला आहे तो बाईट वापरा, गिरीश महाजन बाईट slug आहे) *नाशिक ब्रेकिंग* *नाशिक शहर होणार खड्डे मुक्त संपूर्ण शहरात होणार सिमेंटचे रस्ते...* *डांबरे करण्याचे रस्ते दोन ते तीन वर्षे टिकतात यामुळे शहरातील रस्त्यांवर 'व्हाइट टॅपिंग', मनपा गुणवत्ताही सुधारणार...* डांबरीकरण केलेले रस्तेही पावसामुळे उखडून जात आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांचे व्हाइट टॅपिंग करण्यास प्राधान्य दिले जाणार त्यासाठी अतिरिक्त दोन ते तीन हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार असेल तरी चालेल. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून निधी प्राप्त करू.... मंत्री गिरीश महाजनांनी महापालिकेत घेतलेल्या बैठकीनंतर दिली प्रसारमाध्यमांना माहिती.... बाईट-गिरीश महाजन, मंत्री कुंभमेळा
3
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 18, 2025 03:23:14
Beed, Maharashtra:मंत्री पंकजा मुंडे- भाषण पॉइन्टर -बीडमध्ये पत्रकार संघाच्या एका पुरस्कार वितरण सुरुवात त्या बोलत होत्या. - गेले 60-70 वर्ष ज्या रेल्वेची आपण वाट पाहिली.. ती रेल्वे आलेली आहे. - आणि यासाठी सर्वांचे योगदान आहे, अगदी सुरुवातीला केशर काकूंनी रेल्वेची मागणी केली होती. - मुंडे साहेब जेव्हा लोकसभेला निवडून गेले त्यांनी भरभरून निधी मिळवून दिला. - अर्धा खर्च केंद्राने करावा आणि अर्धा तुम्ही द्यावा.. त्यावेळी विलासरावांनी तोंडी मंजुरी दिली. - आज दोघंही हयात राहिले नाहीत. - मी म्हणाले माझ्या बाबांचं स्वप्न अपुर्ण राहीलंय.. तेव्हा मोदींनी बीडमध्ये आल्यावर मंजुरी दिली. - *हा विषय श्रेयाचा नाही स्वप्नांचा विषय आहे. त्या स्वप्नांचं श्रेय कसं घेणार.* - *मुंडे साहेबांनी ते स्वप्न पाहिलं.. आणि प्रीतम ताई दहा वर्षे खासदार होत्या त्यांनी प्रयत्न केले.* - ज्याचं त्याला श्रेय भेटतं आणि त्याचा आनंद वेगळा असतो. - *एखादा व्यक्ती काही करत असेल तर तो मनापासून आत्म्यापासून करतो तर ते लोकांना कळतं.* - *एखादा वर वर देखावा करतो तर तेही लोकांना कळतं.* - जिल्हा परिषद ज्या खात्या अंतर्गत येते त्या खात्याची मी मंत्री झाले आणि तीन लाख शिक्षकांच्या बदल्यांचा ऐतिहासक निर्णय घेतला. - *बिंदू नामावली एका जिल्ह्याची नसते जे लोक बोलतात त्यांना.. बिंदू नामावली राज्याची असते. (आ.धसांना उद्देशुन)* - बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम झालं पाहिजे असं जर आम्ही ठरवलं तर आम्ही 21 दिवस फक्त प्रयत्न करायचे.. कोणाला वाटलं की इथलं फक्त बिलच उचलावं.. इथे बोगस काम करावं.. त्यांनी फक्त 21 दिवस प्रयत्न करायचे.‌. एवढं अवघड नाहीये. - भगवान बाबा म्हणायचे दोन एक्कर विका पण शिका. - आपल्याकडे कमी पैसे आहेत याची लाज नाही.. आपल्याकडे जास्त संस्कार आहेत हि अभिमानाची गोष्ट आहे. - पुढच्या पिढीला आपण पर्यावरणाचे महत्त्व सांगावे हिच अपेक्षा आहे. - महिला छान दिसतात.. आणि मग कार्यक्रम छान दिसतो. - आणि मला पूर्ण विश्वास आहे की सर्व समावेशक जाती धर्माचे लोक कार्यक्रमाला आहेत. हे बघायला मला आवडतं. - माणुसकीचा धर्म हा फार मोठा आहे आणि माणूस ही जात.. - स्वस्थ महिला सशक्त परिवार असा काहीतरी मोदीजींनी आम्हाला नारा दिलेला आहे. - बदलीसाठी मूल्य घ्यायलाच नाही पाहिजे मला पगार आहे मंत्री म्हणून.. हे माझं कर्तव्य आहे. - सरकार माझ्या बापाचं आहे अशा अविर्भावात मी वागले तर ते चुकीचं आहे. - मी पाच वर्ष मंत्री नव्हते तर मी कोणत्याही अधिकाराने नाही बोलले. - आपला बीड जिल्हा खूप चांगला आहे आणि मला आपल्या जिल्ह्याचा खूप अभिमान आहे. - आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी झाली अक्षम्य गुन्हा झालेला आहे. याचं मला खूप-खूप वाईट वाटतं.
0
comment0
Report
SKShubham Koli
Sept 18, 2025 03:21:54
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 18, 2025 03:21:40
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- महादेव कोळी समाजाचे आमरण उपोषण अखेर स्थगित...… पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर घेतला निर्णय..... AC ::- लातूर मध्ये महादेव कोळी समाजाने सुरू केलेले आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या उपोषणाला भेट देऊन मराठवाड्यातील महादेव कोळी समाजाच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून उर्वरित महाराष्ट्रातीलच निकष मराठवाड्यात लागू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर समाजाने उपोषण मागे घेतले. महाराष्ट्रातील इतर भागात एसटी प्रवर्गातील प्रमाणपत्र सहज मिळत असले तरी मराठवाड्यात त्याच समाजाला वेगळे निकष लागू असल्याने प्रमाणपत्रासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर समाजाने आंदोलनांचा मार्ग स्वीकारला होता. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन समाजाच्या अडचणी समजून घेतल्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मराठवाड्यातही तेच निकष लागू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
0
comment0
Report
Advertisement
Back to top